Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटणच्या औद्योगिक प्रगतीला नवा गतीवेग; नाईक बोमवाडी MIDC मध्ये मोठा उद्योग येण्याचे...

फलटणच्या औद्योगिक प्रगतीला नवा गतीवेग; नाईक बोमवाडी MIDC मध्ये मोठा उद्योग येण्याचे संकेत!

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे नव्याने विकसित होत असलेल्या MIDC औद्योगिक वसाहतीसाठी एक महत्वाची आणि आशादायक पावले उचलण्यात आली आहेत. उद्योग मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत फलटणमध्ये नवीन उद्योग आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, MIDC प्रतिनिधी, तसेच धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही मोठ्या उद्योगसमूहांशी चर्चा करून त्यांना फलटणमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. चर्चेच्या सकारात्मक प्रतिसादानंतर, लवकरच नाईकबोमवाडी येथे रोजगारनिर्मितीचा मोठा प्रकल्प सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील सुमारे २०,००० तरुण बेरोजगार आणि स्थानिक भूमिपुत्रांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मंत्रालयात प्रत्यक्ष यश मिळाले असून, फलटणच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक उजळ नोंद होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments