Friday, June 26, 2026
Home Blog Page 20

नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

0
नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

खटाव : नागसेन बुद्ध विहार, त्रिमली येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व व भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न झाला. दिनांक ८ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरात खटाव तालुक्यातील उपासक श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षणासाठी सहभागी झाले आहेत.

शिबिराच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्षू संघाचे सदस्य भंते धम्मानंद बोधी यांच्या शुभहस्ते श्रामणेर दीक्षा विधी पार पडला. यावेळी त्यांनी उपासकांना चिवर प्रदान करून त्रिसरण व अष्टशील दिले. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावरील श्रद्धा दृढ ठेवून शील, समाधी व प्रज्ञेच्या मार्गाने जीवन जगण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व यांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षक तथा सातारा जिल्हा पूर्वचे हिशोब तपासणी आयु. बाळासाहेब जाधव, आयु. अविनाश बारसिंग सर व आयु. सुनील कदम सर हे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. शिबिरामध्ये धम्म, विनय, बौद्धाचार, त्रिसरण-पंचशील, संघकार्य, धम्मप्रसार आणि सामाजिक बांधिलकी यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक आयु. बाबासाहेब जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “भारतीय बौद्ध महासभा ही समाजाची मातृसंस्था असल्याचे सांगितले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची २४ शिबिरे आयोजित करून धम्माचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात करण्याचे आवाहन केले. समाजात नैतिकता, समता, बंधुता आणि प्रज्ञेचा विचार रुजवण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रामणेर दीक्षा घेतलेल्या सर्व दीक्षार्थींना शुभेच्छा देत धम्ममार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय शिक्षक आयु. बाळासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुक्याचे अध्यक्ष आयु. अरुण रणदिवे यांनी भूषविले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी संपूर्ण विधी व कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार करून घेतले. त्यांनी कार्यक्रमादरम्यान आवश्यक त्या सूचना देत अध्यक्षांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. तसेच हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आवश्यक समन्वय व नियोजन करत वरिष्ठांशी संपर्क साधून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुक्याला शुभेच्छा देत शिबिरात सहभागी झालेल्या श्रामणेर दीक्षार्थींना पुढील धम्मश्रवण व धम्मग्रहणासाठी मंगल शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, उपासक व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे केंद्रीय शिक्षक आयु. बाळासाहेब जाधव, सरचिटणीस आयु. सुनील कदम सर, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग सर, कुमार सरतापे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालय सचिव तथा केंद्रीय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते सर, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी संघटक आनंद जगताप सर, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, संरक्षण उपाध्यक्ष कृष्णात केंजळे, दयानंद केंजळे, जिल्हा संघटक सुधाकर शिलवंत, उत्तम मस्के, केंद्रीय शिक्षिका राजश्री ताई मस्के, गौतम केंजळे, रण बहाद्दर तसेच त्रिमली गावातील श्रद्धावान उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण परिसर बुद्ध वंदना, त्रिसरण-पंचशील आणि धम्मभावनेने भारावून गेला होता. हे शिबिर धम्मसंस्कार, संघटन बळकटी आणि धम्मप्रसारासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका, पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप

0


Maharashtra Rain News :  राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.   

रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी

रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी गेला आहे. तळा तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कर्नाळा फळशेत गावात घडली आहे. वेदांत जनार्दन भोसले वय 14 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. अवकाळी पाऊस आल्यानं सामानाची आवराआवर करत असताना वीज कोसळली. या घटनेमुळं कर्नाळा फळशेत गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. 

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले आहेत. वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी कडाक्याचे ऊन व सायंकाळी अवकाळी पाऊस. मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. 

पुणे-बंगळुरु महामार्गाला नदीचे स्वरुप, महामार्गावर पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा 

पुणे बंगळुरु महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या महामार्गावरील वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे. लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होती. काही वेळापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळं महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड उंब्रज कासेगाव या ठिकाणी सुरु असल्या रस्त्याच्या कामामुळं व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास मेघ दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. भंडाराच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर इथं वादळी वाऱ्यासह आलेल्या या जोरदार पावसाचा चांगलाच परिणाम बघायला मिळाला. परंतु इथं आठवडी बाजार असल्याने सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसाचा भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही याचा जबर फटका बसला. अचानक आलेल्या या पावसानं भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीचं तारांबळ उडाली. मका पिकाची आणि भात पिकाची मळणी केल्यानंतर वळवायला ठेवलेल्या मका आणि धान या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात ओले झाल्यानं त्याला फटका बसण्याची चिंता आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं याचा नागरिकांना फटका बसलाय.

सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा

सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील येत आहे. यामुळं सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यात आंबा, काजू आणि केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काढणीवर आलेल्या आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी आंबा उत्पादन केवळ दहा टक्के उत्पादन आहे. त्यात अशा प्रकारे अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याची झाड तुटून पडली असून आंबे पडून वाया गेले आहेत.

गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस 

गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळला. हवामान विभागाने आज आणि उद्या गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. गोवा राज्यात विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत अवकाळी पाऊस कोसळला. मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा



Source link

शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; म्हणाले, आपण कुठं कमी पडलो..

0


सातारा : राज्यसभा निवडणुकांनंतर खासदारकीची शपथ घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आजारी होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमातूनही दूर होते. मात्र, आज साताऱ्यातील (Satara) कार्यक्रमातून त्यांच्या जोमाने कामाची नव्याने सुरुवात झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी लागली असून सन 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण (Rayat) संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमास हजेरी लावत भाषण केलं.  

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण कुठं कमी पडलो, नवीन काय करता येईल याबाबत आपण विचार करायला हवा. सर्वसामान्य लोकांसाठी कर्मवीरांनी आदर्श दिला, तोच आदर्श आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थेसाठी अखंड काम करणारे आहेत, म्हणून आज संस्थेची उंची वाढली आहे.  सर्व सेवकांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो, असे म्हणत शरद पवारांनी पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर भाषण केलं. 

आधीच्या बैठकीत मी आग्रह केला होता, जग बदलत आहे. नवी संकल्पना जगान स्वीकारली आहे, आपण देखील ती स्वीकारायला हवी. AI स्वीकारून रयत संस्था जगाबरोबर न्यायला पाहिजे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मोठ्या प्रमाणात देणार आहोत. हितचिंतकांकडून संस्थेला मोठी देणगी मिळाली आहे, त्याचे आम्ही आभार मानतो. संस्थेत नवीन काही करण्यासाठी चर्चा झाली आहे. परदेशात ज्या संस्था आहेत, त्याच्यासोबत रयत जोडून मुला-मुलींच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.

खेडेगावातील मुले AI बाबत बोलतात याचा आनंद

कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने दूरदृष्टी ठेऊन गोरगरीब मुला मुलींना ध्यानाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी काम केलं. संस्थेच्या माध्यमातून खेडेगावतील मुलं मुली आज AI बाबत बोलायला लागली, चर्चा करायला लागली ही जमेची आणि कौतुकाची बाब आहे. रामशेठ ठाकूर हे दरवर्षी संस्थेला मदत देत असतात, यावर्षी 3 कोटींपेक्षा जास्त निधी त्यांनी दिला आहे. आता, नव्या पीढीपुढे, रयत सेवकांपर्यंत चांगल्या कामाचा कसा आदर्श राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही शरद पवारांनी म्हटले.

हेही वाचा

Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा ‘सातारा’; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष

आणखी वाचा



Source link

अवकाळीचा तडाखा! साताऱ्यात घरांचे पत्रे उडाले, ओझर्डे धबधबा भर उन्हाळ्यात प्रवाहित, बुलढाणा, वाश

0


Maharashtra Unseasonal Rain: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यासह विदर्भातील बुलढाणा (Buldhana) आणि वाशिम (Washim) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

Satara Unseasonal Rain: साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळाचा तडाखा

साताऱ्यातील पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कामरगाव, नेचर आणि गोकुळ हेळवाक या गावांना बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, ज्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्य भिजले आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम असल्याने कामरगाव आणि नेचर येथील लग्न मंडप पूर्णतः उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळींची मोठी धांदल उडाली. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू केले आहेत. दरम्यान, या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला कोयना परिसरातील ओझर्डे धबधबा प्रवाहित झाला आहे. भर उन्हाळ्यात हा धबधबा वाहण्याची ही पहिलीच वेळ असून पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

Buldhana Unseasonal Rain: बुलढाण्यात मध्यरात्रीनंतर पावसाची बॅटिंग

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार आणि मेहकर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. लोणार तालुक्यात तर आज सकाळी 6 वाजेनंतरही पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना रणरणत्या उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Washim Unseasonal Rain: वाशिममध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस

वाशिम जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सातत्याने होत असलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असली तरी, उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Hingoli Unseasonal Rain: हिंगोलीत अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान 

हिंगोली जिल्ह्यात काल दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यासह हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात वाळत घातलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कांदा बीज, भुईमूग तसेच आंब्याच्या बागांनाही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सरकळी येथील शेतकरी संभाजी पवार यांच्या एक एकर क्षेत्रावरील हळदीचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. हळद काढणी करून शेतात वाळत घातली होती. मात्र अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे हळद झाकण्यासाठीही शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही. तसेच जी हळद ताडपत्रीने झाकून ठेवली होती, त्या ताडपत्रीवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

आणखी वाचा 

Kiran Bidkar: नागपूरच्या ‘त्या’ RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; ‘मॅट’कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा



Source link

पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश : सोहम शेंडे बनले भारतीय वन सेवा अधिकारी

0
पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश : सोहम शेंडे बनले भारतीय वन सेवा अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश : सोहम शेंडे बनले भारतीय वन सेवा अधिकारी                                                                                                                                       फलटण : भाडळी बुद्रूक येथील सुपुत्र तथा विडणी जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. नामदेव शेंडे (आबा) यांचे चिरंजीव श्री. सोहम नामदेव शेंडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय वन सेवा (IFS) मध्ये ऑल इंडिया रँक ७५ प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण फलटण तालुका व परिसरात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातून अत्यंत मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शैक्षणिक परंपरा लाभलेल्या शेंडे कुटुंबातील सोहम यांनी लहानपणापासूनच अभ्यासू वृत्ती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचे मार्गदर्शन, शिक्षकांचे संस्कार आणि स्वतःची चिकाटी यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय वन सेवा (IFS) ही भारत सरकारच्या तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची सेवा मानली जाते. देशातील वनसंपदा, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी या सेवेतील अधिकाऱ्यांवर असते. पर्यावरणाचे संरक्षण, जैवविविधतेचे जतन, शाश्वत वनविकास आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी IFS अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. या सेवेसाठी UPSC मार्फत घेण्यात येणारी परीक्षा अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानली जाते. देशभरातील हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रयत्न करत असताना पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावर ७५ वा क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

सोहम शेंडे यांच्या यशाबद्दल शिक्षण, सामाजिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्या घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश मिळवता येते, हे सोहम यांनी सिद्ध करून दाखवले असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. नामदेव शेंडे (आबा) यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागवण्याचे कार्य केले. आता त्यांच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यामुळे शेंडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोहम शेंडे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भाडळी बुद्रूक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पुढील काळात त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि देशसेवेत उल्लेखनीय कार्य करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत.

फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

0
फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

फलटण : .फलटण शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण नगरपरिषदेच्या आवारात सिंहासनाधिष्ठित स्वरूपातील महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून या कामाला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, शहरात आणखी तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात आर्किटेक्ट रोहन बळीप यांनी नुकत्याच आयोजित विशेष बैठकीत सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले.
सईबाई राणीसाहेबांचा पुतळा; फलटणकरांसाठी अभिमानाचा क्षण
बैठकीतील सर्वात भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय म्हणजे महाराणी सईबाई राणीसाहेब यांच्या पुतळ्याची उभारणी. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांचे माहेर फलटण असून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे फलटण हे आजोळ मानले जाते.
इतके दृढ ऐतिहासिक नाते असूनही आजपर्यंत फलटणमध्ये सईबाई राणीसाहेबांचा पुतळा उभारण्यात आलेला नव्हता. ही ऐतिहासिक उणीव भरून काढण्यासाठी आता नगरपरिषदेच्या आवारात त्यांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पुतळा समिती गठीत करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.
राज्यात पहिल्यांदाच पुतळ्यांसाठी विशेष निधी
फलटण शहरासाठी राज्य सरकारकडून ‘विशेष बाब’ म्हणून पुतळ्यांच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारचा निधी प्रथमच मंजूर झाल्याचे सांगितले जात असून, हा निधी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे.
शहरात उभारण्यात येणारे इतर तीन पुतळे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा
शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, सध्या असलेला शिवाजी महाराजांचा जुना पुतळा हटविण्यात येणार नसून, नवीन अश्वारूढ पुतळ्यासमोर सन्मानपूर्वक स्थापित केला जाणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती
पाचबत्ती चौक ते बारामती चौक रोड (सिमेंट रोडची सुरुवात) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. फलटण शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रथमच बसवण्यात येणार असल्याने सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा
पृथ्वी चौक अर्थात राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
“चारही पुतळे लवकरात लवकर उभारणार” – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, फलटणमध्ये प्रस्तावित चारही पुतळ्यांची उभारणी पूर्ण सन्मानाने आणि शक्य तितक्या लवकर करण्यात येईल. पुतळा समित्यांनी दिलेल्या सूचना आणि निर्देशांनुसारच सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव, नगरसेवक अशोकराव जाधव, संदीप चोरमले, रोहित नागटिळे, किरण राऊत, सुदाम (आप्पा) मांढरे, सचिन अहिवळे, राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक अनुप शहा, फिरोज आत्तार, फलटण पंचायत समिती सदस्य विकास नाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दोशी, निरगुडी विकास सोसायटीचे चेअरमन युवराज सस्ते, युवा नेते श्रीवल्लभ हेंद्रे, अमोल सस्ते, पै. संजय देशमुख, बाळासाहेब कदम, विधीज्ञ अॅड. ऋषिकेश काशीद, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता

0
कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता


फलटण : कोळकी बुद्ध विहार येथे भंते धम्मानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली दि. २८ एप्रिल २०२६ ते ७ मे २०२६ या कालावधीत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रामणेर शिबिराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात धम्म, शिस्त, करुणा, मैत्री, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रशिक्षण देण्यात आले.या शिबिरामध्ये 9 उपासकांनी श्रामणेर दीक्षा घेतली होती. यामध्ये माळशिरस तालुक्यातील मोरोची गावच्या 3 युवकांनी व उर्वरित सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यातील 6 युवकांनी श्रामणेर दिक्षा घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे संघटक, केंद्रीय शिक्षक आयु. दादासाहेब भोसले यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी सातारा जिल्हा पूर्व चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, संघटक अर्जुन ननावरे, सातारा जिल्हा पूर्वच्या महिला अध्यक्ष आयुनि सुजाता गायकवाड, आयु. शिवाजी सावंत, तालुका संघटक आयु. श्रीनिवास धाईंजे, आयु. श्रीमंतराव घोरपडे, आयु. अरुण गायकवाड, तालुका सरचिटणीस आयु. केशव ठोंबरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. दादा कांबळे, माजी सरचिटणीस भिकू भोसले, तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. अरविंद निकाळजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आयुनि कांताताई काकडे, प्रचार व पर्यटन विभाग सचिव विजय लोंढे, संस्कार सचिव धीरज मोरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना आयु. दादासाहेब भोसले म्हणाले की, “फलटण तालुक्यात ज्या गावांमध्ये अजून भारतीय बौद्ध महासभा पोहोचलेली नाही, त्या प्रत्येक गावात आपण धम्माचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. कार्यकर्त्यांचे प्रबोधन आणि संघटन मजबूत होणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावात शाखा आणि समता सैनिक तयार झाले तरच समाज सशक्त बनेल. धम्म म्हणजे समतेचा आणि न्यायाचा मार्ग आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, संस्कार आणि संघटन पोहोचले तरच परिवर्तन घडू शकते. त्यामुळे यापुढील काळात तालुका शाखेने भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या 24 शिबिरांचं आयोजन करून धम्माचा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा.

पुढे ते म्हणाले, ”भगवान बुद्धांनी दिलेला ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी धम्मसेवा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी जाऊन बाल संस्कार शिबिरे घेऊन नवीन पिढीत नैतिकता, शिस्त आणि मानवता रुजवली पाहिजे. वर्षावासाच्या निमित्ताने ज्या ज्या गावांमध्ये धम्म पोहोचला नाही त्या गावांमध्ये पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्माचा विचार घेऊन जाण्याची जबाबदारी तालुका शाखेने पार पाडावी.”

केंद्रीय शिक्षिका आयुनि सुजाता गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “धम्म हा केवळ पूजा-अर्चेचा विषय नसून तो जीवन जगण्याची वैज्ञानिक आणि मानवतावादी पद्धत आहे. महिलांनी आणि तरुणांनी समाज परिवर्तनासाठी पुढे येऊन करुणा, मैत्री आणि समतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत.
यावेळी सुजाता गायकवाड यांनी धम्मपदातील ओळींचा उल्लेख करून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,
मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा॥
ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥

मराठी अर्थ : मन हे सर्व गोष्टींचे पूर्वगामी आहे. मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व काही मनातून निर्माण होते.
जर एखादी व्यक्ती दूषित मनाने बोलते किंवा कृती करते, तर दुःख तिच्या मागे तसेच लागते जसे बैलगाडीचे चाक बैलाच्या पावलामागे फिरते.”

मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोति वा॥
ततो नं सुखमन्वेति, छायेव अनपायिनी॥

अर्थ : मन हे सर्व गोष्टींचे पूर्वगामी आहे. मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व काही मनातून निर्माण होते.
जर एखादी व्यक्ती प्रसन्न आणि शुद्ध मनाने बोलते किंवा कृती करते, तर सुख तिच्या मागे कधीही न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे सतत राहते.

केंद्रीय शिक्षक आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भगवान बुद्धांनी अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला महत्त्व दिले. म्हणूनच प्रत्येकाने विचारपूर्वक जीवन जगून समाजात बंधुभाव निर्माण करावा. शिबिरात शिकलेले धम्माचे संस्कार आपल्या गावात नेऊन प्रत्येक गावात शाखा आणि सैनिक निर्माण करण्याचे कार्य करावे.त्यासोबतच्या हे शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुका कार्यकारिणीने खूप मेहनत घेतली त्यांच्या कार्याला ही धन्यवाद व पुढील धम्मकार्यासाठी शुभेच्छा.”

आयु.शिवाजी सावंत म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून सर्व श्रामणेरांनी येणाऱ्या काळामध्ये धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सक्रिय राहिला पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला जे धम्माचे विचार मिळाले आहेत ते विचार आपल्या घरापासूनच रुजवण्यास सुरुवात करा. आपण सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या धम्म कार्याला गती देण्यासाठी तालुका शाखे सोबत काम करायला तयार व्हावे. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग असून आपण सर्वांनी बौद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे आपलं आचरण करावे. “

यावेळी बोलताना फलटण तालुक्याचे संघटक श्रीनिवास धाईंजे म्हणाले, ” शिबिर यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. संख्या जरी कमी असली तरी चांगले शिबीर राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक अडचणी आल्या पण आम्ही सर्वांनी एकजुटीने शिबिर पार पाडण्यासाठी प्रयत्न केला.या शिबिरामध्ये क्वांटिटी कमी असली तरी कॉलिटी चांगली ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलो लोकांनी आश्वासने ही दिली पण लोक फिरकले नाहीत.

अध्यक्षीय समारोप करताना आयु. भीमराव लोंढे म्हणाले की, “शिबिर यशस्वी होण्याचे श्रेय कोण्या एका व्यक्तीचे नसून सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून मी भिक्षु संघाचे संघनायक भंते धम्मानंद बोधी, केंद्रीय शिक्षक आयु.श्रीमंत घोरपडे, आयु. नानासो मोहिते, आयु. अरुण गायकवाड, आयु. दादासाहेब भोसले, जिल्ह्याचे व तालुक्याचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी भिक्षु संघासाठी नाष्टा, भोजनदान व फलाहार दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलो. प्रतिसाद जरी कमी आला तरी आम्ही या शिबिरामध्ये त्याची गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. अनेक अडचणी आल्या. अनेकांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे अगदी कमी कालावधीत आम्ही हे शिबिर यशस्वी करू शकलो.”

यावेळी भंते धम्मानंद बोधी यांनी श्रामणेर भिक्षूंचे बौद्ध धम्माच्या संस्कार विधीप्रमाणे बौद्ध परंपरेमध्ये श्रामणेर (सामणेर) भिक्षूंनी काही कालावधी नंतर भिक्षूजीवन सोडून पुन्हा गृहस्थ जीवन स्वीकारायचे असल्यास त्यासाठी “चिवर उतरविणे” किंवा “संघातून निवृत्ती” असा संस्कार केला.

पाली विनयात याला सामान्यतः “सिक्खा पच्चक्खान” (शिक्षेचा त्याग) किंवा “पब्बज्जा परित्याग” असे म्हटले जाते. या वेळी श्रामणेर भिक्षुनी बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करून आपण पूर्वीचे जीवन स्वीकारत असल्याची घोषणा केली.भंते धम्मानंद बोधी यांनी चिवर उतरवले.यावेळी धम्मानंद बोधी यांच्या हस्ते श्रामणेर भिक्षूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. दहा दिवसांपासून श्रामणेर भिक्षुंनी ग्रहण केलेला धम्माचा उपदेश व त्यांच्यात झालेला बदल व येणाऱ्या काळात करावयाच्या कामाविषयी आपली मनोगते व्यक्त करून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस आयु. केशव ठोंबरे यांनी केले. शिबिराच्या सांगता समारंभात उपस्थितांनी बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करून सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरोगामी विचारांचा जागर: फलटणमध्ये ‘सत्यशोधक’ पद्धतीने आंतरधर्मीय विवाह सोहळा संपन्न

0
पुरोगामी विचारांचा जागर: फलटणमध्ये ‘सत्यशोधक’ पद्धतीने आंतरधर्मीय विवाह सोहळा संपन्न

पुरोगामी विचारांचा जागर: फलटणमध्ये ‘सत्यशोधक’ पद्धतीने आंतरधर्मीय विवाह सोहळा संपन्न


जाधववाडी (फलटण): एकीकडे जात-पात आणि धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात असताना, दुसरीकडे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत फलटणमध्ये एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून ‘फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन’च्या वतीने ५६ वा आंतरधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संविधान आणि मानवतेची शपथ
फलटण तालुक्यातील जाधववाडी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात प्रा. ॲड. करिश्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांनी आपली जीवनगाठ बांधली. हा विवाह कोणत्याही कर्मकांडाशिवाय, पूर्णपणे सत्यशोधक पद्धतीने पार पडला. प्रारंभी संविधान आणि फुले दाम्पत्याचे समग्र वाङ्मय हातात घेऊन नवदाम्पत्याचे आगमन झाले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि महात्मा फुले रचित मंगलगाथांनी (मंगलाष्टकांनी) विवाह विधी पूर्ण करण्यात आला.
पर्यावरणाची जोपासना आणि वैचारिक भेट
या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपारिक अक्षतांचा वापर टाळून सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. नवदाम्पत्याला सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. श्रेयस आणि करिश्मा यांनी यावेळी शपथपत्र वाचन करून संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा आणि निर्भय सत्यशोधक समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
समाजासमोर एक नवीन आदर्श
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, “सत्य, समता आणि मानवतेवर आधारित हा विवाह केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो समाजाला दिशा देणारा संदेश आहे. आजच्या काळात अशा विवाहांचे अनुकरण होणे ही काळाची गरज आहे.”
या सोहळ्याला प्रा. सुदाम धाडगे, ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विकास शिंदे, जगदीप भगत यांच्यासह विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि दोन्ही कुटुंबातील मोजके नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ॲड. करिश्मा मुलाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि एक प्रेरणादायी कविता सादर केली.
हा सोहळा म्हणजे केवळ एक लग्न नसून पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला पुढे नेणारे एक पाऊल ठरले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

राज्यातील वातावरणात मोठा बदल! अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

0


Maharashtra Rain weather News : राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तळकोकणात सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सातारा, नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी  तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी येलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे. 

सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात 

सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे, शहरातील उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साताऱ्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.

रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस

रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. अशातच एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडलीय. घराचा पत्र आहे टेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हीच प्रवाह खंडित करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जात आहे. 

नांदेडच्या माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, उन्हाळी पिकांचे नुकसान तर लग्नकार्यात अडथळा

नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय. त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसलाय. त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ  दृश्यमानता कमी झाली होती नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

 

आणखी वाचा



Source link

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिरास पदाधिकाऱ्यांची भेट; भिक्षु संघास फलाहार अर्पण

0
कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिरास पदाधिकाऱ्यांची भेट; भिक्षु संघास फलाहार अर्पण

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिरास पदाधिकाऱ्यांची भेट; भिक्षु संघास फलाहार अर्पण

कोळकी : येथील भारतीय बौद्ध महासभा आयोजित श्रामणेर शिबिरास पुणे जिल्हा पूर्व व बारामती शहर, तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत भिक्षु संघास फलाहार अर्पण करून पुढील धम्मकार्याला शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष नामदेव शिंदे, संस्कार सचिव लक्ष्मण भोसले, बारामती शहर अध्यक्ष भारत सोनवणे, बारामती तालुका सरचिटणीस सचिन चव्हाण व संविधान चव्हाण यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा पुणे जिल्हा पूर्व, बारामती तालुका व शहर, तसेच नूतन केंद्रीय शिक्षक चंद्रकांत मोहिते आणि फलटण तालुका शाखेच्या वतीने श्रामणेर भिक्षु संघास फलाहार देण्यात आला.

तसेच आयु. रजनी माने यांनी भिक्षु संघासाठी खीर तयार करून अर्पण केली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्रामणेर शिबिरार्थींना पुढील धम्मकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर दादासाहेब भोसले, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुका अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे, सरचिटणीस केशव ठोंबरे, अर्जुन ननावरे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात धम्मकार्याबाबत मार्गदर्शन करत श्रामणेर शिबिराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.