Thursday, July 9, 2026
Home Blog Page 191

विद्यार्थिनीच्या अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; बारामती तालुक्यातील सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

0
विद्यार्थिनीच्या अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; बारामती तालुक्यातील सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

बारामती :- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध स्थापून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना १६ जानेवारी २०२५ ते २९ जून २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपुल, ता. बारामती), सुरज दत्तात्रय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज), तुषार जगदाळे (पत्ता अज्ञात) या सहा जणांविरुद्ध पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

घटनाक्रम असा उलगडला…

डिसेंबर २०२४ मध्ये फिर्यादीच्या मैत्रिणीने तिची ओळख पार्थ शिंदे या आरोपीशी करून दिली. त्यानंतर त्यांच्यात फोनवरून बोलणं सुरु झालं आणि मैत्री झाली. १३ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवसाच्या दिवशी ‘हॅशटॅग कॅफे’ नीरा येथे दोघांनी एकत्र फोटो घेतले.

१६ जानेवारी रोजी कॉलेजमध्ये पार्थने पीडितेला प्रेमाचे नाटक करत शरीरसंबंधांची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने पाठलाग सुरु केला. करंजेपूल येथील ‘द कॉफी कॅफे’मध्ये भेटीत त्याने नकळत व्हिडिओ शूट केला आणि तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉट्सअॅप कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडून नग्न व्हिडिओ तयार केला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पार्थ शिंदे याने वेगवेगळ्या नंबरवरून पीडितेच्या बहिणीला, नातेवाईकांना वाढदिवसाचे फोटो, मित्रांसोबतचे फोटो तसेच अश्लील व्हिडिओ पाठवले. २९ जून रोजी सहआरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांना फोन करून, ती अनेक मुलांशी संबंध ठेवते, असा खोटा प्रचार करत बदनामी केली. रोहन चाबुकस्वारने तर पीडितेला थेट फोन करून शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हेगारी कलमे आणि कायदेशीर कारवाई

वडगाव निंबाळकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७८, ७९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२), ३(१) थ, (ख), (खख)-६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ई), ६७, ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परिसरात चिंता आणि पोलिस कारवाईकडे लक्ष

या घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीकडे लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांकडून या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

माळेगाव साखर कारखान्यात नवा अध्याय — अध्यक्षपदी अजितदादा पवार निश्चित, उपाध्यक्षपदासाठी रंगत वाढली!

0
माळेगाव साखर कारखान्यात नवा अध्याय — अध्यक्षपदी अजितदादा पवार निश्चित, उपाध्यक्षपदासाठी रंगत वाढली!

माळेगाव | साहस Times प्रतिनिधी | ३ जुलै २०२५ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची घडी आली असून, अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः कारभार सांभाळणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. यामुळे कारखान्याच्या वाटचालीस नवी दिशा मिळणार यात शंका नाही. मात्र, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे!

शनिवार, दि. ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपद अजितदादांकडेच राहणार हे जाहीर झाल्यामुळे, कारखान्याच्या कारभारातील दुसरे महत्त्वाचे स्थान म्हणजे उपाध्यक्षपदासाठी कोण निवडले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत अजित पवारांनी ‘ब’ वर्गातून स्वतः उमेदवारी जाहीर करत एकतर्फी विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे, २१ पैकी २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी ठरले. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी सदस्य म्हणून निवडून आले.

या ऐतिहासिक विजयानंतर माळेगावमध्ये अजित पवारांनी मेळावा घेतला आणि सभासदांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांत कारखान्याचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करत, काटकसर, धोरणात्मक निर्णय आणि सभासदांना चांगला दर देण्यावर भर असेल, असे ठामपणे सांगितले.

कारखान्याचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणाऱ्या अजितदादांकडून उपाध्यक्षपदासाठी सभासदांच्या अडचणी समजून घेणारा, कारभारात सक्रिय राहणारा आणि निर्णयक्षम संचालक निवडला जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वारीत दु:खद घटना : नीरा नदीत बुडालेल्या १५ वर्षीय गोविंदचा मृतदेह ३५ तासांनंतर सापडला

0
वारीत दु:खद घटना : नीरा नदीत बुडालेल्या १५ वर्षीय गोविंदचा मृतदेह ३५ तासांनंतर सापडला

इंदापूर, ३ जुलै:वारीचा उत्साह, भक्ती आणि निसर्गाच्या अप्रत्याशित संकटाची तिव्र जाणीव देणारी एक हृदयद्रावक घटना मंगळवारी नीरा नदीकाठी घडली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पायी निघालेल्या १५ वर्षीय गोविंद फोके या वारकऱ्याचा अंघोळीदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने वारीत शोककळा पसरली. तब्बल ३५ तासांच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह नदीतून सापडला.

झिरपी (ता. अंबड, जि. जालना) येथील गोविंद फोके आपल्या आजीसोबत वारी करत होता. सराटी-अकलूज बंधाऱ्याजवळ अंघोळीला गेल्यानंतर तो अचानक पाण्यात वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मदतीचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते अपयशी ठरले. स्थानिक प्रशासन, पोलिस, एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या समन्वयातून अखेर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर मिळाला.

शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!कोंढव्यात डिलिव्हरी बॉयकडून युवतीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी

0
शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!कोंढव्यात डिलिव्हरी बॉयकडून युवतीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी

पुणे | शहराच्या कोंढवा भागात उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयने तिच्याच घरात घुसून तोंडावर स्प्रे मारत लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवत सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्याने पीडित तरुणीच्या घराच्या दारावर जाऊन ‘तुमचे कुरिअर आले आहे’ असे सांगितले. मात्र, त्या तरुणीने कुरिअर आपले नसल्याचे सांगितले. तरीदेखील ‘सही करावी लागेल’ असे म्हणत त्याने तिला सेफ्टी डोअर उघडायला भाग पाडले.

डोअर उघडताच आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, आरोपीने तिच्याच मोबाईलने तिच्यासोबत सेल्फी घेतला आणि मोबाईलवर ‘परत येईल’ असा मेसेज टाईप करून ठेवला.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तातडीने रवाना केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

0
रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी


Patanjali vs Dabur Chyawanprash: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश देत मोठा धक्का दिला आहे. पतंजलीने डाबर च्यवनप्राशविरोधात कोणतीही दिशाभूल करणारी किंवा नकारात्मक जाहिरात प्रसारित करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. डाबरने पतंजलीवर आपल्या जाहिरातींद्वारे डाबर च्यवनप्राशची चुकीची माहिती दिली आणि ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.



Source link

मुंबईतील मोठ्या शाळेतील शिक्षिकेचा कांड, अल्पवयीन मुलासोबत ठेवायची शारीरिक संबंध, असे आले उघडकीस

0
मुंबईतील मोठ्या शाळेतील शिक्षिकेचा कांड, अल्पवयीन मुलासोबत ठेवायची शारीरिक संबंध, असे आले उघडकीस



एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, “तिने (शिक्षकाने) विद्यार्थ्याला तिच्या कारमध्ये एका निर्जन ठिकाणी नेले आणि जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले आणि त्याचा विनयभंग केला. पुढील काही दिवसांत विद्यार्थी अस्वस्थ राहू लागला आणि तिने त्याला गोळ्याही दिल्या. ‘



Source link

narayana murthy asked indians to work 70 hrs now infosys announce new work life balance Policy about overtime

0
narayana murthy asked indians to work 70 hrs now infosys announce new work life balance Policy about overtime



narayana murthy asked indians to work 70 hrs now infosys announce new work life balance Policy about overtime | आठवड्याचे ७० तास काम करा सांगणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिसचा कर्मचाऱ्यांना ईमेल; एचआर म्हणाले, “तुमची तब्येत…”





Source link

बारामतीत अतिक्रमणाच्या वादातून वकिलाचा थेट कात्रीहल्ला; गुन्हा दाखल

0
बारामतीत अतिक्रमणाच्या वादातून वकिलाचा थेट कात्रीहल्ला; गुन्हा दाखल

बारामती | दुकानासमोर ठेवलेल्या साहित्यामुळे ये-जा करणाऱ्यांना होणाऱ्या अडथळ्याबाबत विचारणा करणे एका व्यावसायिकाच्या चांगलेच महागात पडले. मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्स येथे ही धक्कादायक घटना घडली असून, अडथळ्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या मोहन बोराटे या व्यावसायिकाला मनोहर डेंगळे नावाच्या वकिलाने थेट कात्रीने छातीवर वार करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डेंगळे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन भगवान बोराटे (रा. कसबा, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वकील मनोहर निवृत्ती डेंगळे (रा. गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बोराटे यांचा मुलगा प्रतीक आणि त्याचा मित्र श्रेयस ढवळे या दोघांचे मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्समध्ये आर्किटेक्चरल ऑफिस आहे. शेजारीच मनोहर डेंगळे यांचे दोन गाळे असून, त्या समोरून जाणारा पॅसेज हा लोकांच्या ये-जा करण्यासाठी वापरला जातो. मात्र, या पॅसेजमध्ये डेंगळे यांनी बंद पडलेली झेरॉक्स मशीन, बाकडे, खुर्च्या ठेवून रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. याबाबत अनेकदा विनंती करूनही डेंगळे यांनी साहित्य न हलवता, उलट दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दि. ३० जून रोजी मोहन बोराटे यांनी याविषयी थेट डेंगळे यांच्याशी चर्चा करताना वाद झाला. ‘मुलांवर हात का उचलला’ असा जाब विचारताच, रागाच्या भरात डेंगळे यांनी हातातील कात्रीने बोराटे यांच्या छातीवर वार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, कायद्याची जाण असलेल्या व्यक्तीकडून असा हिंसक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

तुम्हीदेखील प्लास्टिकच्या ताटात जेवता? जाणून घ्या प्लास्टिकच्या ताटात जेवण्याचे गंभीर परिणाम

0
तुम्हीदेखील प्लास्टिकच्या ताटात जेवता? जाणून घ्या प्लास्टिकच्या ताटात जेवण्याचे गंभीर परिणाम



Do you also eat from plastic plates Know the serious consequences of eating from plastic plates l तुम्हीदेखील प्लास्टिकच्या ताटात जेवता? जाणून घ्या प्लास्टिकच्या ताटात जेवण्याचे गंभीर परिणाम





Source link

आतड्यांमध्ये अडकलेली घाण, चिकटपणा बाहेर फेकतील 5 ज्यूस, ड्रायफ्रूट्सचे पण बाप

0
आतड्यांमध्ये अडकलेली घाण, चिकटपणा बाहेर फेकतील 5 ज्यूस, ड्रायफ्रूट्सचे पण बाप


आजच्या काळात लोकांमध्ये पोटाच्या समस्या खूप दिसून येत आहेत, त्याचे कारण म्हणजे चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या सवयी ज्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत, पोट निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे आतडे निरोगी ठेवले पाहिजेत, आज आम्ही तुम्हाला अशा 8 ज्यूसबद्दल सांगणार आहोत जे आतड्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात.

पालकाचा ज्यूस
पालकाचा ज्यूस पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 9, व्हिटॅमिन सी, के 1, आयर्न आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात जे आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात.

अननसाचा ज्यूस
तुम्ही कधी ना कधी अननसाचे सेवन केले असेलच, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, फायबर सारखे पोषक घटक असतात जे आतड्यांसाठी आणि पोटासाठी खूप फायदेशीर असतात.

कोरफडीचा ज्यूस
कोरफडीचा ज्यूस सतत सेवन केल्याने आपल्या आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, सॅकराइड्स, अमिनो अॅसिड्ससारखे पोषक घटक आढळतात जे आतड्यांमधील घाण काढून टाकण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.

लिंबू आणि सायलियम ज्यूस
सायलियममध्ये व्हिटॅमिन बी१२, झिंक, लोह, मॅग्नेशियम आणि तांबे यासारखे पोषक घटक असतात. सायलियम आणि लिंबाचा ज्यूस प्यायल्याने आरोग्यासोबतच आतड्यांमधील घाणही बाहेर पडण्यास मदत होते.

सफरचंदाचा ज्यूस 
जर तुम्ही नियमितपणे सफरचंदाचा ज्यूस प्यायला तर तो आतड्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यात रिबोफ्लेविन, थायामिन आणि व्हिटॅमिन बी-६ असते. त्याचे नियमित सेवन केल्याने त्वचेवर चमक येते.

भाज्यांचा ज्यूस
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, जर तुमच्या आतड्यांमध्ये खूप घाण साचली असेल तर भाज्यांचा रस घ्या. यासाठी फायबरयुक्त भाज्या वापरा. ​​पालक, बीट, गाजर, सलगम, आवळा, दुधी, झुकिनी इत्यादी कमी प्रमाणात वापरा. ​​जेव्हा तुम्ही त्याचा रस काढता तेव्हा त्यात पुरेशा प्रमाणात लिंबू घाला. जर तुम्ही काही दिवस नाश्त्यानंतर हा रस घेतला तर तुमच्या पोटात कितीही घाण भरली तरी सर्वकाही बाहेर पडेल.

कोरफडीचा ज्यूस
कोरफडीचा रस अनेक प्रकारच्या समस्यांसाठी वापरला जातो, परंतु पोट स्वच्छ करण्यासाठी देखील कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. जर आतड्यांमधील घाणीमुळे आतड्याच्या भिंतीमध्ये जळजळ होत असेल तर कोरफडीचा रस यामध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय कोरफडीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे आतड्याच्या अस्तरांना आराम देतात. तथापि, कोरफडीचा रस सर्वांनाच जमत नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पोट स्वच्छ करण्यासाठी कोरफडीचा रस वापरू नका.

हर्बल ज्यूस
सायलियम हस्क हे कोलन स्वच्छ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते अनेक प्रकारच्या प्रतिरोधक स्टार्चपासून बनवले जाते. जर तुम्ही काही दिवस दररोज सायलियमचे सेवन केले तर पोटातील घाण निघून जाते. सायलियममध्ये लिंबाचा रस मिसळा. हे अधिक फायदेशीर ठरेल.

सफरचंदाचा ज्यूस
सफरचंद फायबरने भरलेले असते. म्हणून, सफरचंद तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. परंतु लक्षात ठेवा की बाजारात पॅकेटमध्ये मिळणारा सफरचंदाचा रस फायदेशीर ठरणार नाही. यासाठी, एक सफरचंद घरी आणा आणि थोडे पाणी घालून बारीक करा आणि गाळून न घेता प्या. या रसात तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. यासोबतच तुम्ही त्यात बीट आणि गाजर देखील घालू शकता.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link