
कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचा मांजरांबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे. या संशोधनानुसार पाळीव प्राण्यांमुळे काही आजार होतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भयंकर धोका उद्भवू शकतो.
Source link

कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचा मांजरांबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे. या संशोधनानुसार पाळीव प्राण्यांमुळे काही आजार होतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भयंकर धोका उद्भवू शकतो.
Source link

बंगालमधील एका प्रसिद्ध महाराजाविरोधात महिलेने पोलिसांकडे गंभीर आरोप केले आहेत. भारत सेवाश्रम संघाशी संबंधित पद्मश्री पुरस्कार विजेते कार्तिक महाराज यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ माजली आहे. महाराजांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रथम तिची फसवणूक केली आणि नंतर जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप सदर महिलेने केला आहे. या प्रकरणी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नाबग्राम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिलेने आपली ओळख गुप्त ठेवत माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, 2013 मध्ये कार्तिक महाराज तिला प्राथमिक शाळेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने मुर्शिदाबाद इथे एका आश्रमात घेऊन गेले. महिलेला शिक्षिका म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्याच आश्रमाच्या परिसरात राहण्यासाठी एक खोलीही देण्यात आली होती. एका रात्री कार्तिक महाराज अचानक तिच्या खोलीत आले आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला, असा आरोप महिलेने केला आहे. तिने विरोध केला तेव्हा मानसिक दबाव आणि धमकी देऊन तिला संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले, असा महिलेचा दावा आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली नबग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार्तिक महाराज हा भारत सेवाश्रम संघाच्या बेलडांगा मठाशी संबंधित आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीसह इतर कायदेशीर प्रक्रिया देखील पाळल्या जात आहेत.
कार्तिक महाराज यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात की, ते एक संन्यासी आहेत आणि संन्याशांच्या मार्गात असे अडथळे येत राहतात. ते म्हणाले की ते न्यायव्यवस्थेचा आदर करतात आणि त्यांचे वकील न्यायालयात त्यांची कायदेशीर बाजू मांडतील.
कार्तिक महाराजांच्या राजकीय संलग्नतेमुळेही हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते. त्यांना भारतीय जनता पक्षाचे जवळचे मानले जाते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर यापूर्वी अनेकदा विशेषतः निवडणुकीदरम्यान भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत, या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. सध्या या प्रकरणात भारत सेवाश्रम संघाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

फलटण, २८ जून – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही संविधान दिंडीचे आगमन फलटण शहरात मोठ्या उत्साहात झाले. संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी आणि संविधानातील मूल्ये व अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. निखीलजी मोरे साहेब यांनी फलटणकर नागरिकांच्या वतीने संविधान दिंडीचे स्वागत केले. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प व पुष्पहार अर्पण करून सन्मानित केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते. सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले.
कार्यक्रमास जेष्ठ नेते मा. विजय येवले, संजय निकाळजे, गंधवार्ता संपादक रोहित अहिवळे, राजू मारुडा, महादेव गायकवाड, सिद्धार्थ उर्फ विकी काकडे, पत्रकार सुशील गायकवाड (तरडगाव), शिवा अहिवळे, निलेशभाऊ मोरे, ॲड. विशाल मोहिते, सागर राजपाल अहिवळे, बंटी साबळे, महिला सामाजिक कार्यकर्त्या व अनेक संविधान प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे सागर काकडे (आळजापूर) यांनी केले तर बार्टीचे अधिकारी मा. दिलीप वसावे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

फलटण: इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची दरवर्षी वाढणारी किंमत ही सर्वसामान्य पालकांच्या खिशाला जबरदस्त आर्थिक फटका देणारी ठरत आहे. हे दर इतके अवास्तव आहेत की, अनेक पालकांना त्याचा भार सहन करणं कठीण जातं. विशेषतः खासगी शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला भरमसाठ किंमतीची पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.
याबाबत अद्याप स्पष्ट कायदा नसला तरी शिक्षण हक्क कायदा (RTE Act) आणि शिक्षण विभागाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना योग्य दरात शिक्षणसामग्री मिळणे अपेक्षित आहे. तरीदेखील काही शाळा आपले वेगळे सिलॅबस तयार करून महागडी पुस्तके लादत आहेत. त्यातून शाळांना आर्थिक फायदा मिळतो, असा संशय पालकांमधून व्यक्त होत आहे.
“6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, शाळांनी पुस्तके विक्रीतून व्यावसायिक फायदा करून घेणे हे शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात आहे,” असं कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे शोषण करणाऱ्या अशा शाळांविरोधात कामगार संघर्ष संघटना संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करेल. गरज पडल्यास आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, पण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देणे थांबवणार नाही.”
तत्पूर्वी, पालकांनीही जागरूक राहून शाळांकडून मागवली जाणारी पुस्तके, त्यांची किंमत आणि त्यामागे असलेले नियम याविषयी चौकशी करावी. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार गरज असल्यास अधिकृत तक्रार दाखल करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.

फलटण (प्रतिनिधी) – दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण शहरात आगमन करत असल्याने, या दिवशी फलटण बसस्थानकावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पुढील नियोजनानुसार वळवण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी हे नियोजन लक्षात घेऊन आपली बस संबंधित नव्या पॉईंटवरून पकडावी.
🔹 जिनींग पॉईंट (मुधोजी कॉलेज शेजारी) –
येथून सातारा, पुणे, मुंबई, लोणंद, पुसेगाव या मार्गांवरील बसेस मार्गस्थ होतील.
🔹 कोळकी पॉईंट (शिंगणापूर रोड) –
दहिवडी, शिंगणापूर, पंढरपूर, गिरवी, धुमाळवाडी या मार्गांवरील बसेस येथे उपलब्ध असतील.
🔹 गोविंद दूध डेअरी पार्किंग पॉईंट –
पंढरपूर, आसू, गुणवरे, लातूर, अक्कलकोट या मार्गांवरील बसेस येथे थांबतील.
🔹 सोमवार पेठ पॉईंट (फिरंगाई देवी मंदिराजवळ) –
मलकापूर, बुलढाणा, शिर्डी, बारामती या दिशेने जाणाऱ्या बसेस येथून सुटतील.
🔹 जिंती नाका पॉईंट –
वडगाव, साखरवाडी, जिंती या मार्गांवरील बससेवा याच ठिकाणावरून सुरू राहील.
प्रवाशांनी वरील बदल लक्षात घेऊन आपली नियोजन पूर्वक यात्रा करावी व गैरसोयीपासून बचाव करावा. हा बदल केवळ 28 जून रोजी लागू राहील.
14 तासांपूर्वी
आपण भारतीय एखादी तारीख किंवा कार्यक्रम पकडून त्यावर तुटूनपडतो. त्यातून आपल्याला काय मिळते हे महत्त्वाचे नाही. योग दिन हासर्वात मोठी प्रेरणा देतो की, जीवनातील प्रत्येक क्षण योगाचा असावा.आम्ही लोकांना सोप्या योगात टिकून राहण्याचे आवाहन करतो, अन्यथातुम्ही कठीण योगात अडकाल. १२ वर्षांपूर्वी मी संत युधिष्ठीरलालजींसोबत पाकिस्तानला गेलो होतो. इस्लामाबाद महानगरपालिकेनेएफ-९ पार्कमध्ये मोफत योग वर्ग सुरू केल्याची बातमी आम्ही वाचली.पाकिस्तानसारख्या देशाने योगात सामील होण्यापेक्षा योगाचा मोठा गौरवकाय असू शकतो? मला ६ डिसेंबर २०१३ आठवतो. पाकिस्तान सरकारचेअधिकारी अझहर नजीर सुलहारी मला सद्भाव मंत्रालयाच्या एकाविभागात घेऊन गेले आणि तिथे काही अधिकाऱ्यांशी हनुमान चालीसाऐकून ध्यान करण्याबद्दल चर्चा करत असताना मी त्यांना सामान्य ध्यानकरायला लावले. म्हणूनच आज जेव्हा योगाचा प्रचार केला जातो तेव्हामला तो दिवस आठवतो. सर्व जण त्यात सामील झाले तर जीवन चालतेवैकुंठ बनेल.

माळेगाव | साहस Times :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने विरोधकांचा साफ पाडाव करत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. २१ पैकी तब्बल २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवला असून, ही निवडणूक राज्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेची ठरली आहे.
या एकतर्फी विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दि. २८ जून रोजी माळेगावमध्ये कार्यकर्त्यांचे आणि सभासदांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. दुपारी १.३० वाजता माळेगाव कारखान्याच्या कार्यस्थळी असलेल्या शिवतीर्थ मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
अजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वास दाखवत सभासदांनी विरोधकांना साफ झटपट उत्तर दिलं आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी “अजितदादांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार निवडून येणार नाही,” असा दावा केला होता, तर काहींनी त्यांच्यावर “सहकारी साखर कारखानदारी संपवण्यासाठी माळेगावमध्ये उतरत आहेत,” असे आरोपही केले होते. यावर अजित पवारांनी प्रचारसभांमधून सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.
निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी सभासदांना आश्वासन दिलं होतं की, “आपण कारखान्याची सूत्रे घेतल्यानंतर कारखान्याचा कायापालट करून दाखवू आणि सलग पाच वर्षे राज्यात सर्वाधिक दर देऊ.”
या पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सभेत अजितदादा केवळ कारखान्याच्या प्रगतीबद्दल बोलतील असे नाही, तर विरोधकांनाही जोरदार उत्तर देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

साहस Times | फलटण, 27 जून 2025 :“विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या माऊलींची पालखी आता फलटणच्या सीमेला साक्षी ठरणार आहे!”
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज शुक्रवार, 27 जून रोजी लोणंदहून कापडगाव नजीक सरदेचा ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश करतो आहे. यावेळी तालुक्याच्या सीमेवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून माऊलींचे स्वागत करणार आहेत.
या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळ्याच्या तीन दिवसांच्या फलटण मुक्कामासाठी संपूर्ण तालुका सज्ज झाला आहे.
🔹 २७ जून – तरडगाव,
🔹 २८ जून – फलटण,
🔹 २९ जून – बरड,
तर ३० जून रोजी दुपारी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
आज दुपारी ४ वाजता तरडगाव नजिक चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले “उभे रिंगण” रंगणार संपन्न झाले आहे. यासाठी हजारो भाविक आणि वारकरी आधीच जमा झाले आहेत.
पालखी काळात कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.
▪️ प्रत्येक पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील आदी अधिकारी समन्वयाचे काम करणार आहेत.
▪️ आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी, ३० कर्मचारी, ५ वैद्यकीय गाड्या, २ अॅम्ब्युलन्स, शिवाय १०८ सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.
▪️ महावितरण कडून प्रत्येक मुक्कामी वीज पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
▪️ पाणीपुरवठ्यासाठी २५ जूनपासून नीरा उजवा कालवा सुरू करण्यात आला असून, २७६ विहीरी, ५० बोअरवेल्स तपासून सज्ज केल्या आहेत.
तसेच अन्न व औषध विभागाकडून खाद्य नमुन्यांच्या तपासणीसाठी ४ पथके, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांची डागडूजी व डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे.
पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. पालखी मार्ग, तळ परिसर आणि महत्वाच्या वळणांवर पोलीस कर्मचारी तैनात असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन अत्यंत दक्ष आहे.

फलटण : टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘माऊली… माऊली’ च्या गजरात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे पारंपरिक भक्तिभावाने पार पडले. अश्व रिंगणाच्या या देखाव्याने हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.
दुपारी सव्वा चार वाजता राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वांचे रिंगण सुरू झाले. स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व रथाच्या दिशेने एकामागून एक धावत गेले. टाळ, मृदुंग, हरिपाठाच्या गजरात माऊलींचे अश्व २० पेक्षा अधिक दिंड्या पार करत पुन्हा माऊलींच्या रथाकडे वळले. नारळ प्रसाद घेऊन अश्व रथाभोवती प्रदक्षिणा घालत अग्रभागी पोहोचले. हा सोहळा पाहून वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
यावेळी लोणंद ते तरडगांवपर्यंतच्या मार्गावर हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, परहर खुर्द, हिंगणगांव, रावडी, माळेवाडी, शिंदेमाळ आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच, पदाधिकाऱ्यांनी माऊलींचे स्वागत केले.
या आधी दुपारी २.३० वाजता सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करताच सरदेचा ओढा, कापडगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. या स्वागत सोहळ्यात आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, बाजार समिती संचालक प्रवीण खताळ यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी तरडगाव मुक्कामी पोहोचला.

फलटण (२६ जून २०२५):मुधोजी प्राथमिक विद्यालय फलटण आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षा” मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ आज उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाला मा. प्राचार्य जितेंद्र भीमराव साळुंखे, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ साहेब, डॉ. सतिश फरांदे, सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर (चेअरमन, मुधोजी प्राथमिक विद्यालय), सौ. नुतन अजितसिंह शिंदे (व्हाईस चेअरमन), आणि श्री. अरविंद सखाराम निकम, प्रशासनाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी आदी मान्यवर उपस्थित होते.
या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त बुद्धिमत्तेला वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षणात रस निर्माण होतो, असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. दिलीप राजगुडा, सचिव, मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.