Thursday, July 9, 2026
Home Blog Page 204

मग गद्दारी करून सुरतमार्गे गुवाहाटीला का गेला? भाजपत प्रवेश करताच शिंदेंच्या मंत्र्याला डिवचलं!

0


Satyajit Patankar on Shambhuraj Desai: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणमधील नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. भाजप पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी उत्तर दिलं आहे. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपत पक्षप्रवेश केला. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याच काय कारण होतं? असा सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई व शिंदे गटावर तोफ डागल्याने पाटणला महायुतीत जुंपणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार 

दरम्यान, शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात राजकीय वाद सुरुवातीपासून आहे. विधानसभा निवडणुकीत पाटणकरांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. सत्यजीत पाटणकर यांन भाजप प्रवेश करताच शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा आहे. पाटणचे आमदार आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही बोलणं योग्य नाही, आम्ही आमचं काम करत आहोत. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. या दरम्यान महायुती म्हणून सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. आमच्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील नेत्यांचा प्रवेश झाला आहे. मी याच्याबाबत जे काय बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार आहे. भेटीची वेळ मागितलेली आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा





Source link

तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या

0
तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या


वजन कमी करणे अनेकदा कठीण काम असते, असा बहुतेकांचा अनुभव आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वानुभावावरुन वजन कमी करण्याचा प्रवास उलगडते तेव्हा. ज्या व्यक्तींचा मेटाबॉलिज्म कमी असतो तेव्हा वजन कमी करण्यात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या तरुणीने 15 महिन्यात तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे. 

एकदा तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली की, तुमचे स्वरूप बदलते, विशेषतः हनुवटी, गाल आणि जबड्याभोवती. टोरंटो येथील फिटनेस कोच साची पै ने 15 महिन्यांत 90 पौंड म्हणजे 40.8 किलो वजन कमी केल्यानंतर असाच बदल अनुभवला. ज्यामुळे त्यांच्या जबड्याची रेषा अधिक स्पष्ट झाली आणि गालावरची चरबी कमी झाली. साची यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी वजन कमी केल्यानंतर त्यांचा चेहरा कसा बदलला हे स्पष्ट केले.

पहा कशी होती वेट लॉस जर्नी?

 फक्त ३ गोष्टींची महत्त्वाच्या

१. कॅलरी कमी करणारा आहार आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या

२. व्यायाम, शक्यतो ताकद, कार्डिओ आणि संतुलन यांचे मिश्रण.

३. हळूहळू ध्येये साध्य करण्यासाठी मानसिकता

त्यानंतर तिने एक महत्त्वाची टीप शेअर केली –

सुरुवातीला वजन न वाढवता सुरुवात करा. कारण पहिल्याच महिन्यात वजन कमी करण्यावर फोकस केला तर जास्त त्रास होईल. अशावेळी तुम्ही वजन न वाढवण्याकडे लक्ष द्या. यासाठी काय कराल?

1- तुमच्या घरातून जंक फूड हद्दपार करणे.

2 -आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त बाहेर खाऊ नका.

3 – कोल्ड्रिंक्स/पॉप/साखरयुक्त अल्कोहोल किंवा साखरेची कॉफी पिणे बंद करा.

दिवसातून फक्त एका जेवणावर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ, साचीने नाश्त्यात बदल करून ग्रीक दही + प्रोटीन शेक + फळ किंवा अंडी + एवोकॅडो टोस्ट असे जेवण घेण्याचा सल्ला दिला. त्याने पुढे म्हटले की, अशाच पद्धतीचं आहार तिने दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात घेण्याचा सल्ला दिला. हा बदल महिनाभर पाळण्याचा सल्ला तिने आपल्या अनेक वेट लॉस करणाऱ्या व्यक्तींना दिला. 

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

मुंबईत मोठा अपघात, लोकल ट्रेनने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू

0
मुंबईत मोठा अपघात, लोकल ट्रेनने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू


महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.



Source link

रस्त्यावरच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, कारचं नुकसान तर पंखे दुकानात घुसले, Video व्हायरल

0
रस्त्यावरच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, कारचं नुकसान तर पंखे दुकानात घुसले, Video व्हायरल


Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे काही तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावरच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या लँडिंगमुळे हेलिकॉप्टरचा मागील भार हा तुटून त्या ठिकाणाहून जाणाऱ्या कारवर पडला. त्यामुळे त्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी त्या हेलिकॉप्टरमध्ये असणारे प्रवासी आणि पायलट यांना किरकोळ दुखापत झाली. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 6 जण प्रवास करत होते. 

दरम्यान, या घटनेचा लँडिंग होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले असून इतर जण सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तेथील स्थानिक प्रशासन आणि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे. हे हेलिकॉप्टर क्रिस्टल एविएशन कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नेमकं काय घडलं? 

हेलिकॉप्टरने बदासू हेलिपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण केले. त्यानंतर हेलिकॉप्टरने काही अंतर पार करताच त्यामध्ये बिघाड झाल्याचं समजलं. त्यामुळे या हेलिकॉप्टरला एका रस्त्याच्या मधोमध आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

सध्या देशभरातून लाखो भाविक भगवान केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. 2 मे पासून केदारनाथ धामची यात्रा सुरु झाली आहे. त्यामुळे केदारनाथमध्ये 22 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी भगवान केदारनाथचे दर्शन घेतलं आहे. यामध्ये गेल्या 37 दिवसांमध्ये एकूण 26 हजारांहून अधिक यात्रेकरूंनी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाममध्ये जावून दर्शन घेतले. 

एकाच महिन्यातील तिसरी घटना

याआधी देखील उत्तरकाशीतील गंगणी येथे भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले होते. ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉरप्टर कोसळले. यामध्ये तिघेही सुरक्षित आहेत. त्यानंतर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यामधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 





Source link

तब्बल 32 वर्षांनी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणाार; पुण्याच्या बैठकीत ए

0


Pune: यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 5 ते 7 जून रोजी निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. 

या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाहक सुनिता राजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 99 व्या संमेलनाला आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे .

साताऱ्यातील हे चौथे संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, “साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती . “

साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते . 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्या आता झाले होते .

शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की 1993 साली 66वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची 8 एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच तासांपासून वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा


आणखी वाचा



Source link

सकाळी उठताच पोटदुखी आणि आंबट ढेकरांनी हैराण झालात? घरगुती उपायांनी पोटातील घाण बाहेर पडेल

0
सकाळी उठताच पोटदुखी आणि आंबट ढेकरांनी हैराण झालात? घरगुती उपायांनी पोटातील घाण बाहेर पडेल


जर तुम्हाला सकाळी उठताच पोटदुखी आणि आंबट ढेकर येत असेल तर ते गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोगाचे लक्षण असू शकते. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स ही अशी स्थिती आहे जेव्हा पोटातून अन्न किंवा वायू अन्ननलिकेत येतो, ज्यामुळे जळजळ, वेदना, पोट फुगणे, वारंवार आंबट ढेकर येणे आणि उलट्या होणे अशी लक्षणे जाणवतात.

काळे मीठ आणि सेलेरी

पोटदुखी, आंबट ढेकर येणे यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काळे मीठ आणि सेलेरीचे सेवन करू शकता. सेलेरीमध्ये थायमॉल असते जे गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करते. काळे मीठ आम्लाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही कोमट पाण्यासोबत काळे मीठ आणि सेलेरीचे सेवन करू शकता.

काळे मीठ आणि जिरे

काळे मीठ पचनासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आंबट ढेकराच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी मीठ आणि जिरे फायदेशीर ठरू शकतात. १ चमचा जिरे घ्या, ते एका तव्यावर भाजून घ्या, नंतर ते बारीक करा. आता एक ग्लास कोमट पाण्यात काळे मीठ आणि जिरे पावडर घाला आणि ते प्या. या पाण्यात आराम मिळेल.

बडीशेप पाणी

जर तुम्हाला आंबट ढेकराच्या समस्येने त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप पाणी पिऊ शकता. बडीशेप पचनसंस्था सुधारते. बडीशेप खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर तुम्ही खाल्ल्यानंतर बडीशेप चावू शकता. बडीशेप चावल्याने गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो.

लिंबू पाणी

कधीकधी असे होते की सकाळी उठताच ढेकर येऊ लागतात. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर लगेच एक ग्लास लिंबू पाणी प्या. साध्या मिठाऐवजी लिंबू पाण्यात काळे मीठ घेतल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल.

जीरे पाणी 

आंबट ढेकर येण्याच्या समस्येवर जिऱ्याचे पाणी पिणे हा देखील एक प्रभावी उपचार आहे. यासाठी गरम पाण्यात थोडेसे जिरे मिसळून ते प्या. हे पिल्याने पोटातील गॅसची समस्या कमी होते आणि आंबट ढेकर येणे देखील कमी होते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धार; फलटण तालुक्यात पालखी सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

0
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धार; फलटण तालुक्यात पालखी सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

फलटण प्रतिनिधी | साहस Times  :-   संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीसाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. “वारकऱ्यांच्या सेवेसाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद आणि निरा दत्त घाट या पालखी मार्गावरील महत्त्वाच्या मुक्कामी ठिकाणांची पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाच्या पार्श्वभूमीवर १० हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्र उभारण्याच्या सूचना देताना मंत्री गोरे म्हणाले, “पालखी मार्गावर मोबाइल स्वच्छतागृहांची व्यवस्था जिल्हा परिषदेने करावी. पालखी पुढे सरकल्यावर मागील गावे तत्काळ स्वच्छ करावीत.”

ते पुढे म्हणाले, विद्युत वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, हायमास्क दिवे बसवावेत आणि बेकायदा कनेक्शन रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत करावे.

आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके तैनात करावीत, गॅस व केरोसीनचा पुरवठा सुनिश्चित करावा, तर अन्न व औषध प्रशासनाने अन्न व पाण्याची नियमित तपासणी करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

रस्त्यांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी आणि अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा खास निर्देश त्यांनी दिला.

पालखी सोहळ्यातील गर्दी लक्षात घेता, पोलीस यंत्रणेला सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, निरीक्षण मनोरे आणि पर्याप्त मनुष्यबळ सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पार्किंग व्यवस्था सुस्थितीत असावी याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष वेधले.

भारतीय शैक्षणिक संस्थांना देशातील प्रतिभा टिकवून ठेवण्याची संधी‎: आता अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल, भारतासमोर संधींसह जागतिक वातावरण देण्याचे आव्हान‎

0
भारतीय शैक्षणिक संस्थांना देशातील प्रतिभा टिकवून ठेवण्याची संधी‎:  आता अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल, भारतासमोर संधींसह जागतिक वातावरण देण्याचे आव्हान‎


  • Marathi News
  • Opinion
  • Opportunity For Indian Educational Institutions To Retain Talent In The Country, Now The Number Of Students Going To America Will Decrease, India Faces The Challenge Of Providing A Global Environment With Opportunities

The Economist News paper‎5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकेतील उच्च शिक्षणाविरुद्ध राष्ट्राध्यक्ष‎डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे‎भारतासह जगातील नामांकित विद्यापीठांसाठी संधी‎निर्माण होऊ शकतात. विद्यापीठांचे निधी‎रोखण्यासोबतच, ट्रम्प यांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या‎व्हिसा मुलाखतीही पुढे ढकलल्या आहेत. तज्ञांच्या‎मते, भारतासाठी ब्रेन ड्रेन थांबवण्याची ही संधी‎आहे. वर्षानुवर्षे, प्रतिभावान भारतीय विद्यार्थी‎अमेरिकेत जात आहेत.

प्रसिद्ध आयआयटीच्या टॉप‎१०० विद्यार्थ्यांपैकी ६०% पेक्षा जास्त विद्यार्थी‎परदेशात जातात. त्यापैकी बहुतेक जण अमेरिकेत‎पोहोचतात. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी‎विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक तृतीयांश विद्यार्थी भारतीय‎आहेत. असा अंदाज आहे की ट्रम्पच्या धोरणांमुळे,‎या वर्षी आणि पुढच्या वर्षी अमेरिकन‎विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज एक‎चतुर्थांश कमी होऊ शकतात. या परिस्थितीत, ब्रेन‎ड्रेन थांबवता येईल. परंतु भारतातील उच्च‎महाविद्यालये उच्च शिक्षणाच्या जागतिक‎बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम नाहीत. भारतीय‎विद्यापीठांची तुलना हार्वर्डशी करणे खूप कठीण‎आहे.‎

अमेरिकेतील आयव्ही लीग (संशोधन आणि‎उच्च शिक्षणाच्या आठ प्रसिद्ध विद्यापीठांना‎आयव्ही लीग म्हणतात) मध्ये ३-९% च्या तुलनेत,‎कधीकधी भारतातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश‎दर ०.२% पर्यंत घसरतो. विद्यापीठात जाणाऱ्या‎जगातील निम्म्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या‎भारतात आहे. इंग्रजी जाणणाऱ्या लोकांची संख्या‎जास्त असल्याने, भारतासाठी परिस्थिती अनुकूल‎आहे. तरीही, जगातील शीर्ष १०० उच्च शिक्षण‎संस्थांमध्ये भारतासाठी स्थान नाही. त्याच वेळी,‎चीनने जगातील अनेक उच्च क्रमवारीत आपले‎स्थान निर्माण केले आहे. एका भारतीय राजकीय‎शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की अमेरिकेत भारतीय‎राजकारण शिकवण्यासाठी ते वापरत असलेल्या‎अभ्यासक्रमामुळे भारतात अटक होऊ शकते.‎संस्थांची स्थिती वाईट आहे.‎

भारतात, चांगल्या विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यासाठी‎२०१७ मध्ये इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स कार्यक्रम‎सुरू करण्यात आला होता. परंतु संस्था पुढे आल्या‎नाहीत. २०२० मध्ये, सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण‎धोरण लागू केले आहे. या धोरणात सरकारी देखरेख‎आणि हस्तक्षेप थांबवण्यासाठी धाडसी शिफारसी‎करण्यात आल्या आहेत. विद्यापीठांमध्ये इंग्रजीऐवजी‎हिंदीचा वापर केल्याने कोणत्याही विद्यापीठाला‎किंवा महाविद्यालयाला जागतिक शैक्षणिक‎व्यवस्थेत स्पर्धा करणे कठीण होईल.‎

  • गेल्या दशकात भारताने जीडीपीच्या ४.१% ते‎४.६% शिक्षणावर खर्च केले आहे. यूजीसी‎विद्यापीठांवर लक्ष ठेवते. सहकाऱ्यांसोबतच्या‎परिषदांसाठी आणि परदेशात जाण्यासाठी‎सरकारी मान्यता आवश्यक असते.‎
  • उच्चस्तरीय नियुक्त्यांमध्ये सरकारी हस्तक्षेप‎असतो. सरकारी विद्यापीठांमध्ये भरती‎सत्ताधारी पक्षाच्या इच्छेवर अवलंबून असते.‎
  • वीस वर्षांपूर्वी देशात फक्त वीस खाजगी‎विद्यापीठे होती. आज त्यांची संख्या ४०० पेक्षा‎जास्त आहे.‎
  • नेहरू विद्यापीठाचे सौमेन चट्टोपाध्याय‎म्हणतात की अधिक स्वातंत्र्यामुळे नवी खासगी‎विद्यापीठे सरकारी संस्थांना मागे टाकतील.‎

शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठीही केले जात आहेत प्रयत्न‎



Source link

पंढरपूर आषाढी वारीसाठी सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश

0
पंढरपूर आषाढी वारीसाठी सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश

सोलापूर प्रतिनिधी :-  केबीपी महाविद्यालय सभागृह, पंढरपूर  जिल्हा – सोलापूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शासन पूर्णपणे सज्ज असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पंढरपूर येथे केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आषाढी वारी 2025 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सीईओ कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, पालखी मार्ग व तळांवरील सुविधा, तसेच पंढरपूर शहरात भाविकांच्या राहण्याची योग्य व्यवस्था केली जावी. चंद्रभागा नदीपात्रासाठी स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा उभारण्यात येणार असून, शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

भाविकांना माहिती देणारे फलक किमान 15 फूट उंचीचे असावेत. होड्यांची नोंदणी, चालकांचे नाव व आसन क्षमतेचे नियमन करावे, तसेच होड्यांमध्ये पुरेशा लाईफ जॅकेट्सची व्यवस्था असावी, असेही त्यांनी सुचवले.

शहरातील पार्किंग जागांवर मुरमीकरण व रोलिंग, अतिक्रमण हटविणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने हटविणे, तसेच वाखरी-पंढरपूर रस्त्याचे काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर केला आणि सर्व भाविकांना अडथळ्याविना सेवा मिळावी यासाठी काटेकोर नियोजन केले जात असल्याचे सांगितले.

फलटणच्या औद्योगिक प्रगतीला नवा गतीवेग; नाईक बोमवाडी MIDC मध्ये मोठा उद्योग येण्याचे संकेत!

0
फलटणच्या औद्योगिक प्रगतीला नवा गतीवेग; नाईक बोमवाडी MIDC मध्ये मोठा उद्योग येण्याचे संकेत!

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे नव्याने विकसित होत असलेल्या MIDC औद्योगिक वसाहतीसाठी एक महत्वाची आणि आशादायक पावले उचलण्यात आली आहेत. उद्योग मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत फलटणमध्ये नवीन उद्योग आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, MIDC प्रतिनिधी, तसेच धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही मोठ्या उद्योगसमूहांशी चर्चा करून त्यांना फलटणमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. चर्चेच्या सकारात्मक प्रतिसादानंतर, लवकरच नाईकबोमवाडी येथे रोजगारनिर्मितीचा मोठा प्रकल्प सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील सुमारे २०,००० तरुण बेरोजगार आणि स्थानिक भूमिपुत्रांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मंत्रालयात प्रत्यक्ष यश मिळाले असून, फलटणच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक उजळ नोंद होणार आहे.