Thursday, July 9, 2026
Home Blog Page 190

फलटण शहराच्या रूपात पालखीपूर्वी सकारात्मक बदल… मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

0
फलटण शहराच्या रूपात पालखीपूर्वी सकारात्मक बदल… मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

फलटण, दि. ४ जुलै – संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामांची शहरात जोरदार चर्चा आहे. पालखीच्या आगमनाआधीच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे तसेच पालखी संपल्यानंतर अवघ्या काही तासांत शहर पुन्हा स्वच्छ व सुशोभित करणे यामुळे निखिल मोरे यांचे कार्य शहरवासीयांच्या मनात ठसले आहे.

फलटणमधील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या कामगिरीबद्दल मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अमीरभाई शेख, निलेश तेलखडे, ज्ञानेश्वर पवार, राजाभाऊ देशमाने, राहुल शहा, निखिल उपाध्याय, दीपक करवा, मेहबूबभाई मेटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याधिकारी मोरे यांच्या कार्यतत्परतेचे विशेषतः तेवढेच कौतुक करण्यात येते की, अतिवृष्टीमुळे मोडकळीस आलेले पूल, रस्त्यांवरील खड्डे, आणि शहरातील साचलेली घाण – या सर्व समस्यांना त्यांनी प्राधान्य देत तातडीने उपाययोजना केल्या.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: झोकून काम करा, पण आयुष्यालाही थोडा वेळ द्या

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  झोकून काम करा, पण आयुष्यालाही थोडा वेळ द्या


11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तुमच्या कामाला पूर्ण वेळ द्या. प्रत्येक काम झोकून करा, पण आयुष्यालाही नियमित वेळ द्या. आपण आपल्या कामात इतके गुंतून जातो की, आपण विसरतो की, जीवनही काही आहे. जीवन आपल्याकडून पूर्ण वेळ मागत नाही, कामाचे जग ते मागते. आता कमी वेळ देऊन तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. १० ते १४ तास काम करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तुम्ही ते कमी केले तर तुम्हाला बाजूला ढकलले जाईल. अशा वेळी आयुष्याला नियमित वेळ द्या. आणि विशेषतः चार वेळा थोडा वेळ द्या, पण खूप छान कोरलेला. सकाळी उठता, रात्री झोपता, जेवता आणि कुटुंबासोबत असता तेव्हा. जास्त वेळ देऊ नका, पण थोडा तरी अवश्य द्या. तुमचा प्रत्येक श्वास त्या क्षणाला, त्या कामाला समर्पित असावा. सकाळी उठताना स्वतःशी जोडले गेलात, जेवताना शांत झालात, झोपताना आत्म्यासोबत झोपण्याची तयारी केलीत आणि कुटुंबासोबत बसताना वैकुंठाची कल्पना केलीत तर मग पाहा, व्यवसायात गुंतवलेला वेळ भरपूर परतावा देईल.



Source link

China vs Dalai Lama: Why the 90-Year-Old Tibetan Leader’s Reincarnation Plan Challenges Beijing’s Control

0
China vs Dalai Lama: Why the 90-Year-Old Tibetan Leader’s Reincarnation Plan Challenges Beijing’s Control



China vs Dalai Lama: Why the 90-Year-Old Tibetan Leader’s Reincarnation Plan Challenges Beijing’s Control | भारत ही जन्मभूमी असलेला बौद्धधम्म चीनला तिबेटमध्ये का नकोय?





Source link

विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचा शिक्का

0
विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचा शिक्का


पुणे : ‘राज्य शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचे शिक्के मारले जात असून त्यांच्या कामांचा प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्याबाजूने अनुकूल आला. त्यामुळे यासंदर्भात जनमत करावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे गुरूवारी दिली.

पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. पवार यांनी मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कायंदे यांच्या आरोपासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक लोकायत ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही. श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत,’ असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या मार्गाची आवश्यकता आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, ‘राज्यातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते केले आहेत. या परिस्थितीत एक चांगला रस्ता असताना दुसरा रस्ता कशासाठी हा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तर या रस्त्याची आवश्यकता का आहे, हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समजून घेतले जाईल. शक्तीपीठाची आवश्यकता असेल तर त्याला पाठिंबा दिला जाईल. अन्यथा राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाईल.’

शिवसेना-मनसेच्या विजयी मेळाव्यात राष्ट्रवादीचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केल्यानंतर शिवेसना (ठाकरे) आणि मनसेचा येत्या शनिवारी (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यासंदर्भातही शरद पवार यांनी भूमिका मांडली. ‘यासंदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली आहे. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलना पक्षाने पाठिंबा दिला होता. सहभागासंदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षांचा आदेश मी मानतो. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या मेळाव्यात सहभागी होणार नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.





Source link

गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री सवलतीच्या दरात उपलब्ध; दादासाहेब चोरमले यांची विद्यार्थ्यांना दिलेली मदतीची हाक –

0
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री सवलतीच्या दरात उपलब्ध; दादासाहेब चोरमले यांची विद्यार्थ्यांना दिलेली मदतीची हाक –

फलटण :-  फलटण शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सातारा जिल्हा अ‍ॅम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातून शालेय विद्यार्थ्यांना फक्त २५ रूपयांमध्ये ‘फुलस्केप’ वही उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच वहीची एम.आर.पी. ७० रूपये इतकी असून ती सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादासाहेब चोरमले हे नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रीय राहून समाजहिताचे उपक्रम राबवत असतात. त्याच सामाजिक जाणीवेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ही सवलत उपलब्ध करून दिली आहे.

ही वही गजानन चौक ते तेली गल्ली रस्त्यावर असलेल्या ‘न्यू गजराज किराणा स्टोअर्स’ मध्ये मिळणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आधार देणारा ठरणार असून समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण करणारा आहे.

फलटण तालुक्यात १३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर होणार; ४ जुलैला कार्यक्रम

0
फलटण तालुक्यात १३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर होणार; ४ जुलैला कार्यक्रम



फलटण (साहस Times) |ग्रामपंचायतीतील नेतृत्वाच्या निवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम फलटणमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, विमानतळाजवळ, फलटण येथे हा कार्यक्रम होणार असून याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींसाठी जातीय व सामाजिक आधारावर आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी एकदा आरक्षण सोडती झाली होती, मात्र नवीन शासन निर्णयानुसार ती रद्द करून ही नवीन सोडत घेण्यात येत आहे.

ही आरक्षण सोडत स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जात असून, सर्व जाती व सामाजिक घटकांचे न्याय्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. यामुळे गावपातळीवर नेतृत्वाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तहसीलदार डॉ. जाधव यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून, आरक्षण सोडतीचा निकाल तिथेच जाहीर केला जाईल. पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत निर्णायक ठरणार आहे.”

गेल्या निवडणुकांमध्ये आरक्षण प्रक्रियेतील अस्पष्टतेमुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाले होते. त्यामुळे यंदा पूर्णपणे नियमानुसार, पारदर्शक पद्धतीने ही सोडत पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्रामस्थ व सर्व संबंधित पक्षांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून स्वच्छ व न्याय्य निवडणूक प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Thane banner of Thackeray brothers victory rally

0
Thane banner of Thackeray brothers victory rally


ठाणे – गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे ब्रँडची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र येणार याची उत्सुकता आहे. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता येणार आहे. त्यांच्या या विजय मेळाव्याचे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे इस्टेट भागात लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे येत आहेत… अशा चर्चा आता सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्त्वासमोर आमची भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहणे, यात काही कठीण आहे, असे वाटत नाही’ असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब वाहिनीवरील ‘वास्तव मे ट्रुथ’ या पाॅडकास्ट कार्यक्रमात केले होते. यास उद्धव ठाकरे यांनीही साद दिल्याचे दिसून आले होते.

यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का, याच्या चर्चा समाजमाध्यमांवर, कार्यकर्त्यांच्या गप्पांमधून रंगू लागल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच ठाणे शहरात काही ठिकाणी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यासाठी बॅनर उभारले होते. परंतू, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून याबाबत अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी, हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी दोन्ही बंधू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

शासनाने हा निर्णय रद्द करावा यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. परंतू, महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणि विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. हा विजयी मेळावा येत्या ५ जुलै ला एन. एस. सी. आय. डोम वरळी येथे होणार आहे. या मेळाव्यात तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र दिसणार असल्यामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. तर. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे इस्टेट भागात ठाकरे बंधुंच्या या विजयी मेळाव्याचे बॅनर झळकले आहेत. ठाकरे येत आहेत… अशा आशयाचा हा बॅनर वागळे इस्टेट भागातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे.





Source link

राष्ट्रीय गौरव! सोमेश्वर साखर कारखान्याला देशात सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा बहुमान

0
राष्ट्रीय गौरव! सोमेश्वर साखर कारखान्याला देशात सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा बहुमान

बारामती  प्रतिनिधी :- बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर संघ (NSSFF) यांच्यावतीने देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट उत्पादन, आर्थिक आणि तांत्रिक कामगिरीबद्दल सोमेश्वर कारखान्याला जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंगानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची उपस्थिती होती.

पुरस्कार स्विकारताना सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व अधिकारी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. हा पुरस्कार मिळणे हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून मिळालेल्या चार पुरस्कारांनंतर हा पहिलाच राष्ट्रीय सन्मान असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आगामी काळातही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कारखाना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Exclusive: ZEEL चा मास्टर प्लान! डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं कर्ज, SEBI आणि SONY विलीनीकरण ब्रेकडाउनचं सत्य; शेअरहोल्डर्सना होणार दुहेरी फायदा

0
Exclusive: ZEEL चा मास्टर प्लान! डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं कर्ज, SEBI आणि SONY विलीनीकरण ब्रेकडाउनचं सत्य; शेअरहोल्डर्सना होणार दुहेरी फायदा


शेअरहोल्डर्सचा विश्वास वाढवण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) चे संस्थापक आणि मानद अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यासोबत त्यांनी कर्ज, SEBI आणि SONY विलीनीकरण ब्रेकडाउनचं सत्य जगासमोर मांडलं आहे.  झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सुभाष चंद्रा यांनी झी बोर्डाने 2,237 कोटी रुपयांच्या प्रमोटर गुंतवणूक योजनेला मान्यता दिल्याच सांगितलं आहे. एवढंच नाही तर डॉ. चंद्रा यांनी कंपनीच्या भविष्यातील मेगा प्लॅनवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी कर्ज फेडण्यात अयशस्वी झाल्यानंतर कंपनीला प्रमोटरचा हिस्सा विकावा लागला त्या कठीण काळाबद्दलही सांगितलं आहे. 

या विशेष मुलाखतीत त्यांनी सेबीचे आरोप, SONY विलीनीकरणाच्या अपयशाचं खरं कारण आणि येणाऱ्या काळासाठी कंपनीची रणनीती यावर भाष्य केलं. डॉ. चंद्रा यांनी स्पष्ट केले की हा केवळ एक आर्थिक करार नाही तर कंपनी आणि गुंतवणूकदारांप्रती असलेल्या त्यांच्या खोल जबाबदारीचे प्रतीक आहे. 

‘त्या’ कठीण काळाबद्दलही त्यांनी सांगितलं!

त्या कठीण काळाबद्दल सांगताना डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले की, 25 जानेवारी 2019 रोजी ते पहिल्यांदाच आर्थिक बाजारपेठेतील त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अयशस्वी झाले होते. त्यांनी कबूल केले की, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. ते पुढे म्हणाले की, 2020 मध्ये समूहावरील संकटामुळे त्यांना ZEE मधील त्यांचा 44% हिस्सा विकावा लागला होता. ज्यामुळे प्रमोटरचा हिस्सा फक्त 4% वर आला. या निर्णयामुळे त्यांनी 40,000 कोटींहून अधिक कर्ज फेडलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “पायाभूत सुविधांचा व्यवसाय ही एक मोठी चूक होती, जी चुकीच्या लोकांना देण्यात आली.” त्यांनी सांगितलं की समूहाच्या या त्रासांचा ZEE एंटरटेनमेंटवरही मोठा परिणाम पाहिला मिळाला. 

सेबीच्या आरोपांमागील सत्यावरही त्यांनी सांगितलं!

मुलाखतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डॉ. चंद्रा यांनी सेबीच्या आरोपांबद्दल आणि सोनी विलीनीकरणाच्या ब्रेकडाउनबद्दल सांगितलं. त्यांनी या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला. डॉ. चंद्रा म्हणाल्या की सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी सोनी-झील विलीनीकरण होऊ दिले नाही. त्या म्हणाल्या की या विलीनीकरणामुळे शेअरहोल्डर्सना खूप फायदा झाला असता कारण अनेक गुंतवणूकदारांनी विलीनीकरणानंतर किंमत ₹ 500 पर्यंत जाईल असा विचार करून ₹ 200/शेअरच्या किमतीने गुंतवणूक केली होती. विलीनीकरण न झाल्यामुळे शेअरहोल्डर्सना मोठे नुकसान झालं.

सेबीच्या 200 कोटी रुपयांच्या आरोपावर स्पष्टीकरण!

डॉ. चंद्रा यांनी स्पष्ट केलं की, “सेबीने केलेल्या प्रत्येक आरोपावर आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. प्रवर्तकाने ZEEL मधून पैसे काढले नाहीत.” त्यांनी सांगितलं की, 200 कोटी रुपयांचे शेअर्स विकून पैसे दिले गेले. त्यांनी असेही स्पष्ट केलं की ते कंपनीला परत आलेले नाहीत, तर फक्त सल्लागाराच्या भूमिकेत आहेत.

भागधारकांचा विश्वास जिंकण्यासाठी ‘मास्टरप्लॅन’

तर या मुलाखतीत डॉ. चंद्रा यांनी भविष्यासाठी रोडमॅप जाहीर केला. ज्याच्या केंद्रस्थानी अलीकडेच जाहीर केलेली 2,237 कोटी रुपयांची प्रवर्तक गुंतवणूक आहे. ते म्हणाले, “फक्त 4% प्रवर्तक हिस्सेदारीमुळे भागधारक अस्वस्थ होते. अल्पसंख्याक भागधारकांना देखील प्रवर्तकाचा हिस्सा वाढवायचा आहे. कारण त्यांचा असा विश्वास आहे की ZEE सारखा मोठा व्यवसाय दुसरा कोणीही चालवू शकत नाही.” या गुंतवणुकीनंतर, प्रवर्तकाचा हिस्सा 18.39% पर्यंत वाढेल. प्रमोटर्स प्रति वॉरंट ₹132 या किमतीने, नियामक किमतीपेक्षा जास्त, भागधारक खरेदी करत आहेत, जे कंपनीच्या भविष्यावर त्यांचा खोल विश्वास दर्शवतं आहे.

भविष्यासाठी काय अपेक्षा आहेत?

डॉ. चंद्रा यांनी भविष्यासाठी एक स्पष्ट दृष्टीकोन मांडला आणि भागधारकांना एक मोठे आश्वासनही दिलं. त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं की, आम्ही चांगले काम करणाऱ्यांना गेमचेंजरचा लोगो दिला आहे. आम्ही लवकरच ₹17 चा EPS (प्रति शेअर कमाई) ओलांडू. हे एक ठोस आर्थिक लक्ष्य आहे जे गुंतवणूकदारांमध्ये नवीन ऊर्जा भरणार आहे. शेवटी, त्यांनी भावनिकपणे सांगितलं की स्पष्टवक्तेपणामुळे आम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागले आहे. मी एक काम करणारा माणूस आहे आणि मी नेहमीच भागधारकांच्या फायद्याचा विचार केला आहे. विलीनीकरण न झाल्यामुळे त्यांचे नुकसान आणि राग दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे.

ही मुलाखत ZEE साठी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. डॉ. चंद्रा यांनी केवळ कठीण प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर मोठ्या गुंतवणुकीसह आणि स्पष्ट दृष्टिकोनाने त्यांनी हे देखील दाखवून दिले आहे की ते कंपनीचे वैभव परत मिळवण्यासाठी आणि भागधारकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत.

शेअरहोल्डर्सना ‘दुहेरी’ फायदा कसा मिळेल?

डॉ. चंद्रा यांनी मुलाखतीत या प्रश्नाचे उघडपणे उत्तर दिले की प्रमोटर्सचा हिस्सा वाढवल्याने शेअरहोल्डर्सना कसा फायदा होईल.

1. विश्वास पुनर्संचयित करणे

त्यांनी स्पष्ट केलं की प्रमोटरच्या केवळ 4% हिस्सेदारीमुळे शेअरहोल्डर्स अस्वस्थ होते. अल्पसंख्याक भागधारकांचा असाही विश्वास आहे की प्रमोटर्सशिवाय कोणीही ZEE सारखा मोठा आणि गुंतागुंतीचा व्यवसाय चालवू शकत नाही. प्रमोटर्सचा हिस्सा वाढवल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.

2. वाढीला गती मिळेल

₹ 2237 कोटींचा हा निधी कंपनीसाठी ‘बूस्टर डोस’ म्हणून काम करेल. हा पैसा प्रामुख्याने कंटेंट आणि तंत्रज्ञानातील वाढ, बॅलन्स शीट मजबूत करणे आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ प्लॅन जलद अंमलात आणण्यासाठी वापरला जाईल. यामुळे, कंपनी रिलायन्स आणि डिस्ने सारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यासाठी चांगल्या स्थितीत असेल.

स्टॉकमध्ये हालचाल दिसून येणार!

ZEEL चा स्टॉक गुरुवारी सुमारे 2% वाढीसह 144 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या 1 महिन्यात या स्टॉकमध्ये 10% वाढ झाली आहे. 16 जून रोजी कंपनीने प्रवर्तकांचा हिस्सा वाढवल्याची बातमी आली. गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 14% वाढ झाली आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत हा शेअर 16% ने वाढला आहे.

(अस्वीकरण: झी बिझनेस आणि झी मीडिया हे दोघेही झी ग्रुपचा भाग आहेत. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या)





Source link

विद्यार्थिनीच्या अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; बारामती तालुक्यातील सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

0
विद्यार्थिनीच्या अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; बारामती तालुक्यातील सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

बारामती :- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध स्थापून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना १६ जानेवारी २०२५ ते २९ जून २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपुल, ता. बारामती), सुरज दत्तात्रय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज), तुषार जगदाळे (पत्ता अज्ञात) या सहा जणांविरुद्ध पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

घटनाक्रम असा उलगडला…

डिसेंबर २०२४ मध्ये फिर्यादीच्या मैत्रिणीने तिची ओळख पार्थ शिंदे या आरोपीशी करून दिली. त्यानंतर त्यांच्यात फोनवरून बोलणं सुरु झालं आणि मैत्री झाली. १३ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवसाच्या दिवशी ‘हॅशटॅग कॅफे’ नीरा येथे दोघांनी एकत्र फोटो घेतले.

१६ जानेवारी रोजी कॉलेजमध्ये पार्थने पीडितेला प्रेमाचे नाटक करत शरीरसंबंधांची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने पाठलाग सुरु केला. करंजेपूल येथील ‘द कॉफी कॅफे’मध्ये भेटीत त्याने नकळत व्हिडिओ शूट केला आणि तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉट्सअॅप कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडून नग्न व्हिडिओ तयार केला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पार्थ शिंदे याने वेगवेगळ्या नंबरवरून पीडितेच्या बहिणीला, नातेवाईकांना वाढदिवसाचे फोटो, मित्रांसोबतचे फोटो तसेच अश्लील व्हिडिओ पाठवले. २९ जून रोजी सहआरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांना फोन करून, ती अनेक मुलांशी संबंध ठेवते, असा खोटा प्रचार करत बदनामी केली. रोहन चाबुकस्वारने तर पीडितेला थेट फोन करून शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हेगारी कलमे आणि कायदेशीर कारवाई

वडगाव निंबाळकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७८, ७९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२), ३(१) थ, (ख), (खख)-६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ई), ६७, ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परिसरात चिंता आणि पोलिस कारवाईकडे लक्ष

या घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीकडे लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांकडून या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.