Thursday, July 9, 2026
Home Blog Page 203

कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला

0


Satara Weather Update: सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील कोयना नगर मध्ये पावसाने रात्रीपासून जोर धरला आहे. कराड चिपळूण महामार्गावरील बांधकाम सुरू असणाऱ्या पुलाच्या शेजारील पर्यायी रस्ता डोंगरातून आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे कराड चिपळूण महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाचे काम रखडलं आहे.. पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे डोंगरावरून येणाऱ्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने महामार्गाला घातलेला भराव देखील यामध्ये वाहून गेला आहे.

कराड-चिपळूण महामार्गावर बसचा अपघात 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणला जोडणाऱ्या कराड-चिपळूण महामार्गावर बसचा अपघात झाला आहे. महामार्गाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने महामार्गावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात झाला आहे. एसटी आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन एसटी  नाल्यात गेली असून या अपघातात आठ जण प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मोठ्या प्रमाणावर एसटी बसचे नुकसान झाले. गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात सुरू आहे. 24 तासात 104 मिलिमीटर पावसाची नोंद कोयना भाग परिसरात झाली आहे.

दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील कोयनानगरमध्ये पावसाने रात्रभर जोरदार सुरुवात केली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने झाडे उर्मळून पडण्याचा घटना सुरु आहेत. गुहागर पंढरपूर मार्गांवर कोयनानगरमध्ये झाडाची भली मोठी फांदी रस्त्यात धोकादायक पद्धतीने उन्मळून पडल्याने प्रवास करताना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दरड कोसळली 

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दरड कोसळली आहे. कोयनानगर-तोरणे मार्गांवर दरड कोसळली.  मुसळधार पावसाने जननीवन विसकाळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर्ती झाडे कोसळली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  प्रशासनाकडून दरड तसेच रस्त्यांवरील पडलेली झाडे हटविण्यास सुरुवात झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

परशुराम घाटात संरक्षक भिंतीची माती वाहिली, धोकादायक प्रवास; चिपळूण महामार्गावर बसचाही अपघात

0


Nashik Rain Update : फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ

फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ



Source link

अजय देवगणच्या रेड 2 च्या OTT प्रीमिअरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहावा

0
अजय देवगणच्या रेड 2 च्या OTT प्रीमिअरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहावा


अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात सौरभ शुक्ला, रजत कपूर, वाणी कपूर, अमित सियाल, सुप्रिया पाठक, यशपाल शर्मा, श्रुती पांडे आणि ब्रिजेंद्र काला यांच्याही भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता ओटीटीवर चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे.



Source link

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही: शिवेंद्रसिंहराजे

0


Shivendra Singh Rajebhosale :  मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue) चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती शिवेंद्रसिंह राजे यांनी दिली आहे. 

शिवेंद्रसिंह राजे भोसले नेमकं काय म्हणाले?

पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं सांगितलं मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळील जमीन खचल्याचा विषय माझ्या कानावर आल्यानंतर मी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती घ्यायला सांगितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत पुतळ्याला किंवा पुतळ्याच्या चबुतऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पुतळ्याच्या आजूबाजूला जो भराव केला होता त्या काही भागातील माती पाऊस जास्त असल्यामुळे खचली आहे. त्या ठिकाणच्या तात्काळ दुरुस्तीच्या सूचना मी दिलल्या असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. 

संबंधित अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या संपूर्ण परिसरावर नीट लक्ष ठेवण्याच्या सूचना 

आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कोकणात पाऊस जास्त असतो. तरीही पीडब्ल्यूडी च्या संबंधित अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या संपूर्ण परिसरावर नीट लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही याची खबरदारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेत आहोत. सर्व अधिकारी माझ्याशी बोलले आहेत पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्याच्या बाजू ला असलेली जमीन पावसाळ्याच्या जास्त प्रमाणामुळे पाणी झिरपल्यामुळे थोड्या प्रमाणात खचली आहे. आणि त्याचे दुरुस्ती तात्काळ आता सुरु केली आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या आधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण त्या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तो 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 कोसळला. त्यावरून मोठं राजकारणही झालं. त्यानंतर महायुतीच्या सरकारने पुन्हा गाजावाजा करत मूळच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवला. हातातल्या तलवारीसह या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे. राजकोटवरील नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. आता महिनाभरातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली आहे.  त्यामुळे पुतळ्याला लागूनच असलेली जमीन काही प्रमाणात खचल्याचं दिसून आलं. या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. 

महत्वाच्या बातम्या:

Shivaji Maharaj Statue : पुतळा भक्कम, पण आता चबुतऱ्याला भगदाड पडलं; मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली

आणखी वाचा



Source link

15 वर्षांनी ‘ईद’साठी सह-कुटुंब भारतात आले… पण काळाने घाला घातला, संपूर्ण कुटुंब विमान अपघातात उद्ध्वस्त

0
15 वर्षांनी ‘ईद’साठी सह-कुटुंब भारतात आले… पण काळाने घाला घातला, संपूर्ण कुटुंब विमान अपघातात उद्ध्वस्त


एअर इंडिया विमान अपघाताने कित्येक कुटुंबं संपूर्णतः उध्वस्त झाली आहेत. त्यात लंडनहून ईद साजरी करण्यासाठी आणि  आपल्या अम्मी अर्थात आईला भेटायला आलेला जावेद अली आणि त्याचं संपूर्ण कुटुंब होते. पण या दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलं. तब्बल 15 वर्षांनी तो संपूर्ण कुटुंबासह ईदसाठी मायदेशी आला होता. पण नियतीने वेगळंच काही ठरवलेलं होतं.

कुटुंबासह मृत्यू

37 वर्षीय जावेद, त्याची पत्नी मरियम, पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची चिमुकली मुलगी  हे चौघंही एकत्र होते. ते चौघेही एअर इंडिया फ्लाइट AI-171 ने 242 लोकांसोबत अहमदाबादमधून लंडनला जाण्यासाठी निघाले होते. गुरुवारी ही फ्लाइट टेकऑफनंतर काही क्षणांतच इमारतीवर आदळून कोसळली आणि त्या अपघातात हे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं.

हे ही वाचा: Video: “मी 2 तासांपूर्वी त्याच फ्लाइटमध्ये होतो, त्याच वेळी…” अपघातग्रस्त झालेल्या विमानाने प्रवास केल्याचा एका व्यक्तीचा दावा

 

आईला अजूनही नाही माहिती 

जावेदच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचा इतिहास असून लवकरच तिची शस्त्रक्रिया होणार होती. तिच्या प्रकृतीचा विचार करून तिला अद्यापही हे सांगण्यात आलेलं नाही की, तिनं फक्त मुलगाच नव्हे तर सुना आणि दोन्ही नातवंडंही गमावली आहेत.

हे ही वाचा: “मी पुन्हा एअर इंडियामध्ये….” अहमदाबाद विमान अपघातानंतर डेव्हिड वॉर्नरची घोषणा, दुर्घटनेवर केले दुःख व्यक्त

 

भाऊ इम्तियाजला भावना अनावर 

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीडितांच्या DNA चाचण्या सुरू असताना जावेदचा भाऊ इम्तियाज यांनी NDTV शी बोलताना सांगितलं, “आमचं संपूर्ण कुटुंब संपलं. हे कोणत्या दु:स्वप्नासारखं वाटतंय. जावेद 11 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी युकेला गेला होता. तिथेच त्याची ओळख मरियमशी झाली आणि ते लग्न करून लंडनमध्ये स्थायिक झाले. ते ब्रिटिश नागरिक झाले होते.” 

“आम्ही 15 वर्षांनी सगळे एकत्र आलो होतो…”

इम्तियाज पुढे म्हणाले की, “आम्ही चार भाऊ-बहिणं आहोत. गेल्या 15 वर्षांत कधी दोन, कधी तिघं भेटत असतं. पण यावेळी पहिल्यांदा सगळे एकत्र आलो होतो. आईच्या ऑपरेशनपूर्वी ती आनंदी राहावी म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. जावेद खूप आनंदात होता. पण नियतीने आमच्या सर्वांच्या आनंदावर काळाचा पडदा टाकला.”

हे ही वाचा: निवृत्तीच्या उंबरठ्यावरील पायलट, गावासाठी आदर्श ठरलेली एअर होस्टेस… दुर्घटनेत मृत्यू झालेल्या क्रू मेंबर्सच्या जीवनकथा काळजाला चटका लावतील

 

“काय चूक केली आम्ही?”

“आम्ही आमच्या कुटुंबातील चार जीव गमावले. कोण जबाबदार आहे याला? 240 हून अधिक लोकं गेली. असं पुन्हा पुन्हा होत राहणार का? विमान फक्त उड्डाण करतं आणि काही सेकंदांतच कोसळतं, हे कसं शक्य आहे?”  असं म्हणत इम्तियाज यांनी दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. 





Source link

एका फटक्यात उघडतील 72 हजार नसा; निघेल रक्तातील चिकट घाण अन् कचरा, डॉक्टरांनी सांगितल्या Heart Attack वर टिप्स

0
एका फटक्यात उघडतील 72 हजार नसा; निघेल रक्तातील चिकट घाण अन् कचरा, डॉक्टरांनी सांगितल्या Heart Attack वर टिप्स


शरीरातील रक्तवाहिन्यांची स्वच्छता नायट्रो ऑक्साईड नावाच्या घटकाद्वारे केली जाते, जो शिरांमध्ये तयार होतो. शिरा स्वच्छ करण्याचे हे काम सतत चालू राहते. जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, शिरा रोग यासह अनेक गंभीर आणि जीवघेण्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याचा अर्थ असा की शरीरात नायट्रो ऑक्साईडचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला पाहिजे. डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांचा असा विश्वास आहे की हिरव्या पानांचे सेवन करून तुम्ही या घटकाचे प्रमाण वाढवू शकता.

डॉक्टरांनी सांगितले की हिरवी पाने म्हणजेच पालक, बीट, सलगम इत्यादी भाज्यांची पाने नायट्रो ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात. हिरव्या पानांचा रस रक्त तयार करण्याचे काम करतो म्हणून त्याला हिरवे रक्त म्हणतात. आहारात हिरव्या पानांचा समावेश करून तुम्ही शिरा निरोगी आणि मजबूत ठेवू शकता.

किती ज्यूस प्याल?

जर तुम्ही हिरव्या पानांचा रस म्हणून सेवन करत असाल तर डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की दररोज २५० मिली रस प्यावा. पालकाच्या पानांचा २५० मिली रस घ्या, बीटच्या पानांचा ५० मिली रस घ्या. जर तुम्हाला रस पिता येत नसेल तर तुम्ही हिरवी पाने कच्ची खाऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीची काही पाने जसे की सुपारीची पाने, मुळा पाने, धणे पाने, पालकाची पाने, कोशिंबिरीची पाने आणि कढीपत्ता मिसळून सॅलड म्हणून खाऊ शकता. त्याचे प्रमाण लक्षात ठेवा, उदाहरणार्थ, जर तुमचे वजन ५० किलो असेल तर फक्त ५० ग्रॅम खा.

हिरवी पाने चावून खा

डॉक्टरांनी सांगितले की, हिरवी पाने खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती चावणे. तुम्ही इतक्या ग्रॅम पानांचे तीन भाग करू शकता आणि सकाळच्या नाश्त्यात, दुपारी आणि संध्याकाळी चावू शकता. जर तुम्ही पानांचा रस बनवू शकत नसाल किंवा चावू शकत नसाल तर तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवावे. या गोष्टी खाल्ल्याने नायट्रो ऑक्साईडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या शिरा साफ होऊ शकतात.

नसा उघडल्या की नाही कसे ओळखाल? 

डॉक्टरांनी सांगितले की शिरा अडथळ्यामुळे तुम्हाला वेदना, अस्वस्थता, निळे डाग, बधीरपणा यासारखी लक्षणे जाणवू लागतात. जेव्हा ही लक्षणे कमी होऊ लागतात, तेव्हा समजून घ्या की तुमच्या शिरा उघडत आहेत आणि चांगले काम करत आहेत.





Source link

Foamy urine cause: लघवीदरम्यान येणारा फेस कोणत्या आजाराचं लक्षणं? आताच व्हा अलर्ट

0
Foamy urine cause: लघवीदरम्यान येणारा फेस कोणत्या आजाराचं लक्षणं? आताच व्हा अलर्ट


अनेकदा लघवीला थांबल्यावर जोरात लघवीला होते तेव्हा फेसाळ लघवी दिसते. तसेच कमोडमध्ये लघवीला गेल्यावरही फेसाळ लघवी दिसते. पण या सगळ्या व्यतिरीक्त सतत लघवीला होणे आणि लघवीमधून फेस आल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या असल्याचे निदर्शनास येते. 

जर तुम्हाला वारंवार फेसाळ लघवी येत असेल, तर ते प्रथिनांचे लक्षण असू शकते. जे किडनी स्टोन किंवा उच्च रक्तदाबामुळे होऊ शकते. याशिवाय, लघवीमध्ये फेस येण्याची इतर अनेक कारणे असू शकतात.

खराब किडनीचे प्रमुख लक्षणं

जर लघवी करताना थोडासा फेस येत असेल तर काही अडचण येत नाही, पण जर हा फेस जास्त प्रमाणात तयार होत असेल तर तो किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो. दुसरीकडे, अहवालांनुसार, जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा लघवीतून प्रथिने बाहेर पडू लागतात आणि ते फेसाचे रूप धारण करते.

किडनी निकामी होण्याची लक्षणे

किडनी खराब झाल्यावर, लघवीमध्ये फेस येणे, हातपाय सुजणे, थकवा, खाज सुटणे, कमी किंवा जास्त लघवी होणे, लघवीचा रंग गडद होणे आणि कोणत्याही कारणाशिवाय शरीरात खाज सुटणे अशी लक्षणे दिसून येतात. किडनीच्या नुकसानाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार. वाईट किंवा तेलकट अन्न खाल्ल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह, रक्तातील साखर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

फेसाळ लघवी होण्यामागचं कारण काय? 

शौचालयातील क्लिनिंग प्रोडक्ट्सच्या वापरामुळे देखील लघवीमध्ये फेस येणे होते.  ते कोणत्याही आजाराचे लक्षण नाही. याशिवाय, पुरेसे पाणी न पिणे किंवा जास्त व्यायाम न केल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा लघवी अधिक जाड आणि फेसाळ होऊ शकतो. तसेच, लघवीचा रंग गडद होईल आणि त्याला वास येऊ लागेल.

उच्च-तीव्रतेच्या व्यायामानंतर किंवा प्रथिने पूरक आहार जास्त घेतल्याने फेसाळ लघवी होऊ शकते, परंतु ते मूत्रपिंडाच्या समस्या, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यासारख्या गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण देखील असू शकते.

यूटीआयमुळे देखील फेसयुक्त लघवी होऊ शकते. फेसयुक्त लघवी व्यतिरिक्त, लघवी करताना वेदना किंवा जळजळ, वारंवार लघवी होणे आणि लघवीत रक्त येणे ही इतर लक्षणे उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही नक्कीच डॉक्टरांना भेटावे.

डॉक्टरांना कधी भेटावे?

फेसयुक्त लघवी ही एक सामान्य गोष्ट असू शकते, विशेषतः जर काही मिनिटांत फेस निघून गेला. तथापि, जर फेस कायम राहिला आणि तुम्हाला इतर लक्षणे दिसली तर ते किडनी स्टोन, यूटीआय किंवा कोलोव्हेसिकल फिस्टुला यासारख्या आरोग्य स्थितीचे लक्षण असू शकते.

औषधे देखील फेसयुक्त लघवी होऊ शकतात, म्हणून जर तुम्हाला शंका असेल की फेसयुक्त लघवी हा औषधांचा दुष्परिणाम आहे, तर तुम्ही तुमच्या औषधांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी.  





Source link

वेळीच ओळखा मेंदूतील नसा ब्लॉकेज झाल्याची लक्षणे; अन्यथा होऊ शकतो स्ट्रोकचा धोका

0
वेळीच ओळखा मेंदूतील नसा ब्लॉकेज झाल्याची लक्षणे; अन्यथा होऊ शकतो स्ट्रोकचा धोका


Symptoms of brain artery blockage in early stage: मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ लागला, की शरीर आधीच काही सूचनांद्वारे आपल्याला इशारा देत असतो. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर अवस्थेला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच, लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

मेंदूतील नस ब्लॉक होण्यामागचं कारण काय असतं?
मेंदू हे आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्र आहे. शरीराच्या प्रत्येक हालचालीसाठी मेंदू आदेश पाठवतो आणि प्रत्येक क्रिया त्याच्या नियंत्रणात असते. त्यामुळे, मेंदूशी संबंधित कोणतीही समस्या शरीरासाठी गंभीर ठरू शकते. मेंदूच्या नसांमध्ये अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाल्यास, ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वं मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे मेंदूचं कार्य थांबण्याची शक्यता असते आणि स्ट्रोक होण्याचा धोका निर्माण होतो.

सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
या अवस्थेत मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होतात. या गाठी नसांमध्ये अडकतात आणि रक्तप्रवाह थांबवतात. यामुळे नसांमध्ये दाब वाढतो, सूज येते आणि गंभीर परिणाम उद्भवू शकतात. डॉक्टर या स्थितीला Cerebral Vein Thrombosis (CVT) असं म्हणतात. वेळेत लक्ष न दिल्यास याचा परिणाम कायमस्वरूपी अपंगत्व, स्मृती कमकुवत होणे किंवा मृत्यू देखील ठरू शकतो.

मेंदूमधील नसा ब्लॉक होण्यापुर्वी आपल्याया काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. नाही तर ते जीवावर देखील बेतू शकते. मेंदू मध्ये नक्की कोणकोणते अडथळे निर्माण होतात. हे जाणून घेऊयात .  

1. अचानक आणि तीव्र डोकेदुखी: डोकेदुखी सामान्य असू शकते, पण जर ही दुखणं अचानक सुरू झाली आणि ती खूप तीव्र असेल, विशेषतः हे दुखणं आधी कधी अनुभवली नसेल, तर डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे.

2. अर्ध्या शरीरात अशक्तपणा किंवा मुकपणा: चेहऱ्याचा एक भाग, एक हात किंवा एक पाय अचानक कमकुवत वाटू लागणे किंवा मुका पडणे. हे देखील एक लक्षण आहे.

3. बोलण्यास त्रास होणे: वाक्य बनवण्यात अडचण, शब्द चुकीचे उच्चारले जाणे किंवा अगदी बोलणं अशक्य होणं.

4. दृष्टीत बदल होणे: एका डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर किंवा अस्पष्ट दिसणे, डोळ्यांसमोर अंधुक छटा दिसणे.

5. चक्कर येणे आणि असंतुलित वाटणे: चालताना समतोल बिघडणे, कोणत्याही दिशेला झुकत जाणे किंवा अचानक पडणे.

6. अत्यधिक थकवा आणि अशक्तपणा: शरीरात उर्जा नसल्यासारखं वाटणे, सामान्य काम करण्यासही त्रास होणे.

7. स्मृती कमी होणे किंवा गोंधळलेपणाची भावना: नुकत्याच घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, प्रश्नांना उत्तर देता न येणे, किंवा मनात गोंधळ निर्माण होणे.

8. शरीरातील विशिष्ट भागात मुंग्या येणे किंवा संवेदना कमी होणे: पाय, हात, बोटं किंवा चेहऱ्यावर शून्यता वाटणे, संवेदना जाणवू न शकणे.

9. चेहरा वळणे: हसताना एक बाजू न हलणे, तोंडाची रचना बदलणे, डोळा किंवा ओठ नीट न हलणे.

10. हालचालीत समन्वयाचा अभाव: बारीक हालचाली करताना अडथळा येणे. उदा. बटण लावणे, चमच्याने खाणे, लिहिणं.

ही लक्षणं शरीरात जाणवू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. याकडे दुर्लक्ष केल्यास याचा त्रास जीवावर बेतू शकतो. त्यामुळे त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. 





Source link

World Blood Donor Day 2025 : रक्तदानाच्या अगोदर अजिबात करु नका 5 चुका; शरीरावर होईल विपरित परिणाम

0
World Blood Donor Day 2025 : रक्तदानाच्या अगोदर अजिबात करु नका 5 चुका; शरीरावर होईल विपरित परिणाम


आजही लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकतेचा अभाव आहे. लोक अजूनही रक्तदान करण्यास कचरतात. तर रक्तदान करणे ही एक चांगली सवय आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे. तुमचे रक्त रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंजणाऱ्या अनेक रुग्णांना नवीन जीवन देऊ शकते. बरेच लोक रक्तदान करण्यास तयार असतात, परंतु माहितीच्या अभावामुळे ते काही चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.

आजकाल लोकांमध्ये अशक्तपणा खूप सामान्य आहे. अन्नाचा अभाव आणि संतुलित आहार न घेतल्यामुळे अनेकजण शरीरात अशक्तपणाशी झुंजत आहेत. तथापि, काही लोकांना काही वैद्यकीय स्थितीमुळे अशक्तपणाची देखील आवश्यकता असू शकते. याशिवाय, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रुग्णालयात अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाला रक्ताची आवश्यकता असते. गर्भधारणा, अपघात आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये, डॉक्टरांना अनेकदा रुग्णाला रक्त द्यावे लागते. पण बऱ्याचदा असे दिसून येते की रुग्णालयात पुरेसे रक्त नसल्याने कुटुंबातील सदस्यांकडून किंवा रक्तपेढीकडून रक्त घ्यावे लागते.

रक्तदान करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. बरेच लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा रक्तपेढीला रक्तदान करण्यासाठी रक्तदान करतात, जेणेकरून गरजूंना वेळेवर रक्त मिळू शकेल. कारण वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. म्हणून, आपण सर्वांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. यामुळे तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होते आणि रक्त शुद्ध देखील होते. परंतु रक्तदान करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदान करण्यापूर्वी काही चुका आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. या लेखात, आम्ही तुम्हाला अशा 6 गोष्टींबद्दल सांगत आहोत (रक्तदान करताना टाळायच्या चुका) ज्या तुम्ही रक्तदान करण्यापूर्वी काळजी घेतल्या पाहिजेत.

रक्तदान करण्यापूर्वी 6 चुका करु नयेत 

शरीराला पुरेशी विश्रांती
जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आदल्या रात्री चांगली आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही रक्तदानाच्या वेळी उत्साही राहू शकाल. जर तुम्ही हे केले नाही, तर रक्तदानानंतर तुम्हाला अधिक थकवा, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

तुमच्या आरोग्याची काळजी घ्या
रक्तदान करण्यापूर्वी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा तुम्हाला सर्दी आणि खोकला सारख्या हंगामी समस्या असतील तर तुम्ही रक्तदान करू नये. कारण यामुळे तुमची सध्याची स्थिती बिघडू शकते. तसेच, रक्तदान करण्याची तुमची क्षमता देखील यामुळे प्रभावित होऊ शकते.

पौष्टिक अन्न खा
रक्तदान करण्यापूर्वी शरीराला पुरेसे पोषण देणे खूप महत्वाचे आहे. लोह, व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहार घ्या. जेणेकरून रक्तदान केल्यानंतर तुम्हाला कमकुवत वाटू नये. तुम्ही लाल मांस, मासे, चिकन, राजमा, मसूर, पालक, काजू आणि सुकामेवा तसेच बिया देखील खाऊ शकता.

पुरेसे पाणी प्या
रक्तदान करण्यापूर्वी शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि रक्तदान केल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवत नाही. म्हणून रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर पुरेसे पाणी पिण्यासोबत जास्त द्रवपदार्थ पिण्याचा प्रयत्न करा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा
रक्तदानाच्या किमान २४ तास आधी अल्कोहोल पिणे योग्य नाही. तसेच, किमान २ तास आधी धूम्रपान थांबवणे उचित आहे. याचा तुमच्या रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

रिकाम्या पोटी कधीही रक्तदान करू नका
चुकूनही रिकाम्या पोटी रक्तदान करण्याची चूक करू नका. रक्तदान केल्यानंतर यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला थकवा आणि कमकुवतपणा जाणवू शकतो तसेच चक्कर येऊ शकते. म्हणून, रक्तदान करण्यापूर्वी खाणे महत्वाचे आहे.

हे देखील लक्षात ठेवा
रक्तदान केल्यानंतर, शरीराला विश्रांती द्या, काही द्रवपदार्थ प्या आणि थोडा वेळ झोपा. फळांचा रस प्या, यामुळे बरे होण्यास मदत होईल. १८ ते ६५ वयोगटातील कोणीही रक्तदान करू शकते. परंतु फक्त निरोगी लोकच रक्तदान करू शकतात. कोणतीही व्यक्ती ३-४ महिन्यांनी एकदा रक्तदान करू शकते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

४ वर्षे जुना जीएमएलआर उड्डाणपूल आता जोडला जाणार सायन-पनवेल महामार्गाला

0
४ वर्षे जुना जीएमएलआर उड्डाणपूल आता जोडला जाणार सायन-पनवेल महामार्गाला


घाटकोपर मानखुर्द लिंक रोड (GMLR) उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांनंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने १,०५१ कोटी रुपये खर्चून सायन-पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त दोन हात बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाशीहून पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Express Highway) ये-जा करणाऱ्या वाहनांना गोवंडीतील महाराष्ट्र नगरजवळील नेहमी वर्दळीच्या टी-जंक्शन सिग्नलवरून जाता येणार आहे.



Source link