Thursday, July 9, 2026
Home Blog Page 193

वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

0
वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

अकलूज  १ जुलै:  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नीरा नदीकाठी एक दुर्दैवी घटना घडली. संतांची भक्ती आणि आस्था मनात घेऊन वारीत सहभागी झालेला एक १५ वर्षीय गोविंद कल्याण फोके नावाचा बाल वारकरी नदीत स्नानासाठी गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

गोविंद हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत वारीमध्ये सहभागी झाला होता. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी व अकलूजला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यात तो आंघोळीसाठी उतरला होता. मात्र अचानक आलेल्या प्रवाहाच्या वेगामुळे तो नदीच्या भोवऱ्यात अडकला आणि पाहता पाहता पाण्याच्या गर्भात समाविष्ट झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोरगाव येथील होमगार्ड जवान राहुल अशोक ठोंबरे यांनी आरडाओरड ऐकून क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. त्यांनी दोन वेळा गोविंदला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा जोर आणि प्रवाहाच्या अनियंत्रित वेगामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये होमगार्ड स्वतःही एका बाजूला फेकले गेले, तर गोविंद नदीच्या प्रवाहात वाहून गेला.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक अभिजीत कणसे यांनी सांगितले की, “सदर मुलगा अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस शोधकार्य करत आहेत.”

“माझा नातू माझ्यासमोर पाण्यात गेला…”
हे दृश्य गोविंदच्या आजीसाठी अत्यंत काळजाचा ठरले. “आमची ही दुसरी वारी होती. आंघोळीसाठी आम्ही दोघं नदीकाठी गेलो. तो पाण्यात गेला आणि अचानक त्याचा आवाजच बंद झाला. मी जोरात आरडाओरड केला. काहींनी उड्या मारल्या, पण अजून तो सापडलेला नाही,” असे सांगताना आजीचा आक्रोश गहिवरून टाकणारा होता.

वारीच्या भक्तिमय वातावरणात ही घटना काळजाला चटका लावणारी असून, यामुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील काही तास नीरा नदीच्या परिसरात शोधमोहीम राबवली जाणार आहे.

Tapeworm : ‘ही’ भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

0
Tapeworm : ‘ही’ भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य


Dangerous worm inside the cabbage: हिरव्या भाज्या किंवा काही फळभाज्यांमध्ये पावसाळ्यात खाल्ल्या जातात पण यामध्ये किड सहज सापडते. या वातावरणात कोबी चांगला येतो. त्यामुळे अनेक घरात कोबी खाल्ला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून कोबी खाल्ल्यावर त्यामधील किडे मेंदूत जात असल्याच सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे या भाजीमधील किडे शिजवल्यावरही मरत नाहीत. मेंदूत किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हटलं जातं. 

अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं, कोबीच्या भाजीला योग्य पद्धतीने शिजवलं नाही तर त्यामध्ये असलेले टेपवर्म म्हणजे किडे शरीरात शिरकाव करतात. हे किडे शरीरासाठी घातक असतात. असं म्हटलं जातं की, किडा खाण्यासोबत शरीरात शिरकाव करतो. पहिल्यांदा अन्नासोबत किडा पोटात जातो आणि मग तो आतड्यांमधून ब्लड फ्लोसोबत मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक लोक कोबी खाण्यापासून दूर राहतात. पण या गोष्टीमध्ये किती सत्य आहे याबाबत कुठेच खुलासा झालेला नाही. यावर पहिल्यांदाच डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. खरंच कोबीमध्ये किडे असतात का? हे किडे जीवघेणे असतात का? काय आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया. 

टेपवर्म म्हणजे काय? 

टेपवर्म एक चपटा आणि परजीवी किडा आहे. सामान्यपणे हा किडा वेगवेगळ्या जनांवरांमध्ये संक्रमित होतो. हा किडा त्यांच्या आतड्यांमध्ये मिळतो. हा किडा प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्ये देखील आढळतो. हे किडे आतड्यांमध्ये राहतात आणि शरीरातील पोषकतत्व खातात यामुळे त्या व्यक्तीला उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणे जाणवतात. 

मेंदूत किडे आहेत कसे ओळखाल? 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतड्यांमध्ये शिरल्यावर शरीरात विशेष बदल पाहायला मिळतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये देखील दिसतात. अशावेळी पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उल्टी, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

काय कराल? 

डॉक्टरांनी सांगितले की कोबी किंवा जंत असलेली कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवावी. जर असे केले नाही तर या अळ्या तुमच्या आतड्यांमध्ये जाऊ शकतात आणि तेथून तुमच्या मेंदूत जाऊ शकतात, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि झटके येऊ शकतात. याशिवाय भाज्या पूर्णपणे शिजवल्यानंतर खा.

भाज्यांमधील किडे रोखण्याचे मार्ग

कोबीतील जंत दूर ठेवण्यासाठी, त्यांच्यासोबत थाइम, सेज आणि पुदिना सारखी झाडे लावा. त्यांचा तीव्र वास कोबीच्या फुलपाखरे आणि त्यांच्या अळ्या दूर करू शकतो. कोबी शेतात हलक्या श्वास घेण्यायोग्य आवरणाने झाकून ठेवा. कडुलिंबाचे तेल एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, जे कोबीच्या जंतांना दूर करू शकते. मिरची आणि लसूण वापरून घरगुती स्प्रे बनवा, जे दोन्ही नैसर्गिक कीटकनाशके आहेत. कोबीच्या झाडांभोवती कुस्करलेल्या अंड्याचे कवच पसरवा. तीक्ष्ण कडा रांगणाऱ्या कीटकांना परावृत्त करतात.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

 





Source link

हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती

0


Heavy Rains in Himachal : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्यामुळे पर्यटनासाठी फिरण्यास गेलेले महाराष्ट्रातील काही पर्यटक या पूर परिस्थितीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अजूनही प्रशासनाकडून कोणताही या घटनेला दुजोरा दिला नसून यामधून कोणतीही पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सोमवारी (30 जून) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही इमारती कोसळल्या असून अनेक भागात भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झालेत. अशातच, पावसाळ्यापासून आतापर्यंत राज्यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी सकाळी हिमाचलच्या मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ भूस्खलन झाले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहने बोगद्यातही अडकली आहेत. सतर्कतेमुळे आज हिमाचलच्या 4 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत. 

दुसरीकडे, बिहारमधील भोजपूर, बक्सर आणि नालंदा येथे वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी रविवारी गया येथील इमामगंज येथील लागुरही धबधब्यात अचानक पाणी वाढले. जोरदार प्रवाहात 6 मुली वाहून गेल्या. स्थानिक लोकांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस पडेल. उत्तराखंड आणि झारखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश-राजस्थानसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर 17 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

शिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर 5 ठिकाणी भूस्खलन

दरम्यान, सततच्या पावसामुळे शिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामुळे वाहतूक एकाच लेनमध्ये वळवण्यात आली, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. सोलन जिल्ह्यातील कोटी जवळील चक्की मोर येथील महामार्गावरही अशीच परिस्थिती होती, जिथेही रस्त्यावर दगड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना एकाच लेनमध्ये हळू गाडी चालवावी लागली. सोलनच्या डेल्गी येथे भूस्खलनामुळे सुबाथू-वाकनाघाट रस्ता देखील बंद करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासन रस्ता पूर्ववत करण्यात व्यस्त आहे. सोलनचे उपायुक्त मनमोहन शर्मा यांनी चक्की मोडची पाहणी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे

0
हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे


Himachal Pradehs Cloudburst : (Monsoon) मान्सूननं सध्या संपूर्ण देश व्यापला असला तरीही याच मान्सूननं (Himachal Pradesh Weather Update) हिमाचल प्रदेशात मात्र हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये पावसामुळं नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. तर, आता याच राज्यातील मंडी इथं ढगफुटीमुळं नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. 

(Himachal Pradesh Mandi Cloudburst) मंडी येथील करसोग इथं झालेल्या ढगफुटीनंतर या भागात प्रचंड पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला. नजर जाईल तिथं फक्त आणि फक्त विध्वंसच दिसेल असं चित्र तिथं पाहायला मिळालं. कससोगमधील पंजराच आणि मेगली या गावांचं या ढगफुटीमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असून, तेथील अनेक घरं नजरेदेखत अतिप्रचंड वेगानं आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली, तर काही वाहनं आणि रस्तेसुद्धा या पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. 

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

हिमाचलमधील मंडी इथं ज्या भागात ढगफुटी झाली तिथं सध्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत असून, या नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनानं प्रभावित क्षेत्रामध्ये शक्य त्या सर्व मार्गांनी मदतकार्य पोहोचवण्यास सुरूवात केली असून, जोखमीच्या भागांमध्ये बचावकार्यसुद्धा सुरू केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला असून त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. काही गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला असून, काही भागांचा विजपुरवठासुद्धा खंडित झाला आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये हिमाचलमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवल्यानं येथील प्रशासन सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीचत हिमाचलच्याच कुल्लू आणि कांगडा इथंही ढगफुटी झाल्यानं अचानक नद्यांची पाणीपातळी वाढली आणि वाटेल येणारी प्रत्येक गोष्ट हे नदीपात्र गिळंकृत करताना दिसलं. ज्यानंतर या भागांमधून 10 जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं. सध्याच्या घडीला प्रशासनसुद्धा हिमाचलमधील हवामान आणि पर्जन्यमानावर लक्ष ठेवत असून, या राज्यातील पर्यटकांनासुद्धा सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 





Source link

वारीच्या वाटेवर अत्याचार! पुणे-सोलापूर महामार्गावर संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दीड लाखांची लूट

0
वारीच्या वाटेवर अत्याचार! पुणे-सोलापूर महामार्गावर संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दीड लाखांची लूट

दौंड, जि. पुणे | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या वाटेत अंधार धावून आला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे सोमवारी पहाटे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेत, दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी कुटुंबाला अडवून लुटले आणि त्याचवेळी वाहनात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब चारचाकी वाहनाने पंढरपूर वारीसाठी निघाले होते. वाटेत स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबले असताना, पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चहा घेऊन पुन्हा वाहनात बसताच दोन दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत, “जिवंत राहायचं असेल तर काहीही विरोध करू नका,” अशी धमकी दिली. यावेळी महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेण्यात आले.

लुटीनंतर, त्यापैकी एकाने वाहनात बसलेल्या एका अल्पवयीन  मुलीला खेचून काही अंतरावर झुडपात नेले

  “फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; सामाजिक बांधिलकी”

0
  “फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; सामाजिक बांधिलकी”

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटणमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी फलटण तालुका व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन चौक येथे पार पडलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना युवा नेते संदीप चोरमले म्हणाले, “राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेशजी पांडे यांच्या संकल्पनेतून या पालखी मार्गावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून, तब्बल दहा हजार रुपयांच्या वैद्यकीय तपासण्या वारकऱ्यांसाठी मोफत केल्या जात आहेत.”

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अद्यावत वैद्यकीय सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे हालचाल, आरोग्य व अनुभव जाणून घेतले.

सदर कार्यक्रमास स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, सद्गुरु हरिबुवा पतसंस्थेचे तेजसिंह भोसले, भाजपचे युवा नेते अमोल सस्ते, लायन्स क्लब गोल्डन सेलच्या अध्यक्षा स्वातीताई चोरमले, तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, राजेंद्र निंबाळकर, रियाजभाई इनामदार, अजिंक्य बेडके, उषाताई राऊत आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या यशस्वी उपक्रमासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चोरमले परिवाराने विशेष मेहनत घेतली.

ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची मोठी तयारी, पाकिस्तान-चीनच्या कानाकोपऱ्यात ठेवणार नजर

0
ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची मोठी तयारी, पाकिस्तान-चीनच्या कानाकोपऱ्यात ठेवणार नजर


ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने मोठी तयारी सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे तर ५२ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे सर्व उपग्रह पूर्णपणे लष्करासाठी काम करतील. यामुळे पाकिस्तानसह शत्रू देशांच्या भूभागावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय लष्करासाठी खास स्पेस डॉक्ट्रिन अंतिम करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने सॅटेलाईट सिस्टिमच्या मदतीने पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर यशस्वी नजर ठेवली होती. यामुळे लष्कराला अचूक लक्ष्य निश्चित करण्यात मदत झाली.



Source link

पुण्याहून युरोपला थेट विमानसेवा लवकरच : मुरलीधर मोहोळ

0
पुण्याहून युरोपला थेट विमानसेवा लवकरच : मुरलीधर मोहोळ


युरोपसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी थेट विमानसेवा हवी असलेल्या पुणेकरांसाठी दिलासा मिळाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धावपट्टीच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली आहे. सध्या पुणे विमानतळावर पायाभूत सुविधा, विशेषत: धावपट्टीच्या लांबीमुळे युरोपियन देशांसाठी थेट उड्डाणे होत नाहीत.



Source link

पालखी सोहळ्यानंतर फलटण नगरपालिकेचे प्रशासन ठरले आदर्श!

0
पालखी सोहळ्यानंतर फलटण नगरपालिकेचे प्रशासन ठरले आदर्श!

फलटण |श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानंतर फलटण शहरात नगरपालिकेने केलेल्या कामकाजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वारकऱ्यांच्या प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांत पालखी तळाची संपूर्ण स्वच्छता करून फलटण नगरपरिषदेने प्रशासनाची कार्यक्षमता सिद्ध केली. मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मोहिमेमुळे कचरा, दुर्गंधी यांसारख्या त्रासांना यशस्वी आळा घालण्यात आला.

पालखीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. शहरात विविध 13 वॉटर पॉईंट्सवरून सुमारे 1000 वारकऱ्यांना अंदाजे 10,000 लिटर शुद्ध पाणी पुरवले गेले. वैद्यकीय मदतीसाठी पंचायत समिती, आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून उत्कृष्ट सेवा देण्यात आली. 1992 जर्मन टेन्टवर 1240 आणि सावता माळी मंदिर येथे 1645 वारकऱ्यांनी वैद्यकीय सुविधा घेतल्या.

याशिवाय, यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधील जर्मन हँगरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 150 फिजिओथेरपी विद्यार्थ्यांनी मसाज सेवा दिली, ज्याचा 4000 हून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला.

स्वच्छतेसाठी नगरपरिषदेच्या 70 कर्मचाऱ्यांबरोबरच खाजगी तत्वावरील 25, कराड, मलकापूर, महाबळेश्वर येथील 100, कोल्हापूर जिल्हा आणि कागल येथील 25 कर्मचारी, तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या 150 विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून कचरा संकलन मोठ्या प्रमाणात पार पडले. पाच ट्रॅक्टर ट्रॉली, दोन जेसीबी आणि १६ घंटा गाड्यांच्या सहाय्याने सुमारे ८ टन कचरा संकलित करण्यात आला.

फलटण नगरपालिकेच्या नियोजनबद्ध व कार्यक्षम व्यवस्थेमुळे या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे यश अधिक सशक्त झाले आहे. अशा प्रकारच्या नियोजनाची पुढील काळातही पुनरावृत्ती व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

दहा हजार वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सेवा — फलटण तालुका वारकरी संघटनेचा उपक्रम

0
दहा हजार वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सेवा — फलटण तालुका वारकरी संघटनेचा उपक्रम

फलटण |श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त, फलटण तालुका वारकरी संघटना आणि लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलटण (ता. फलटण) यांच्या वतीने भव्य अल्पोपहार दान सेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तब्बल दहा हजार वारकऱ्यांना अल्पोपहार पुरविण्यात आला.

या सेवाभावी कार्याचे उद्घाटन सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, सेवा आणि भक्तिभावाला समर्पित असा हा उपक्रम वारकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि समाधानकारक अनुभव देणारा ठरला.