Saturday, September 12, 2026
Homeसातारा  "फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; सामाजिक बांधिलकी"

  “फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; सामाजिक बांधिलकी”

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटणमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी फलटण तालुका व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन चौक येथे पार पडलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना युवा नेते संदीप चोरमले म्हणाले, “राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेशजी पांडे यांच्या संकल्पनेतून या पालखी मार्गावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून, तब्बल दहा हजार रुपयांच्या वैद्यकीय तपासण्या वारकऱ्यांसाठी मोफत केल्या जात आहेत.”

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अद्यावत वैद्यकीय सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे हालचाल, आरोग्य व अनुभव जाणून घेतले.

सदर कार्यक्रमास स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, सद्गुरु हरिबुवा पतसंस्थेचे तेजसिंह भोसले, भाजपचे युवा नेते अमोल सस्ते, लायन्स क्लब गोल्डन सेलच्या अध्यक्षा स्वातीताई चोरमले, तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, राजेंद्र निंबाळकर, रियाजभाई इनामदार, अजिंक्य बेडके, उषाताई राऊत आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या यशस्वी उपक्रमासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चोरमले परिवाराने विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments