Thursday, July 9, 2026
Home Blog Page 197

निळकंठेश्वर पॅनलचा माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दबदबा; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा उमेदवार विजयी!

0
निळकंठेश्वर पॅनलचा माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दबदबा; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा उमेदवार विजयी!

बारामती, प्रतिनिधी |माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने जोरदार मुसंडी मारत विजयाची मालिका सुरू केली आहे. कालपासून (२४ जून) बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पॅनलने आघाडी मिळवत सहा जागांवर विजय मिळवला आहे.

काल जाहीर झालेल्या ब वर्ग मतदारसंघाच्या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९१ मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला होता. त्यानंतर आज (२५ जून) सकाळपासून दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली असून, एकामागून एक निकाल जाहीर होत आहेत.

आजपर्यंत जाहीर झालेल्या पाच जागांमध्ये निळकंठेश्वर पॅनलचे पुढील उमेदवार विजयी झाले आहेत:

  • अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग: रतनकुमार भोसले
  • इतर मागास प्रवर्ग: नितीन शेंडे
  • भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग: विलास देवकाते
  • महिला राखीव प्रवर्ग: संगीता कोकरे आणि ज्योती मूलमुले

या विजयामुळे निळकंठेश्वर पॅनलचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील निकालांकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामतीतील सहकार क्षेत्रावर पुन्हा एकदा पकड घट्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भारतीय मार्केटमध्ये दाखल झालं वजन कमी करणारं औषध, आपोआप भूक होईल कमी; जाणून घ्या किंमत

0
भारतीय मार्केटमध्ये दाखल झालं वजन कमी करणारं औषध, आपोआप भूक होईल कमी; जाणून घ्या किंमत


Weight Loss Medicine: सध्याच्या काळात लठ्ठपणा ही फार मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणासोबत डायबेटिजसह तसंच ह्रदयाशी संबंधित अनेक आजारही बळावतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लोकांची हीच समस्या लक्षात घेत डेन्मार्कमधील औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने (Novo Nordisk) मंगळवारी भारतात वजन कमी करणारं औषध लाँच केलं आहे. या औषधाचं नाव वेगोवी (Wegovy) आहे, जे एक इंजेक्टेबल सेमाग्लुटाइड आहे.

वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे औषध

आठवड्यातून एकदा घेतलं जाणारं ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट (GLP-1 RA) वेगोवी हे भारतातील पहिले आणि एकमेव वजनावरील औषध आहे जे दीर्घकाळासाठी वजनाचं व्यवस्थापन करतं आणि मेजर एडवर्स कार्डियोवास्कुलर इवेंट्सचा (MACE) धोका कमी करतं. हे पेनसारखं उपकरण आहे जे वापरण्यास सोपं आहे. ते 0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम, 1 मिलीग्राम, 1.7 मिलीग्राम आणि 2.4 मिलीग्राम अशा वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे.

किंमत किती?

0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम आणि 1 मिलीग्रामसाठी औषधाची किंमत 17,345 रुपयांपासून सुरू होते, तर 1.7 मिलीग्रामची किंमत 24,280 रुपये प्रति पेन आणि 2.4 मिलीग्रामची किंमत 26,015 रुपये प्रति पेन आहे. हे केवळ प्रिस्क्रिप्शनवर मिळणारं औषध असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. म्हणजे हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. वेगोवी लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा देऊ शकतं.

कशाप्रकारे काम करतं औषध?

INDIAB च्या एका अभ्यासानुसार, जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या 254 मिलियन आहे, तर 351 मिलियन लोक पोटाच्या लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.

वेगोवी एक GLP-1 रिसेप्टर एका प्रकारचं प्रथिन आहे. ज्यामुळे भूक कमी लागते आणि खाण्याची इच्छा कमी होते. ज्यामुळे त्याचा वजनावर प्रभाव दिसू लागतो. ते इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील सुधारते, ज्यामुळे कार्डिओमेटाबॉलिक प्रणाली सुधारते.





Source link

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा पाक अधिकारी तालिबानच्या हल्ल्यात ठार

0
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा पाक अधिकारी तालिबानच्या हल्ल्यात ठार


२०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यान भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान तालिबानने केलेल्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह शहीद झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण राहिले आहेत.



Source link

“पालखी चौकातील उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण; शिवप्रेमींचा पुढाकार”

0
“पालखी चौकातील उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण; शिवप्रेमींचा पुढाकार”

वेळापूर (ता. माळशिरस) – पालखी महामार्गावरील वेळापूर गावातील महत्त्वाच्या पालखी चौकात असलेल्या उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात आले असून, हा पुढाकार पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी घेतला आहे.

सध्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्याअंतर्गत अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलांना थोर समाजपुरुषांची नावे देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून, यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा मान्यवरांचा समावेश आहे.

त्याच धर्तीवर, वेळापूर येथील अकलूज-सांगोला व माळशिरस-पंढरपूर मार्गाच्या संगमावर असलेल्या पालखी चौकातील उड्डाणपुलास शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे गौरवपूर्ण नाव देण्याचा निर्णय घेतला. या नाविकरणाबाबत शिवप्रेमींनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेत त्यांना याबाबतची पूर्वकल्पना दिली आहे.

हा ऐतिहासिक निर्णय शिवप्रेमींच्या एकजुटीचे व संस्कृतीप्रेमाचे प्रतीक ठरला आहे.

फलटण पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी : स्वागतासाठी प्रशासन सज्ज!

0
फलटण पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी : स्वागतासाठी प्रशासन सज्ज!

फलटण :संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे यंदा दि. २८ जून २०२५ रोजी फलटणमध्ये आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आळंदीतून प्रस्थान झालेल्या या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण नगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली असून, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाकडून नियोजनबद्ध कामे सुरू आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली.

रस्ते, पाणी, स्वच्छता… सर्व सेवा सज्ज!

फलटण शहरातील रस्त्यांची डागडुजी, पावसामुळे खराब झालेल्या पुलांची दुरुस्ती, पालखी मार्ग स्वच्छता, आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन हे सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी मार्गावरील दगड-माती उचलण्याचे काम वेगाने सुरू असून, स्वच्छतेसाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे.

वारकऱ्यांसाठी विशेष पाणी सुविधा

प्रत्येक प्रमुख चौकात पाणपोई तर पालिकेच्या जलपुरवठा केंद्रावर एकाच वेळी ८ टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एक १० हजार लिटरचा टँकर अवघ्या ७–८ मिनिटांत भरून निघतो, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

पालखी तळ सज्ज, मंडप आणि सेवा केंद्र उभारणी

पालखी तळावर पावसाचा त्रास होऊ नये यासाठी डांबरीकरण व मुरुमाची भर करण्यात आली असून, लाईटसाठी ८ सॅटेलाईट पॉइंट, जनरेटर, शौचालय व स्नानगृह यांसह संपूर्ण सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. दर्शन बारीची रचना पूर्ण झाली असून, यावर्षी प्रथमच यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये “जर्मन मंडप” माध्यमातून वारकरी सेवा केंद्र उभे राहिले आहे.

आरोग्य सेवा केंद्र आणि सुरक्षा व्यवस्था

या केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५० डॉक्टर, २० फिजिओथेरपिस्ट, तात्पुरते हॉस्पिटल, हिरकणी कक्ष अशा सुविधा उपलब्ध आहेत. गर्दी नियंत्रणासाठी नगरपालिकेची फिरती पथके आणि पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुखद अनुभव मिळावा यासाठी फलटण नगर परिषद कटीबद्ध आहे, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.

पालखी सोहळ्यामुळे वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन

0
पालखी सोहळ्यामुळे वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन

फलटण   : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २६ ते ३० जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यामध्ये लाखो भाविक सहभागी होणार असून, वाहतूक कोंडी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण वाहतूक बदलांची अधिसूचना जारी केली आहे.

पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पाडेगाव-लोणंद (ता. खंडाळा) मार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पुढे लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्काम करून ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करेल.

या पार्श्वभूमीवर २५ ते ३० जून दरम्यान निरा-लोणंद-फलटण-पंढरपूर मुख्य रस्ता इतर सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. केवळ पालखीतील वाहनं आणि अत्यावश्यक सेवा (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक) यांना वगळण्यात आलं आहे.

🚧 वाहतूक मार्गात बदल पुढीलप्रमाणे:

  • २५ ते २९ जून: फलटणहून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती वा वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) मार्गे शिरगाव घाटातून वळवली जाईल.
  • २५ ते २८ जून: आदर्की फाटा ते लोणंद रस्ता सामान्य वाहनांसाठी बंद.
  • २५ ते ३० जून: लोणंद ते फलटण मार्ग पूर्णपणे बंद.
  • २८ ते ३० जून: फलटण ते नातेपुते मार्ग बंद.
  • २८ जून: नातेपुतेहून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस-अकलूज-बारामतीमार्गे वळवण्यात येणार.
  • २८ जूनपासून: नातेपुतेहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर-तिकाटणे-दहीवडी मार्गे वळवण्यात येणार.
  • नातेपुते–पुणे वाहतूक दहीगाव-जांब-बारामतीमार्गे वळवण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहनधारक, स्थानिक नागरिक व प्रवाशांना अधिसूचनेतील नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

.

पैशांच्या बदल्यात पर्यवेक्षक नेमणुकीचा सौदा; बारामतीत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटक

0
पैशांच्या बदल्यात पर्यवेक्षक नेमणुकीचा सौदा; बारामतीत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटक

बारामती, ता. २५ जून :सरकारी परीक्षा प्रक्रियेसारख्या नितीमूल्यांच्या गोष्टीतही पैशांचा सौदा सुरू असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य आणि सध्या प्राचार्यपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अवधूत भिमाजी जाधवर (वय ५३) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २४ जून) बारामती शहरातील सिटी इन हॉटेलजवळ करण्यात आली.

या प्रकरणी जाधवर यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार हे एका खासगी पॅरामेडिकल संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेतील परीक्षेसाठी शासकीय पर्यवेक्षक नियुक्त करणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी संबंधित शासकीय आयटीआय संस्थेकडे लेखी विनंती केली होती. यावर जाधवर यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये या दराने ४५ विद्यार्थ्यांच्या बदल्यात एकूण ९० हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी दहा हजार रुपये आधीच देण्यात आले होते. उर्वरित ४० हजारांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली.

सापळा आणि अटकेची कारवाई

तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचत जाधवर यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल भोसले, शिपाई कोमल शेटे, कैलास महामुलकर आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

    चेतन भगत यांचा कॉलम: ‘बळी तो कान पिळी’ या‎ तत्त्वावर चालत आहे जग‎, सॉफ्ट पॉवरचे मिथकही मोडत आहे‎

    0
    चेतन भगत यांचा कॉलम:  ‘बळी तो कान पिळी’ या‎ तत्त्वावर चालत आहे जग‎, सॉफ्ट पॉवरचे मिथकही मोडत आहे‎


    • Marathi News
    • Opinion
    • Chetan Bhagat’s Column, The World Is Running On The Principle Of ‘Vali To Kan Pili’, The Myth Of Soft Power Is Also Being Broken

    6 तासांपूर्वी

    • कॉपी लिंक

    ‎‎‎‎‎‎‎‎आपण सर्वांनी शाळेत भूगोल आणि इतिहासाचा अभ्यास‎केला आहे. काही लोक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रगत‎पदवी घेतात. या विषयावर अनुभवी राजनयिक आणि‎असंख्य थिंक टँक आहेत. संयुक्त राष्ट्र संघ, जी-७ आणि‎यांसारख्या इतर जागतिक संस्थांचे काम जागतिक‎व्यवस्था राखणे आहे. परंतु, यापैकी काहीही तुम्हाला‎आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तवासाठी तयार करत नाही.‎वास्तविक-जगातील राजनय पाठ्यपुस्तकातील नियमांचे‎पालन करत नाही. ते सभ्य किंवा निःपक्ष किंवा सुसंगतही‎नाही. आणि तरीही त्याचे नियम आजच्या जगाला आकार‎देतात. जागतिक शक्ती कशी कार्य करते याबद्दल काही न ‎‎सांगितलेली सत्ये येथे आहेत.‎

    QuoteImage

    एखाद्या देशाकडे लष्करी, आर्थिक किंवा‎तांत्रिक शक्ती नसते तोपर्यंत तो जागतिक‎व्यासपीठावर महत्त्वाची भूमिकाेची‎अपेक्षा करू शकत नाही. इराण- इस्रायल-‎अमेरिका संघर्षाने आपल्याला जगाच्या‎वास्तवाबद्दल खूप धडे दिले आहेत.‎

    QuoteImage

    १. बळी तो कान पिळी : जागतिक व्यासपीठावर‎राष्ट्रांवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही संविधान किंवा‎सर्वोच्च न्यायालय नाही. शक्तिशाली राष्ट्रांना जबाबदार ‎‎धरण्यासाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय पोलिस दल नाही. जग‎हे एका जंगलासारखे आहे – जिथे सर्वात शक्तिशाली‎लोक त्यांच्या इच्छेनुसार वागतात आणि बाकीच्यांना‎त्यांच्या इच्छेनुसार वागावे लागते. आज अमेरिका हा‎जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, मग तो इतर‎कोणताही देश कितीही अभिमानी, ऐतिहासिक किंवा‎दृढनिश्चयी असला तरी. अमेरिकेच्या पाठिंब्याने‎इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले आणि अमेरिकेने‎स्वतःच त्यावर थेट हल्ला केला. इराणकडे आपला निषेध‎नोंदवण्यासाठी कोणतेही खरे व्यासपीठ नाही. जोपर्यंत‎एखाद्या देशाकडे लष्करी, आर्थिक किंवा तांत्रिक शक्ती‎नसते, तोपर्यंत तो जागतिक व्यासपीठावर महत्त्वाची‎भूमिका बजावण्याची अपेक्षा करू शकत नाही.‎

    २. मैत्री महत्त्वाची, परंतु केवळ परस्पर‎हितसंबंधांमुळे : इस्रायल हा एक छोटा देश आहे, परंतु‎त्याच्याकडे त्याच्या आकारापेक्षा खूप जास्त शक्ती आहे.‎का? कारण अमेरिका त्याच्यासोबत ठामपणे उभी आहे.‎अमेरिकेतील ज्यू समुदायाचा प्रभाव सर्वज्ञात आहे, परंतु‎तो त्यापलीकडे जातो. मध्य-पूर्वेत अमेरिकेचे धोरणात्मक‎हितसंबंध आहेत – तेल, गॅस आणि शत्रुत्ववादी कट्टरपंथी‎राजवटींचा उदय रोखणे. इस्रायलला त्याचा पाठिंबा या‎हितसंबंधांशी सुसंगत आहे. संबंध केवळ भावनिक नाही -‎त्यात देणगी आणि धोरणात्मक विचारांचा समावेश आहे.‎

    ३. संयुक्त राष्ट्रसंघ कमकुवत देशांसाठी आहे :‎आपल्याला शिकवले गेले होते की, संयुक्त राष्ट्रसंघ‎जागतिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. वास्तविकता अशी‎आहे की, ते एका निधीप्राप्त स्वयंसेवी संस्थेसारखे काम‎करते. निश्चितच ते मानवतावादी मदत पुरवते, संघर्षांत‎मध्यस्थी करते व शांतता निर्माण करते – परंतु, सहसा‎छोट्या किंवा कमी शक्तिशाली देशांसाठी. मोठे खेळाडू‎उदयास येतात तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ मूक प्रेक्षक बनतो.‎

    ४. विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल व इनोव्हेशन‎जिंकते, मूलतत्त्ववाद नाही : अमेरिका केवळ श्रीमंत‎आहे म्हणून नाही, तर लष्करी तंत्रज्ञानासह तंत्रज्ञानात‎अथक गुंतवणूक केल्यामुळेही शक्तिशाली आहे. हवाई‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संरक्षण, अचूक क्षेपणास्त्रे, ड्रोन, एआय – कोणीही त्याच्या‎जवळ येत नाही. मानवजातीच्या इतिहासात चांगले‎तंत्रज्ञान असलेली राष्ट्रे नेहमीच वर्चस्व गाजवत आली‎आहेत – गनपावडरच्या शोधापासून ते आंतरखंडीय‎बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपर्यंत . केवळ श्रद्धा, आवड किंवा‎भूतकाळाच्या गौरवावर अवलंबून असलेली सरकारे‎अनेकदा त्यांच्याच लोकांना मूर्ख बनवतात.‎

    ५. सॉफ्ट पॉवर हे मिथक : पर्शियन कार्पेट उत्तम‎आहेत. इराणी पाककृती जागतिक दर्जाची आहे. इराणी‎सिनेमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. परंतु,‎युद्धात यापैकी काहीही महत्त्वाचे नाही. सॉफ्ट पॉवर हा‎शब्द एक ऑक्सिमोरॉन आहे. पॉवर कठीण आहे. आणि‎ती आर्थिक ताकद, लष्करी क्षमता आणि अत्याधुनिक‎तंत्रज्ञानातून येते. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाने‎आपल्याला अनेक धडे दिले आहेत.‎ (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)‎



    Source link

    Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक

    0


    Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक

    Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

     एक दिवस चालतोय एक दिवस चेक राजमाबल समोर समोर आज विरांचा वाढदिवस मनापासून व्यक्तीच्या माझ्या वतीने सहकार्य केल, आज जे मी आहे, हे तुमच्या सगळ्यांमुळे, तुमच्या सगळ्यांमुळे, जरी जन्म, आता तरी सुशील असेल, मी अस समजण्यापैकी नाही, फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनकार हे दोन माझे मुल, वेदांत असेल, सगळ्यांची मुल, माझे मुल आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून कराव लागेल. लवकर आता आता मोठा झालाय मला कळतच नाही आता सगळे मुल एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मगाशी म्हणल माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण एक लक्षात घ्या काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळत असच प्रेम तुझ्यावरती करत राहणार.



    Source link

    “सत्य, नम्रता आणि सेवा भावनेचा संगम – सचिन सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!”

    0
    “सत्य, नम्रता आणि सेवा भावनेचा संगम – सचिन सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!”

    नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांचा वाढदिवस

    फलटण (प्रतिनिधी) – नम्रता, दयाळूपणा, सत्यनिष्ठा, जबाबदारी, सकारात्मकता आणि धैर्य अशा अनेक सद्गुणांचा संगम म्हणजे नगरसेवक सचिन रमेश अहिवळे सर. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण फलटण शहरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    सचिन सर हे फलटण नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक असून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे घडत आहे.

    ते नेहमी नम्र आणि विनम्र स्वभावाने लोकांशी संवाद साधतात. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणं, प्रामाणिकपणे काम करणं आणि कोणत्याही अडचणींमध्ये सकारात्मक दृष्टी ठेवणं, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.

    त्यांच्या कार्यातून आणि विचारातून अनेकांना प्रेरणा मिळते. समाजहितासाठी झटणाऱ्या, सदैव लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अशा या लोकनेत्याला ‘साहस टाइम्स’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    🎉 Happy Birthday Sachin Sir! 🎁🎂
    💐 आपले आयुष्य उत्तरोत्तर यशस्वी आणि समृद्ध होवो, हीच प्रार्थना! 🙏