Friday, July 10, 2026
Home Blog Page 205

भारतातील ‘या’ राज्यात सापडली आजपर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण; वर्षानुवर्षे खोदलं तरी संपणार नाही सोनं; बड्या कंपनीला मिळाले खाणीचे कंत्राट

0
भारतातील ‘या’ राज्यात सापडली आजपर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण; वर्षानुवर्षे खोदलं तरी संपणार नाही सोनं; बड्या कंपनीला मिळाले खाणीचे कंत्राट


Gold Mine In India: भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे. या खाणीत इतकं सोनं आहे की काही देशांमध्ये जितके सोने आहे तितके येथे एका खाणीत. या खाणीत सोनं काढण्याचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. जाणून घेऊय भारतातील कोणत्या राज्यात ही सोन्याची खाण सापडली असून या खाणीतून सोनं काढण्याचे कंत्राट कोणत्या कंपनीला मिळाले आहे. 

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी भागात  ही खाण आहे. डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनी हा प्रकल्प हाताळत आहे. लवकरच या खाणीत प्रत्यक्षात सोन्याचे उत्खनन केले जाणार आहे.  जोनागिरी सुवर्ण प्रकल्प ही देशातील पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण आहे. या खाणीतुन दरवर्षी 750 किलो सोन्याचे उत्पादन केले जाऊ शकते असा अंदाज आहे. उत्खनन सुरु केल्यावर पहिल्या वर्षी 400 किलो सोन्याचे उत्पादन केले जाईल. यानंतर यथे  पूर्ण क्षमतेने उत्खनन सुरु केल्यावर येथे वर्षाला 750 किलो सोने काढले जाईल. 80 वर्षांनंतर भारतात सुरू होणारी ही पहिली मोठी सोन्याची खाण आहे.

डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेडने आतापर्यंत या प्रकल्पात सुमारे 200 कोटी रुपये गुंतवले आहेत. कंपनीचा 40 टक्के हिस्सा जिओमॅसोर सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडकडे आहे. हीच कंपनी ही खाण विकसित करत आहे. एकत्रितपणे, या दोन्ही कंपन्या ही देशातील पहिली खाजगी सोन्याची खाण बनवत आहेत. आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाण आणि प्रक्रिया प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. तथापि, पूर्ण प्रमाणात खाणकाम सुरू होण्यापूर्वी काही महिने चाचणी घेतली जाईल. यामुळे प्रणाली सुरळीतपणे काम करेल याची खात्री होईल.

या खाणीतून काढलेले सोने जवळच्या रिफायनरीजना विकले जाईल. कंपनीचा अंदाज आहे की पहिल्या वर्षी  400 किलो सोनं काढले जाईल. यातून 300 ते 350 कोटींची कमाई होईल. 60 टक्के EBITDA मार्जिनच्या आधारावर 2027 च्या आर्थिक वर्षापर्यंत ही कमाई शक्य आहे. खाणकामाला मंजुरी मिळाल्याच्या बातमीने डेक्कन गोल्ड माइन्सच्या शेअर्समध्ये तेजी आली. गुरुवारी, शेअरची किंमत 9.73 टक्क्यांनी वाढून 163.70 रुपयांवर बंद झाली. हा दहा महिन्यांचा उच्चांक आहे, जो बाजारातील उत्साह दर्शवितो.

मागील वर्षभरातृ डेक्कन गोल्ड माइन्सच्या शेअर्समध्ये सुमारे 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2025 च्या सुरुवातीपासून त्यात 46.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या यशाबद्दल गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. जोनागिरी सुवर्ण प्रकल्पातील खुल्या खड्ड्यातून 6.8 टन सोने काढण्याची क्षमता आहे. जिओमॅइसोरने पूर्व आणि पश्चिम ब्लॉकमध्ये व्यापक ड्रिलिंग आणि सर्वेक्षण केले आहे. पुढील ड्रिलिंगमुळे ही मात्रा 14 टनांपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे खाणीचे आयुष्य 15 वर्षांनी वाढू शकते.

या प्रकल्पाला CFE, CFO आणि पर्यावरणीय मंजुरी यासारख्या सर्व आवश्यक सरकारी मान्यता मिळाल्या आहेत. भारतीय खाण ब्युरोने 2008  मध्ये खाण योजनेला मान्यता दिली. पर्यावरणीय मंजुरी 2043 पर्यंत वैध आहे, जी दीर्घकालीन कामकाजाची हमी देते. या सोन्याच्या खाणीमुळे भारताची अर्थव्यवस्था रॉकेटसराखीभरारी घेणार आहे.  स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जोनागिरी प्रकल्पाची सुरुवात दररोज १००० टन क्षमतेने होईल, जी 2000 टनांपर्यंत वाढवली जाईल. यामुळे भारत सोन्याच्या उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे जाईल.





Source link

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

0
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

फलटण प्रतिनिधी | साहस Times :-पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण फलटण शहर सज्ज होत असून, नगरपालिका प्रशासन सजगतेने कामाला लागले आहे. मुख्याधिकारी निखील मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पालिकेने पाठपुरावा केला असून, या दोन्ही संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील पुलांचे तुटलेले रेलिंग तातडीने बसवण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा म्हणून शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात आठ दिवस पाणपोईची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच पालिकेच्या टँकवरून पाण्याचे टँकर भरता येतील अशी सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वाहतूक नियोजन अंतर्गत वारकऱ्यांचे मालवाहतूक ट्रक आणि अन्य वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आखले जात आहेत. पालखी तळावर पावसामुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी दर्जेदार डागडुजी करण्यात येणार असून, लाईटसाठी आठ सॅटेलाईट पॉईंट्स आणि विविध क्षमतेचे जनरेटरही उपलब्ध करुन दिले जातील.

तसेच पालखी तळावर तात्पुरती शौचालये आणि त्याठिकाणी प्रकाशयोजना करण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारची गैरसोय वारकऱ्यांना होऊ नये यासाठी फलटण नगरपालिका सर्वतोपरी खबरदारी घेत आहे, असेही मुख्याधिकारी निखील मोरे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर दौरा; आषाढी वारी तयारीचा आढावा

0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर दौरा; आषाढी वारी तयारीचा आढावा

दि. ६ जून २०२५ | सोलापूर जिल्हा :- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी भेटी व पाहण्या करून आढावा घेणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात सकाळी ८.३० वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहातून होणार असून, तत्पश्चात सकाळी ८.४५ वाजता जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

यासह पुढीलप्रमाणे महत्त्वाचे कार्यक्रम:

🔹 पंढरपूरमध्ये ६५ एकर पालखी स्थळ व वाळवंट पाहणी – सकाळी १०.३० वाजता
🔹 आषाढी वारी संदर्भात आढावा बैठक – सकाळी ११.३० वा., कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
🔹 अरण तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यावर जिल्हास्तरीय बैठक – १२.३० वा.
🔹 वाखरी, भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस, नातेपुते इत्यादी पालखी तळांचे स्थळ पाहणी दौरे – दुपारी १.३० नंतर
🔹 दुपारी ४.०० नंतर फलटण तालुक्यातील बरड गावाकडे प्रयाण

संपूर्ण दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पंढरपूर नगरपालिका व विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीपूर्वीची ही पाहणी व आढावा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

40 शीतही दिसायचंय तरुण! आजपासूनच खा ‘ही’ 5 फळं

0
40 शीतही दिसायचंय तरुण! आजपासूनच खा ‘ही’ 5 फळं


Anti Aging Fruits : वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. वय जसजसं वाढतं, तसतशी आपल्या शरीराची ताकद, त्वचेची लवचिकता आणि इम्युनिटी थोडी कमी होऊ लागते. पण चांगली गोष्ट ही आहे की, योग्य आहाराच्या मदतीनं आपण यावर थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो.

40 शीत आल्यानंतर शरीराची जास्त काळजी आणि पोषणाची गरज असते. काही फळं अशी आहेत, जी रोज खाल्ली तर वाढत्या वय जसं की त्वचेवरील सुरकुत्या, थकवा, चिडचिडेपणा हे उशिरा दिसतात. चला तर मग पाहूया अशी 5 फळं जी तुम्हाला तरुण आणि ताजंतवानं ठेवू शकतात.

1. संत्री – त्वचेला फ्रेश आणि टाईट ठेवण्यासाठी

संत्रं हे व्हिटॅमिन C चा खजिना आहे. यामुळे त्वचा टाईट राहते आणि सुरकुत्या लवकर येत नाहीत. त्यात असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पोटॅशियम तुमचं रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. रोज एक संत्रं खाल्लं तरी त्वचेचा ग्लो टिकतो.

2. डाळिंब- लवचिक त्वचा आणि निरोगी हृदयासाठी

डाळिंबमध्ये पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला लवचिक बनवतात आणि सांधेदुखी कमी करतात. व्हिटॅमिन C चा पुरवठा करून डाळिंब शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो आणि सुरकुत्या कमी करतं.

3. केळं – हाडं, मसल्स आणि मूडसाठी उत्तम

केळं हे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 चं उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ते हृदय, हाडं आणि मसल्ससाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय, व्हिटॅमिन B6 मूड स्विंग्स कमी करतं आणि सतत थकवा वाटू देत नाही. नैसर्गिक साखरमुळे दिवसभर उर्जा मिळते.

4. आव्होकाडो – हार्मोन्स आणि त्वचेसाठी सुपरफूड

आव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे हार्मोन्स बॅलन्स ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. फाइबरमुळे पचन सुधारते आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.

हेही वाचा : शरीरात मॅग्नेशियमची कमतरता? ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

5. पपई – पचन आणि डोळ्यांसाठी उत्तम

पपईमध्ये पपेन नावाचा एन्जाइम असतं, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन A आणि C असतं. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ली, तर शरीराला पोषण चांगल्या पद्धतीने मिळतात.

(Disclaimer –  प्रिय वाचक, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे.  ‘झी 24 तास’ याला दुजोरा देत नाही. आरोग्याशी संबंधित माहिती  स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)





Source link

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता? ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

0
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता? ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष


Magnesium Deficiency Symptoms : मॅग्नेशियम हे शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक मिनरल आहे. शरीरात होणाऱ्या अनेक जैविक क्रिया (biological reactions) मॅग्नेशियमच्या मदतीनेच पार पडतात. हे मसल्स म्हणजेच स्नायूंना मजबूत ठेवणे, नसा म्हणजे नर्व्ह्स सक्रिय ठेवणे, हाडं बळकट करणं, तसेच रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठीही महत्त्वाचं आहे. पण आजच्या धावपळीच्या, असंतुलित लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, याची लक्षणं दिसूनही अनेक वेळा आपण ती दुर्लक्ष करतो. चला तर मग जाणून घेऊया मॅग्नेशियमची कमतरता ओळखण्याची 4 प्रमुख लक्षणं. 

1. मसल्समध्ये गोळे येणं किंवा झटके

रात्री झोपताना पायात किंवा हातात गोळे येणं किंवा मसल्समध्ये अचानक झटके येणं. ही लक्षणं मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. मॅग्नेशियम मसल्सना रिलॅक्स करतात, वेदना कमी करतं आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेत मदत करतं. त्यामुळे याची कमतरता असल्यास सतत क्रॅम्प्स किंवा स्नायूंमध्ये दुखापत जाणवू शकते.

2. सतत थकवा आणि अशक्तपणा

कधी काही न केल्यावरही अंगात ताकत न वाटणं, सतत थकवा जाणवणं किंवा अंगात जडपणा वाटणं. हेही मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं असू शकतात. कारण मॅग्नेशियम शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक असतं. याची पातळी कमी झाली की पेशींना योग्य प्रकारे ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवतो.

3. मानसिक अस्वस्थता

मॅग्नेशियम फक्त शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप महत्त्वाचं आहे. हे न्यूरोट्रान्समीटर (मेंदूतील केमिकल मेसेंजर) संतुलित ठेवण्यासाठी मदत करतं. मॅग्नेशियम कमी झालं की मूड स्विंग्स, अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि स्ट्रेस जास्त जाणवतो. काही वेळा हे डिप्रेशन आणि अँक्सायटीसारख्या मानसिक समस्यांनाही कारणीभूत ठरू शकतं.

4. अनियमित हृदयाची धडधड

मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांनाही नियमित ठेवण्यात मदत करतं. त्याची कमतरता झाली की हृदयाच्या धडधडीचा वेग अनियमित होऊ शकतो. कधी फार वेगाने तर कधी अचानक बदल होतो. ही स्थिती धोकादायकही ठरू शकते.

हेही वाचा : अभिनेते जितेंद्र यांनी तब्बल 855 कोटींना विकली मुंबईतील जमीन, बालाजी IT पार्कच्या जागी आता तिथे…

जर तुमच्यात यापैकी एकाहून अधिक लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसं की नट्स, संत्री, केळी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि ओट्स.

(Disclaimer – येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)





Source link

नालासोपारा स्तूपाच्या स्मृतीस जपण्यासाठी कुरवली खुर्द येथे स्तूप निर्माण!

0
नालासोपारा स्तूपाच्या स्मृतीस जपण्यासाठी कुरवली खुर्द येथे स्तूप निर्माण!

कुरवली खुर्द (ता. फलटण) – धम्म संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नालासोपारा येथील प्राचीन स्तूपाच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी आणि सम्राट अशोकाच्या धम्म वारशाची आठवण जपण्यासाठी आयु. संघराज अशोक निकाळजे यांनी कुरवली खुर्द या गावात एक छोटेखानी स्तूप उभारला आहे.

सम्राट अशोकाने बांधलेल्या ८४ हजार स्तूप व विहारांपैकी आज केवळ काहीच अवशेष उरले असून, अनेक ठिकाणी इतर धर्मियांनी त्या जागांवर अतिक्रमण केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांवर धम्माचा वारसा जपण्याची जबाबदारी सोपवली होती.

त्याच प्रेरणेतून आणि पुढच्या पिढ्यांमध्ये धम्माची स्मृती व आदर्श रुजवण्यासाठी निकाळजे यांनी नालासोपारा स्तूपाच्या मूळ विटेचा उपयोग करून कुरवली खुर्द येथे हा स्तूप उभारला आहे. हा स्तूप केवळ धार्मिक श्रद्धेचे नव्हे तर सांस्कृतिक इतिहासाचेही प्रतीक ठरणार आहे.

सध्या अनेक तरुण धम्म विचारांपासून दूर जात असताना, अशा इतिहास जागवणाऱ्या स्मारकांची नितांत आवश्यकता आहे. धम्म बांधवांना या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन स्थानिकांकडून केले जात आहे.

📹 व्हिडीओ: YouTube लिंक पाहा

जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपचं काय होणार? सर्वेक्षणात समोर आली आश्चर्यकारक गोष्ट

0
जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपचं काय होणार? सर्वेक्षणात समोर आली आश्चर्यकारक गोष्ट


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.



Source link

Bangalore Stampede: ‘सत्ताधाऱ्यांना दोष देता कामा नये..’ बंगळुरूतील मृत्यूतांडवावर BCCI कडून दोन टोकाच्या प्रतिक्रिया

0
Bangalore Stampede: ‘सत्ताधाऱ्यांना दोष देता कामा नये..’ बंगळुरूतील मृत्यूतांडवावर BCCI कडून दोन टोकाच्या प्रतिक्रिया


Bangalore Stampede: आयपीएलच्या 18 (IPL 2025) व्या हंगामाचं जेतेपद मिळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघावर, संघातल्या प्रत्येक खेळाडूवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. इथं संघ विजयी होतो तोच 12 तासांच्या आतच बंगळुरूच्या (Chinnaswamy Stadium stampede) चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वियजोत्सव साजरास करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि इथं संघातील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी म्हणून लाखोंच्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली. पाहता पाहता गर्दी इतकी वाढली, की तिथं असणाऱ्या पोलीस दलालासुद्धा या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानाजचं ठरताना दिसलं. 

स्टेडियमच्या आतमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झालेली असतानाच स्टेडियमबाहेर मात्र मृत्यूचा तांडव सुरू झाला होता. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या भयंकर चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 11 जणांनी प्राण गमावले, तर अनेक क्रिकेटप्रेमी गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले. बीसीसीआय आणि कर्नाटक सरकारपर्यंत ही खबरबात पोहोचताच त्यांनी तातडीनं या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेवर BCCI च्या वतीनं भूमिका मांडली. सैकिया यांनी बंगळुरूत झालेली ही घटना अचतिशय दु:खद असल्याचं म्हटलं. 

‘वास्तविक ही घटना अतिशय दुर्दैवी असून, अशा प्रकारच्या अमाप लोकप्रियतेची नकारात्मक बाजू यातून यमोकर आली आहे. चाहते त्यांच्या आवडच्या खेळाडूंप्रती भावनिक नात्यानं पाहतात यात शंकाच नाही. मात्र आयोजकांनी इथं अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता होती. या दुर्घटनेमध्ये ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वंन करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो’, असं ते म्हणाले. 

सैकिया यांनी सदर दुर्घटनेमध्ये चूक तर नक्की झाली आहे असं म्हणत आयपीएलच्या हंगामानातर अशा निराशाजनक घटना घडणं ही बाब अत्यंत वाईट असल्याचं म्हणत दु:ख व्यक्त केलं. 

BCCI उपाध्यक्ष म्हणाले… 

बंगळुरूमध्ये उसळलेली प्रचंड गर्दी आणि त्यानंतरची चेंगराचेंगरीची दुर्घटना पाहता बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी चिंतेचा सूर आळवत म्हटलं, ‘असं कोणत्याही राज्यात होऊ शकतं आणि यासाठी सत्ताधारी पक्षाला निशाण्यावर घेऊ नये. मुळात अशा दुर्घटनेचं राजकारण व्हायला नको. भाजपशासित राज्यात असं काही घडत असेल तर, पक्षाला याचा दोष देता कामा नये. प्रत्यक्षात तिथं गर्दी जास्त होती. मी स्वत: बंगळुरूच्या संघ व्यवस्थापकांशी संवाद साधला असून, त्यांनाही इतकी गर्दी अपेक्षित नव्हती आणि त्यातच चेंगराचेंगरीच्या घटनेनं परिस्थिती आणखी चिघळली. यादरम्यान मृतांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याचाच प्रयत्न असेल.’

नेमकी कधी झाली चेंगराचेंगरी? 

आरसीबीच्या विक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच ही घटना घडली. जिथं असंख्य चाहत्यांनी स्टेडियमच्या विविध प्रवेशद्वारांतून मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी परिस्थिती इतकी चिघळली की अनेक नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आणि अस्वस्थतेसह भीतीची लाट दिसून आली. काहींना प्रकृती अस्वास्थ्यामुळं पोलिसांनी तातडीनं रुग्णालयात दाखल करत मदतकार्य सुरू केलं आणि नागरिकांना घरी परतण्याचं आवाहन केलं. मात्र तोपर्यंत जे व्हायचं ते घडूनच गेलं होतं. 





Source link

Bangalore Stampede: मोदींनी घेतली दखल! म्हणाले, ‘ही दुर्घटना अत्यंत…’; राहुल गांधी म्हणाले, ‘कोणताही उत्सव…’

0
Bangalore Stampede: मोदींनी घेतली दखल! म्हणाले, ‘ही दुर्घटना अत्यंत…’; राहुल गांधी म्हणाले, ‘कोणताही उत्सव…’


Modi & Rahul Gandhi On RCB Stampede In Bangalore: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाच्या सेलिब्रेशनला बुधवारी बंगळुरुमध्ये गालबोट लागलं. खेळाडूंना पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्यांची एकच झुंबड उडल्याने आणि नियोजनासंदर्भात पुरेशी व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं होऊनही मैदानात खेळाडूंचा सत्कार समारंभ पार पडला. या वरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची दखल घेतली. 

मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी घडलेली घटना हृदयद्रावक असल्याचं नमूद केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन मोदींची या दुर्घटनेवरील प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली आहे. “बेंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत आहेत. जखमींना लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो,” असं मोदींनी म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.

कोणताही उत्सव कोणाच्या जीवापेक्षा मोठा नाही: राहुल गांधी

दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनीही या प्रकरणावर भाष्य करताना, कोणतंही सेलिब्रेशन हे एखाद्याच्या जीवापेक्षा अधिक मोठं नसावं, असं म्हटलंय. “बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या समारंभात झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. जखमी झालेल्या सर्वांना लवकर बरं वाटावं म्हणून मी प्रार्थना करतो,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, “या दुःखाच्या वेळी, मी बेंगळुरूच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. कर्नाटक सरकारने पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवली पाहिजे,” अशी अपेक्षाही राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.

“ही दुर्घटना एक वेदनादायक आठवण आहे. कोणताही उत्सव मानवी जीवनापेक्षा अधिक मूल्यवान नसतो. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी प्रत्येक सुरक्षा नियमांचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि काटेकोरपणे अंमलात आणले पाहिजे – कोणाचेही प्राण हे कायमच प्रथम प्राधान्य क्रमावर असले पाहिजेत,” असंही राहुल यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, एवढी गर्दी येईल असं अपेक्षित नव्हतं

मैदानाची क्षमता 35 हजार प्रेक्षकांची असताना मैदानाबाहेर 2 ते 3 लाख चाहत्यांनी गर्दी केली होती, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 





Source link

बाईक घेऊन डायरेक्ट ट्रेनच्या डब्यात घुसला, जोर जोरात हॉर्न वाजवला आणि… असा भयानक प्रकार याआधी कुणीच पाहिला नसेल

0
बाईक घेऊन डायरेक्ट ट्रेनच्या डब्यात घुसला, जोर जोरात हॉर्न वाजवला आणि… असा भयानक प्रकार याआधी कुणीच पाहिला नसेल



सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिएत एक तरुण लोकल ट्रेनमध्ये बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. 



Source link