Friday, July 10, 2026
Home Blog Page 206

तरुणाच्या आत्महत्येने सोनवडी खुर्द गावात शोककळा; व्यसन, नोकरीतून ब्रेक की अन्य कारण?

0
तरुणाच्या आत्महत्येने सोनवडी खुर्द गावात शोककळा; व्यसन, नोकरीतून ब्रेक की अन्य कारण?

फलटण :- दि. २ जून २०२५ रोजी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने फलटण तालुक्यातील सोनवडी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. गावातील २७ वर्षीय युवक रविराज लक्ष्मण पोळ याने तुकाई मंदिरासमोर बसून डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने विषारी औषधही सेवन केल्याचे समोर आले आहे.

ही घटना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी स्पंदन केअर हॉस्पिटल, फलटण येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

रविराज पोळ याने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तो काही काळापासून व्यसनाधीन होता आणि एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. सदर कंपनीने त्याला नुकताच नोकरीतून ब्रेक दिला होता, असे देखील समजते.

याप्रकरणी मृताचे मामा नवनाथ विठ्ठल पवार (वय ३८, व्यवसाय: शेती व मजुरी, रा. सोनवडी खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस नाईक यादव अधिक तपास करत आहेत.

गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, युवकांच्या मानसिक आरोग्याची व व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा आटपाडी ते मंत्रालय लॉग मार्च; फलटणमध्ये उत्स्फूर्त स्वागत

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा आटपाडी ते मंत्रालय लॉग मार्च; फलटणमध्ये उत्स्फूर्त स्वागत

फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आटपाडी येथे असलेला पुतळा जाणीवपूर्वक हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ शेकडो भीमसैनिकांनी आटपाडी ते मुंबई मंत्रालय असा लॉगमार्च काढला आहे. या असंवेदनशील व अकार्यक्षम प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सुरू झालेला हा मार्च फलटण नगरीत पोहोचताच मंगळवार पेठ येथे स्थानिक भीमसैनिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

या भीमसैनिकांच्या विश्रांतीसाठी कोळकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज दिनांक 4 जून 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मंगळवार पेठ येथून हा लॉग मार्च पुढे मार्गस्थ झाला.

या वेळी सामाजिक बांधिलकी जपत जयश्री अर्बन पतसंस्थेचे चेअरमन दयानंद पडकर यांनी सर्व भीमसैनिकांना पावसाळी रेनकोट, औषधे, इलेक्ट्रोल पावडर व प्रत्येकी 3000 रुपये रोख स्वरूपात मदत दिली.

तसेच मॅग फिन्सर्व्ह कंपनी लि., फलटणचे एरिया मॅनेजर विशाल पाटील यांच्या वतीने कोरडा खाऊ वाटप करण्यात आला. बुद्ध जयंती 2025 या संस्थेने सुद्धा आर्थिक मदत रोख स्वरूपात केली.

या वेळी विजय येवले (RPI आठवले गट), दयानंद पडकर, विकास काकडे सर, कपिल काकडे, विशाल पाटील, चंद्रकांत मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी लढा!आटपाडी ते मंत्रालय लॉंग मार्च आज फलटणमध्ये !

0
बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी लढा!आटपाडी ते मंत्रालय लॉंग मार्च आज फलटणमध्ये !

फलटण | ४ जून २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आटपाडी ते मंत्रालय लॉंग मार्चचा आज फलटणमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आला. हा लढा केवळ पुतळ्याच्या पुनःस्थापनेचा नाही, तर बाबासाहेबांच्या अस्मितेचा आहे, असा निर्धार करत शेकडो भीमसैनिक बुधवारी सकाळी ९:४५ ते १०:०० वाजेच्या सुमारास फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले.

या लॉंग मार्चने काल संध्याकाळी कोळकी  बुद्ध विहार, फलटण येथे मुक्काम केला होता. शहरातील अनेक सामाजिक संघटना, नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐक्य दर्शवले.

या लॉंग मार्चची सुरुवात ३० मे २०२५ रोजी आटपाडीतील सांगोला चौक येथून झाली. कारण प्रशासनाने समाज बांधवांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, पहाटे ३ वाजता जेसीबीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवून चबुतरा उध्वस्त केल्याने भीम अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक समाज बांधवांनी प्रशासनाशी चर्चा करून पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवण्यास तयार असल्याचे सांगूनही असा अनैतिक प्रकार करण्यात आला. यामुळे संतप्त नागरिकांनी संविधानिक मार्गाने २२ दिवसांचा लॉंग मार्च करून मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला.

लॉंग मार्चचा मार्ग:
आटपाडी – म्हसवड – गोंदवले – दहिवडी – फलटण – जेजुरी – पुणे – पिंपरी चिंचवड – तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा – लोणावळा – खोपोली – चेंबूर – मुंबई मंत्रालय

या लढ्याचे नेतृत्व शैलेश ऐवळे आणि सनी कदम करीत असून, आबालवृद्ध भीमसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आठवणींनी भरलेली शाळा पुन्हा गजबजली ; काळज शाळेत २००५-०६ च्या बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात”

0
आठवणींनी भरलेली शाळा पुन्हा गजबजली ; काळज शाळेत २००५-०६ च्या बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात”

फलटण (काळज ) :-  डब्यांतील खमंग चव, निकालाच्या भीतीने थरथरलेली मनं, मैदानावरचे खेळ, वर्गातील खोड्या, हातावर घेतलेल्या छड्या आणि शिक्षकांचे प्रेमळ शिस्तबद्ध मार्गदर्शन या साऱ्या आठवणींनी पुन्हा एकदा उर्मी घेतली आणि २००५-०६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, गुरुजन आणि विद्यमान मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत “स्नेह संमेलन – आनंद सोहळा २०२५” उत्साहात पार पडला.


🏫 कार्यक्रमाची भव्य सुरुवात :

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करत प्रतिमांचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करत कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले.


🙏 गुरुजनांना कृतज्ञतेचा सन्मान :

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः…” या स्तोत्राच्या उच्चारात शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. अंगणवाडी शिक्षिका खराडे मॅडम जिल्हा परिषद शाळा काळज घाडगे मॅडम स्वाती काकडे मॅडम कदम मॅडम  यांच्यापासून ते काळज हायस्कुलच्या शिक्षकांपर्यंत सर्व गुरुजनांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रत्येक शिक्षकाने आपल्या आठवणी सांगताना डोळ्यांत ओल व हृदयात प्रेम मिसळलेल्या भावना व्यक्त केल्या.


🕯️ अभिवादन दिवंगत शिक्षकांना :

मणेर सर, दोरगे मॅडम आणि जाधव सर या आपल्या प्रिय शिक्षकांच्या निधनाची बातमी शोकाकुल करत होती. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर या आठवणींचा भावनिक ठसा स्पष्ट दिसत होता.


👥 परिचयाचे क्षण आणि गप्पांची मैफल :

विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, सध्याचे व्यवसाय, आणि शालेय आठवणी शिक्षकांसोबत शेअर करत हास्यविनोद आणि गोड गप्पांमध्ये रंग भरला. काहींनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजनांच्या मार्गदर्शनालाच दिले. विद्यार्थिनींचा प्रतिसादही विशेष उल्लेखनीय होता. कार्यक्रमात एकमेकांना नव्याने ओळखण्याची ही पर्वणी ठरली.


🍱 लंच आणि छायाचित्र सत्र :

दुपारच्या सत्रात सर्वांनी एकत्र भोजन घेतले. त्यानंतर सामूहिक छायाचित्र सत्रात जुन्या आठवणींना फ्रेममध्ये बंदिस्त करण्यात आले. जुने फोटो आणि नव्या आठवणींसोबत हा क्षण अविस्मरणीय ठरला.


🏸 खेळ आणि सांगता सत्र :

खेळांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानावर तीच धावपळ, तोच जल्लोष अनुभवायला मिळाला. खो-खो, क्रिकेट, कबड्डीच्या आठवणी जागवल्या गेल्या. सांगता सत्रात संयोजकांनी सर्वांचे आभार मानले आणि पुढेही अशाच प्रकारचे स्नेहमेळावे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.


  • जि. प. शिक्षक/शिक्षिका : घाडगे मॅडम, स्वाती काकडे मॅडम, कदम मॅडम, देशपांडे मॅडम
  • काळज हायस्कुल शिक्षक : गुंजवटे सर, शेख सर, चौधरी (आबा) सर
  • अंगणवाडी शिक्षिका : खराडे मॅडम
  • विद्यमान मुख्याध्यापक (जि. प. शाळा) : भोसले सर
  • विद्यमान मुख्याध्यापक (हायस्कुल) : गाढवे सर ,                                                 काळज  गावचे  विद्यमान  सरपंच संजय गाढवे

💬 संवेदनशील शेवट :

“कितीही मोठं झालो, कुठेही गेलो, पण आपली शाळा आणि शिक्षक हे कायम आपल्या हृदयात असतात.”

या ओळीतच या कार्यक्रमाचा खरा सारांश सामावलेला आहे. ‘स्नेह संमेलन आनंद सोहळा २०२५’ हा केवळ एक स्नेहमेळावा नव्हता, तर ही एक स्मृतीगंधाची जिवंत कविताच होती.

स्मृतीगंधाचा स्नेहमेळावा – काळजच्या२००५-०६ बॅचचा गहिरा अनुभव !

0
स्मृतीगंधाचा स्नेहमेळावा – काळजच्या२००५-०६ बॅचचा गहिरा अनुभव !

🌟 “गुरुर्ब्रह्मा…”चा सन्मानसोहळा – काळजच्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरूंना भावपूर्ण अभिवादन!

🌼 भारतीय संस्कृतीची स्नेहमय सुरुवात

फलटण (काळज ) ” संस्कृती आहे आपली प्रकाशाळी, शितलता आहे त्यात चंद्राची, दीपप्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची.”
या ओळींसह कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मंचावरील मान्यवरांनी देवी सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून कार्यक्रमास मंगल प्रारंभ केला.


🙏 गुरूंचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मानभिवादन

“गुरू विना कोणी दाखवील वाट? यशाची उंच शिखरं गाठण्यासाठी गुरूचाच हात धरावा लागतो.”
या भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा भावनिक सत्कार केला.
सत्कारप्राप्त गुरुजन:
खराडे मॅडम (अंगणवाडी), घाडगे मॅडम, स्वाती काकडे मॅडम, कदम मॅडम, देशपांडे मॅडम, गुंजवटे सर, शेख सर, चौधरी (आबा) सर

त्यांच्या सन्मानात प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू दाटून आले.


🕯️ दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली

मणेर सर, दोरगे मॅडम, आणि जाधव सर यांच्या स्मृतीस दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

“ते गेले तरी त्यांच्या शिकवणीचे संस्कार आजही आमच्यासोबत आहेत,” अशी भावना यावेळी व्यक्त झाली.


🎤 वक्तृत्वातून उमटलेले भावगर्भ सूर

विद्यार्थिनीने भावना व्यक्त करत म्हटलं:

“गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः, गुरू साक्षात परब्रह्म – जीवनात जो मार्गदर्शक होतो तोच खरा दीपस्तंभ असतो.”

सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षण, सुसंस्कार आणि जीवनाच्या वाटचालीत गुरूंचे योगदान किती अमूल्य आहे हे ठळकपणे अधोरेखित झाले.


📸 गप्पा, हशा, आठवणी आणि प्रेम

स्नेहमेळाव्यानंतर सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. जुन्या आठवणी, बालपणीचे किस्से आणि गमतीजमती शेअर करत हास्यकल्लोळ झाला.
मोबाईल कॅमेरातून टिपले गेलेले क्षण म्हणजे भावनांची सोनेरी साठवणच!


🏏 बालपण पुन्हा अनुभवले खेळांतून

खो-खो, कबड्डी, क्रिकेट अशा पारंपरिक खेळांनी संपूर्ण शाळा गजबजून गेली.

“शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती एक भावना आहे,” हे प्रत्यक्ष अनुभवलं गेलं.


🎙️ विद्यमान शिक्षकांचे मोलाचे योगदान

प्रस्तुत कार्यक्रमाला भोसले सर (प्राथमिक) व गाढवे सर (हायस्कूल) या विद्यमान मुख्याध्यापकांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले,

“माजी विद्यार्थ्यांनी आपले गुरू विसरले नाहीत, हीच खरी आमच्या कार्याची पावती आहे.”


💬 शेवटी…

“शाळा म्हणजे आठवणींचं खजिनं. कितीही उंच भरारी घेतली, तरी मनातली शाळा मात्र कायमच शाबूत राहते.”

हा संपूर्ण स्नेहमेळावा म्हणजे एका सुंदर नात्याची, कृतज्ञतेची आणि श्रद्धेची कहाणी होती – गुरुशिष्य परंपरेचा एक प्रकाशमान सोहळा!

✍️ प्रतिनिधी – साहस Times,


मारहाण अन् गुप्तांगांना… ; टोल प्लाझावर कथिक शेतकरी नेत्यांकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, Video Viral

0
मारहाण अन् गुप्तांगांना… ; टोल प्लाझावर कथिक शेतकरी नेत्यांकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, Video Viral


Viral Video : एका टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याशी शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथल्या टोल प्लाझावरील ही संतापजनक घटना घडली आहे. 03 जून मंगळवारी दुपारी दादरी परिसरातील एनएच-91 लुहारली टोल प्लाझावर शेतकरी संघटनेच्या नावाखाली काही लोक तेथे आले. त्यावेळी यांनी टोल कर भरण्यास नकार दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले तेव्हा त्यांनी महिला टोल कर्मचाऱ्याशी केवळ शिवीगाळच केली नाही तर अश्लील कृत्येही केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. स्थानिक प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाच्या मते, अशा घटना आता दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत आणि यामुळे महामार्गाची सुरक्षितता आणि महसूल दोन्ही धोक्यात येत आहे. 

घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये बाबा हिरा नाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक रोहित शर्मा त्यांच्या काही सहकाऱ्यांसह टोल प्लाझावर पोहोचताना दिसत आहेत. हे सर्व शेतकरी संघटनेचा गणवेश घालून येतात आणि टोल न भरता जबरदस्तीने व्यावसायिक वाहने जाऊ देण्याचा प्रयत्न करतात. 

टोलवर तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्याने या लोकांना थांबवले तेव्हा त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलेच नाही तर तिच्या गुप्तांगांना स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणात अमित भाटी नावाच्या व्यक्तीचे नावही समोर आले आहे, ज्याच्याविरुद्ध आधीच 5-6 गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. तो देखील या घटनेत सक्रियपणे सहभागी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. 

टोल व्यवस्थापनाकडून निवेदन!

लुहारली टोल प्रशासनाने सांगितले की, हे लोक शेतकरी संघटनेच्या नावाखाली वाहतूक माफियांसारखे काम करत आहेत. महामार्गाच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा हा थेट कट आहे. टोल कर्मचाऱ्यांना दररोज धमक्या दिल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. जर या घटना वेळीच थांबवल्या नाहीत तर हे समाजकंटक भविष्यात मोठी घटना घडवू शकतात. टोलवर सुरक्षा पूर्ववत व्हावी यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. 





Source link

Bank Robbery Case : 52 कोटींचं सोनं आणि काळी जादू… ‘या’ बँकेत पडला देशातील सर्वात मोठा दरोडा

0
Bank Robbery Case : 52 कोटींचं सोनं आणि काळी जादू… ‘या’ बँकेत पडला देशातील सर्वात मोठा दरोडा


Bank Robbery Case : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील बँकेत देशातील सर्वात मोठा दरोडा पडला आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने ज्यांची अंदाजे किंमत 53 कोटींच्या घरात आहे. त्यासोबत 5.2 लाख रोख रक्कम लुटली आहे. हा दरोडा रविवारी 25 मे रोजी पडला आहे. धक्कादायक म्हणजे दरोडेखोरांनी हा दरोडा टाकण्यासाठी काळ्या जादूचा वापर केल्यामुळे पोलीसही हैरान झाले आहेत. 

विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एका सफाई कामगाराला या चोरीची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर 26 मे रोजी मंगोडीमधील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली. एसपींनी सांगितले की, 24 तारखेला (चौथा शनिवार) बँक बंद होती तर 25 तारखेला पीएनओ साफसफाईसाठी आला तेव्हा त्याला शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यानंतर पोलिसांना या दरोड्याची बातमी देण्यात आले. 

लॉकर उघडण्यासाठी बनावट चावीचा उपयोग!

ते पुढे म्हणाले, ‘सखोल चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की, 59 किलो सोने चोरीला गेले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हे सोने त्या ग्राहकांचे होते ज्यांनी ते सोन्याच्या कर्जासाठी तारण ठेवले होते.’ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सहा ते आठ सदस्यांच्या या टोळीने सोन्याने भरलेले एक विशिष्ट लॉकर उघडण्यासाठी बनावट चावी वापरली. दोन दिवस बँकेचे निरीक्षण केल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्याचे दिसते. पोलिसांनी सांगितले की त्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडले आणि अलार्म सिस्टम निष्क्रिय केली. एसपी म्हणाले की यावरून असे दिसून येते की गुन्हेगारांना बँकेच्या अंतर्गत रचनेबद्दल आधीच माहिती होती.

बँकेच्या खिडकीवर काळी बाहुली

पोलिसांनी पुढे जे सांगितले ते खूपच धक्कादायक होते. पोलिसांनी सांगितले की दरोडेखोरांनी तुटलेल्या खिडकीजवळ एक काळी बाहुली ठेवली होती, जी कदाचित तपासाची दिशाभूल करण्यासाठी काळी जादू करण्यासाठी ठेवली गेली होती. पोलिसांचा असा विश्वास आहे की तपासकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि प्रकरणातील पुढील तपासाला विलंब करण्यासाठी हे जाणूनबुजून केले गेले होते, जेणेकरून गुप्तचर यंत्रणेच्या सहभागाची छाप निर्माण होईल.

गुन्हेगारांनी जादूचा वापर…

पोलिस सूत्रांनी सांगितले की, ‘ही अत्यंत व्यावसायिक आणि नियोजित दरोडा होता. तपासात गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी काळ्या जादूचा वापर करण्यात आला आहे असे दिसते.’ कॅनरा बँकेच्या ग्राहक शिवना गौडा म्हणाल्या, ‘दरोड्याच्या वेळी बँकेत सुमारे 53 कोटी रुपयांचे सोने आणि 7 लाख रुपये रोख होते याची पुष्टी झाली आहे. हरनाल आणि हुबळी सारख्या शेजारच्या जिल्ह्यांतील लोकांनी कर्जासाठी या शाखेत त्यांचे सोने गहाण ठेवले होते.’ गुंतलेल्या मालमत्तेचे प्रमाण आणि मूल्य पाहता, हे देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड्यांपैकी एक असू शकते असे म्हणणे योग्य ठरेल.

बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘ही ग्राहकांची चूक नाही. त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू बँकेवर विश्वास ठेवला. वैयक्तिकरित्या, मला वाटते की सुरक्षेचा इतका गंभीर भंग रोखण्यासाठी बँकेने अधिक सतर्क राहायला हवे होते.’ दरम्यान, पोलिसांनी सांगितले की ते याचा तपास करत आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. एसपी म्हणाले, ‘तपास हळूहळू सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की आरोपीला लवकरच अटक केली जाईल.’





Source link

गुप्तांगाजवळची त्वचा काळी पडलीये, रंग उजळण्यासाठी क्रीम लावावी का? पाहा डॉक्टर काय म्हणतात..

0
गुप्तांगाजवळची त्वचा काळी पडलीये, रंग उजळण्यासाठी क्रीम लावावी का? पाहा डॉक्टर काय म्हणतात..


Dark Private Part : गोरा असो किंवा सावळा, पुरुष असो किंवा स्त्री यांचे गुप्तांगाजवळील त्वचा ही काळी असते. या काळा त्वतेची अनेक लोकांना लाज वाटते. जोडीदारासमोर जाताना ते मागेपुढे पाहतात. अशावेळी मार्केटमध्येही अनेक प्रकारच्या क्रीम आल्या आहेत, ज्या गुप्तांगाजवळील त्वचा गोरी करण्याचे दावे करतात. पण ही क्रीम गुप्तांगाजवळील त्वचेला लावणे योग्य आहे का? त्यामुळे आरोग्यास कुठला धोका तर नाही? असे प्रश्नही उपस्थितीत होतात. याबद्दल डॉक्टर काय सांगतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी प्राइव्हेट पार्ट जवळची जागा काळी का असते याबद्दल पहिला पाहूयात. 

प्राइव्हेट पार्ट काळं होण्याचं कारण काय?

डॉ. मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या त्यांनी गुप्तांग काळे असण्यामागील कारण सांगितलं आहे. ते म्हणतात की  गुप्तांग काळे असणे म्हणजे तुम्ही स्वत:ची किंवा गुप्तांगाची योग्य स्वच्छता किंवा काळजी घेत नाही.  तुमच्या गुप्तांगाजवळील त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा अनेकदा गडद असते. हे हार्मोन्स, घर्षण आणि नैसर्गिक रंगद्रव्यामुळे घडतं. पण खरी समस्या तेव्हा सुरु होतं ज्यावेळी लहानपणापासूनच, आपल्याला फिल्टर केलेले फोटो, प्रौढ सामग्री आपण पाहतो, ज्यामुळे आपले शरीर कसे दिसावे याचा एक बनावट आदर्श आपल्या डोळ्यासमोर न कळत उभा राहतो. 

प्राइव्हेट पार्ट काळं असणे गैरनाही!

डॉ. व्होरा पुढे म्हणाले, “आपण गोरा जननांगांवर विश्वास ठेवू लागलो आहोत, ही गैरसमज आपल्याला लाज वाटते. बऱ्याच महिला आणि पुरुषांनाही असुरक्षित वाटते. बरेच लोक यामुळे जवळीक टाळतात, अनेकांना काळजी वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्या खालच्या नजरेवरून त्यांचा न्याय करेल.”

मार्केटमधील क्रीमचा वापर करावा की नाही?

डॉ. व्होरा यांनी शेवटी स्पष्ट केलंय, “दुर्दैवाने या लाजेवर पैसे खर्च केले गेले आहेत, कंपन्या तुम्हाला त्वचा पांढरी करणारी क्रीम, जननेंद्रियाला पांढरी करणारी उत्पादने विकतात, जी बहुतेकदा अनावश्यक आणि हानिकारक रसायनांनी भरलेली असतात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण वैद्यकीयदृष्ट्या याची अजिबात गरज नाही. हे संवेदनशील त्वचेला नुकसान करू शकतं. म्हणून समजून घ्या की तुमच्या खाजगी भागांभोवती काळी त्वचा ही दोष नाही आणि ती दुरुस्त करण्याची गरज नाही.”





Source link

पावसाळ्यात मुरुमांपासून मुक्ती हवीय? चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा ‘या’ प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती!

0
पावसाळ्यात मुरुमांपासून मुक्ती हवीय? चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा ‘या’ प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती!


How To Prevent Pimples In Monsoon: पावसाळा म्हणजे दमट हवामान, वाढलेली आर्द्रता आणि बॅक्टेरियांच्या वाढीस अनुकूल वातावरण. याचमुळे या हंगामात त्वचेच्या समस्या, विशेषतः मुरुमे अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. पावसाळ्यातील बदललेले हवामान, चेहऱ्यावरील घाम, तेल, धूळ आणि ओलसरपणा यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण अडकते आणि मुरुमांची उत्पत्ती होते. यावर मात करण्यासाठी या काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.

पावसाळ्यात मुरुमांपासून बचावासाठी हे उपाय करा

1. नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता
पावसाळ्यात चेहऱ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक गोष्ट आहे. दिवसातून किमान दोन वेळा पीएच बॅलन्सिंग क्लीन्सर वापरा. जो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकेल आणि छिद्रे बंद होण्यापासून थांबवेल.

2. एक्सफोलिएशन
आठवड्यातून एक ते दोन वेळा सौम्य एक्सफोलिएटरचा वापर करा. यामुळे मृत पेशी हटून त्वचा श्वास घेऊ लागते. कठोर स्क्रब टाळावे कारण हे त्वचेचे नुकसान करू शकते.

3. आहारात सुधारणा
तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूड हे पावसाळ्यात मुरुमांना अधिक आमंत्रण देतात. त्याऐवजी ताज्या फळांमध्ये  लिंबू, पपई, काकडी, टोमॅटो यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंटयुक्त अन्न त्वचेसाठी लाभदायक ठरते.

4. हायड्रेशन
पावसाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी प्यायले जाते, पण ही सवय त्वचेसाठी घातक ठरते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.

5. मेकअप टाळा
पावसाळ्यात मेकअप वापरणे टाळा किंवा हलका मेकअप वापरा. मेकअप करताना ही काळजी घ्या की तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होणार नाहीत.

6. चेहऱ्याला वारंवार हात लावू नका
पावसाळ्यात आपण अनेकदा बाहेर जातो तेव्हा अनेक सुक्ष्मजीव आपल्या हातांना लागतात. चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने बॅक्टेरिया त्वचेत प्रवेश करतात आणि मुरुमे होतात.

होममेड फेसपॅक वापरा
1. मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. हा पॅक अँटीबॅक्टेरियल असून मुरुमांवर नियंत्रण ठेवतो.

2. चंदन आणि गुलाबजल एकत्र करुन लावल्याने चेहरा थंड राहतो आणि डाग कमी होतात.

3. बेसन आणि हळद नैसर्गिक क्लिंजर म्हणून उत्तम आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा नक्कीच वापरले पाहिजे. हा पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी एकदा पॅचटेस्ट करणे महत्त्वाचे आहे. 

पावसाळा कितीही सुंदर वाटत असला तरी त्वचेसाठी ही वेळ सावधगिरीची असते. मुरुमांना दूर ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता, योग्य आहार, भरपूर पाणी आणि नैसर्गिक उपाय हेच आपले संरक्षण कवच आहे. त्वचेला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आजपासूनच हे उपाय अमलात आणा.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले ‘पालकांनी कधीही ही चूक करु नये’

0
20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले ‘पालकांनी कधीही ही चूक करु नये’


घरात लहान बाळ असलं की आनंदाचं वातावरण असते. पण त्यासोबत त्या चिमुकल्या बाळाचीही तेवढीच काळजीही घ्यावी लागते. बाळाचा जन्म हा पालकांसोबत घरातील अनेक सदस्यांच्या आनंदात भर टाकतो. त्या बाळाला प्रेम करण्यासाठी बघण्यासाठी अनेक लोक येत असतात. पण तुम्हाला माहितीय का हे नुकतच जन्माला आलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. त्या बाळाला लगेचच संसर्ग होण्याचा धोका असतो. नुकतच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात फक्त 20 दिवसांच्या चिमुकलीला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ आली. या निष्पाप बाळाची प्रकृती अचानक खराब झाली. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली. 

डॉक्टर पवन मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या घटनेबद्दल सांगितलं आहे. त्यासोबत प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची सुचना केली आहे. कारण या निष्पाप बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ तिच्या पालकांच्या चुकीमुळे आली आहे. 

डॉ. पवन मांडवीय सांगितलं की, अलिकडेच एका पालकाने त्यांच्या 20 दिवसांच्या नवजात बाळाला आपत्कालीन कक्षात आणले. बाळाची तपासणी केली असता त्याला सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया झाल्याचं निष्पण झालं. बाळाची प्रकृती अशी होती की त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कुटुंबाशी बोलले असता असे आढळून आले की, आपल्या भारतीय समाजात ज्याप्रमाणे बाळाच्या जन्मानंतर नातेवाईक आणि मित्र त्याला पाहिला येतात. त्याचप्रमाणे त्या नवजात बाळाला भेटण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते.

डॉ. पवन मांडवीय म्हणतात की, अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा घरात एखादा छोटा पाहुणा येतो तेव्हा नातेवाईक आणि मित्र त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. या काळात बरेच लोक मुलाला आपल्या मांडीवर घेतात, काहीजण त्याला खायला घालतात आणि अनेक वेळा प्रेमाने गालावर चुंबनही घेतात.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत जर त्यापैकी कोणालाही सर्दी, खोकला, फ्लू किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला तर ते मुलासाठी खूप धोकादायक ठरू शकते. डॉ. पवन स्पष्ट करतात की अशा संसर्गांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती मोठ्या मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये आधीच विकसित झालेली असते, पण नवजात किंवा लहान मुलांमध्ये ती पूर्णपणे विकसित झालेली नसते.

आता अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाला असेल आणि तो मुलाच्या जवळ आला किंवा त्याचे चुंबन घेतले तर हा संसर्ग मुलापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुलामध्ये सर्दी, खोकला किंवा अगदी न्यूमोनिया देखील होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात, ‘मला समजते की आपल्या भारतीय समाजात, जर एखाद्या नातेवाईकाला मुलापासून दूर राहण्यास किंवा त्याचे चुंबन घेऊ नये असे सांगितले तर त्याला वाईट वाटू शकते. पण आपण हे विसरू नये की आपल्या मुलाची सुरक्षितता ही आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे.’

जर एखाद्याला सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला असेल तर त्याने मुलापासून कमीत कमी 6 फूट अंतर राखले पाहिजे. जवळ जाणे आवश्यक असेल तर मास्क घालून जावे. पालकांनी कोणालाही मुलाला किस करू देऊ नये, कारण यामुळे मुलाला विषाणूजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. डॉक्टर पवन म्हणतात की जर घरात एखादा छोटा पाहुणा आला असेल आणि लोक त्याला भेटायला येत असतील तर काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम, जर कोणी मुलाला स्पर्श करणार असेल किंवा खायला घालणार असेल तर त्याने त्याचे हात योग्यरित्या स्वच्छ केले आहेत याची खात्री करा .





Source link