Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2742

कबीररंग: मेरा मुझ में कुछ नहीं…

0
कबीररंग: मेरा मुझ में कुछ नहीं…


हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणूस समाजात अनेक नातेसंबंधांसह वावरतो. त्याला संपर्कात राहणं, अनेकांशी व्यवहार करणं आवडतं. कधी अपरिहार्यतेतून, तर कधी उपयुक्ततेतून हे व्यवहार घडत असतात. देवघेवीचे असे कितीएक व्यवहार तो शब्दांतून पार पाडतो. माणसाच्या असण्याचा आवाका हा त्याच्या समाजशील वृत्तीतून जन्मला आहे. तो समानशील माणसांच्या सहवासाचा अनुभव घेतो; तसंच स्वभावतः आपल्याहून भिन्न असलेल्या माणसांचाही अनुभव घेतो. आपली सुख-दुःखं आणि क्वचित कधी हृदयाला ओझरता स्पर्शून गेलेला आनंद त्याला दुसऱ्याला सांगावासा वाटतो. तो सांगतोही. त्याचं दुसऱ्याला सांगणं कधी त्याला अनुभवातून मोकळं करतं, तर कधी बांधून टाकतं. अनुभवाचं कथन त्याला बांधून टाकतं तेव्हा तो आंतरिक वेदनेनं एकाकी होतो. हे एकाकीपण निरर्थक नसतं. इथंच त्याच्या हृदयाला अज्ञातातून पुढं-पुढं चालत राहणाऱ्या आध्यात्मिक सांगातीची ओढ वाटू लागते.

माणसाचा दुसऱ्या एका माणसाशी किंवा अनेकांशी असलेला नुसता संपर्क महत्त्वाचा नसतो. अशा संपर्काला बहुतेक वेळा व्यावहारिक उपयुक्ततेची पार्श्वभूमी असते. पण, आपलं असणं केवळ उपयुक्ततेशी जोडलेलं नसतं. अस्तित्व म्हणजे सर्जन असतं. निर्माण करणारा दुसरा कोणीही नसतो, हे ध्यानात येतं तेव्हा भौतिक जगापलीकडल्या व्यवहाराची, संवादाची तातडी तीव्रतेनं जाणवायला लागते. इंद्रियगत सुखांच्या पलीकडंही एक सुख आहे, याची खूण दृष्टीत तरळू लागते. ही खूण केवळ मनाच्या शांततेची मागणी करत नाही. मनाला आता नुसत्या तणावरहित अवस्थेचं आकर्षणही वाटत नाही. हे तरल मन…

कह कबीर आनन्द भयो है

बाजत अनहद ढोल रे…

या चरणाच्या आनंदकंदाला मिटल्या डोळ्यांनी पाहत राहतं. ‘मी’ – ‘तू’पणाचा अनुभव माणूस जन्मभर घेतो. पण त्याला ‘मी’पणाचा अर्थ कळतो का, त्याचा आशय त्याच्या जाणिवेत येतो का? चेतना एकच असते, असे कबीर आपल्या गीत – दोह्यांतून वारंवार सांगतात. पण, आपण त्या चेतनेचे भाग करतो. त्या चेतनेचा एक छोटासा तुकडा आपण जाणिवेत घेतो. त्या तुकड्यात ‘मी’नं गोळा केलेले विशिष्ट आदर्श, नीतिनियम, विविध धर्म, शास्त्रं, सिद्धान्त, गुरू, मंदिरं, पूजा – प्रार्थना असतात. असतेपण या ‘मी’पणापलीकडंही केवढं तरी विस्तारलेलं असतं. ते ‘मी’च्या जाणिवेत येतं का? यावर कबीर उद्गारतात…

मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा,

तेरा तुझकौ सौंपता क्या लागे है मेरा।।

आपलं ‘मी’पण आपल्याला पूर्णपणे जाणवल्याशिवाय या दोह्यांतलं कबीरांचं ‘मी’पण आपल्या ध्यानात येईल का? आपलं ‘मी’पण सदान् कदा भौतिक जगातल्या सुखदायक वस्तूंशी तसंच इंद्रियगत सुखांशी जोडलेलं असतं. मग या ‘मी’ला कबीर म्हणतात त्या.. ‘माझ्याजवळ माझं काही नाही, जे आहे ते सर्व तुझंच आहे,’ या चरणाचा अर्थ कसा उमजेल बरं! कबीरांनी आपल्या ‘मी’ला, आपल्या ‘अहम्”ला ‘तू’शी जोडलं आहे. हा ‘तू’ सद्भाव जागवणारा, बंधनमुक्त करणारा कधी ‘अवधू’, “ठाकूर’, ‘राम’, ‘रहीम’, “साहेब’, “साईं’ , ‘हरि’, ‘प्रभू’, ‘स्वामी’, “संत’, ‘सतगुरू’ आहे, तर कधी ‘पियारा’, “प्रीतम’, “मन’, ‘सिरजनहारा’ आहे. कबीरांच्या ‘मी’ नं या ‘तू’ला परमप्रेमानं आपल्या हृदयात उतरून घेतलंय. कबीरांचा हा प्रेमभाव आपल्या ध्यानात आल्यावर या दोह्याच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ आपल्याला उमजतो. ‘जेव्हा माझं असणंच तुझं आहे; तेव्हा ते तुला अर्पित करताना माझी हानी ती कुठली!’ हा आशय मनात उजेडतो. कबीरांच्या या समरसतेतून ‘मी – तू’पणाचं विसर्जन झालेलं आपल्याला जाणवतं. ही जाणीव आपल्याला भवतीच्या निरर्थक भौतिक आणि दैवी गुंतवळ्यातून बंधनमुक्त जीवनाची दिशा दाखवते.

मेरी मिटी मुक्ता भया, पाया अगम निवास,

अब मेरा दूजा नहीं, एक तुम्हारी आस।।

माझंपण संपून गेलंय. या माझेपणाशिवाय असलेला निव्वळ ‘मी’ आता उरलाय. मी आता ‘आहेपणा’च्या आसऱ्याला आलोय. आता कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीची आस मनी उरली नाहीय. देही – विदेही केवळ संतुष्टी भरून राहिलीय. कबीरांची ही भावस्थिती ‘आनंद भयो है’ सारखी आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांचा ‘मी’ नुसते इच्छेचे आकार धारण करतो. तिच्या पूर्ततेमागे मरेपर्यंत धावतो. इच्छा संपत नाही. ‘मी’पण संपत नाही. आपण स्वत:च निर्माण केलेल्या जगाचा निरोप घेतो. जाणिवेच्या आकाशाला जोडणाऱ्या ‘तू’शी म्हणजेच गुरूंशी, ईश्वराशी आपल्याला मैत्र का साधावं वाटत नाही? अविनाशी आनंदापासून वंचित ठेवणाऱ्या ‘मी’पणाच्या सावलीतच आपण वावरतो. आपल्या खऱ्या ‘मी’चा आनंदस्वरूप ‘तू’शी संवाद व्हावा, हीच तर कबीरांची तळमळ आहे. आणि हा ‘तू’ कुठे बाहेर नाही, तर देवकुळीच्या एकांतात आपल्या जाणिवेत येणारं आपल्या आतलंच चैतन्य आहे. आपल्या आत वास करणाऱ्या चैतन्याची अनुभूती यावी, यासाठी कबीर आपल्याला एक आध्यात्मिक आवाहन करत आहेत…

मैं मेरा घर जालिया, लिया पलीता हाथ,

जो घर जारो आपना, चलो हमारे साथ ।।

मी ‘माझेपणा’चा आसराच नष्ट केलाय आणि आता आसऱ्याचं नाहीपण घेऊन निघालोय. ज्यांना ‘मी’ आणि ‘माझेपणा’चं विसर्जन करायचंय, त्यांनी सोबत यावं. माझंपण संपलेलं ‘मी’पण कबीरांमध्ये आहे. आता शुद्ध अस्तित्वाशिवाय त्यांच्यापाशी काही नाही. कबीर आता निरिच्छ झालेत. फकीर झालेत. इच्छेपल्याडचे अज्ञात जाणून घेऊ पाहणाऱ्यांसाठी केवळ कबीरच ‘तू’ होऊ शकतात. सखासांगाती होऊ शकतात.

संपर्क : ९४०३७६८८९१

hemkiranpatki@gmail.com



Source link

नेटस्ट्रीम: टोबी : नव्या कानडी सिनेमाचा पाइक

0
नेटस्ट्रीम: टोबी : नव्या कानडी सिनेमाचा पाइक


समीर गायकवाड5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कन्नड चित्रपट ‘टोबी’मध्ये पोस्टमार्टेम करणाऱ्या एका मध्यमवयीन तरुणाची गोष्ट आहे. मृत व्यक्तींच्या देहाची चिरफाड करायची, कवटी फोडायची, इकडे तिकडे छेद घ्यायचे आणि नंतर टाके घालायचे, हे त्याचं रोजचं काम. त्याचबरोबर गावात कुणाला गायब व्हायचं असेल किंवा कुणाला चार-आठ दिवस लपून राहायचं असेल, तर टोबी हा महत्त्वाचा माणूस. पडक्या घरामध्ये तो आणि त्याची दहा-अकरा वर्षांची मुलगी- जेनी हे दोघेच राहतात. त्याची जगण्याची अशी मोठी स्वप्नं नाहीत. अपेक्षाही कमी आहेत. एके दिवशी स्टेशनजवळ एका सुंदर मुलीला पाहिल्यावर तिच्याशी लग्न करायचं स्वप्न तो पाहतो. त्याची मुलगीही या गोष्टीला होकार देते. ते स्वप्न पूर्ण होते की नाही, हे सिनेमातच कळेल. पण, या सिनेमाची मुख्य कथा ती नाही.

समाजात आजही बळी देण्याची अनिष्ट प्रथा रूढ आहे. या प्रथेच्या आडून चालणारे शोषण किती खालच्या थरावरचे आहे, मानवी विकार किती खालच्या पातळीचा आहे, हे समोर आणण्यासाठी मेंढ्याला देवाला सोडण्याची नि नंतर त्याची गरज संपल्यावर बळी देण्याची प्रथा इथे प्रतीक म्हणून वापरली आहे. प्राण्याऐवजी आपण सर्रास माणसाचा बळी देत असतो, मात्र त्याचं आपल्याला सोयरसुतक नसतं, कारण मरणारा आपल्या परिघातला नसतो. या सिनेमातील काही दृश्यांत अंगावर शहारे येतात. टोबीच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या आनंद या मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पंचक्रोशीमध्ये सर्वात शक्तिमान आणि श्रीमंत माणूस व्हायचं असतं. त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. मात्र, दुर्दैवाने त्याच्या प्लॅनिंगमध्ये टोबीचा बळी जातो. सर्वांना वाटतं टोबी संपला. परंतु, वास्तव वेगळे असते. तो कसा परत येतो आणि परतल्यावर कसा सूड घेतो, हे पडद्यावर बघणेच इष्ट ठरेल. ‘कांतारा’नंतरचा हा अत्यंत प्रभावी कन्नड चित्रपट आहे. मात्र, याची फारशी चर्चा झाली नाही, कारण कांतारामधील भडकपणा आणि थरार यात नाही. हा चित्रपट सस्पेन्स, भयपटही नाही. समाज आणि शोषक यांचे बुरखे तटस्थतेने फाडत जाणारा, गावजीवनातील जनरीतींचा आणि समाजातील उच्च-नीच भेदभावाचा खरा चेहरा उघडा पाडणारा हा सिनेमा आहे. टोबीमध्ये अनेक प्लॉट पॉइंट आहेत, परिणामी शक्तिशाली क्रिसेंडोमध्ये त्याचे रूपांतर झाले आहे. यातील कथा खरी की खोटी, याविषयी भाष्य कुठे येत नाही. कुमठा नावाच्या एका छोट्याशा गावातील ही गोष्ट. टोबी हा मुका गरीब तरुण. त्याचं काम हिंसक आणि दुष्टपणाचं असलं, तरी त्याचं अंत:करण विशाल आहे. त्याला आवडणारी तरुणी नि त्याची मुलगी यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे. ‘कांतारा’मधील ऋषभ शेट्टीच्या वराह अंगी संचारलेल्या हरी या पात्राची आठवण यावी, असा एक सीन यात आहे, ज्यात टोबी अंगात मेंढा संचारल्यासारखा वागतो. टोबीची ‘आनंद गरुड गमना वृषभ वाहना’ ही स्थिती सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. हा चित्रपट पूर्णत: अभिनेता राज बी. शेट्टीचा आहे. सावित्री, दामोदर, आनंद, जेनी ही सर्व पात्रे पटकथेत अत्यंत गोळीबंद पद्धतीने लिहिली आहेत. सर्वांचे अभिनय अत्यंत कसदार झालेत. परिणामी एखाद्या पॉवर ट्रीपचा अनुभव प्रेक्षकांना येतो. सिनेमाच्या तांत्रिक अंगाचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. विशेषतः सिनेमॅटोग्राफर प्रवीण श्रिया आणि संगीतकार मिथुन मुकुंदन यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पार्श्वसंगीत अत्यंत थरारक आहे. सिनेमाची प्रत्येक फ्रेम देखणी नि बघण्याजोगी झालीय, याचे श्रेय सिनेमॅटोग्राफरला आहे. कन्नड चित्रपटाने कात टाकल्याचे आपण अलीकडे पाहात आहोत. मराठी सिनेमात दशकांच्या अंतराने साचे बदलत गेले, पण त्यामध्येही तोच तोपणा होता. चौकटबंद परीघ मराठी सिनेमा मोडू शकला नाही. अगदीच सुरूवातीला आदर्शवादाचे सिनेमे होते, नंतर तमाशापट येत होते. पुढे बाष्कळ विनोदी सिनेमांचे पेव फुटले. त्यानंतरच्या काळात विविध विषयांवरचे सिनेमे येत गेले, पण सैराट वळता जागतिक स्तरावरती मराठी सिनेमाची दखल घ्यावी, असे ब्लॉक बस्टर सिनेमे मराठीत निर्मिले गेले नाहीत, हे वास्तव आहे. मराठीची शेजारीण असणाऱ्या कानडीने मात्र मोठी भरारी घेतलेली आहे. हे कसे शक्य झाले, यासाठी काय करावे लागले, याचा मराठी चित्रसृष्टीने अभ्यास केला पाहिजे. केजीएफ, कांतारा आणि आताचा टोबी हे तिन्ही चित्रपट कन्नड सिनेमाने कात टाकल्याचे प्रतीक होत. कन्नड सिनेमाने मल्याळी, तमिळ सिनेमापासून प्रेरणा घेत वास्तववादी प्लॉट निवडत सामाजिक, राजकीय भाष्य करताना मौन न स्वीकारता खणखणीत आसूड ओढण्याकडे कल ठेवला, हे विशेष आहे. अत्यंत उच्च आणि दर्जेदार चित्रपटमूल्ये, भव्य-दिव्य निर्मिती आणि वास्तववादी कथा हा मल्याळी सिनेमांचा प्लस पॉइंट कानडीनेही निवडला असल्यास त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. डिस्नी हॉट स्टारवर आलेला टोबी हा त्याच परंपरेतील चित्रपट आहे. तो निराश करत नाही. अर्थात, हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल, असे विधान करणे योग्य नाही. मात्र, ज्यांना सामाजिक विषयावरचे वास्तववादी भाष्य करणारे सिनेमे आवडतात, त्यांना टोबी नक्की आवडेल. वेगळ्या धाटणीचा सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शक बसिल शेलक्कल यांना धन्यवाद दिले पाहिजेत.

संपर्क : ९७६६८३३२८३ sameerbapu@gmail.com



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: आपल्यावर शॉट चित्रीत होण्याच्या अगदी आधीच सतीश कौशिक ओरडू लागले, ‘कट! कट! कट!’

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: आपल्यावर शॉट चित्रीत होण्याच्या अगदी आधीच सतीश कौशिक ओरडू लागले, ‘कट! कट! कट!’


रुमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘साजन चले ससुराल’मध्ये मुत्तू स्वामीच्या भूमिकेत सतीश कौशिक (डावीकडे). 

आम्ही आरे मिल कॉलनीमध्ये शूटिंग करत होतो. डेव्हिड साहेबांनी शॉट लावला होता की, सतीशभाई रस्त्यावर झोपलेले असतात आणि त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर जातो. ट्रॅक्टरची उंची चांगली असल्यामुळे तसा कोणताच धोका नव्हता. आता शॉटसाठी सतीशभाई झोपले आणि डेव्हिड साहेबांनी ‘अॅक्शन’ म्हणताच ट्रॅक्टर सुरू झाले…

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज सतीश कौशिक यांच्याबाबत सांगणार आहे, ज्यांना मी सतीशभाई म्हणत असे. सतीशभाईंशी माझी पहिली भेट मी मुंबईत दाखल होण्यापूर्वी आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी झाली होती. १९८४-८५ मध्ये मी लग्न, कौटुंबिक समारंभासाठी दोन-तीन वेळा मुंबईत आलो होतो. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक भारतीयाची सर्वांत मोठी इच्छा असते की, त्याला तिथं चित्रपटाचं शूटिंग बघायला मिळावं. मी मुंबईत ज्या दोन चित्रपटांचे शूटिंग पाहिलं आणि ज्यामुळं मी प्रभावित झालो, ते होते ‘अल्लाह रक्खा’ आणि ‘मिस्टर इंडिया’. दिनेश राय हे भोपाळचे एक लेखक होते आणि ते मुंबईत राहात होते. मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी सतीश कौशिकही तिथे त्यांना भेटायला आले होते. मला अजूनही आठवतंय त्यांची काळ्या रंगाची फियाट होती. तिचे दरवाजे पुढच्या बाजूने उघडायचे. दिनेश राॅय यांना मी दिनू भैय्या म्हणायचो. मी त्यांना म्हणालो, ‘दिनू भैय्या, मला शूटिंग बघायचंय.’ हे ऐकून सतीश कौशिक स्वत:च म्हणाले, ‘अरे! एक काम कर.. तू वर्सोव्याला या पत्त्यावर ये. तिथं मिस्टर इंडियाचं शूटिंग सुरू आहे. मी ते तुला दाखवेन.’ आणि मी दुसऱ्या दिवशी माझा मोठा भाऊ सलमानला घेऊन तिथं पोहोचलो. अशा तऱ्हेने मी जे पहिले शूटिंग पाहिले, ते ‘मिस्टर इंडिया’चे होते आणि श्रीदेवीनाही पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळी त्यांचा सीन चालू होता. त्यानंतर जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो आणि खूप लांबचा पल्ला पार करत चित्रपटसृष्टीचा एक भाग बनलो, तेव्हा सतीशभाईंसोबत भेटी होत गेल्या. मग आमच्यात एक नवे नाते निर्माण होऊ लागले. ते पुढे वाढत गेले आणि आम्ही खूप जवळचे मित्र बनलो. खूप वर्षांनी मी त्यांना आमच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. मी त्यांना पहिल्यांदा कुठे भेटलो होतो आणि त्यांनीच मला पहिल्यांदा शूटिंग दाखवले होते, हेही सांगितले. पुढे माझा ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट सुरू होत होता. त्यात मुत्तू स्वामी नावाची एक व्यक्तिरेखा होती. हे दक्षिण भारतीय पात्र होते. आधी आम्ही त्यासाठी शक्ती कपूर यांना साइन केले होते. शक्ती कपूर यांच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. त्यांचा विगही तयार झाला होता. सगळी तयारी झाली होती. शूटिंगच्या काही दिवस आधी मी आणि डेव्हिड धवन साहेब सीनवर चर्चा करत बसलो होतो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की, शक्ती कपूर यांचा जो चेहरा, जो रंग आहे, त्यात ते मुत्तू स्वामीसारखे दिसणार नाहीत. खरं तर ते खूप चांगले अभिनेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केले आहे, त्यांच्याशी चांगली मैत्रीही आहे. परंतु, या भूमिकेसाठी सतीश कौशिक जास्त योग्य राहतील, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. त्यामुळे त्या भूमिकेसाठी आम्ही सतीशभाईंना घेतले. यामुळे शक्ती कपूर खूप नाराजदेखील झाले. परंतु, त्याचवेळी ‘कुली नंबर १’ची निर्मितीही सुरू होती. त्यात मामाचे जे पात्र होते, ती भूमिका शक्तीजींना दिली आणि त्यांची नाराजी दूर झाली. आता तुम्हाला सर्वांत मजेदार किस्सा सांगतो. सतीशभाईंचा व्यक्तिगत आयुष्यातील सेन्स ऑफ ह्युमरदेखील कमालीचा होता. पहिल्या दिवशी आम्ही आरे मिल कॉलनीमध्ये शूटिंग करत होतो. सतीश कौशिक यांचादेखील हा पहिलाच दिवस होता. डेव्हिड साहेबांनी शॉट लावला होता की, सतीशभाई रस्त्यावर झोपलेले असतात आणि त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर जातो. ट्रॅक्टरची उंची चांगली असल्यामुळे तसा कोणताच धोका नव्हता. एका फायटरला बसवून सतीशभाईंना त्याची रिहर्सलदेखील दाखवली. आणि आता सतीशभाई झोपले. काही दिवसांपूर्वीच सतीशभाईंचा ‘रूप की रानी, चोरों का राजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो फ्लॉप ठरला होता. तर शॉटसाठी सतीशभाई झोपले आणि डेव्हिड साहेबांनी ‘अॅक्शन’ म्हणताच ट्रॅक्टर सुरू झाला. अचानक सतीश ई उठले आणि ओरडले, ‘कट! कट! कट!’ डेव्हिड साहेबांनी विचारले, ‘काय झालं?’ सतीशभाई म्हणाले, ‘हा जो ट्रॅक्टर चालवणारा आहे त्याला विचारा की, यानं रूप की रानी, चोरो का राजा तर पाहिला नाही ना..?’ डेव्हिड साहेबांनी आश्चर्याने विचारले, ‘का?’ त्यावर सतीशजी म्हणाले, ‘जर त्याने हा चित्रपट पाहिला असेल, तर मी हा शॉट देणार नाही. नाहीतर त्याला असं वाटेल की, याच्यावर ट्रॅक्टर घालण्याची अन् याला चित्रटपसृष्टीतून संपवण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.’ हे ऐकून आम्ही सगळे जोरजोरात हसायला लागलो. असा होता सतीशभाईंचा सेन्स ऑफ ह्यूमर. ‘साजन चले ससुराल’साठी ‘बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल’साठी सतीश कौशिक यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. आज सतीशभाई नाहीत, पण आपल्या आठवणींमध्ये ते कायम जिवंत राहतील. त्यांनी साकारलेल्या भूमिकादेखील अजमरामर राहतील. त्यांच्या स्मरणार्थ परवीन शाकिर यांचा एक शेर…

एक सूरज था की तारों के घराने से उठा,

आँख हैरान है क्या शख़्स ज़माने से उठा।

सतीशभाईंसोबत मी जवळपास १२ चित्रपट केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वादा’ आणि “मुझे कुछ कहना है’चे कथानक मी लिहिले आहे. मी लिहिलेले आणि त्यांनी अभिनय केलेल्या जवळपास सर्व व्यक्तिरेखा आजही संस्मरणीय आहेत, मग तो मुत्तू स्वामी असो, ‘बडे मियॉ-छोटे मियाँ’चा शराफ़त अली असो, ‘दिवाना-मस्ताना’चा पप्पू पेजर असो किंवा ‘हसीना मान जाएगी’चा कुंजबिहारी असो; या सर्व पात्रांनी त्यांना अमर केले आहे. आज सतीश कौशिक दिग्दर्शित ‘मुझे कुछ कहना हैं’ चित्रपटातील हे गाणे ऐका… इस प्यार को मैं क्या नाम दूँ…

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: हरवली आहे!

0
गोष्ट सांगतो ऐका…: हरवली आहे!




गोष्ट सांगतो ऐका…:हरवली आहे!



Source link

लोक-संचित: चित्ती नाही अनुताप…

0
लोक-संचित: चित्ती नाही अनुताप…


प्रवीण दशरथ बांदेकर15 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

फेसबुकवरून ओळख झालेला एक शिक्षक मित्र म्हणाला, ‘मी फार अस्वस्थ आहे मणिपूरच्या त्या घटनेचं कळल्यापासून. राहून राहून मला त्या स्त्रियांच्या जागी माझीच लेक, माझी आई, बहीण दिसतेय. भयंकर सुरू आहे आपल्या देशात. माणसं इतकी कशी सैतान बनल्यासारखी वागू लागलीत, कळत नाहीय..’

मित्र म्हणत होता त्यात काहीच चुकीचं नव्हतं. मित्रच कशाला, त्या घटनेमुळं सगळा देशच अस्वस्थ झाला होता. विचार करणाऱ्या आणि संवेदनशील असलेल्या कुणाही माणसाला धक्का बसेल, अशीच ती घटना होती. देशाचे सर्वेसर्वा असलेले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असलेले बुद्धिजीवी वगैरे फारसे काही प्रतिक्रियादाखल बोलत नसले, तरी सर्वसामान्य माणसं मात्र फेसबुक, व्हाट्स ॲप वगैरेंसारख्या उपलब्ध समाजमाध्यमांना हाताशी धरून व्यक्त होत होती. फेसबुकवरचा माझा मित्रही सतत याविषयी काहीबाही लिहीत आपली अस्वस्थता व्यक्त करत होता. मराठी कवी-लेखक-कलावंत वगैरे अशा घटनांबाबत उदासीन असतात, व्यवस्थेच्या विरोधात जाण्याऐवजी आपल्या लाभस्थानात व्यवस्थेतले राहू-केतूसारखे ग्रह अनुकूल कसे होतील, याचाच ते विचार करत असतात, असा या मित्राचा आरोप होता. यात काही फार चुकीचं होतं, असंही नाही. मराठीच नव्हे, तर काही अपवाद वगळता देशभरातील बहुतांश कवी, लेखक, कलावंत आणि शिक्षक-प्राध्यापकांसारखे पांढरपेशा बुद्धिजीवी लोक आजकाल साधी प्रतिक्रिया नोंदवायलाही मागेपुढे पाहतात, असंच जाणवत असतं. एरवी आपल्या सुरक्षाकवचाच्या आतल्या अन्य कोणत्याही विषयावर मते मांडायला मात्र हे लोक हिरीरीने पुढं असतात.

तशातच शिक्षकांच्या एका व्हाट्स ॲप ग्रुपवरची एक चर्चा वाचनात आली. तिथेही हा शिक्षक मित्र ॲक्टिव्ह होता. मणिपूर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील काही मंडळी एका कृती-कार्यक्रमाची आखणी करीत होते. शालेय शिक्षणमंत्री आमच्याच जिल्ह्यातले असल्याने त्यांनाही सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करणारं एक निवेदन द्यावं, असंही ठरत होतं. आमच्या त्या ग्रुपमधल्या काही शिक्षकांनाही ते योग्य वाटत होतं. पण, अशा निषेध कार्यक्रमांनी काय होणार आहे, नेहमी चमकोगिरी करून कागदी प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे असलेले लोकच यासाठी उतावीळ झालेत, असं अन्य काही शिक्षकांचं म्हणणं होतं. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या त्या ग्रुपवरच्या बाकी सदस्यांविषयी मी समजू शकत होतो. त्यातले बहुसंख्य निव्वळ पोटार्थी शिक्षक होते. पगार, कुटुंब, नोकरीतल्या पाट्या टाकणं, चंगळवादी स्वरूपाची मौजमजा यापरते विश्व नसलेली, कसलेही सामाजिक भान नसलेली ही मंडळी होती. त्यांच्या अशा प्रतिक्रिया येणार, हे मी गृहीतच धरले होते. आश्चर्य वाटावं असं त्यात काही नव्हतं. पण, या चर्चेत शिक्षणमंत्र्यांना ओढू नये, त्यांचा काय संबंध आहे, असं माझ्या या फेसबुकी शिक्षक मित्रानं मांडलेलं मत वाचल्यावर मात्र मला धक्काच बसला. काही महिन्यांमागे कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झालेला राज्य शासनाचा पुरस्कार शासनाकडूनच मागे घेण्यात आला होता, तेव्हाही या शिक्षक मित्राने शासनाची बाजू कशी बरोबरच आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ते आठवलं. खरं तर, तेव्हा या पुस्तकावर कोणत्याही प्रकारची बंदी वगैरे काही नव्हती. तरीही केवळ नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका कार्यकर्त्याने आपले अनुभव यात मांडलेले असल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामागेही या आमच्या शिक्षक मित्रासारख्या काही तथाकथित समाजहितचिंतक लोकांचा दबाव होता, हेही नंतर समोर आले होते. वास्तविक हा निर्णय लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाराच होता. याचा निषेध म्हणून, त्यासोबतच शासकीय पुरस्कार जाहीर झालेल्या काही अन्य लेखकांनीही आपापले पुरस्कार परत केले होते. पण, आधी पुरस्कारासाठी अर्ज करणारे नि आता पुरस्कार परत करणारे हे लोक कसे ढोंगी आहेत, यावरून या मित्राने आमच्याशी वाद घातला होता. म्हणजे कवी-लेखक किंवा शिक्षक-पत्रकारांसारखे बुद्धिजीवी लोक भूमिका घ्यायला कचरतात, व्यवस्थेच्या विरोधात कृती करायला घाबरतात, असेही एकीकडे म्हणायचे आणि कुणी काही भूमिका घेतली, कृतिशील झाला, तरीS त्याला प्रसिद्धीसाठी हे सगळं करतायत म्हणून ट्रोलिंग करत टोचा मारायच्या, असा हा सरळ सरळ दुटप्पीपणा होता.

मला वाटतं, या फेसबुकी विद्वान शिक्षक मित्रासारखे अनेक जण आपल्या अवतीभवती आहेत. एकीकडे ते तुमच्यासोबत वावरताना आपण कसे समाजाप्रति संवेदनशील, जाणीव असलेले आहोत, सर्वसामान्य माणसांचं अस्तित्व संपवू पाहणाऱ्या मुर्दाड व्यवस्थेची आपल्याला कशी चीड आहे, असंच सतत सांगत असतात. पण, त्याच शोषित, पीडित समाज घटकांसाठी काही करू या म्हटलं की हे बिळात लपून राहतात. तिथून कुत्सितपणे तुमच्यावर फूत्कार सोडत नाउमेद करत राहतात. सत्तेतील सरकारच्या विरोधात तर कधी ‘ब्र’सुद्धा काढण्याची तसदी हे लोक घेत नाहीत. तुम्ही तसं करू पाहिलात, तर या त्या मार्गांनी तुमचंही खच्चीकरण करण्याच्या संधी ते शोधत राहतात. अशा आमच्या मित्रांचं हे परस्परविरोधी वर्तन पाहताना मला अनेकदा डॉ. जेकील ॲण्ड मिस्टर हाईड आठवतात. खरं तर, ही एकाच व्यक्तिमत्त्वाची दुभंगलेली प्रतिरूपे. पण, आपल्यातल्या या विसंगतीपूर्ण वर्तनव्यवहाराची जाणीवही नसलेली. आपल्या सोयीप्रमाणे कधी डॉ. जेकीलच्या सज्जन, परोपकारी आणि जगाविषयी दयार्द्र नजरेने पाहणारी, तर कधी मिस्टर जॅकीलच्या पराकोटीच्या हिंसक आणि आतल्या गाठीच्या स्वार्थी वृत्तीने भवतीच्या जगाला वेठीस धरू पाहणारी.

डॉ. हेन्री जेकील आणि मिस्टर एडवर्ड हाईड म्हणजे रॉबर्ट लुईस स्टिव्हनसन्सच्या ‘स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकील ॲण्ड मिस्टर हाईड’ या बहुचर्चित कादंबरीतल्या नायकाची दोन रूपं. काही कारणांनी दुभंगलेलं नायकाचं व्यक्तिमत्व (Split Personality) आणि त्याचं परस्परविरोधी वर्तन किंवा बुचकळ्यात टाकणारी वागण्यातली विसंगती एकवेळ समजून घेता येऊ शकते. याचं कारण म्हणजे, मुळात डॉ. जॅकील ही व्यक्ती अतिशय सद्‍वर्तनी, समंजस आणि जगाच्या भल्याचा विचार करणारी, समाजाचा आदरभाव मिळवून असलेली अशीच असते. वैज्ञानिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बुद्धिमान डॉ. जॅकीलला विज्ञानाची काळी बाजूही जगासमोर आणायची असते. त्यासाठीच स्वतःवरच काही गंभीर प्रयोग करून तो आपल्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या मिस्टर हाईड या सैतानाला बाहेर काढतो. पुढे घडत गेलेल्या गोष्टींवर त्याचं नियंत्रण राहत नाही, त्यातून अनेक भल्याबुऱ्या बाबी जगासमोर येतात वगैरे.. हे आपण समजू शकतो.

आपल्याही व्यक्तिमत्त्वाला असे असंख्य सूक्ष्म कंगोरे असू शकतात. आपल्या आत दुसऱ्याच्या दुःखानं कळवळणारा एखादा मातृहृदयी श्याम असू शकतो, तसाच ‘टू बी ऑर नॉट टू बी’ म्हणत निर्णय घ्यायला कचरणारा डेन्मार्कचा राजपुत्र हॅम्लेटही असू शकतो. वासनांवर नियंत्रण नसलेला ययाति असू शकतो तसा प्रियतमेच्या विरहानं तळमळणारा शापित यक्षही असू शकतो. पण, या सगळ्यांना नियंत्रणात ठेवत स्वतंत्र बुद्धी, प्रज्ञा आणि आपली अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ‘ओळख’ (Identity) असलेलं माणूसपण जपणं आपल्याच हातात असतं. आजकाल आपण नेमकं हेच विसरत चाललो आहोत की काय, असंच राहून राहून वाटतं. आपल्या आत दडून असलेल्या बाकी सगळ्या भल्याबुऱ्या रूपांना डावलून निव्वळ चिमूटभर स्वार्थासाठी आपल्यातल्या सैतानालाच आपल्यावर हावी होण्याची दुर्बुद्धी आपल्याला सुचली असेल, तर त्याला कोण काय करणार? चित्ती नाही अनुताप, लटिके भगवे स्वरूप.. असं वर्तन असलेल्या आमच्या त्या फेसबुकपंडित मित्रासारख्यांसाठीच तुकोबांनी इशारा देऊन ठेवला असावा काय.. तुका म्हणे सिंदळीच्या, व्यर्थ श्रमविसी वाचा?

samwadpravin@gmail.com



Source link

रसिक स्पेशल: मराठवाड्याला विकासाचे झुकते माप मिळेल?

0
रसिक स्पेशल: मराठवाड्याला विकासाचे झुकते माप मिळेल?


डॉ. शिरीष खेडगीकर18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कालापव्यय आणि कागदी घोडे नाचवण्यामुळे आता मराठवाडा विकास मंडळाच्या नावातच फक्त ‘विकास’ राहिला आहे. वैधानिक विकास मंडळांचा मूळ हेतू साध्य होत नसल्याने केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांसाठी लागू असलेली ‘पीएम -डिव्हाइन’ योजनेसारखी तरतूद मराठवाड्यासाठी विशेष बाब म्हणून केली पाहिजे. ईशान्येकडील मागास राज्यांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या २०२२-२३ ते २०२५-२६ पर्यंतच्या कालावधीसाठी १२ हजार ८८२ कोटी निधीची तरतूद केंद्राने या वर्षीच्या प्रारंभीच केली आहे. त्या धर्तीवर भरघोस केंद्रीय अर्थसहाय्याचे झुकते माप मराठवाड्यालाही मिळाले पाहिजे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने, या प्रदेशाच्या विकासातील असमतोलाचा वेध घेणारा हा विशेष लेख…

महाराष्ट्रातील अन्य प्रादेशिक विभागांच्या तुलनेत मराठवाडा सर्वांत मागासलेला विभाग मानण्यात येतो. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाहीच्या अधिपत्याखाली असलेला हा हैदराबाद संस्थानातील प्रदेश नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. निजाम-उल-मुल्क हा औरंगजेबाचा सुभेदार. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दख्खनच्या सुभेदाराची स्वायत्त सत्ता येथे होती. परंतु १८०० मध्ये निजामाने ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले, त्यामुळे निजाम ब्रिटिशांचा गुलाम झाला आणि मराठवाड्यातील जनता गुलामाची गुलाम झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर १९४८ ला, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिन्यांनी झालेल्या ‘ऑपरेशन पोलो’ नामक धाडसी लष्करी कारवाईनंतर या प्रदेशाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्यात मराठवाडा सामील झाला आणि १ मे १९६० नंतर त्याला संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशात स्थान मिळाले. या सामिलीकरणापूर्वी २८ डिसेंबर १९५३ ला ‘नागपूर करार’ झाला. या करारानुसार संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाडा आणि विदर्भ प्रदेशांसाठी विकास निधीचे वाटप लोकसंख्येच्या प्रमाणात होणे अपेक्षित होते. पण, तसे ते झाले नाही. परिणामी या प्रदेशांतील विकासाचा अनुशेष वर्षागणिक वाढत गेला. मराठवाडा आज ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जात आहे.

समन्यायी विकासाचा अनुशेष

१९७२ मधील विद्यार्थी आंदोलनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न वेशीवर टांगले. १९७९ मध्ये गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थापना झाली. १९७३ मध्ये विदर्भातील खासदार वसंत साठे यांनी लोकसभेत संवैधानिक तरतुदीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक मंडळाची मागणी केली. १९७८ मध्ये औरंगाबाद येथील राज्यसभा सदस्य भाऊसाहेब वैशंपायन यांनीही राज्यसभेत पुन:श्च एकवार ही मागणी केली. या मंडळांच्या निर्मितीबद्दल राजकीय नेत्यांमध्ये अनेक मतमतांतरे होती. परिणामी त्यांची स्थापना लांबली. २८ जुलै १९८४ ला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंडळांच्या स्थापनेचा ठराव मंजूर केला. त्यानंतर १० वर्षांनी, १ मे १९९४ ला मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तीन स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात आली. पुढे सहा महिन्यांतच, ऑक्टोबर १९९४ मध्ये या तिन्ही प्रदेशांमध्ये करावयाच्या विकास खर्चाच्या समन्यायी वाटपासाठी राष्ट्रपतींनी राज्यपालांना दिलेल्या निर्देशानुसार संयुक्त अनुशेष समिती स्थापन करण्यात आली. सचिव आणि तिन्ही मंडळांचे प्रत्येकी २ सदस्य असलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांना नेमण्यात आले.

‘वैधानिक’ गेले अन् ‘मंडळ’ उरले

अनुशेष निर्मूलन ही मागास प्रदेशांना विकासाचा सोपान चढण्यासाठी लागणारी पहिली पायरी समजली जाते. जुलै १९९५ मध्ये कुलकर्णी समितीचा अहवाल राज्यपालांना सादर झाला. परंतु, ऑक्टोबर १९९५ मध्ये राज्यपालांनी या समितीच्या सदस्यांची संख्या ७ वरून २२ केली. भुजंगराव कुलकर्णी यांनाच या नवीन समितीचे निमंत्रक करण्यात आले. १९९७ च्या जुलै महिन्यात या समितीचा पहिला अहवाल राज्यपालांना सादर झाला. त्यानंतर आणखी एक फेरअहवाल सप्टेंबर २००० मध्ये सादर झाला. शेवटी १४ महिन्यांनंतर, १५ डिसेंबर २००१ ला विकासनिधीच्या समन्यायी वाटपाचा घटनात्मक आदेश राज्यपालांनी जारी केला. मात्र, त्यानंतरही विदर्भ आणि मराठवाड्याच्या आर्थिक तरतुदी उर्वरित महाराष्ट्राकडे वर्ग होत राहिल्या. याचे कारण पश्चिम महाराष्ट्रातील ताकदवान राजकीय नेत्यांचा दबाब हेच होते. मराठवाड्याला मंडळाकडून फारसे अनुदान मिळत नव्हते. २०१८ पासून २०२१ पर्यंत मंडळाकडून मराठवाड्यासाठी फक्त ५० कोटी रुपये मिळाले. ते देखील सरकारी योजनांच्या वार्षिक तरतुदी वाढवून देण्यात खर्ची पडले. २००८ पासून २०१८ पर्यंत मंडळाला अध्यक्षच नव्हते. मंडळाच्या अनुशेष समित्यांच्या अहवालावर एका वर्षाचा अपवाद वगळता विधिमंडळात चर्चा झालीच नाही. ५ सप्टेंबर २०११ ला सुधारित राजपत्र काढून राज्यपालांनी या मंडळाचे नामकरण ‘मराठवाडा विकास मंडळ’ असे करीत त्यामधील ‘वैधानिक’ शब्द काढून टाकण्यात आला.

सिंचनाच्या सुविधांकडे दुर्लक्ष

सुमारे ६४ हजार ५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या आणि सव्वादोन कोटी लोकसंख्येच्या मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण ६५ टक्के आहे. मराठवाड्यातील ८३ टक्के जमीन ओलिताखाली नाही. २०१३ मधील केळकर समितीच्या अहवालानुसार, या प्रदेशातील विविध क्षेत्रांमधील मागासलेपण १० टक्के ते ९८ टक्के आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत येथील दरडोई उत्पन्न ४० टक्के कमी आहे. वनक्षेत्रसुद्धा खूपच कमी आहे. त्यामुळे हा अवर्षणप्रवण आणि अति पाणीतुटीचा प्रदेश आहे. अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे या प्रदेशातील जलाशये अपेक्षित प्रमाणात भरत नाहीत. मराठवाड्यात गेल्या काही दशकांपासून तीव्र किंवा अति तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असतोच, असा आयआयटी मंुबईचा अहवाल आहे. दुसरीकडे, शेतीसोबतच पिण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी आणि उद्योग-धंद्यांसाठी पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी-प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी शेती उत्पादन वाढले पाहिजे. त्यासाठी सिंचन सुविधांमध्ये वाढ व्हायला हवी. सिंचनाच्या आणि जलवितरणाच्या व्यवस्था अधूनमधून नादुरुस्त झाल्यामुळे लाभक्षेत्राच्या पायथ्यापर्यंत पाणी जात नाही. या स्थितीमुळे समतोल विकासाच्या दृष्टीने पाणी परिवहनासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे.

खालावलेला मानव विकास निर्देशांक

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (यूएनडीपी) ही संघटना मानव विकास निर्देशांक, मानव दारिद्र्य निर्देशांक आणि मानव वंचितता निर्देशांक काढून त्या त्या प्रदेशातील जनतेच्या राहणीमानाचा स्तर ठरवते. या तिन्ही निर्देशांकावर आधारित अभ्यासानुसार , अल्प मानव विकास गटात मराठवाड्यातील ८ पैकी ५ जिल्हे आहेत. केवळ छ. संभाजीनगर जिल्ह्याचा उच्च मानव विकास गटात समावेश होतो. अन्य मागास जिल्ह्यांतील जनतेचे गुणात्मक जीवनमान निकृष्ट दर्जाचे आहे. दरडोई उत्पन्नाची राज्याची सरासरी १ लाख ८४ हजार ५८२ रूपये आहे. मराठवाड्यातील दरडोई उत्पन्नाचा आकडा १ लाख ३१ हजार ३२८ रूपये आहे. राज्यांतील एकूण औद्योगिक गुंतवणुकीत मराठवाड्याचा हिस्सा १० टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील फक्त १५ टक्के कारखाने मराठवाड्यात आहेत. त्यापैकी बहुसंख्य छ. संभाजीनगर शहराच्या आजूबाजूलाच आहेत.

हा प्रदेश निजामाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे प्रारंभापासून सर्व क्षेत्रांत मागास राहिला. राज्यातील उर्वरित भागावरील ब्रिटिश राजवटीमुळे पारतंत्र्यात असूनही तेथे अनेक सुविधा ब्रिटिशांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. कालापव्यय आणि कागदी घोडे नाचवण्यामुळे आता मंडळाच्या नावातच फक्त “विकास’ शब्द राहिला आहे. त्यामुळे काही पर्याय सुचवणे आवश्यक आहे. वैधानिक विकास मंडळांचा मूळ हेतू साध्य होत नसल्यामुळे केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांसाठी लागू असलेली ‘पीएम -डिव्हाइन’ योजनेसारखी तरतूद मराठवाड्यासाठी विशेष बाब म्हणून केली पाहिजे. ईशान्येकडील मागास राज्यांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या २०२२-२३ पासून २०२५-२६ पर्यंतच्या कालावधीसाठी १२ हजार ८८२ कोटी निधीची तरतूद केंद्र सरकारने या वर्षीच्या प्रारंभीच केली आहे. मराठवाड्याच्या पदरात विकासाबाबत आजवर पडलेल्या मापातील पापाचे परिमार्जन व्हायला हवे. त्यासाठी मुक्तिसंग्रामाच्या या अमृत महोत्सवी वर्षात भरघोस केंद्रीय अर्थसहाय्याचे झुकते माप मराठवाड्याला मिळाले पाहिजे.

संपर्क : ९८५००५५४४५

shirish_khedgikar@yahoo.co.in



Source link

हैदराबाद संस्थान भारतात विलीन, प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म; आज इतिहासात…

0
हैदराबाद संस्थान भारतात विलीन, प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म; आज इतिहासात…


17th September In History : आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. भारतीय सैन्यासमोर निजामाने शरणागती पत्करली. समाजसुधारक पेरियार रामसामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. 

जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day) 

जागतिक स्तरावर 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सर्वात प्रथम 17 सप्टेंबर 2019 रोजी WHOने आपल्या ठरावावर साजरा करण्याची मान्यता दिली. 25 मे 2019 रोजी 72 व्या जागतिक आरोग्य संमेलनात हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस जागतिक रूग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

1879 : पेरियार ई.व्ही. रामसामी यांचा जन्म 

द्राविड चळवळीचे पुरस्कर्ते, समाज प्रबोधनकार पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी अर्थात पेरियार ई. व्ही. रामासामी यांचा आज जन्मदिन. पेरियार हे  विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवणारे क्रांतीकारक म्हणून पेरियार यांची ओळख आहे. पेरियार यांच्या विचारांचा पगडा तामिळनाडूमध्ये आजही दिसून येतो. 

पेरियार यांचा जन्म एका धार्मिक हिंदू कुटुंबात झाला होता.  काशीमध्ये आलेल्या अपमानास्पद अनुभवानंतर त्यांनी रुढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी झाले. त्यांनी जस्टीस पार्टीची स्थापना केली होती.  1944 मध्ये या पक्षाचे नाव द्रविड कनघम असे झाले. 

पेरियार हे ब्राह्मणवादाचे मोठे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अस्पृश्यता, असमानता याला पाठबळ देणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांची होळी केली होती. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह यांच्या विरोधात असण्याबरोबरच ते महिला आणि दलितांच्या शोषणाच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी हिंदू जातीव्यवस्थेविरोधातही संघर्ष केला. 

1885 : समाजसुधारक, पत्रकार, लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म

पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राचे पुढारी म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणावर छाप सोडलेले केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिन.  रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. महात्मा फुले त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली. 

सामाजिक सुधारणांच्या मुद्यावर कोणतीही तडजोड केली नाही. बालविवाह, विधवांच्या केशवपनाची परंपरा, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, अस्पृश्यतेचा प्रश्न, हुंडाप्रथा आदी मुद्यांवर त्यांनी लढा दिला. त्यांच्याविरोधात पुण्यातील कट्टरतावाद्यांची त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे होते. 

प्रबोधनकार ठाकरे हे राजर्षी शाहू महाराजाच्याही संपर्कात आले होते. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी आणि परिवर्तन चळवळीचे नेतृत्व करणारे होते. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. 

प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळसाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र होते. 

1948 : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले 

भारतीय लष्कराने सुरू निजाम संस्थानाच्याविरोधात सुरू केलेले ऑपरेशन पोलो आज पूर्णत्वास गेले. हैदराबादच्या निजामाने आज भारतासमोर शरणागती पत्करली. 15 ऑगस्ट 1947 नंतर निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेच व प्रश्‍न निर्माण झाला. हैदराबाद राज्याचा सत्ताधिश मुसलमान होता. परंतु राज्यात 88 टक्के हिंदू, 11 टक्के मुसलमान आणि एक टक्का इतर लोक होते. याशिवाय देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताच्या विरोधात होते. हैदराबादचा निजाम हा पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी पडद्याआडून हालचाली करत होता. 

तर, हैदराबाद राज्याच्या भारतातील विलीनीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण प्राप्त होणार नव्हते. त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले. भारतीयांच्या या आंदोलनाला चिरडण्यासाठी निजामाच्या फौजांनी, रझाकारांनी नागरिकांवर अत्याचार केले. अखेर भारतीय लष्कराने 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर कारवाई सुरू केली आणि चार दिवसात निजामाने शरणागती पत्करली. 

1950 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म. नरेंद्र मोदी यांचा जन्म बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्याच्या अखत्यारीत असलेल्या वडनगर येथे झाला. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये सुरू झालेल्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता. नरेंद्र मोदी हे त्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक जबाबदारी पार पाडत होते. 2001 मध्ये अनपेक्षितपणे त्यांची निवड गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून झाली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द विविध मुद्यांवरील वादाने कायम चर्चेत राहिली. मात्र, भाजपने गुजरात राज्यावरील आपली पकड अधिकच मजबूत केली. पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सत्ता आल्यास मोदी पंतप्रधान होतील, अशी घोषणा केली. 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झालेले मोदी हे पंतप्रधान झाले. अशी कामगिरी ते पहिले व्यक्ती ठरले. भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 2019 मध्ये ही भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत मिळाले. 

इतर महत्त्वाच्या घटना :

1877: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन
1915: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. 
1929: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. 
1938: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म
1951: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.
1999: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. 
2002: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन



Source link

Ganesh Chaturthi : विसर्जनानंतर पुन्हा भेटणार बाप्पा! मूर्तीकाराची अनोखी कल्पना ABP Majha

0
Ganesh Chaturthi : विसर्जनानंतर पुन्हा भेटणार बाप्पा! मूर्तीकाराची अनोखी कल्पना ABP Majha



<p>Ganesh Chaturthi : विसर्जनानंतर पुन्हा भेटणार बाप्पा! मूर्तीकाराची अनोखी कल्पना ABP Majha</p>



Source link

Ganpati Private Buses : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या खासगी बसेसची संख्या रोडावली Special Report

0
Ganpati Private Buses : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या खासगी बसेसची संख्या रोडावली Special Report



<p>मुबंई गोवा महामार्गावरचे खड्डे, वाहनांच्या मेंटेनन्सचा वाढलेला खर्च, फूल झालेलं रेल्वे आणि एसटी बसचं बूकींग आणि खासगी बसेसच्या तिकीटाचे भरमसाठ दर… यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांनी यंदा खासगी बसने जाणं टाळलंय.. &nbsp;</p>



Source link

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये ऑपरेशन नाग सुरुच, तीन दहशतवादी ठार ABP Majha

0
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये ऑपरेशन नाग सुरुच, तीन दहशतवादी ठार ABP Majha



<p>जम्मू-काश्मीरमधील कोकेरनागमध्ये ऑपरेशन नाग अजूनही सुरु आहे.,… गेल्या 72 तासांपासून दोन्ही बाजूनं जोरदार गोळीबार सुरु आहे….भारतीय जवानांनी दहशतवाद्याची ५० टक्के तळं नेस्तनाबूत केली आहेत… भारतीय ड्रोनमध्ये दहशतवादी कैद झालेत… सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जोरदार ऑपरेशन सुरु आहे… एक एक दहशवाद्याला शोधून भारतीय जवान त्यांचा खात्मा करतायत &nbsp; उरी, बारामुल्ला येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाला आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link