Home Blog Page 2

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख

0
बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख


पुणे : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात आले असून १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
अंतिम मतदार यादीतील तपशीलानुसार पुरुष मतदारांची संख्या १,९३,४९६, महिला मतदारांची संख्या १,९०,२७१, तर इतर मतदारांची संख्या २४ आहे. एकूण मतदारसंख्या ३,८३,७६७ इतकी नोंदविण्यात आली आहे.
यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३,६०,६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ही संख्या ३,८८,३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.
सदर अंतिम मतदार यादी नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची सुविधा आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती मिनल कळसकर यांनी दिली.

वेगाने दुचाकी चालवण्यास विरोध केल्याचा राग; गॅरेज मालक व भावावर लाकडी दांडक्याने हल्ला, चौघे अटकेत

0
वेगाने दुचाकी चालवण्यास विरोध केल्याचा राग; गॅरेज मालक व भावावर लाकडी दांडक्याने हल्ला, चौघे अटकेत

फलटण (प्रतिनिधी): रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवण्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून गॅरेज मालक आणि त्यांच्या भावावर लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करणाऱ्या टोळीतील आरोपींना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल विठ्ठल हिरणवाळे हे शंकर मार्केट येथील त्यांचे गॅरेज बंद करून बाहेर थांबले होते. त्याचवेळी गोसावी गल्ली परिसरातील ७ ते ८ तरुण दुचाकींवरून मोठा आवाज करत आणि अतिवेगाने त्या ठिकाणाहून जात होते.
यावेळी अनिल हिरणवाळे यांनी त्यांना “एवढ्या वेगाने गाड्या का चालवता? कुणाला तरी धडक लागेल,” असे सांगत समज दिली.
मात्र ही समज टोळीला मान्य झाली नाही. या कारणाचा राग मनात धरून काही वेळाने संशयित आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आले आणि अनिल हिरणवाळे तसेच त्यांचे भाऊ संतोष हिरणवाळे यांच्यावर लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अनिल हिरणवाळे गंभीर जखमी झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेऊन अटक सत्र सुरू केले.
आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणात पुढील आरोपींना अटक केली आहे:
संदीप विठ्ठल जाधव (वय २०)
सुनील उर्फ सतिश राजू मोरे (वय २०) – यांना २४ फेब्रुवारी रोजी अटक
गणेश अजय जाधव (वय १८) – याला ६ मार्च रोजी अटक करून ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
प्रशांत सुनील जुवेकर (वय २१) – याला ९ मार्च रोजी अटक करून पोलीस कोठडीत रवानगी
याशिवाय या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन विधीसंघर्षित बालकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा येथील बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे.
पोलिसांचा इशारा
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत. शहरातील नागरिक, व्यापारी तसेच सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिला आहे.

सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? फलटणमध्ये खळबळ

0


SSC Exam Satara : दहावीच्या परीक्षेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. फलटण (Phaltan) तालुक्यातील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये शिक्षकानं थेट सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या पेपरची तपासणी करून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. वैभव शेंडे असं या शिक्षकाचं नाव असून दहावीचा मराठी विषयाचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींच्या मदतीनं तपासला जात असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील CCTV फुटेजही समोर आलं आहे. या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Satara School Controversy : CCTV फुटेजमुळं प्रकरण उघड

शिक्षक वैभव शेंडे हे दहावीच्या मराठी विषयाचे पेपर तपासत असताना सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून मदत घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

School Response : मुख्याध्यापिकांनी बोलण्यास नकार

या प्रकरणाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोनवर बोलण्यास नकार देत प्रत्यक्ष भेटून माहिती देऊ, असं सांगितलं. 

Pune Paper Leak : पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक

दरम्यान, राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही विविध गैरप्रकार समोर येत आहेत. नागपूरमधील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता पुणे जिल्ह्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Math Paper Leak Pune : तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. विशेष म्हणजे गणित भाग-2 चा पेपर परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आला होता. बोर्डानं अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केल्यानंतर दोन्ही पेपर तंतोतंत जुळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पुणे बोर्डानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा



Source link

फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून ९३.३५ कोटींचा विकास निधी; रस्ते व दळणवळणाच्या कामांना मोठी चालना

0
फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून ९३.३५ कोटींचा विकास निधी; रस्ते व दळणवळणाच्या कामांना मोठी चालना


फलटण | प्रतिनिधी. राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण रस्ते व दळणवळणाशी संबंधित विकासकामे मार्गी लागणार आहेत.
या निधीमुळे मतदारसंघातील ग्रामीण रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग, जोडरस्ते, काँक्रीटीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंती, गटार बांधकाम तसेच काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अशी अनेक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना प्रवास सुलभ होणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापूर्वीही त्यांनी फलटण शहरात प्रशासकीय इमारत, महसूल भवन, शहरातून जाणारा पालखी महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, तारांगण तसेच आधुनिक स्टेडियम यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील अनेक कामे सध्या सुरू असून काही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
फलटणच्या इतिहासात प्रथमच राज्याच्या अर्थसंकल्पातून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. या निधीतून सासवड–भाडळे–सोनवडी–विडणी–सांगवी मार्ग, गिरवी–मांडवखडक–वाखरी–निरगुडी–निंभोरे–फडतरवाडी–जिंती मार्ग, जिंती–साखरवाडी–नांदल–मिषी–वाघोशी–उपळवे मार्ग, भुईंज–देगाव–राऊतवाडी–वाघोली–पिंपोडे–तडवळे मार्ग, वाई–परखंडी–मुंगसेवाडी–साळशी–नांदवळ–सोनके–पिंपोडे मार्ग यांसह अनेक प्रमुख रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय गिरवी–दुधेबावी–वडले–पिंप्रद–राजाळे–सांगवी, फलटण–कुरवली–मांडवखडक–दालवडी–उपळवे, सर्कलवाडी–राऊतवाडी–देहिगाव–वाठार स्टेशन, नायगाव–करंजे, जाधववाडी–गिरवी, पिंप्रद–सोनवडी, सरडे–शेंडगेवाडी, शिंदेवाडी–हनुमाननगर, चौधरवाडी, घिगेवाडी तसेच अनेक ग्रामीण जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
काही ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम, गावांतर्गत सीसी रस्ते, संरक्षक भिंती उभारणे यासारखी कामे देखील केली जाणार आहेत. तसेच निरगुडी येथील लांडगेवस्ती परिसरात ओढ्यावर नवीन पूल उभारण्यात येणार असून गुणवरे–मठाचीवाडी रस्त्यावरही पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा ऐतिहासिक निधी मंजूर केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी फलटण–कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत, मंजूर झालेली सर्व विकासकामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते व दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

128 लिटर दुधापासून सुरु झालेला प्रवास 7 लाख लिटरपर्यंत पोहोचला; गोविंद फाउंडेशनचा नेदरलँडच्या र

0


फलटण : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या गोविंद फाउंडेशनला नेदरलँडच्या भारतीय राजदूत सुश्री एच. ई. मारिसा जेरार्ड्स यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी PUM इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी नेदरलँड्स मध्ये एच. ई. राणी मॅक्सिमा यांच्या उपस्थितीत झालेल्या PUM इम्पॅक्ट अवॉर्ड्स सोहळ्यात ६ विजेत्यांपैकी एक गोविंद फाउंडेशनच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील  समारंभाद्वारे भारतातील गोविंद फाउंडेशनच्या टीमला अधिकृतपणे हा पुरस्कार गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि नेदरलँड्स दूतावासातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.(Govind Foundation) 

महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि भारतातील दुग्ध क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) बळकटी देण्यासाठी गोविंद फाउंडेशनने दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस फलटणचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर व गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हा सन्मान स्वीकारला, त्यावेळी नेदरलँड्स दूतावासातील कृषी सल्लागार सुश्री मॅरियन व्हॅन शाईक, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस फलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला, श्रीमंत अजयसिंह नाईक निंबाळकर गोविंद फाउंडेशनचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड, PUM भारत प्रतिनिधी डॉ. तरन्नुम कादरभाई, PUM प्रतिनिधी NCR पुनीत रमण उपस्थित होते.

राजदूत जेरार्ड्स यांनी गोविंद टीमचे स्वागत केले आणि दुग्ध क्षेत्रातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, गोविंद फाउंडेशनचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. दिवसाला केवळ १२८ लिटर दुधापासून सुरु झालेला हा प्रवास आज दररोज ७ लाख लिटरपर्यंत पोहोचला आहे, जे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि चिकाटीचे प्रतीक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फौंडेशनने २२ हजाराहून अधिक महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सन्मान आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. उद्योजकता समुदायांमध्ये कसा बदल घडवून आणू शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पुरस्कारा सोबत, राजदूत जेरार्ड्स यांनी गोविंद टीमला ‘डेल्फ्ट ब्लू ट्युलिप फूलदाणी’ आणि स्वतः लावलेल्या गुलाबी ट्युलिप फुलांचा गुच्छ भेट दिला, जो भारत आणि नेदरलँड्समधील मजबुत सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.

गोविंदच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले म्हणाले, आमचा प्रवास १९९५ मध्ये दररोज अवघ्या १२८ लिटर दूध संकलनाने सुरु झाला होता, आज आम्ही ७ लाख लिटरच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत आणि आमचे ध्येय १० लाख लिटरचा टप्पा ओलांडण्याचे आहे. ही प्रगती केवळ हजारो महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्पणामुळेच शक्य झाली आहे, ज्या आमच्या या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहेत.

दुग्ध व्यवसाय करताना जनावरांचे शेण काढणे, जनावरे स्वच्छ धुणे, त्यांना चारा पाणी घालणे या कामासाठी लागणारा वेळ व श्रम कमी करुन महिलांना आपल्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देता यावे या उद्देशाने मुक्त संचार गोठा, उत्तम व सकस चारा नियोजनासाठी मुरघास आणि चांगली वंशावळ निर्मितीसाठी तांत्रिक मदत गोविंद फाउंडेशन मार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत अशा महिलांना गोविंद फाउंडेशन पंजाब, कर्नाटक व इतर राज्यातही अभ्यास दौऱ्यावर पाठवते त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट करताना आज हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या असून त्यांनी २ गाईपासून ५० गाईंचे गोठे तयार केले आहेत. त्या ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत सर्व कामे स्वतः करत असल्याचे गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

PUM च्या भारत प्रतिनिधी डॉ. तरन्नुम कादरभाई यांनी गोविंद फाउंडेशनला पाठिंबा देण्यामध्ये PUM तज्ज्ञांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. PUM ने गोविंद फाउंडेशनमधील सुधारणेसाठी ८ महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम केले. चौघा PUM तज्ज्ञांनी महिला दुग्ध उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि संस्थेची कार्यप्रणाली मजबूत करण्यासाठी जवळून काम केले. या उपक्रमांतर्गत १० गावांतील १०० महिला उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आता त्या ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून काम करण्यास सज्ज आहेत. त्या आपल्या समुदायातील इतर अनेक महिलांना हे ज्ञान आणि कौशल्ये देतील.PUM इम्पॅक्ट अवॉर्ड अशा संस्थांना दिला जातो ज्या PUM तज्ज्ञांच्या सहकार्याने मोजता येण्याजोगा आणि शाश्वत प्रभाव निर्माण करतात. महिला सक्षमीकरण, ग्रामीण उपजीविका मजबूत करणे आणि दुग्ध क्षेत्राचा विकास करण्यातील गोविंद फौंडेशनचे कार्य हे शाश्वत विकासाचे एक शक्तिशाली उदाहरण असल्याचे डॉ. तरन्नुम कादरभाई यांनी आवर्जून सांगितले.

 

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये अंगणवाडी सेविकांचे उपोषण तात्पुरते स्थगित; बीएलओ कामाच्या सक्तीविरोधात आंदोलन

0
फलटणमध्ये अंगणवाडी सेविकांचे उपोषण तात्पुरते स्थगित; बीएलओ कामाच्या सक्तीविरोधात आंदोलन

फलटण प्रतिनिधी : अंगणवाडी सेविकांवर बी.एल.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर) कामाची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय फलटण येथे १० मार्च २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून चर्चेचे आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांवर आधीच विविध शासकीय योजनांची जबाबदारी आहे. त्या कामाचा विचार न करता त्यांच्यावर बी.एल.ओ.चे अतिरिक्त काम लादले जात असल्याने त्यांच्यावर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे. या संदर्भात संघटनेने अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून सकारात्मक दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अंगणवाडी सेविकांनी प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन बी.एल.ओ.चे काम सक्तीने देऊ नये, अशी विनंती केली होती. तसेच या संदर्भातील शासन निर्णयाची (जी.आर.) माहितीही प्रशासनाला देण्यात आली होती. तरीदेखील उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडून जबरदस्तीने हे काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेच्या मते, आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ठराविक जबाबदारी असताना त्यांच्यावर योजना बाह्य कामे लादली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होत असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बी.एल.ओ.चे काम स्वीकारले नाही तर पोलिस कारवाई करून एफआयआर दाखल करण्याचा इशारा दिला जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या निषेधार्थ १० मार्चपासून तहसील कार्यालय फलटण येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणादरम्यान कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्याला इजा झाली किंवा त्यांची प्रकृती बिघडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला होता.
दरम्यान, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा परिषद सातारा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.
रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या महिला सदस्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले.

आषाढी वारी पार्श्वभूमीवर फलटणमध्ये प्रशासनाची लगबग; वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी व स्वच्छतेवर विशेष भर

0
आषाढी वारी पार्श्वभूमीवर फलटणमध्ये प्रशासनाची लगबग; वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी व स्वच्छतेवर विशेष भर


फलटण प्रतिनिधी :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करणार असून १७ जुलै रोजी हा सोहळा फलटण येथे मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण शहरात वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आतापासूनच प्रशासकीय पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे अधिकारी, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच वारकऱ्यांसाठी मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यास सांगितले. शहरात स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास ती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही नगराध्यक्षांनी यावेळी दिला.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबतच महानुभाव पंथीयांची फलटण शहरात दरवर्षी होणारी ‘घोडा यात्रा’ही अत्यंत प्रसिद्ध आहे. ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या फलटणमध्ये या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल होत असतात. त्यामुळे या यात्रेच्या नियोजनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरात येणाऱ्या भाविकांना मुक्काम, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा योग्यरित्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकीआधीच वाद; निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची शिवसेनेची मागणी

0
फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकीआधीच वाद; निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची शिवसेनेची मागणी


फलटण (प्रतिनिधी): फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत बाळासाहेब जाधव (दादा) यांनी यासंदर्भात सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सध्याच्या निर्णय अधिकाऱ्याऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विराज खराडे उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती मान्य नसल्याचे सांगत शिवसेनेने याला आक्षेप नोंदवला आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभापती निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्याऐवजी दुसऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. सदर निवेदन १० मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीमुळे फलटण पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव  यांनी सांगितले की, फलटण तालुक्यात नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेहमीच मोठी राजकीय चुरस पाहायला मिळते. त्यामुळे तालुका राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत असतो.
मात्र गेल्या वर्षभरात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची पक्षपाती भूमिका असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत आणि त्यांनी जनतेसाठी काम करणे अपेक्षित आहे. परंतु काही अधिकाऱ्यांची वर्तणूक आणि भाषाशैली उद्दामपणाची असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सभापती निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच सभापती निवड प्रक्रिया सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटिंगच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे पार पाडण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्या या मागणीमुळे फलटणच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांना बसण्यासाठी केबिन नाही; नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद कसा साधणार?

0
फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांना बसण्यासाठी केबिन नाही; नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद कसा साधणार?


फलटण / प्रतिनिधी : फलटण नगरपालिकेत लोकप्रतिनिधींनाच बसण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. विशेषतः विरोधी पक्षातील शिवसेना नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी किंवा मतदारांशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत शिवसेनेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले असून १ सदस्य स्वीकृत आहे. या सर्वांमध्ये फक्त एक नगरसेवक अनुभवी असून उर्वरित ८ नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहेत. या नवोदित नगरसेवकांमध्ये ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. बहुतांश नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आल्याने कामकाज समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना काम करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत नागरिक दररोज विविध समस्यांसाठी लोकप्रतिनिधींना भेट देत असतात. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडे बसून नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी स्वतंत्र केबिन अथवा सामूहिक दालन नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. एका शिवसेना नगरसेवकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच जर बसण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर नागरिकांच्या समस्या मांडल्या जाणार कशा आणि त्यावर मार्ग कसा निघणार? असा सवाल आता नागरिकांकडूनही उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे फलटण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
दरम्यान, विरोधी शिवसेना नगरसेवकांकडून स्वतंत्र सामूहिक केबिन देण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर नेमकी मागणी करण्यात आली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. जर मागणी करूनही केबिन उपलब्ध करून दिली जात नसेल, तर तो सत्ताधारी पक्षाचा मनमानी कारभार ठरेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे शक्य व्हावे यासाठी विरोधी शिवसेना नगरसेवकांना तातडीने स्वतंत्र सामूहिक केबिन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मुख्य मुद्दे :
फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांना स्वतंत्र केबिन नाही
९ निवडून आलेले व १ स्वीकृत सदस्य
८ नगरसेवक प्रथमच निवडून; ५ महिला, ३ पुरुष
नागरिकांशी संवाद साधताना अडचणी
सामूहिक केबिन देण्याची मागणी प्रलंबित

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: उत्साहाचे दुःखात रूपांतर‎ करणाऱ्या मनावर काम करावे‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  उत्साहाचे दुःखात रूपांतर‎ करणाऱ्या मनावर काम करावे‎




प्रत्येक काम उत्साहाने केले पाहिजे, असे सांगितले जाते. आणि हे‎देखील खरे आहे. आजकाल दबावाशिवाय काहीही साध्य करता येत‎नाही. म्हणून उत्साह समजून घेऊया. आपल्या भूतकाळाचे ओझे वाहू‎नये, वर्तमानावर पकड असावी. आपण भविष्यातील बदलांशी‎स्वतःला जोडले पाहिजे. या तीन गोष्टी योग्यरित्या केल्या तर ते‎उत्साहात रूपांतरित होईल. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर‎योग्यरित्या काम केले तरच आपण उत्साही राहू शकतो. काम लहान‎असले तरी उत्साह अबाधित राहिला पाहिजे. तुलसीदासांनी लिहिले,‎”बालचरित कहि बिबिधि बिधि मन महँ परम उछाह।’ प्रचंड उत्साहाने‎भरलेल्या काकभूशुंडीनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. आता‎या संदर्भात ते एक गोष्ट सांगत होते. पण त्यांनी स्वीकारलेला सूत्र‎म्हणजे- तुम्ही कराल ते उत्साहाने करावे. मन उत्साहाचे दुःखात‎रूपांतर करते. म्हणून तुमच्या मनावर काम करत राहा. काम करताना‎भूतकाळ, वर्तमान व भविष्यावर लक्ष ठेवा. त्यावर पकड ठेवा – तुमचा‎उत्साह कायम राहील.



Source link