Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2743

Nashik: दिव्यांग मामावर कोयत्यानं वार; त्यानंही मेला नाही म्हणून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं

0
Nashik: दिव्यांग मामावर कोयत्यानं वार; त्यानंही मेला नाही म्हणून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं


मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हरी मेधने (वय, ४१) असे हत्या झालेल्या अंपग व्यक्तीचे नाव आहे. तर, किरण शरद कदम (वय, २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरला मयत आणि आरोपी एकमेकांसोबत दारू प्यायले. त्यावेळी किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने संदीप यांच्यावर कोयत्याने वार केले. मात्र, एवढ्याने संदीप मरणार नसल्याचे समजताच आरोपीने अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर आरोपी आणि त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.



Source link

Naga Chaitanya: नागा चैतन्य करणार दुसऱ्यांदा लग्न? अभिनेत्री नाही तर या मुलीशी करणार लग्न?

0
Naga Chaitanya: नागा चैतन्य करणार दुसऱ्यांदा लग्न? अभिनेत्री नाही तर या मुलीशी करणार लग्न?


नागा आणि समंथा यांची प्रेमकथा देखील मनोरंजन विश्वात प्रचंड चर्चेत आली होती. २००९मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्य यांची भेट झाली होती. ‘या माया चेसावे’ या चित्रपटात नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या दरम्यान दोघेही वेगवगेळ्या व्यक्तींना डेट करत होते. या काळात नागा चैतन्य अभिनेत्री श्रुती हसन हिला डेट करत होता, तर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही अभिनेता सिद्धार्थ याला डेट करत होती. मात्र, दोघांनी देखील याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. मात्र, या चित्रपटा दरम्यान नागा आणि समंथा एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटानंतर दोघे ‘सूर्या’ या चित्रपटात देखील एकत्र झळकले.



Source link

मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पदरात काय पडलं? पाहा संपूर्ण यादी…

0
मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पदरात काय पडलं? पाहा संपूर्ण यादी…


छत्रपती संभाजीनगर: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक झाली, त्या संभाजीनगर जिल्ह्याला या बैठकीत नेमकं काय मिळाले याची देखील चर्चा आहे. तर, या बैठकीत संभाजीनगरसाठी एकूण 15 घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याचा विकास कामात भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या घोषणा? 

  • पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार असून, यासाठी 150 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
  • वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा होणारा असून, यासाठी 1793 हे. क्षेत्र सिंचित होणार आहे. यासाठी 285 कोटी 64 लाखांची घोषणा करण्यात आली आहे.
  • वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखड्यासाठी 156 63 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
  • सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या 45 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली असून, 656.38 कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगरच्या फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानउ भारणार असून, प्रत्येकी 50 कोटी खर्च केले जाणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच, मिल कॉर्नर येथील निवासस्थाने यासाठी 191 कोटी 65 लाखांची घोषणा करण्यात आली आहे.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक 1197 ई-बसेस चालवल्या जाणार असून, यासाठी 421 कोटीस मान्यता देण्यात आली आहे.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार असून, यासाठी 135.61 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
  • राज्यातील 9 राष्ट्रीयमहामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार असून, पुणे– छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 188.19 कोटी खर्च येणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथप्रकल्प केले जाणार असून, यासाठी 10.37 कोटींचा खर्च येणार आहे.
  • केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये 2740.75 कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प, रुपये 275.68 कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प, तर रुपये 2.78 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प, असे एकूण रुपये 3059.21 कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
  • खुलताबाद शहरासाठी रुपये 21.32 कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
  • छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय केले जाणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Cabinet Meeting : नव्या बाटलीत जुनीच दारू, सरकारच्या घोषणांवरून अंबादास दानवेंची टीका



Source link

Dombivli: तुझे तसले फोटो माझ्याकडे, धमकावून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, डोंबिवलीतील घटना!

0
Dombivli: तुझे तसले फोटो माझ्याकडे, धमकावून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, डोंबिवलीतील घटना!



Minor Girl Rape In Dombivli: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात पोस्को कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Aatmapamphlet Trailer: अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

0
Aatmapamphlet Trailer: अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला



Paresh Mokashi Movie: किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर प्रेमकथा सांगणार ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.



Source link

Jalgaon Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, बस दुभाजकाला धडकून उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू

0
Jalgaon Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, बस दुभाजकाला धडकून उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळील वळणावर हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



Source link

Mumbai Local: मुंबईकरांच्या आनंदात भर; गणेशोत्सवात तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसणार!

0
Mumbai Local: मुंबईकरांच्या आनंदात भर; गणेशोत्सवात तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसणार!


यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असून अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याच्या निर्णयाने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मेगा ब्लॉकदरम्यान मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, पालघर, वसई विरार येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, रेल्वेने मंगलप्रभात लोढा यांची विनंती मान्य केल्याने प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.



Source link

Anil Kapoor Son: अनिल कपूरच्या मुलाला ओरडला होता ‘हा’ मराठमोळा अभिनेता, ‘बस झालं आता…’

0
Anil Kapoor Son: अनिल कपूरच्या मुलाला ओरडला होता ‘हा’ मराठमोळा अभिनेता, ‘बस झालं आता…’



Harsh Varrdhan Kapoor: विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘भावेश जोशी’ या चित्रपटात हर्षनर्धन कपूरसोबत एका मराठमोळ्या अभिनेत्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते.



Source link

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधती निघाले हनीमूनला, मालिकेत रोमँटिक वळण

0
Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधती निघाले हनीमूनला, मालिकेत रोमँटिक वळण


आशुतोष आणि अरुंधती त्यांच्या प्रवासाला लागतात. अरुंधती गाडी चालवत असते. त्यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरु असतात. दोघेही मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यासाठी ते लांबच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेताता. दरम्यान, अरुंधतीला भूक लागते. ते नास्ता करण्यासाठी एका धाब्यावर थांबतात. तेथे असलेल्या एका मुलीची मदत करण्यासाठी अरुंधती पुढे सरसावते. पण त्या मुलीला वाचवण्यासाठी काही गुंडे आणि आशुतोष यांच्यामध्ये मारामारी होते. आता या सगळ्यामुळे आशुतोष आणि अरुंधती पुढे हनीमूनला जाणार की परत येणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्त्वाचे निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर!

0
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्त्वाचे निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर!


75th Anniversary of Marathwada Liberation Day: मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या ७५व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात आज (१६ सप्टेंबर २०२३) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर, अमलबजावणी करतो”, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते.



Source link