Thursday, July 9, 2026
Home Blog Page 196

शाहू-आंबेडकरी क्रांतीमुळे युवक विविध क्षेत्रांत मिळवतायेत नेत्रदीपक यश: —— प्रबुद्ध सिद्धार्थ

0
शाहू-आंबेडकरी क्रांतीमुळे युवक विविध क्षेत्रांत मिळवतायेत नेत्रदीपक यश: —— प्रबुद्ध सिद्धार्थ

फलटण (२६ जून): “आपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले. ते राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित यशस्वी युवकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.
सिद्धार्थ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “समता स्थापन्यासाठी शाहू महाराजांनी संधी दिली. ही संधीची समानता बाबासाहेबांनी संविधानात समाविष्ट केली. यामुळेच आपले युवक आज विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. हीच खरी शाहू-आंबेडकरी क्रांती आहे.” शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग व्यवसाय यातूनच आंबेडकरी आर्थिक क्रांती शक्य आहे. संविधानाने दिलेल्या संधीच्या स्वातंत्र्याचा आपण पूर्ण ताकतीने वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन सिद्धार्थ अहिवळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ मागील तीन दशकांपासून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. प्रबुद्ध विद्याभवनच्या माध्यमातून मंडळ मोफत प्राथमिक शिक्षण देत आहे. याशिवाय, मंडळ १०वी, १२वी, पदवीधर, आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा नियमितपणे गौरव करत आले आहे. यावर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अशाच विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मान्यवरांचा गौरव सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अनेक यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या युवकांना सन्मानित करण्यात आले:

  • अमेरिकेतून वैमानिक प्रशिक्षण घेतलेल्या संकेत अंजलीताई सुहास अहिवळे यांचा सत्कार माजी नगरसेवक मधुकर काकडे यांच्या हस्ते झाला.
  • आयआयटी वाराणसीचा पदवीधर पराग भीमराव लोंढे यांचा सत्कार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
  • खासगी बँक संस्थापक दयानंद पडकर यांचा सत्कार विजय येवले यांच्या हस्ते झाला.
  • प्राणी वैद्यकीयशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉ. अंकिता रमेश भोसले यांचा सत्कार संघमित्रा अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
  • उद्योगविश्वात कार्यरत संघराज दिपाली बाळू अहिवळे यांचा सत्कार जे.एस. काकडे यांच्या हस्ते झाला.
  • पेट्रोलपंप व्यावसायिक दादासो गायकवाड यांचा सत्कार सचिन अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
  • महावीर विठ्ठल मोहिते यांचा सत्कार आर.डी. काळे साहेब यांच्या हस्ते झाला.
  • लेबर सप्लाय एजन्सीच्या माध्यमातून कार्यरत वैशालीताई संदीप कांबळे यांचा सत्कार अंजलीताई अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
  • राज्यसेवेत निवड झालेल्या शंकेश्वर वंदना हनुमंत अहिवळे यांचा सत्कार नानासो मोहिते यांच्या हस्ते झाला.
  • इस्रोमध्ये निवड झालेल्या सुमेध हिरामण आढाव यांचा सत्कार प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
    या सत्कार सोहळ्यात सर्व सत्कारार्थींनी आपल्या यशामागील संघर्षाची गाथा उपस्थितांसमोर मांडली, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली.

15 ऑगस्टपर्यंत HSRP लावणं बंधनकारक; अजूनही 70% वाहनधारकांनाच प्रतीक्षा!

0
15 ऑगस्टपर्यंत HSRP लावणं बंधनकारक; अजूनही 70% वाहनधारकांनाच प्रतीक्षा!

फलटण : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना! एक एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने असणाऱ्यांना आता उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनधारकांनी याबाबत आवश्यक ती पावले उचललेली नाहीत. परिणामी, सरकारने आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देत १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. ही शेवटची मुदत असून, यानंतर पाटी न बसवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

सध्या राज्यात सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनांवरच HSRP बसविण्यात आलेली आहे. अपुरी केंद्रे, प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अंमलबजावणीत अपेक्षित प्रगती झालेली नाही.

यापूर्वी ३१ मार्च, नंतर ३० एप्रिल आणि त्यानंतर ३० जून अशी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अजूनही पाटी बसवण्यात फारशी वाढ न झाल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहनधारकांकडून आणखी मुदतवाढीची मागणी करण्यात आली. यावर कारवाई करत सरनाईक यांनी १५ ऑगस्ट २०२५ ही शेवटची मुदत असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे.

🔍 HSRP म्हणजे नेमकं काय?

  • अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली प्लेट
  • जाडी 1 मिमीपेक्षा थोडी अधिक
  • क्रोमियम बेस्ड होलोग्राम स्टिकर
  • टॅम्पर-प्रूफ लॉक
  • लेझर कोडेड 10 अंकी PIN

वाहनधारकांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आपल्या वाहनाला HSRP बसवून घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई टळणार नाही.

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव

0
जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव
फलटण : शोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.त्यांच्या न्याय हक्कांसाठी अनेक प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून त्यांचे हक्क जपण्याचे काम केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली. प्रस्थापितांशी संघर्ष करीत असताना इथल्या सामान्य माणसाशी त्यांनी कधीच आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी कधीही राजेशाही मिरवू दिली नाही आणि मिरवली ही नाही. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी फलटण या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार कार्याला अभिवादन करून ते म्हणाले,”रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकराजा, राजर्षी या उपाध्यांनी ओळखतो. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य इथल्या बहुजन समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या विचार व कार्याचा जागर करून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करूया. “
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान व त्यांच्यामध्ये असणारा स्नेह याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आहे. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, कृषी, शिक्षण आणि बऱ्याच बाबतीत आदर्शवत आहे. त्यांनी या सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूरचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सक्तीचा शिक्षणाचा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात करून 50 टक्के आरक्षण देशात देऊन सर्वप्रथम आरक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. म्हणूनच आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो.त्यांनी जातीप्रथेचे समूळ उच्चाटन केले. राधानगरी सारखे धरण निर्माण करून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना ‘सामाजिक समतेचे आधारस्तंभ’ म्हणून संबोधतात. त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाऊन समताधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करूया.”असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आव्हान केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी यावेळी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव

0
जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव


फलटण : शोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.त्यांच्या न्याय हक्कांसाठी अनेक प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून त्यांचे हक्क जपण्याचे काम केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली. प्रस्थापितांशी संघर्ष करीत असताना इथल्या सामान्य माणसाशी त्यांनी कधीच आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी कधीही राजेशाही मिरवू दिली नाही आणि मिरवली ही नाही. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी फलटण या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार कार्याला अभिवादन करून ते म्हणाले,”रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकराजा, राजर्षी या उपाध्यांनी ओळखतो. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य इथल्या बहुजन समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या विचार व कार्याचा जागर करून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करूया. “
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान व त्यांच्यामध्ये असणारा स्नेह याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आहे. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, कृषी, शिक्षण आणि बऱ्याच बाबतीत आदर्शवत आहे. त्यांनी या सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूरचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सक्तीचा शिक्षणाचा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात करून 50 टक्के आरक्षण देशात देऊन सर्वप्रथम आरक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. म्हणूनच आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो.त्यांनी जातीप्रथेचे समूळ उच्चाटन केले. राधानगरी सारखे धरण निर्माण करून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना ‘सामाजिक समतेचे आधारस्तंभ’ म्हणून संबोधतात. त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाऊन समताधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करूया.”असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आव्हान केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी यावेळी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.

राजाच्या शापाने कॅन्सर बरा होणार का? शास्त्रज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

0
राजाच्या शापाने कॅन्सर बरा होणार का? शास्त्रज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर


Egypt Pharaoh Cancer Treatment : इजिप्तमध्ये बंद शवपेट्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत असतात. 1922 मध्ये तुतानखामुनची कबर उघडल्यानंतर जगाला हादरुन सोडलं होतं. त्यानंतर इथे सुरु असलेल्या संशोधनातून अनेक गुढ उकले जात आहे. खरं तर त्या काळात खूप विचित्र घटना घडल्या ज्यामध्ये कबर उघडणारे अनेक लोक गूढपणे मरण पावले. त्यानंतर अशी अफवा पसरली की, फारो नावाच्या राजाच्या शापामुळे हे मृत्यू होत आहेत. अशी अफवा होती की, जो कोणी त्याची कबर उघडेल तो आजाराने किंवा अचानक त्याचा मृत्यू होईल. अखेर संशोधकांना या मृत्यूमागील रहस्य उघडण्यात यश आलं आहे. 

‘या’ कारणामुळे झाला त्यांचा मृत्यू!

संशोधकांनी केलेल्या शोधानंतर असा दावा केला की, कुठल्याही शापामुळे शास्त्रज्ञांचा मृत्यू नाही तर कबरींमध्ये वाढणाऱ्या एका धोकादायक बुरशीमुळे होतो. शेकडो वर्षांनंतर त्या उघडल्यानंतर, त्यामध्ये असलेल्या एस्परगिलस फ्लेव्हस नावाच्या बुरशीचे बीजाणू हवेत पसरले. हे कबरी उघडणाऱ्या लोकांच्या श्वासाद्वारे शरीरात शिरले आणि संसर्ग झाला ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली. त्यातून त्यांचा मृत्यू झाला. 

फारोचा शाप – आशेचा किरण

पण आता शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की तुतानखामुनच्या थडग्याचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लॉर्ड कार्नाव्हॉनला या बुरशीमुळे न्यूमोनिया झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, फारोचा शाप प्रत्यक्षात एक नैसर्गिक घटना होती जी लोकांना शाप वाटत होती, जी आता वरदान असल्याच या संशोधनातून पुढे आलं आहे. 

कर्करोगावर उपचार करण्यास मदत!

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधकांनी एक आश्चर्यकारक शोध लावला आहे, त्यांनी म्हटलंय की एस्परगिलस फ्लेव्हसमध्ये असलेल्या काही संयुगांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास फायदेशीर असल्याच त्यांनी म्हटलं आहे. संशोधकांनी या बुरशीपासून एस्पेरिजिमायसिन नावाचे चार नवीन पेप्टाइड्स वेगळे केले आहेत. पेप्टाइड्स कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जर ही बुरशी चाचण्यांमध्ये उपयुक्त ठरली तर ती कर्करोगाच्या उपचारात एक मैलाचा दगड ठरेल असं संशोधकांचं म्हणं आहे. 





Source link

नीरा नदीच्या साक्षीने पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत!

0
नीरा नदीच्या साक्षीने पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत!

फलटण :‘माऊली माऊली’च्या गजरात, टाळमृदुंगाच्या निनादात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरास्नान घालून हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा जयघोष आसमंत दुमदुमवत होता.

या पवित्र प्रसंगानंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला असून सायंकाळी लोणंद येथे मुक्कामी पोहोचला आहे. बुधवारी वाल्हे येथे मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी पालखी वाल्हे येथून मार्गस्थ होऊन नीरा येथे दुपारी थांबली आणि तद्नंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामी पोहोचली.

पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालण्याची परंपरा अतिशय प्राचीन असून आषाढी वारीतील तीन पवित्र स्नानांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नीरा नदी ओलांडताना पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर होणारे हे स्नान हजारो वारकऱ्यांसाठी भक्तिभावाचा केंद्रबिंदू असतो.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दलाने पालखीला मानवंदना दिली आणि पालखी सोहळ्याचे व वारकऱ्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा हा सातारा जिल्ह्यातील पहिला मुक्काम भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला.

भात खाण्याची ‘ही’ सवय आतड्या सडवते; 90% लोक करतात ‘ही’ चूक, शिजवताच किती वेळात खावा?

0
भात खाण्याची ‘ही’ सवय आतड्या सडवते; 90% लोक करतात ‘ही’ चूक, शिजवताच किती वेळात खावा?


अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारख वाटत नाही. जवळपास प्रत्येकाच्या घरी दररोज भात शिजवला जातो. भात आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. पण हा भात शिजवल्यानंतर किती वेळात आणि कसा खाता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. 

असे अनेक लोक आहेत ज्यांना शिळा भात खायला आवडतो. अगदी सकाळच्या नाश्त्याला देखील काहीजण फोडणीला देऊन भात खातात. पण शिळा म्हणजे एवढंच नव्हे तर अगदी एक तास अगोदर शिजवलेला भात देखील शिळा भात समजला जातो. फ्रिजमध्ये ठेवलेला भात देखील शिळाच असतो. त्यामुळे नक्की कधी शिजवलेला भात खावा, कोणता भात खाण्यासाठी आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. 

भारतातील लोकप्रिय न्यूट्रिशन कोच Ryan Fernando यांनी सांगितलं की, शिळा भात तुमच्या पोटावर काय परिणाम करतो. कारण अशा भातातून Basillus Cereus सारखे बॅक्टेरिया शरीरात शिरकाव करतात. 

कोच यांनी सांगितलं की, हा जीवघेणा विषाणू कच्च्या तांदळात असतो. या बॅक्टेरियावर उष्णतेमुळे कोणता परिणाम होत नाही. अगदी भात शिजवल्यावरही कोणताच परिणाम होत नाही. एवढंच नव्हे तर हा विषाणू वाढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा भात शिळा होतो तेव्हा त्यावर या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढतात. 

कसा वाढतो हा विषाणू?

जेव्हा तांदूळ शिजवला जातो आणि त्याचे तापमान कमी होते तेव्हा हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि विषारी पदार्थ सोडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भात शिजवल्यानंतर फक्त एका तासाच्या आत हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि भाताला विषारी बनवू लागतात. कोच म्हणाले की या बॅक्टेरियाशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भात गरम केल्यानंतरही ते मरत नाही. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला वाटत असेल की अन्न गरम केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील, तर तुम्ही चुकीचे आहात.

शिळा भात खाण्याचे तोटे

बॅक्टेरियापासून कसा बचाव करा? 

जर तुम्हाला हे बॅक्टेरिया पोटात जाण्यापासून रोखायचे असेल तर भात शिजवल्यानंतर लगेच खा. जर तुम्ही ते लगेच खात नसाल तर भात फ्रिजमध्ये ठेवा आणि २४ तासांच्या आत कोणत्याही किंमतीत खा, अन्यथा ते फेकून द्या. डॉक्टरांनी सांगितले की हा जीवाणू पोटात जातो आणि आतड्यांवर हल्ला करतो, ज्यामुळे अन्न विषबाधा, मळमळ, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेत फ्राइड राइस सिंड्रोम म्हणतात.

तांदूळ जास्त शिजवला जातो आणि अनेकदा खोलीच्या तपमानावर सोडला जातो. जर तांदूळ लवकर थंड आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला नाही तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. एकदा विषारी पदार्थ तयार झाले की ते पुन्हा गरम करूनही नष्ट करता येत नाहीत.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

“बहुजनांचा राजा, समतेचा शिल्पकार – राजर्षी शाहू महाराज!”

0
“बहुजनांचा राजा, समतेचा शिल्पकार – राजर्षी शाहू महाराज!”


फलटण :  शाहू भोसले हे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर संस्थानाचे १८९४-१९२२ दरम्यान छत्रपती व मराठी समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

*जीवन :

शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व ‘शाहू’ हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

*कार्य :

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.

महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठाधनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “दलितांचा नेता” व “भारतीय अग्रणी नेता” म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

जातिभेदा विरुद्ध लढा

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

*शैक्षणिक कार्य :

महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे :

  • व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
  • दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
  • वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
  • मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
  • मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
  • दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
  • श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
  • पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
  • श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
  • इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
  • कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
  • आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
    वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

*इतर कार्ये :

शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.

*कलेला आश्रय :

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

*स्वातंत्र लढ्यातील योगदान :

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

*सन्मान :

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
संकलन:-मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर, पेरणेक

“एक जबाबदारी, एक चळवळ” – कान्हेरी लेणी संवर्धन मोहिमेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

0
“एक जबाबदारी, एक चळवळ” – कान्हेरी लेणी संवर्धन मोहिमेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

मुंबई, बोरीवली | २५ जून २०२५ :- पावसाळा सुरू होताच पर्यटकांनी भरलेले आणि निसर्गाने नटलेले कान्हेरी लेणी परिसर (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) हे केवळ एक रमणीय स्थळ नाही, तर जगप्रसिद्ध बौद्ध महाविहार आणि शैक्षणिक वारसा असल्याचे अनेकांना ठाऊक नाही. या पवित्र परिसरात सध्या काही अज्ञानी आणि बेफिकीर लोकांकडून होणाऱ्या अश्लील वर्तनामुळे बौद्ध संस्कृतीचा अपमान होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, ‘कान्हेरी लेणी मोहिम – एक जबाबदारी, एक चळवळ’ या नावाने गेल्या वर्षीपासून सुरु असलेली जनजागृती मोहीम यंदाही दर रविवारी राबवली जात आहे. या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कान्हेरी लेणी परिसरातील बौद्ध वारशाचे संरक्षण करणे, अश्लीलतेला आळा घालणे, आणि पर्यटकांमध्ये सांस्कृतिक भान निर्माण करणे.

रविवारी पुन्हा मोहीम – सहभागी व्हा!

येत्या रविवारी, २९ जून २०२५ रोजी, पुन्हा एकदा तरुणांची टीम कान्हेरी लेणी येथे जनजागृतीसाठी दाखल होणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे नावनोंदणी सुरू केली आहे –

  1. सिद्धार्थ गायकवाड
  2. यश खुने
  3. (नोंदणी सुरू आहे)

संपर्कासाठी:

📞 सिद्धार्थ गायकवाड – 8097275909
🌐 WhatsApp समूहात सहभागी व्हा


ही मोहीम केवळ कान्हेरी लेणीपुरती मर्यादित नाही, तर आपल्या संस्कृतीच्या अस्मितेचे रक्षण करण्याचा एक लढा आहे

IVF केल्यानंतर किती दिवसांनी करावी प्रेग्नेंन्सी टेस्ट? 90% लोकांना ‘या’ दिवशी आला पॉझिटिव्ह रिझल्ट

0
IVF केल्यानंतर किती दिवसांनी करावी प्रेग्नेंन्सी टेस्ट? 90% लोकांना ‘या’ दिवशी आला पॉझिटिव्ह रिझल्ट


Pregnancy Test After IVF: वर्षानुवर्षे मूल होण्यासाठी अनेक जोडपी संघर्ष करत असतात. अशावेळी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. IVF केल्यानंतर पहिला प्रश्न येतो की,आता गर्भधारणा चाचणी कधी करावी लागेल? जरी उपचारादरम्यान त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते, तरीही कधीकधी ते घाईघाईने किंवा घाबरून हे विसरतात आणि म्हणूनच या जोडप्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी किती दिवसांनी चाचणी करावी याबद्दल समजून घेऊया. जेणेकरून तुम्हाला प्रेग्नेंन्सीबाबत Good News मिळेल.  कधीकधी घाईमुळे, चाचणी नकारात्मक दिसू शकते, तर महिला प्रत्यक्षात गर्भवती असते. अशा परिस्थितीत, आयव्हीएफ नंतर गर्भधारणा चाचणीसाठी योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 99 टक्के लोकांना याबाबत आतापर्यंत सकारात्मक रिपोर्ट मिळाला आहे. 

आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांनी IVF ट्रिटमेंट १० ते १२ दिवसांनी गर्भधारणा चाचणी करावी, जेणेकरून निकाल अचूक आणि विश्वासार्ह असेल. तर, नैसर्गिक गर्भधारणेमध्ये, महिलांना मासिक पाळी चुकल्यानंतर किंवा इतर कोणतेही शारीरिक बदल दिसल्यानंतरच गर्भधारणेबद्दल कळते.

स्टेप १ 

आयव्हीएफ प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलेला काही हार्मोनल इंजेक्शन दिले जातात. हे हार्मोन्स महिलांच्या अंडाशयात अधिक अंडी (फिमेल एग) तयार करण्यास मदत करतात. या प्रक्रियेला काही दिवस लागतात.

स्टेप 2

अंडी पूर्णपणे विकसित झाल्यावर, एका लहान शस्त्रक्रियेच्या मदतीने ती गोळा केली जातात.

पायरी ३

नंतर, गोळा केलेले अंडी नमुने वडिलांच्या शुक्राणूंसह गर्भाधानासाठी ठेवले जातात. गर्भाधानानंतर, अंडी काही दिवसांसाठी देखरेख आणि निरीक्षण केली जातात.

स्टेप 4

अंडी फलित केल्यानंतर, गर्भ तयार होतो. हे गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात (एम्ब्रियो इम्प्लांटेशन) रोपण केले जातात.

किती दिवसांनी गर्भधारणा चाचणी करावी?

आयव्हीएफ प्रक्रियेत, गर्भाशयात गर्भ रोपण केल्यानंतर, सुमारे १०-१४ दिवसांनी गर्भधारणा चाचणी करता येते. यावेळी गर्भधारणा चाचणी करून, गर्भधारणा चाचणीचे निकाल अचूक असल्याचे दाखवता येते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link