Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2748

Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!

0
Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!


राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनीउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.



Source link

Narayan Rane Maratha : फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा देखणे, टरबूज काय म्हणता? – नारायण राणे

0
Narayan Rane Maratha : फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा देखणे, टरबूज काय म्हणता? – नारायण राणे



<p>Narayan Rane Maratha : फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा देखणे, टरबूज काय म्हणता? – नारायण राणे</p>



Source link

Raj Thackeray : ‘पोटातलं ओठावर आणताना यापुढं…’, ‘त्या’ व्हिडिओवरून राज ठाकरेंचा टोला

0
Raj Thackeray : ‘पोटातलं ओठावर आणताना  यापुढं…’, ‘त्या’ व्हिडिओवरून राज ठाकरेंचा टोला


राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, ‘श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं,ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत,अशी मी आशा करतो.
 



Source link

Filmy Nostalgia: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची नावे ऐकून सेन्सॉर बोर्डही व्हायचे हैराण! तुम्हाला माहितीये का किस्सा?

0
Filmy Nostalgia: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची नावे ऐकून सेन्सॉर बोर्डही व्हायचे हैराण! तुम्हाला माहितीये का किस्सा?


दादा कोंडके यांनी केवळ हिंदी चित्रपटच बनवले नाहीत, तर त्यात मातब्बर बॉलिवूड कलाकारांना काम देखील दिले. धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांनीही दादा कोंडके यांच्या कामाचे खूप कौतुक केले होते. तर, एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी ‘भिंगरी’ चित्रपटातील ‘कुठे कुठे जायचं हनीमूनला’ या गाण्यात लावणी केली होती.



Source link

Ashok Saraf: सलील कुलकर्णींनी शेअर केल्या अशोक मामांच्या आठवणी; फोटो शेअर करत म्हणाले…

0
Ashok Saraf: सलील कुलकर्णींनी शेअर केल्या अशोक मामांच्या आठवणी; फोटो शेअर करत म्हणाले…


‘अलीकडच्या काळात ‘श्रावणमाशी’ किंवा ‘आनंदाने वेडेपिशे होणे’ म्हणत आपल्याला वेड लावणारे ‘एक डाव धोबीपछाड’मधले अशोकमामा अजूनही ‘पांडू हवालदार’मधलीच एनर्जी घेऊन वावरतात. ते भेटतात तेव्हा शांत, प्रांजळ, मिश्किल पण मोजकं बोलणारे असतात. झीने जीवनगौरव साजरा करतांना सिद्धार्थ जाधवने इतका अप्रतिम परफॉर्मन्स केला की अशोक मामांना गदगदलेलं पाहिलं. या आठवड्यात आमच्या ‘सारेगमप’मध्ये ते स्वतः आले आहेत. शूटिंग दरम्यान मला भेटून ‘एकदा काय झालं’साठी अभिनंदन केलं, तेव्हा पाय पडलो आणि त्यांना सांगितलं, तुम्ही भेटलात की लहानपण भेटतं.. शाळा.. कॉलेज.. साधा डोसा..आईची सायकल.. सगळं पुन्हा भेटतं..!! मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो ही गणपतीबाप्पाची कृपा!’, असे म्हणत त्यांनी आपल्या बालपणीच्या सुंदर आठवणी सलील कुलकर्णी यांनी शेअर केल्या आहेत.



Source link

Ganesh Chaturthi 2023: ‘डॅडीं’च्या जावयाचं गणपती स्पेशल गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ दिवशी होणार रिलीज

0
Ganesh Chaturthi 2023: ‘डॅडीं’च्या जावयाचं गणपती स्पेशल गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ दिवशी होणार रिलीज


या गाण्यात अक्षय वाघमारेसोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे देखील झळकणार आहे. विशेष म्हणजे तिनेच या गाण्याची निर्मिती केली आहे. ‘महाराष्ट्राची एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली शिल्पा ठाकरे ही ‘ट्रिपल सीट’, ‘भिरकिट’, ‘खीचिक’, ‘राडा’, ‘इभ्रत’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकली आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताला येणारे हे नवे कोरे गाणे तिने निर्मित केले आहे. नुकतीच तिने ‘द बिग स्क्रीन स्टुडिओ’ची स्थापना केली आहे. या निर्मिति संस्थेमधील हे दुसरे गाणे आहे. अक्षय वाघमारे आणि शिल्पा ठाकरे यांचे हे गाणे येत्या रविवारी १६ सप्टेंबर या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मल्हारला आठवणार वैदहीसोबत पाहिलेलं स्वप्न! स्वराचा करेल का स्वीकार?

0
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मल्हारला आठवणार वैदहीसोबत पाहिलेलं स्वप्न! स्वराचा करेल का स्वीकार?


मात्र, आता स्वराला पाहून आता मल्हारला वैदहीची आठवण आली. तर, वैदहीसोबत पाहिलेल्या प्रेमाच्या स्वप्नांची देखील आठवण आली. यावेळी त्याने वैदहीला म्हटले होते की, आपल्याला जर मुलगी झाली तर तिचे नाव स्वरा ठेवू. आता मल्हार स्वराजला ‘स्वरा’ म्हणून हाक मारणार आहे. यावेळी त्याला स्वरा आपली मुलगी असल्याची जाणीव त्याला होणार आहे.



Source link

Wardha Bail Pola : दुर्दैवी! बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाचा घाला

0
Wardha Bail Pola : दुर्दैवी! बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाचा घाला


विदर्भ, खानदेश व मराठवाड्यात आज बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गावा-गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असतानात अकोला जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होता. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातही बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. बैल धुताना तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.



Source link

सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्ववत; पुसेसावळी तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक

0


सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये रविवारी झालेल्या दोन गटामधील तणावानंतर अजूनही परिस्थिती तणावाखाली आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी झालेल्या तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडित करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा टप्प्याटप्याने आज सकाळपर्यंत पूर्ववत झाली आहे. 

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर तांत्रिक पुराव्यांवर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, काही लोकांकडून पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत बाजारपेठ उघडण्यास विरोध केला आहे. जोपर्यंत युवकांना या गुन्ह्यातून वगळले जात नाही, तोपर्यंत बाजारपेठ सुरू होणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे. त्यामुळे गावात शांतता असली तरी बाजारपेठेत शुकशुकाट आहे.

दरम्यान, नेट बंद असल्याने सर्वात मोठा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. इंटरनेट बंदीने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. नेट बंद झाल्याने पाचगणी महाबळेश्वर येथून अनेक पर्यटक परत फिरले. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.

आतापर्यंत 34 जणांना अटक 

दरम्यान, पुसेसावळी तणाव प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 34 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील 15 जणांना वडूज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, बाजारपेठ सुरू करण्यासाठी पोलिसांनी गावातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची मुलं अटकेत असल्याने आम्ही दुकाने कशी सुरू, अशी विचारणा व्यापाऱ्यांनी केली. अटकेतील मुलांचा दंगलीशी संबंध नसल्याचा दावाही केला. मात्र, पोलिसांनी ठोस पुरावे हाती आल्यानंतर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच पुसेसावळीत दंगल झाली होती तेव्हा आपली मुलं कुठं होती याचा माहिती सादर करा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

पुसेसावळीत तणाव कसा निर्माण झाला?

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Anant Kalse on MLA Disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी कशी आणि कधीपर्यंत?, कळसेंची माहिती

0
Anant Kalse on MLA Disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी कशी आणि कधीपर्यंत?, कळसेंची माहिती



<p>Anant Kalse on MLA Disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी कशी आणि कधीपर्यंत?, कळसेंची माहिती</p>



Source link