Thursday, July 9, 2026
Home Blog Page 192

कामगारांच्या सन्मानार्थ सामाजिक उपक्रम… घरगुती भांडी वाटप कार्यक्रम उत्साहात पार

0
कामगारांच्या सन्मानार्थ सामाजिक उपक्रम… घरगुती भांडी वाटप कार्यक्रम उत्साहात पार

फलटण | दि. २ जुलै २०२५ – घरगुती बांधकाम क्षेत्रात दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या कामगारांचा सन्मान राखत आज एक अनोखा सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत कामगारांना त्यांच्या घरेलू उपयोगासाठी भांडी सेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित कामगार वर्गाने दिलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.

या वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील, श्रीमंत संजीव नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, व ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमादरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, “घरेलू बांधकाम कामगार हा समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टाचे भान ठेवत ही मदत करण्यात आली आहे. भविष्यात इतरही कामगार घटकांपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमात C.I.T.U चे आयाझ आतार, कल्पना मोहीते (समता घेरुलू कामगार संघटना), शांताराम कारंडे (फलटण बांधकाम कामगार संघटना) यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे समाजातील श्रमिक वर्गात विश्वास निर्माण होतो. सामाजिक जाणीवा जागृत ठेवून अशा उपक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Delhi High Court Directs DCGI on Weight Loss Drug Approval Plea, Seeks Stakeholder Consultation

0
Delhi High Court Directs DCGI on Weight Loss Drug Approval Plea, Seeks Stakeholder Consultation



Delhi High Court Directs DCGI on Weight Loss Drug Approval Plea, Seeks Stakeholder Consultation | वजन कमी करणाऱ्या औषधांशी संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; खंडपीठ म्हणाले, “उपस्थित केलेल्या चिंता…”





Source link

प्रत्येक पुरूषाने आजपासूनच अंगवळणी लावा ‘या’ 5 सवयी; म्हातारपणातही दिसेल फिटनेस!

0
प्रत्येक पुरूषाने आजपासूनच अंगवळणी लावा ‘या’ 5 सवयी; म्हातारपणातही दिसेल फिटनेस!


Mens Health Habits: आजकाल नोकरी करणे सोपे नाही. पुरुष असो वा महिला, सर्वांनाच नोकरीत अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. वाढत्या स्पर्धेमध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप कठीण होते. अनेक वेळा लोक प्रत्येक काम पूर्ण करण्याच्या घाईत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 30-40 वयोगटातील पुरुषांमध्ये हे जास्त दिसून येते.समस्या येईपर्यंत सर्व काही ठीक आहे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे या लोकांना वाटते. 

पण चिडचिडेपणा, थकवा, अशक्तपणा, वजन वाढणे, ताणतणाव याकडे लक्ष न देणे हे आजारांचे लक्षण असू शकते. म्हणून जर शरीर असे संकेत देत असेल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची वेळ आली आहे, हे लक्षात यायला हवे. अशा काही सवयी तुम्ही दिनचर्येचा भाग बनवल्या पाहिजेत जेणेकरून म्हातारपणातही तुमचा फिटनेस टिकून राहील.

पुरुषांसाठी 5 निरोगी सवयी

योगा करा 

जेव्हा पुरुष 30 आणि 40 वर्षांचे होतात तेव्हा त्यांना कडकपणा, स्नायूंचा ताण आणि खराब आसन यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी तुम्ही दररोज काही काळ योगा केला पाहिजे. योगा सांध्याचे आरोग्य वाढवते आणि शरीरात लवचिकता आणते. योगा तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. तुम्ही प्राणायाम, अनुलोम विलोम, सूर्यनमस्कार असे योगाभ्यास करावेत. यामुळे झोप, वेदना, शरीरातील कडकपणाची समस्या दूर होईल.

रेजिस्टेंस ट्रेनिंग 

30 वर्षांनंतर स्नायूंचे वस्तुमान कमी होऊ लागते. ज्यामुळे वेदना, मंद चयापचय, कमी ऊर्जा आणि अनेक समस्या वाढतात. अशा परिस्थितीत, तुम्ही रेजिस्टेंस ट्रेनिंग घेतले पाहिजे. तुम्ही वजन उचलणे, प्रतिकार बँड, शरीराचे वजन, पुशअप, स्क्वॅट्स असे व्यायाम करावेत. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी चांगली राहते. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. टाइप 2 मधुमेह, हृदयविकाराचा झटका, नैराश्य आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

स्मरणशक्ती वाढवण्याचे व्यायाम 

जेव्हा तुम्ही 40 वर्षांचे असता तेव्हा स्मरणशक्ती, मूड, लक्ष केंद्रित करणे, समस्या सोडवणे आणि भावनिक लवचिकता, विचार करण्याची क्षमता प्रभावित होऊ लागते. यासाठी तुम्ही नवीन भाषा शिकणे, एखादे वाद्य वाजवणे शिकणे किंवा कोडी सोडवणे यासारखे मानसिक खेळ खेळणे महत्वाचे आहे. ध्यान आणि इतर मानसिक व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि चिंता आणि नैराश्य कमी होते.

आहारात बदल  

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी, या वयात आहारात बदल करणे महत्वाचे आहे. तुमच्या आहारात काजू, बिया, पातळ मांस, निरोगी चरबी आणि अनेक प्रकारची फळे आणि भाज्या समाविष्ट करा. हे पदार्थ तुमच्या शरीराला रोगांशी लढण्यासाठी, स्वतःला बरे करण्यासाठी आणि तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देतात.

ध्यान करा 

वयाच्या 30-40 वर्षांनंतर तुम्ही दररोज शांत ठिकाणी बसून काही काळ मानसिक व्यायाम करावेत. ध्यान केल्याने कोर्टिसोलची पातळी कमी होण्यास, जळजळ कमी होण्यास आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. तुम्ही काही काळ आत्मचिंतन, जप किंवा प्रार्थना यासारखे काही आध्यात्मिक व्यायाम देखील केले पाहिजेत. यामुळे तुमचे हृदय आणि मन दोन्ही मजबूत होते.





Source link

अकलूज : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत; सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण उत्साहात पार

0
अकलूज : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत; सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण उत्साहात पार

अकलूज, ता. १ जुलै — आज अकलूज येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात आले. वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले. टाळ-मृदुंगांच्या गजरात, अभंगवाणीच्या साक्षीने सर्व परिसर वारीमय झाला होता.

संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज नगरीत दाखल होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत, आरती ओवाळून स्वागत केले. हजारो वारकरी, महिला-पुरुष, लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील भक्त मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

गोल रिंगणाच्या वेळी वारकऱ्यांनी ताल धरून फुगडी खेळली, तर विविध दिंड्यांनी पारंपरिक वेशभूषा आणि पताका फडकवत सहभाग नोंदवला. रिंगणाचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते.

या वेळी अकलूज ग्रामस्थांसोबतच मोहिते-पाटील कुटुंबीयांनीही मोठ्या श्रद्धेने आणि सेवाभावाने सहभाग घेतला. मोहिते पाटील परिवारातर्फे पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी विविध ठिकाणी सेवा केंद्रे, अल्पोपहार व्यवस्था, तसेच वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुढचा मुक्काम हा नियोजित स्थळी आनंदमय वातावरणात पार पडणार असून अकलूजच्या स्वागत सोहळ्याने वारकऱ्यांच्या मनात आनंद आणि समाधानाचे क्षण रुजवले आहेत.

कुस्तीचा गड पुन्हा गाजणार! पंढरपुरात ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा

0
कुस्तीचा गड पुन्हा गाजणार! पंढरपुरात ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा

पंढरपूर, ४ जुलै २०२५ : वारकरी परंपरेतील ताकद आणि तंदुरुस्ती यांचं अद्वितीय दर्शन घडवणारी ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ शुक्रवार, ४ जुलै रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पंढरपूरच्या वाखरी येथील पालखी तळाशेजारील विश्वशांती गुरुकुल परिसरात पार पडणार आहे.

ही भव्य स्पर्धा विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

कुस्ती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे:

या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी हिंद केसरी दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, पै. विष्णूतात्या जोशीलकर तसेच आमदार समाधान आवताडे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे आणि माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी वारकरी मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

स्पर्धा नोंदणी आणि गटविभागणी:

  • स्पर्धेसाठी नोंदणी ४ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वारावर होईल.
  • आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र आवश्यक.
  • संपर्क: श्री. विलास कथुरे – ९८५०२ ११४०४, डॉ. वैभव वाघ – ८८८८१ १८४००

विशेष आकर्षण – ज्येष्ठ मल्लांची शौर्यपरीक्षा:

या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे योगमहर्षी स्व. शेलारमामा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घेतली जाणारी ७० वर्षावरील मल्लांची खास स्पर्धा! यातील विजेत्याला ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

  • १६ ते २५ वयोगट – कुमार वारकरी कुस्ती महावीर
  • ५६ ते ६५ वयोगट – वारकरी कुस्ती महावीर
  • ७० वर्षांवरील मल्ल – ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर

या विजेत्यांना मानाचा फेटा, माऊलींची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सांस्कृतिक पर्वणी – भारूड व गवळणी स्पर्धा

कुस्ती स्पर्धेनंतर रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, संत एकनाथ महाराजांच्या प्रसिद्ध नाथांचे भारूड व गवळणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी ही एक आत्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.


वारकरी परंपरेचा अभिमान, मल्लकुस्तीचा दांडगा उत्सव आणि संतकृतींचा सांस्कृतिक सागर—या सगळ्याचा संगम ४ जुलैला पंढरपूरात अनुभवायला विसरू नका!

पांथस्थच्या पुढाकारातून श्रीलंका व सांची अभ्यास दौऱ्यांचे यशस्वी आयोजन; पुन्हा दोन महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्यांची घोषणा

0
पांथस्थच्या पुढाकारातून श्रीलंका व सांची अभ्यास दौऱ्यांचे यशस्वी आयोजन; पुन्हा दोन महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्यांची घोषणा

सूरज रतन जगताप यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभलेली पांथस्थ संस्था बौद्ध वारशाच्या अभ्यासासाठी सातत्याने अभ्यास दौरे आयोजित करत आहे.

पांथस्थच्या माध्यमातून १० मे ते १६ मे दरम्यान ३० सदस्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता. वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात सहभागी सदस्यांना बौद्ध संस्कृती, धम्म स्थळे आणि ऐतिहासिक वारशाचा सखोल परिचय मिळाला.

यानंतर २७ जून ते ३० जून दरम्यान ५० सदस्यांना घेऊन सांची येथे राष्ट्रीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्येही बौद्ध शिल्प, स्तूप, धम्मचक्र प्रবর্তन स्थळे यांचा अभ्यास करण्यात आला.

या दोन्ही यशस्वी आयोजनांनंतर पांथस्थ संस्थेने पुन्हा दोन अभ्यास दौऱ्यांची घोषणा केली आहे:

🔹 श्रीलंका आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा
दिनांक: २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५
लिंक: श्रीलंका अभ्यास दौरा WhatsApp गट https://chat.whatsapp.com /B6DsgMjWtCYFSkEx6Nca0f ?mode=r_c

🔹 सांची राष्ट्रीय अभ्यास दौरा
दिनांक: २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५
विषेष आकर्षण: या दौऱ्यात सहभागी सदस्यांना सारीपुत्त व महामोग्गलायन यांच्या पवित्र शारीरिक धातूंचे दर्शन घेता येणार आहे.
लिंक: सांची अभ्यास दौरा WhatsApp गट   https://chat.whatsapp.com /CNjLhOVsr30Cw0Dkhulwjx ?mode=r_c

ज्यांना या अभ्यास दौऱ्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन पांथस्थ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिस्तीच्या बळावर श्रीमंत मालोजीराजे शेती संकुलाची यशस्वी वाटचाल!

0
शिस्तीच्या बळावर श्रीमंत मालोजीराजे शेती संकुलाची यशस्वी वाटचाल!

फलटण, दि. २९ : शिस्तीच्या भक्कम पायाावर उभा असलेला श्रीमंत मालोजीराजे शेती संकुल आज राज्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. केवळ माध्यमिक शेती विद्यालयाने सुरू झालेली ही शैक्षणिक वाटचाल आज उद्यानविद्या आणि कृषी महाविद्यालयाच्या रूपाने विस्तारित झाली आहे, याचे श्रेय प्राचार्य अरविंद निकम यांच्या नेतृत्वातील शिस्तप्रिय आणि गुणवत्ता आधारित व्यवस्थापनाला असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य संजय वेदपाठक, उपशिक्षक वसंत यादव आणि प्रयोगशाळा सहाय्यक जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक चव्हाण होते.

या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, रणजीत निंबाळकर, प्राचार्य यु.डी. चव्हाण, एस.डी. निंबाळकर, नितीन भोसले, सुरेशराव तावरे, महादेवराव माने, निलेश कापसे, वामनराव यादव, पत्रकार अरविंदभाई मेहता, सुभाष भांबुरे, दादासाहेब चोरमले, शंकरराव बर्गे, प्रगती कापसे, शाम कापसे, राजेंद्र कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात सातत्याने गुणवत्ता टिकवली जात असून त्याचे परिणाम म्हणूनच या संकुलातील विद्यार्थी राज्यभर विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यांनी प्राचार्य वेदपाठक, उपशिक्षक यादव आणि भाऊ कापसे यांच्यासह सर्व सेवकांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “भाऊ कापसे यांनी शैक्षणिक संस्थेत तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्य करताना संयम, शिस्त आणि जनसेवा यांचे मूर्तिमंत उदाहरण दिले. त्यांचा अनुभव संस्थेसाठी भविष्यातही उपयुक्त ठरेल.”

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे कार्य केवळ पुस्तकी शिक्षणापुरते न ठेवता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे असल्याचे अधोरेखित केले. चांगल्या कामाचे श्रेय संस्थेला आणि कुटुंबालाही समाधान देते, असे सांगत त्यांनी सेवापूर्ती झालेल्या तीनही व्यक्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य अरविंद निकम यांनी तीनही कर्मचाऱ्यांचे कार्य गौरवत त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्था यापुढेही घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी उपप्राचार्य काळे सर यांनी स्वागत, तर दिवसे सर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. राजश्री शिंदे व शिल्पा इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.

‘वारी’ जीवनानुभवाची प्रेरक वाटचाल: पाच दशकांपासून हरिनामाचा जागर, जाणून घ्या सोनुने गुरुजी बाबांचे अविरत कार्य

0
‘वारी’ जीवनानुभवाची प्रेरक वाटचाल:  पाच दशकांपासून हरिनामाचा जागर, जाणून घ्या सोनुने गुरुजी बाबांचे अविरत कार्य


  • Marathi News
  • Opinion
  • Pandharpur Wari Journey Update; Sonune Guruji’s Lifelong Warkari Mission Honoured

आरती सुहास सदाव्रते12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शैक्षणिक क्षेत्रासह वारकरी संप्रदायाची जीवनमूल्य रुजविण्यासाठी पाच दशकांपासून अविरत हरिनामाचा जागर मांडणारे जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील हभप गुरुवर्य सोनुने गुरुजी कृतीशील आदर्शाचे दीपस्तंभ आहेत. जाफराबाद तालुक्यातील 35 गावातील शेकडो शिष्य परिवारांनी ‘गुरुजी बाबां’चा अमृत जीवनाचा अमृत महोत्सव सोहळा मे महिन्यात साजरा केला. या सोहळ्यानिमित्त ‘वारी’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जालन्यातील सुयश प्रकाशनने हा विशेषांक तयार केला आहे. समीक्षक डॉ. कैलास इंगळे, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. सुहास सदाव्रते यांनी या विशेषांकाचे संपादन केले आहे.

हभप सोनुने गुरुजी यांनी स्थापन केलेली ‘वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान’ अविरत कार्य करीत आहे. वारी, वारकरी यासह पंढरपूर येथील विठू माऊली, पैठण येथील नाथ महाराज, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली, देहू येथील जगतगुरू तुकोबाराय यांना प्रमाण मानत आषाढी- कार्तिकीला दिंडीच्या माध्यमातून लोकजागराचे कार्य करणारे हभप साळूबा महाराज सोनुने अर्थात ‘गुरुजी बाबा’ यांच्या चरणी नतमस्तक व्हावेच लागते. शिक्षकीपेक्षा सांभाळत जवळपास पाच दशके वारकरी संप्रदायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोनुने गुरुजींनी आयुष्य समर्पित केले आहे. वारकरी संप्रदायाची जीवनमूल्य रुजवण करीत 12 वर्षांपासून ‘चतुर्थी जागर उपक्रम’ प्रेरणादायी ठरलेला आहे. पंढरपूर, पैठण, आळंदी, देहू याठिकाणी पायी दिंडी प्रवास 15 वर्षांपासून अविरत सुरूच आहे.

गुरुजींच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त अविस्मरणीय अनुभव ठरावा म्हणून ‘वारी’ या विशेषांकाचे निमित्त शोधले आहे. एकूणच हभप सोनुनेचा जीवनपट, वारी-दिंडीचे आयोजन आणि वारकरी संप्रदाय जीवनमूल्य वर्तमानात अपरिहार्य ठरतात या हेतूने ‘वारी’चे प्रयोजन आहे. विशेषांकात ‘वारी महाराष्ट्राचा महासोहळा’ या विषयावर सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या अभ्यासपूर्ण लेखासह ‘वारी’च्या इतर लेख विषय व निवडीत प्रमुख मार्गदर्शक भूमिका प्रेरणा देणारी आहे. विशेषांकात गुरुवर्य प्रा. बसवराज कोरे यांनी हभप सोनुने गुरुजींची घेतलेली “माझी सर्व चिंता आहे विठोबासी ” या मुलाखतीतून गुरुजींचे बालविश्व ते आयुष्याच्या विविध वळणांवर आलेले सुख दुःखाचे प्रसंग आणि आठवणी शब्दबद्ध करीत प्रा. बसवराज कोरे यांनी प्रवास उलगडून दाखविला आहे.

वारी विशेषांकात ‘वारीचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू’, ‘वारी एक आनंदयात्रा’, वारीच्या वाटचालीतील समान दुवे, मराठवाड्यातील वारी परंपरा’, यासह आधुनिक मराठी साहित्यातील वारीदर्शन’, संतांच्या अभंगातील वारी’ अशा विविध विषयांवर मान्यवर लेखक, कीर्तनकार, अभ्यासकांचे लेख आहेत. वारी विशेषांकाच्या प्रवासात सुनील वायाळ, अनिरुद्ध महाराज जगताप, संदेश भंडारे, सचिन परब, डॉ. रवींद्र बेंबरे यांच्यासह मान्यवरांच्या लेखनाने ‘वारी’ विशेषांक समृद्ध होताना दिसतो. वारीच्या एकूणच प्रवासात गजानन पोफळे, भगवानराव गायकवाड, विठ्ठल चव्हाण, अंबादास महाराज भालके, अनिल देव्हडे, अनिल म्हस्के यांचा सहप्रवास जिव्हाळ्याचा आहे.

‘वारी ‘विशेषांक निर्मितीत ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद धोडपकर यांचे सहकार्य नसते तर वाट खडतर होती. कवी, पत्रकार, अभिनेते विनोद जैतमहाल यांनी ‘वारी’चे केलेले मुखपृष्ठ, मागील मुख्य पानावरील ‘गुरू पाठीराखा पावलोपावली, भेटवी माऊली पंढरीची’ या ओळीतून ‘वारी’ विशेषांकाचे अंतरंग अधोरेखित होते. संभाजीनगर येथील काव्या क्रिएशनने रेखाटलेली मुखपृष्ठावरील दिंडी आणि विठ्ठलाची प्रतिमा अद्वैत आनंद देणारी वाटते.

विशेषांक ‘वारीत’ माणूस घडवणारा संस्कार, ‘मानवतावादी विचार,’विठ्ठलभक्तीचे गारुड, संत संगतीचे काय सांगू सुख, ‘माझी वारी, माझा संसार, नीतीमान जीवनाचा आग्रह’ अशा विषयावर हभप अभय जगताप, डॉ. सर्जेराव जिगे, शालीकराम म्हस्के, कलावती साळुंके, डॉ. एकनाथ शिंदे यांनी लेखातून ‘वारी’चे वैभव सिद्ध केले आहे. वारी विशेषांकात खास म्हणून बाब अशी, की सौ. सुमन सोनुने यांनी सहजीवनात वारकरी जीवनमूल्याची जोपासना कशी झाले, असे अनुभव मांडले आहेत. हभप सोनुने गुरुजींची कन्या ज्योती आढाव, स्नुषा मनीषा तसेच नातू विवेक (हरी) यांनी व्यक्त केलेल्या भावना वारीची उंची वाढविणाऱ्या आहेत.

जवळपास पाच दशके वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेवून आयुष्य समर्पित करणारे हभप सोनुने गुरुजी होय. आजच्या युवापिढीला हा वसा आणि वारसा याची मनोमन जाणीव होवो, यासाठी विविध विषयांवरील लेख मागविण्यात आले होते. एकूणच ‘वारी’चे यश हे हजारो वारकऱ्यांच्या मनातील हरिनामाच्या अविरत जागरासाठी आहे.

(लेखिका सुयश प्रकाशनच्या सर्वेसर्वा आहेत.)



Source link

वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

0
वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

अकलूज  १ जुलै:  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नीरा नदीकाठी एक दुर्दैवी घटना घडली. संतांची भक्ती आणि आस्था मनात घेऊन वारीत सहभागी झालेला एक १५ वर्षीय गोविंद कल्याण फोके नावाचा बाल वारकरी नदीत स्नानासाठी गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

गोविंद हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत वारीमध्ये सहभागी झाला होता. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी व अकलूजला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यात तो आंघोळीसाठी उतरला होता. मात्र अचानक आलेल्या प्रवाहाच्या वेगामुळे तो नदीच्या भोवऱ्यात अडकला आणि पाहता पाहता पाण्याच्या गर्भात समाविष्ट झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोरगाव येथील होमगार्ड जवान राहुल अशोक ठोंबरे यांनी आरडाओरड ऐकून क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. त्यांनी दोन वेळा गोविंदला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा जोर आणि प्रवाहाच्या अनियंत्रित वेगामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये होमगार्ड स्वतःही एका बाजूला फेकले गेले, तर गोविंद नदीच्या प्रवाहात वाहून गेला.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक अभिजीत कणसे यांनी सांगितले की, “सदर मुलगा अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस शोधकार्य करत आहेत.”

“माझा नातू माझ्यासमोर पाण्यात गेला…”
हे दृश्य गोविंदच्या आजीसाठी अत्यंत काळजाचा ठरले. “आमची ही दुसरी वारी होती. आंघोळीसाठी आम्ही दोघं नदीकाठी गेलो. तो पाण्यात गेला आणि अचानक त्याचा आवाजच बंद झाला. मी जोरात आरडाओरड केला. काहींनी उड्या मारल्या, पण अजून तो सापडलेला नाही,” असे सांगताना आजीचा आक्रोश गहिवरून टाकणारा होता.

वारीच्या भक्तिमय वातावरणात ही घटना काळजाला चटका लावणारी असून, यामुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील काही तास नीरा नदीच्या परिसरात शोधमोहीम राबवली जाणार आहे.

Tapeworm : ‘ही’ भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

0
Tapeworm : ‘ही’ भाजी खाल्ल्यामुळे मेंदूत होतात किडे? डॉक्टरांनी सांगितलं सत्य


Dangerous worm inside the cabbage: हिरव्या भाज्या किंवा काही फळभाज्यांमध्ये पावसाळ्यात खाल्ल्या जातात पण यामध्ये किड सहज सापडते. या वातावरणात कोबी चांगला येतो. त्यामुळे अनेक घरात कोबी खाल्ला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून कोबी खाल्ल्यावर त्यामधील किडे मेंदूत जात असल्याच सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे या भाजीमधील किडे शिजवल्यावरही मरत नाहीत. मेंदूत किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हटलं जातं. 

अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं, कोबीच्या भाजीला योग्य पद्धतीने शिजवलं नाही तर त्यामध्ये असलेले टेपवर्म म्हणजे किडे शरीरात शिरकाव करतात. हे किडे शरीरासाठी घातक असतात. असं म्हटलं जातं की, किडा खाण्यासोबत शरीरात शिरकाव करतो. पहिल्यांदा अन्नासोबत किडा पोटात जातो आणि मग तो आतड्यांमधून ब्लड फ्लोसोबत मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक लोक कोबी खाण्यापासून दूर राहतात. पण या गोष्टीमध्ये किती सत्य आहे याबाबत कुठेच खुलासा झालेला नाही. यावर पहिल्यांदाच डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. खरंच कोबीमध्ये किडे असतात का? हे किडे जीवघेणे असतात का? काय आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया. 

टेपवर्म म्हणजे काय? 

टेपवर्म एक चपटा आणि परजीवी किडा आहे. सामान्यपणे हा किडा वेगवेगळ्या जनांवरांमध्ये संक्रमित होतो. हा किडा त्यांच्या आतड्यांमध्ये मिळतो. हा किडा प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्ये देखील आढळतो. हे किडे आतड्यांमध्ये राहतात आणि शरीरातील पोषकतत्व खातात यामुळे त्या व्यक्तीला उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणे जाणवतात. 

मेंदूत किडे आहेत कसे ओळखाल? 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतड्यांमध्ये शिरल्यावर शरीरात विशेष बदल पाहायला मिळतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये देखील दिसतात. अशावेळी पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उल्टी, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

काय कराल? 

डॉक्टरांनी सांगितले की कोबी किंवा जंत असलेली कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवावी. जर असे केले नाही तर या अळ्या तुमच्या आतड्यांमध्ये जाऊ शकतात आणि तेथून तुमच्या मेंदूत जाऊ शकतात, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि झटके येऊ शकतात. याशिवाय भाज्या पूर्णपणे शिजवल्यानंतर खा.

भाज्यांमधील किडे रोखण्याचे मार्ग

कोबीतील जंत दूर ठेवण्यासाठी, त्यांच्यासोबत थाइम, सेज आणि पुदिना सारखी झाडे लावा. त्यांचा तीव्र वास कोबीच्या फुलपाखरे आणि त्यांच्या अळ्या दूर करू शकतो. कोबी शेतात हलक्या श्वास घेण्यायोग्य आवरणाने झाकून ठेवा. कडुलिंबाचे तेल एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, जे कोबीच्या जंतांना दूर करू शकते. मिरची आणि लसूण वापरून घरगुती स्प्रे बनवा, जे दोन्ही नैसर्गिक कीटकनाशके आहेत. कोबीच्या झाडांभोवती कुस्करलेल्या अंड्याचे कवच पसरवा. तीक्ष्ण कडा रांगणाऱ्या कीटकांना परावृत्त करतात.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

 





Source link