Sunday, September 20, 2026
Homeसातारानिळकंठेश्वर पॅनलचा माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दबदबा; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा उमेदवार...

निळकंठेश्वर पॅनलचा माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दबदबा; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा उमेदवार विजयी!

बारामती, प्रतिनिधी |माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने जोरदार मुसंडी मारत विजयाची मालिका सुरू केली आहे. कालपासून (२४ जून) बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पॅनलने आघाडी मिळवत सहा जागांवर विजय मिळवला आहे.

काल जाहीर झालेल्या ब वर्ग मतदारसंघाच्या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९१ मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला होता. त्यानंतर आज (२५ जून) सकाळपासून दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली असून, एकामागून एक निकाल जाहीर होत आहेत.

आजपर्यंत जाहीर झालेल्या पाच जागांमध्ये निळकंठेश्वर पॅनलचे पुढील उमेदवार विजयी झाले आहेत:

  • अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग: रतनकुमार भोसले
  • इतर मागास प्रवर्ग: नितीन शेंडे
  • भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग: विलास देवकाते
  • महिला राखीव प्रवर्ग: संगीता कोकरे आणि ज्योती मूलमुले

या विजयामुळे निळकंठेश्वर पॅनलचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील निकालांकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामतीतील सहकार क्षेत्रावर पुन्हा एकदा पकड घट्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments