Thursday, July 9, 2026
Home Blog Page 194

संजीवराजेंच्या नेतृत्वात १ जुलैला पालखी तळ स्वच्छता अभियान”

0
संजीवराजेंच्या नेतृत्वात १ जुलैला पालखी तळ स्वच्छता अभियान”

फलटण |संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण मुक्कामी आगमन आणि प्रस्थानानंतर मागे उरते ती भाविकांची श्रद्धा आणि काही प्रमाणात कचरा. याच कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पालखी तळ परिसराच्या स्वच्छतेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ही स्वच्छता मोहीम सुरू होणार आहे. विमानतळ परिसरातील मुख्य पालखी तळासह कंपाऊंड लगत जमा झालेला प्लास्टिक, पेपर ग्लास आणि इतर कचरा संकलित करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

या उपक्रमात फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, श्रीराम सहकारी साखर कारखाना, कृषि उत्पन्न बाजार समिती, दूध संघ, मालोजीराजे बँक, सईबाई महाराज महिला पतसंस्था, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट, गोविंद मिल्क, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – फलटण शाखा, क्रेडाई फलटण शाखा तसेच शहर व तालुक्यातील अनेक संस्था, पदाधिकारी आणि फलटणकर नागरिक सहभागी होणार आहेत.

फलटण नगर परिषदेने याआधीच पालखी तळ परिसराची प्राथमिक स्वच्छता केली आहे. त्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नगर परिषदेला धन्यवाद दिले असून, उर्वरित भागांत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एकत्र मंचावर, पण मनोमिलन नाही! बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांची दूरदृष्टी दिसली, पण जवळीक नाही

0
एकत्र मंचावर, पण मनोमिलन नाही! बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांची दूरदृष्टी दिसली, पण जवळीक नाही

बारामती :- बारामतीत आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आले. अनेक महिन्यांनंतर हे दोघे एकत्र दिसले असले तरी, मंचावर त्यांच्या शेजारी बसण्याचे टाळले गेल्याचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांजवळ बसण्याऐवजी एक खुर्चीचा अंतर ठेवत उपस्थिती नोंदवली. त्यामुळे दोघांमध्ये अजूनही राजकीय तणाव कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.

कार्यक्रमाची अध्यक्षता शरद पवार यांनी केली. टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्ट अंतर्गत व्हर्चुअल रिअॅलिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, होलोग्राम टेक्नॉलॉजीसारख्या अत्याधुनिक प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाची संधी निर्माण करणार आहेत.

राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, मुंबई यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची निवड करण्यात आली असून, हे राज्यातील एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. पुढील टप्प्यात राज्यातील इतर पाच विज्ञान केंद्रांमध्ये हे मॉडेल राबवले जाणार आहे.

या विज्ञानाच्या अधुनातन प्रयोगाशिवाय, या कार्यक्रमातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या वागणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी घडामोडींचा संकेत दिसत आहे, हे मात्र नक्की!

भक्तिरसात न्हालं फलटण शहरजिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. जिजामाला निंबाळकर म्हणाल्या – “वारकऱ्यांची सेवा हेच मोठं भाग्य”

0
भक्तिरसात न्हालं फलटण शहरजिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. जिजामाला निंबाळकर म्हणाल्या – “वारकऱ्यांची सेवा हेच मोठं भाग्य”

फलटण | 29 जून 2025
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं आहे. आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माऊलींच्या पालखीचे स्वागत करताना, वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहर आणि तालुक्यातील विविध संस्था, संघटना आणि नागरिक पुढे सरसावले आहेत.

फलटण शहरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, भोजन, अल्पोपहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या सेवाकार्यात सहभागी होताना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाल्या, “शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे, हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे.

या उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सचिन पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, अमोल सस्ते, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभा चेतन शिंदे, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे आणि युवा नेते अमित भोईटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, अॅड. जिजामाला निंबाळकर यांनी वारकऱ्यांबरोबर खेळांचा आनंदही घेतला, जे उपस्थितांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला.

फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त मॅग फिन्सर्व्ह कंपनीकडून पाच हजार भाविकांना अल्पोहार व पाण्याचे वाटप

0
फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त मॅग फिन्सर्व्ह कंपनीकडून पाच हजार भाविकांना अल्पोहार व पाण्याचे वाटप

फलटण :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथे मॅग फिन्सर्व्ह कंपनी लिमिटेड यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुमारे पाच हजार भाविकांना आलपोहार व पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली मॅग फिन्सर्व्ह कंपनी दरवर्षी प्रमाणे यंदाही सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करताना दिसली. “लोकांची सेवा करणे हाच आमचा मूलमंत्र” या तत्त्वाशी बांधील राहून कंपनीने भाविकांच्या आरोग्याची आणि सोयीसुविधांची विशेष काळजी घेतली.

या उपक्रमासाठी मॅग फिन्सर्व्ह कंपनीचे चेअरमन अनंता मोहटकर साहेब, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच कंपनीचे संपूर्ण टीमसह स्वयंसेवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पंढरीच्या वाटेवर निःस्वार्थ सेवा देणारा हा उपक्रम वारकऱ्यांकडून विशेष कौतुकास्पद ठरला.

यासारख्या सेवाभावी उपक्रमांमुळे पालखी सोहळ्याचे आयोजन अधिक सुकर व भाविकांसाठी समाधानी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ 200 टी-शर्ट वाटपाचा उपक्रम संपन्न

0
माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ 200 टी-शर्ट वाटपाचा उपक्रम संपन्न

फलटण, दि. 29 जून 2025 माजी नगरसेवक कै. गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ आज मंगळवार पेठ, भिमनगर फलटण येथे सामाजिक उपक्रम म्हणून 200 टी-शर्टचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्रशांत अहिवळे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये विजय येवले (जिल्हा सचिव, RPI), मधुकर काकडे (संघटक, पश्चिम महाराष्ट्र), संजय निकाळजे (जिल्हा सदस्य, सातारा), तेजस काकडे (उपाध्यक्ष, फलटण शहर), सुरेश भोसले सर (सेवानिवृत्त शिक्षक), रोहित भैय्या माने, निलेश भाऊ मोरे, विजय भाऊ मोरे, गणेश भोईटे, बापूराव भोसले, दादा मोरे, मनोज दांडोरे, दादा येवले, राजू शिंदे, राजू जाधव यांचा समावेश होता.

संजय निकाळजे यांनी यावेळी माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या समाजकार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन महादेव गायकवाड आप्पा (अध्यक्ष) यांनी केले.

या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

वारकऱ्यांचा सन्मान – स्वच्छतेतून! फलटण पालखी मुक्कामानंतर स्वच्छता मोहिमेला वेग

0
वारकऱ्यांचा सन्मान – स्वच्छतेतून! फलटण पालखी मुक्कामानंतर स्वच्छता मोहिमेला वेग

फलटण | प्रतिनिधी:- श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने काल (२८ जून) फलटणमध्ये मुक्काम केला होता. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या अध्यात्मिक सोहळ्यानंतर आज सकाळी (२९ जून) पालखीने पुढील प्रवासासाठी बरडकडे प्रस्थान केले.

पालखीच्या प्रस्थानानंतर काही तासांतच पालखी तळाची स्वच्छता मोहिम फलटण नगरपरिषद आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली. मुक्कामी झाल्यानंतर पालखी तळाभोवती मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला असतो. मात्र, तात्काळ राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

याचबरोबर पालखी मुक्कामी असलेल्या विमानतळावर दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठीही लवकरच नियमित वापराची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.

विशेष बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांच्या २५ कर्मचाऱ्यांची टीम स्वखुशीने फलटण पालखी तळावर सेवा देण्यासाठी दाखल झाली असून त्यांनीदेखील स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.


वारकरी भक्तीने येतात आणि प्रशासन जबाबदारीने स्वच्छता राखतं – हीच खरी पुण्याई!

माळेगाव साखर कारखाना निवडणूक विजय : अजित पवारांचा आभार मेळाव्यात फटकेबाज अंदाज

0
माळेगाव साखर कारखाना निवडणूक विजय : अजित पवारांचा आभार मेळाव्यात फटकेबाज अंदाज

बारामती |राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत शनिवारी झालेल्या आभार मेळाव्यात अजित पवारांनी भावनिक आठवणी, राजकीय किस्से आणि परखड फटकेबाजी करत विरोधकांना जोरदार सुनावलं.

“मी कुणाचा दुश्मन नाही, पण काहींना स्वतःची हवा वाटत होती, म्हणूनच हा खेळ फिस्कटला,” असं सांगत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांच्यावर नाव न घेता घणाघात केला.

अजित पवारांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी सुरू होती, निवडणूक नको होती, वाटाघाटींचा पर्याय शोधत होतो. पण, विरोधकांनी मुद्दाम वादंग उभं केल्याने आपल्याला मैदानात उतरावं लागलं. “मी सांगेल त्याच्या घरी गेलो, मला गरज होती म्हणून नम्रपणे विनंती केली,” असेही त्यांनी सांगितले.

“चुकीचं काही मी खपवून घेणार नाही. आता मी चेअरमन होणार आहे, पारदर्शक कारभार केला जाईल,” असा ठणाणा अजित पवारांनी यावेळी केला.

त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ताकीद दिली की, निवडणुकीत क्रॉस वोटिंग कुठे-कुठे झालं याचे आकडे आपल्या कडे आहेत. यापुढे कोणताही गोंधळ खपवून घेतला जाणार नाही. “मी सांगेन तेच काम करायचं, नाहीतर राजीनामा द्या, गोंधळ नको,” असा दम त्यांनी निवडून आलेल्या संचालकांना भरला.

“पाच वर्षे मीच चेअरमन राहणार आहे. कुणाच्या डोक्यात वेगळं काही असेल, तर ते आधीच काढून टाका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

अजित पवारांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर दिला जाईल, आणि माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती कारखान्यांत तोडणी व वाहतूक नीट केली जाईल. कामगारांनी कामात गडबड केली तर कारवाई होणारच. व्यापाऱ्यांनी संचालकांच्या घरी न जाता सभेत तक्रार मांडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

राजकीय पातळीवर केलेल्या कटु अनुभवांची आठवण करत, अजित पवारांनी सांगितले की, “1991 पासून मी कारखान्याच्या मतमोजणीत सहभागी होतो. पण यावेळी उमेदवार कुठे होते? असं कसं चालेल?” असा सवालही त्यांनी केला.

ही सभा केवळ एक आभार मेळावा नव्हती, तर पुढील पाच वर्षांच्या कारभाराचे स्पष्ट संकेत देणारी आणि विरोधकांना ठणकावून सांगणारी होती.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये भव्य स्वागत; विमानतळावर एक दिवसाचा मुक्काम

0
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये भव्य स्वागत; विमानतळावर एक दिवसाचा मुक्काम

फलटण | २९ जून:  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी ५ वाजता फलटण नगर परिषदेच्या हद्दीत जिंती नाका येथे पोहोचला. फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. निखिल मोरे यांच्या उपस्थितीत नगरवासीयांनी अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा फलटण विमानतळावर पोहोचून मुक्कामी विसावला.

पहाटे तरडगाव येथे सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींची नित्य पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६ वाजता पालखी सोहळा ऐतिहासिक फलटणनगरीकडे मार्गस्थ झाला. स्वच्छ व निरभ्र वातावरणात निघालेल्या या सोहळ्याने दत्तमंदिर काळज येथे विश्रांती घेतली. सकाळी ९ वाजता सुरवडी येथे पोहोचून न्याहारी व त्यानंतर निंभोरे ओढ्यावर नैवेद्य व भोजन घेतले.

सोहळ्याच्या वाटचालीत कधी तळपता सूर्य तर कधी ढगाळ वातावरण जाणवत होते. पावसाची अपेक्षा असलेल्या वारकऱ्यांना मात्र उकाड्याने दमछाक केली. तरीही मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’चा जयघोष करत वारकरी भक्तिभावाने मार्गक्रमण करत होते.

दुपारी वडजल येथे विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पालखी अश्वांसह मलठण, उंबरेश्वर चौक, संत हरीबाबा मंदिर मार्गे तीन बत्ती चौकातून कसबा पेठेत दाखल झाली. येथे बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाने पुष्पवृष्टी केली. नंतर नाईक-निंबाळकर परिवाराच्यावतीने श्रीराम मंदिर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

फलटण विमानतळावर १०० एकराच्या विस्तीर्ण जागेत मध्यभागी ज्ञानराजांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. सभोवताली मानकऱ्यांचे तंबू व भक्तांचा उत्साही जनसमुदाय दिसत आहे. टाळ, मृदुंगाच्या गजरात सायंकाळी ७ वाजता माऊली व तुकोबारायांची आरती पार पडली. यानंतर हा सोहळा ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण नगरीत एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला.

फलटण नगरपालिकेच्यावतीने सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी तुकाराम, बाळासाहेब व राजाभाऊ आरफळकर, चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे व इतर मानकऱ्यांचा फेटा व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

एन. रघुरामन यांचा कॉलम: डिजिटल जगाचा मुलांच्या पैशांचे व्यवस्थापन क्षमतेवर परिणाम?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  डिजिटल जगाचा मुलांच्या पैशांचे व्यवस्थापन क्षमतेवर परिणाम?


  • Marathi News
  • Opinion
  • N. Raghuram’s Column, How Does The Digital World Affect Children’s Money Management Skills?

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

मेरी-गो-राउंड आठवतो – एक मोठा गोल प्लॅटफॉर्म जो वर्तुळात फिरतो आणि त्यावर बसण्यासाठी जागा आणि प्राण्यांच्या आकृत्या (घोड्यांसारख्या) असतात ज्यावर मुले बसून सायकल चालवतात? मी शेवटचा तो १९६० च्या दशकात चालवला होता, तेव्हा त्याची किंमत ३ पैसे होती! हो, मला ५ पैशांचे नाणे देण्यात आले होते आणि एकदा सायकल चालवण्याची परवानगी देण्यात आली होती आणि २ पैसे वाचवले होते, पण राईडच्या मालकाने मला फक्त २ पैशात दुसऱ्या फेरीत सायकल चालवण्यास राजी केले आणि मी ती ऑफर स्वीकारली, जणू काही माझ्याकडे सौदेबाजीचे उत्तम कौशल्य आहे, पण माझ्या आईने मला २ पैशांच्या अनावश्यक खर्चाची शिक्षा दिली. वयाच्या ५ व्या वर्षी पैशांच्या व्यवस्थापनातील हा माझा पहिला धडा होता. नंतर अनेक प्रसंगी – मी माझी शाळा पास होईपर्यंत – मी घाऊक बाजारात सायकल चालवत असे आणि घरासाठी अनेक लहान खरेदी करून ५ ते २५ पैशांमधील काहीही वाचवत असे. त्यानंतर मला त्या शहाणपणाचे बक्षीस वाटून देण्यात आले.

या आठवड्यात मी माझ्या मोलकरणीला ही घटना सांगितली, ती माझ्या १० वर्षांच्या मुलीशी फोनवर बोलताना ऐकली. शाळेत जाणारी मुलगी फोनवर रडत होती आणि तिच्या आईला ड्रॉइंग वर्कबुक खरेदी करायला विसरल्याबद्दल दोष देत होती. आईने त्याची किंमत किती आहे, असे विचारले तेव्हा मुलगी म्हणाली २० रुपये. आईने तिला दुकानात जाऊन फोन करायला सांगितले जेणेकरून ती दुकानदाराला डिजिटल पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकेल. मुलगी दुकानात धावत गेली आणि दुकानदाराला फोन दिला, त्याने तिला सांगितले की, पुस्तकाची किंमत १८ रुपये आहे. मी विचार करत होते की जर मोलकरणीने मुलीला २० रुपये रोख दिले असते तर ती स्वतःवर २ रुपये खर्च करू शकली असती, पण मुलीने २ रुपयांचा पॉकेटमनी गमावला, ज्यामुळे तिला काही आनंद मिळू शकला असता. यामुळे मला असे वाटले की जेव्हा अर्ध्याहून अधिक पॉकेटमनी आणि मुलांच्या गरजांवरील खर्च डिजिटल होत आहेत, तेव्हा आपला दृष्टिकोन, शिक्षण आणि सवयी देखील त्यासोबत बदलत आहेत का? हे असेच दिसते. यासाठी माझे युक्तिवाद खालीलप्रमाणे आहेत.

आजही जेव्हा आपण पैसे हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला नाणी आणि नोटांचा विचार येतो. महिन्याच्या शेवटी, महिन्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या ५ रुपयांच्या खिशातील पैशातून माझ्याकडे नेहमीच किमान १ रुपये शिल्लक असायचे, पण आमच्या मुलांची भौतिक पैशांबद्दलची ओढ कमी झाली आहे आणि ते अजिबात सोबत ठेवत नाहीत, त्यामुळे ते महिनाभर त्यांच्या पालकांकडून किती कर्ज घेतले आहे हे देखील विसरले आहेत. पैसे घेऊन जाणारा मोबाइल फोन आता मुलाला पैशासारखा वाटत नाही आणि तो त्याला रोख रकमेपेक्षा फोन मानतो. म्हणून मला वाटते की त्यांची खर्च करण्याची वृत्ती उच्च असली तरी त्यांच्या बचतीच्या वृत्तीवर गंभीर परिणाम झाला आहे.

यूकेमध्ये ३ ते १८ वयोगटातील १,०६७ मुलांवर केलेल्या सर्वेक्षणातून आमच्या मुलांच्या बदलत्या सवयींवर प्रकाश पडतो. त्यात असे आढळून आले की, बहुतेक मुलांना दररोजच्या किराणा सामानाची किंमत माहीत नसते, परंतु त्यांना हे समजले आहे की योग्य पाठिंब्याने, डिजिटल-शिफ्टने अनेक संधी उघडल्या आहेत.

स्पष्टपणे, डिजिटल परिवर्तन मुलांना त्यांचे पैसे व्यवस्थापित करण्यासाठी आणि ते कसे खर्च करतात आणि कशासाठी बचत करतात याला प्राधान्य देण्यासाठी साधने आणि तंत्रज्ञान प्रदान करते. अनेक पालकांना हे लक्षात आले आहे की, ऑनलाइन ॲप्सद्वारे त्वरित खरेदी करण्याच्या युगात, त्यांच्या मुलांच्या खिशातील पैसे पुढील पगारापर्यंत टिकत नाहीत आणि ते त्या दरम्यान काही अतिरिक्त पैसे मागत राहतात.

फंडा असा की, डिजिटल व्यवहारांमुळे आपल्या मुलांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्याच्या समजुतीवर कसा परिणाम झाला आहे हे समजून घेण्याबाबत आपल्याला वेगवेगळी मते आढळतात. तुम्हाला काय वाटते?



Source link

तुम्ही दिवसा झोपताय, सावधान! दुपारी काढलेली डुलकी 7 भयंकर आजाराचे कारण, हे 4 लोक गमावू शकतात जीव

0
तुम्ही दिवसा झोपताय, सावधान! दुपारी काढलेली डुलकी 7 भयंकर आजाराचे कारण, हे 4 लोक गमावू शकतात जीव


Sleeping Or Napping In Day Is Good or Not : दुपारी भरपेट जेवणाचा आनंद घेऊन अनेकजण ताणून झोप काढतो. आपल्यापैकी काहीजण रोज दुपारी वामकुक्षी घेतात. पण आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. दिवसा झोपल्याने तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचू शकते. काय होऊ शकतं दुपारी झोपल्याने. 

अनेकदा आपण दुपारी किंवा दिवसा झोप काढतो. जरा आराम मिळावा, थकवा दूर व्हावा यासाठी ताणून झोपतो. पण अशी दिवसा झोप घेणं तुमचं आरोग्य बिघडवू शकतं. याबाबत केलेल्या एका संशोधनातून झोप उडवणारी माहिती समोर आलीये. दिवसा झोपेबाबत आंतरराष्ट्रीय परिषदेत एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात काही धक्कादायक दावे करण्यात आलेत. यानुसार जे दिवसा झोपतात. त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता वाढते.  याबाबत सांख्यिकी माहीतीही समोर आलीये. दिवसा झोप न घेणाऱ्यांच्या तुलनेत. दिवसा झोपणाऱ्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता 20 टक्के जास्त असते.

खरंतर भारतात दुपारी जेवणानंतर झोपणं, वामकुक्षी घेणं, सामान्य आहे. सहसा लोक जेवणानंतर 20 ते 30 मिनिटे झोप घेतात. पण या अहवालानुसार दिवसा झोपणे, हे प्रत्यक्षात आरोग्याशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. दिवसा झोपल्याने, हृदयाच्या ठोक्यांच्या नैसर्गिक गतीवर परिणाम होऊ शकतो. दिवसा जास्त झोपल्याने मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. दिवसाची झोप अल्झायमर सारख्या आजाराचे कारण बनू शकते. 

हल्ली सोशल मीडिया किंवा कामाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे दिवसा झोपण्याचं प्रमाण वाढतंय. रात्रीच्या झोपेची गरज दिवसाच्या झोपेतून भरून काढली जाते. पण ही झोप आता तुमच्या जीवाशी येऊ शकते. आपल्या झोपेच्या चक्रात मेलाटोनिन हे घटक महत्वाच असतं. 

– मेलाटोनिन हे शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे हार्मोन आहे
– हा एक ‘झोप-प्रेरित करणारा हार्मोन’ आहे, जो झोपेत महत्त्वाची भूमिका बजावतो
– मेलाटोनिन हा मेंदूतील पाइनल ग्रंथीचा स्राव आहे
– रात्रीच्या अंधारात, वेगाने मेलेटोनिन तयार होते, तेव्हा गाढ झोप यायला सुरूवात होते
– जे लोक दिवसा झोपतात, त्यांची या हार्मोनच्या निर्मितीची प्रक्रिया मंदावते 
– त्यामुळे अशा लोकांना रात्री झोप लागणं अडचणीचं होतं

दिवसा, दुपारी झोपेबाबत आता एक नवा अहवाल समोर आलाय. त्या अहवालानुसार मेंदुसंबंधित आजारासोबत इतरही आजारांना निमंत्रण मिळंतय. 

– दिवसा झोपल्याने मेंदुसंबंधी आजार येऊ शकतं
– नैराश्य, चिंता, गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणे, काहीही समजण्यात अडचण, तणाव 
– चिडचिडेपणा आणि वागण्यात बदल होण्याची शक्यता 
– शरीर थकलेले, सुस्त, आणि उत्साहाचा अभाव 
– दिवसा जास्त वेळ झोपल्याने रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो
– डोळ्यांचे आजार होऊ शकतात, दृष्टी कमकुवत होऊ शकते.

या लोकांनी दुपारी झोपू नये!

हाय कोलेस्ट्रॉलचे रुग्ण
लठ्ठ असलेले लोक
भरपूर फॅटयुक्त पदार्थ किंवा आहार खाल्ल्यावर
कफ प्रकृतीचे लोक

आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी झोप महत्वाची असते. पण दिवसा जास्त वेळ झोपल्याने मेंदुच्या गुंतागुंतीच्या आजारासोबत इतर आजारही उद्भवू शकतात. थकवा घालवण्यासाठी 15-20 मिनिटे झोप ठिक,,,पण तासन तास झोपणं तुमचं आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे दिवसा झोपणं आताच बंद करा आणि आजारांपासून दूर राहा. 





Source link