Thursday, July 9, 2026
Home Blog Page 189

Students in Maharashtra protest government exam fees being too high hurting poor candidates.

0
Students in Maharashtra protest government exam fees being too high hurting poor candidates.



Students in Maharashtra protest government exam fees being too high hurting poor candidates. | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सरकारी परीक्षा शुल्क खूप जास्त असल्याने गरीब उमेदवारांना त्रास होत असल्याचा निषेध केला.





Source link

फलटण नगरपालिकेसाठी रणजितदादांचा स्पष्ट प्लॅन; महायुतीच्या विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष

0
फलटण नगरपालिकेसाठी रणजितदादांचा स्पष्ट प्लॅन; महायुतीच्या विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष

फलटण :- माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागले असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरील नियंत्रण मिळवण्यासाठी महायुतीकडून व्यापक रणनीती आखली जात आहे. नगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांचा कालबद्ध कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, त्यानुसार रणजितदादा यांनी पक्ष कार्यकर्त्यांसह नव्याने हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकसभेतील पराभवानंतर केवळ काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक जोमाने लढवत त्यांनी राजे गटाच्या तीस वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का दिला आणि महायुतीच्या माध्यमातून सचिन सुधाकर पाटील यांना यशस्वीपणे विधानसभेत पाठवले. हे यश म्हणजे राजकीय पुनरागमनाचे ठोस उदाहरण ठरले आहे.

खासदार असताना माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये लक्ष द्यावे लागत असल्याने फलटण-कोरेगाव मतदारसंघाला कमी वेळ देता आला, मात्र आता पूर्ण लक्ष फक्त फलटण तालुक्याच्या प्रलंबित कामांवर केंद्रित असून, विकासाच्या मुद्द्यावर टीकाटिप्पणी टाळत ते स्थिरपणे वाटचाल करत आहेत.

दुसरीकडे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतून विधानपरिषद सदस्य आहेत, तर त्यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी पवार साहेबांच्या गटात प्रवेश करत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिपक चव्हाण यांच्यासाठी प्रचार केला होता.

मात्र, निवडणुकीनंतर राजे गटाची भूमिका अद्याप अस्पष्ट असून, आगामी स्थानिक निवडणुकीत ते कुणाच्या सोबत असतील, यावर तालुक्याचे राजकीय समीकरण ठरणार आहे. जनतेचे लक्ष आता त्यांच्याकडील निर्णयावर आहे.

फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

0
फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

फलटण | दि. ५ जुलै २०२५ :- फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांचं पुर परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन व सोहळ्यानंतर पालखी तळ परिसरात केलेल्या स्वच्छतेबद्दल महायुतीकडून गौरव करण्यात आला.

हा सत्कार मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारीवर्ग तसेच महायुतीचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने श्री. मोरे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार श्री. नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण नगर परिषदेकडून दिलेली सेवा व नियोजन कौतुकास्पद असून, हे शहर पालखी सोहळ्याच्या दृष्टीने आदर्श ठरत आहे.”

या सत्कार सोहळ्यावेळी महायुतीचे शहर व तालुकास्तरावरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Godrej Capital partners with Salesforce to speed up loan process

0
Godrej Capital partners with Salesforce to speed up loan process



Godrej Capital partners with Salesforce to speed up loan process | कर्ज प्रक्रिया जलद करण्यासाठी गोदरेज कॅपिटलची सेल्सफोर्सशी भागीदारी





Source link

आतड्यात अडकली मॉइश्चरायझरची बाटली; तरुणीने प्रायव्हेट पार्टमध्ये…डॉक्टरांही हादरले

0
आतड्यात अडकली मॉइश्चरायझरची बाटली; तरुणीने प्रायव्हेट पार्टमध्ये…डॉक्टरांही हादरले


डॉक्टरांकडे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येत असतात. पण एक विचित्र प्रकरण डॉक्टरांकडे आलं. एका 27 वर्षीय तरुणी पोटदुखी आणि दोन दिवसांपासून शोच करू न शकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आली. सर गंगा राम रुग्णलायातील आपत्कालीन कक्षात असह्य वेदना घेऊन ती आली. तपासणी करताना तरुणीने डॉक्टरांना सांगितलं की, लैंगिक सुखाच्या इच्छेने तिने दोन दिवसांपूर्वी तिच्या गुदाशयात मॉइश्चरायझरची बाटली घातली होती.

ती तरुणी असह्य वेदना घेऊन पहिले तिच्या जवळच्या रुग्णालयात गेली. जिथे डॉक्टरांनी बाटली काढण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले. त्यानंतर तिच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला, ज्यामध्ये बाटली गुदद्वाराच्या वरच्या भागात अडकलेली आढळून आली. महिलेची गंभीर स्थिती आणि आतडे फुटण्याची शक्यता पाहून तिला रात्री तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.

शस्त्रक्रिया पथकात डॉ. तरुण मित्तल, डॉ. आशिष डे, डॉ. अनमोल आहुजा, डॉ. श्रेयश मांगलिक आणि भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत अग्रवाल यांचा समावेश होता. सिग्मोइडोस्कोपीच्या मदतीने बाटली यशस्वीरित्या काढण्यात आली. या प्रक्रियेत पोट किंवा आतडे कापण्याची आवश्यकता नव्हती, ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना आणि जलद बरे होण्यास मदत मिळाली. संपूर्ण बाटली सुरक्षितपणे काढण्यात आली आणि रुग्णाची प्रकृती सुधारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

असोसिएट कन्सल्टंट डॉ. अनमोल आहुजा म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये वेळ वाया न घालवता प्रक्रिया करणे महत्वाचे असतं, कारण त्यामुळे आतडे फुटण्याचा धोका वाढतो. ते म्हणाले की, एंडोस्कोपी, सिग्मोइडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी सारख्या कमीत कमी आक्रमक तंत्रांनी यावर सुरक्षितपणे उपचार करता येतात. युनिट-3 चे उपाध्यक्ष आणि प्रमुख डॉ. तरुण मित्तल म्हणाले की, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवात त्यांनी अनेक रुग्णांना गुदद्वारात परदेशी वस्तू घालताना पाहिले आहे. अशा प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेसह, रुग्णाच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचे मूल्यांकन देखील करणे आवश्यक आहे. डॉ. तरुण म्हणाले की, काही रुग्ण लैंगिक सुखासाठी बाटल्या, भाज्या इत्यादी गोष्टी गुदद्वारात घालतात. ही प्रवृत्ती दोन्ही लिंगांमध्ये दिसून येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना एकटेपणा जाणवतो आणि उपचारादरम्यान या पैलूची देखील काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणांमध्ये समग्र दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

आपल्या शरीरात दोन प्रकारची आतडे असतात. एक म्हणजे लहान आतडे ज्याचे काम अन्न पचवण आणि त्यातून पोषण काढणे आहे. त्यानंतर, ते उरलेला कचरा मोठ्या आतड्यात पाठवते. मोठे आतडे त्यातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स काढून टाकते आणि मल तयार करते. गुद्द्वार हा मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग असतो. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद घुसला हे आरोप बिन बुडाचे”- भंते ज्ञानज्योती

0
आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद घुसला हे आरोप बिन बुडाचे”- भंते ज्ञानज्योती


सोलापूर : गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. जाणीवपूर्वक हे कोणी गुलामीच्या बेड्या तोडायला लागलेल्या सर्वांना ते अर्बन नक्षलवादी ठरवतील. त्यांचा तो मूळ स्वभाव आहे.बडव्या विरुद्ध वारकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हे मंदिर बडव्यांच्या ताब्यात द्यावे यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केली आहे.
आम्ही हे मंदिर मागण्यासाठी आलो नाही की त्याच्यावर अधिकार जाजवण्यासाठी आलो नाही. आम्ही सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी आलो नाही.तुटलेली मने जोडण्यासाठी आलो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठी कठीण जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे तुटलेली मन जोडण्यासाठी आम्ही आलो. माणसं तोडण्यासाठी आम्ही आलो नाही. उलट ते हिंदू मुस्लिम म्हणून स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक ची मस्जिद तोडली. मुख्य म्हणजे मुंबईचा जैन मंदिर तोडले. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी असे सांगितले की, तुम्ही मशिदीमध्ये मंदिर शोधू नका. अशी ऑर्डर दिल्यानंतर हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवले.
माणसं तोडणं खूप सोप्प आहे. पण तुटलेली माणसं जोडणं खुप कठीण आहे. म्हणून गाडगेबाबा आयुष्यभर पंढरपुरात राहिले पण मंदिरात गेले नाहीत. त्यांना काय पंढरपूरचा पांडुरंग पावला नसेल? अरे देवळात देव राहत नाही रे, देवळात पुजाऱ्याच पोट राहते.असे ते निक्षुन सांगत राहिले.
माणसा माणसांना हिंदू – मुस्लिम म्हणून तुम्ही काय करणार आहात?
माणसा माणसांमध्ये सांप्रदायिक तणाव वाढवून तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला काय बक्षीस मिळणार आहे का?
माणसा माणसात तणाव वाढवून तुम्हाला काय स्वर्ग मिळणार आहे का?
साने गुरुजी ब्राह्मण होते तरी वारकऱ्यांच्या सुटकेसाठी अमरण उपोषण करावे लागले.
पंढरपूरचं श्री.विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वारकरी लोकांसाठी वर्षानुवर्षे बंद होतं. त्यासाठी साने गुरुजींनी उपोषण करत आपले प्राण पणाला लावले. त्यामुळं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं.
चोख्याची भक्ती काय कमी होती म्हणून त्यांना भिंताडात मारून टाकण्यात आलं.

ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाई विनंती करत होती की मी पंढरपूरला जाते त्यावेळी बाबासाहेब तिला म्हणाले,खबरदार म्हणाले, अग शुद्रातिशुद्रांना ते दर्शन देत नाहीत. मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेल जी तुटलेली मने जोडणारी पंढरपूरं तयार होतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी घोषणा केली. आणि 21 वर्षानंतर नागपूर येथे दिक्षा मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा परिपूर्ण केली. पाच लाखाच्या समुदायासमोर बोलताना त्यांना त्यांच्या रमाईची आठवण आली. ते म्हणाले, “हे मी तुटलेली माणसं जोडण्यासाठी नवीन पंढरपूर उभे केले आहे दीक्षाभूमीवर!’ पण हे पाण्यासाठी माझी रामू मात्र जिवंत नाही.
माणसं जोडण्यासाठीचे हे सामाजिक क्रांतीचे आंदोलन आहे.
भवतू सब्ब मंगलम!!!

If anyone commits hooliganism in the name of Marathi we will not tolerate it Devendra Fadnaviss big warning to MNS

0
If anyone commits hooliganism in the name of Marathi we will not tolerate it Devendra Fadnaviss big warning to MNS



If anyone commits hooliganism in the name of Marathi we will not tolerate it Devendra Fadnaviss big warning to MNS | ‘मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा मनसेला मोठा इशारा





Source link

डोंबिवलीत रेतीबंदर, कुंभारखाणपाडा खाडीत वाळू माफियांच्या ३० लाखाच्या सामग्रीला जलसमाधी

0
डोंबिवलीत रेतीबंदर, कुंभारखाणपाडा खाडीत वाळू माफियांच्या ३० लाखाच्या सामग्रीला जलसमाधी



Sand mafias assets worth 30 lakhs drowned in Retibandar, Kumbharkhanpada khadi in Dombivli डोंबिवलीत रेतीबंदर, कुंंभारखाणपाडा खाडीत वाळू माफियांच्या ३० लाखाच्या सामग्रीला जलसमाधी





Source link

फलटण तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर!

0
फलटण तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर!

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे (4 जुलै 2025) |फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी सरपंचपद आरक्षणाची सोडत आज प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सजाई गार्डन, फलटण येथे पार पडली. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, तसेच निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे उपस्थित होते.

लोकसंख्येनिहाय तसेच मागील आरक्षणाचा आढावा घेत सरपंचपद आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यापुढील निवडणुका या लोकनियुक्त सरपंच प्रणालीद्वारे होणार आहेत. जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या आदेशानुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.

▪️ सर्वसाधारण

सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भाडळी खु., होळ, आदर्की खु., वडगाव, कापडगांव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुम, दुधेबावी, बिबी, कांबळेश्वर, पिंप्रद, अलगुडेवाडी, शेरेचवाडी (हिंगणगाव), तिरकवाडी, नांदल, फडतरवाडी, कोरेगांव, वडजल, तावडी, जाधववाडी (फ), मुळीकवाडी, घाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेरी, निरगुडी + मांडवखडक, ढवळ, शिंदेवाडी, सोमंथळी, सालपे.

▪️ सर्वसाधारण महिला

सांगवी, भिलकटी, खटकेवस्ती, कुलवली खुर्द, सासकल, आळजापूर, कुरवली बु.+दत्तनगर, वडले, चौधरवाडी, विडणी, टाकळवाडे, आंदरुड, खराडेवाडी, कापशी, आरडगांव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, मिरढे, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाठार – निंबाळकर, जाधववाडी (आ.), सासवड, फरांदवाडी, मिरेवाडी (कुसुर), कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, घाडगेवाडी, ढवळेवाडी (निंबळक), पिराचीवाडी, मानेवाडी, दऱ्याचीवाडी, गोळेगाव, परहर बु., परहर खुर्द, बरड, गोळेवाडी.

▪️ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला

वाघोशी, भाडळी बु., सोनवडी बु., आदर्की बु., तांबवे, नाईकबोमवाडी, टाकुबाईचीवाडी, मलवडी, पाडेगांव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर (वाखरी), जोर (कुरवली), साठे, ठाकुरकी, मिरगांव, उपळवे, झडकबाईचीवाडी.

▪️ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण

हिंगणगाव, काशिदवाडी, शेरेचीवाडी (ढवळे), विठ्ठलवाडी, राजाळे, तरडफ, मठाचीवाडी, तरडगांव, रावडी बु., धुमाळवाडी, शिंदेमाळ, उलूंब, वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी, परहर खु.

▪️ अनुसूचित जमाती (ST)

ढवळेवाडी (आसू)

▪️ अनुसूचित जाती (SC) – महिला

वेळीशी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी – भवानीनगर, निंबळक, वाजेगांव, आसू, दालवडी, माळेवाडी, मिरेवाडी.

▪️ अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण

जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचुर्णी, हणमंतवाडी, खामगाव.

“कुरिअर बॉय”चा बहाणा करून बलात्कार! पुण्यातील संगणक अभियंता तरुणीवरील अत्याचार प्रकरणात जुना मित्र आरोपी अटकेत

0
“कुरिअर बॉय”चा बहाणा करून बलात्कार! पुण्यातील संगणक अभियंता तरुणीवरील अत्याचार प्रकरणात जुना मित्र आरोपी अटकेत

पुणे: कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या २५ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर घरात घुसून बलात्कार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. २ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल दहा पथकं कामाला लावली होती. अखेर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, संबंधित आरोपीला पुण्यातूनच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणी व आरोपी एकमेकांचे जुने मित्र असल्याचे उघड झाले आहे.

पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कार्यरत आहे आणि दोन वर्षांपासून कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ बाहेरगावी गेला असताना ती एकटीच घरी होती.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने कुरिअर बॉय असल्याचा बहाणा करत दरवाज्यावर टकटक केली. पीडितेने कुरिअर नाकारल्यावर आरोपीने “स्वाक्षरी लागेल” असे सांगून तिला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून, ती दृष्टिहीन झाल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

त्याने पीडितेचे मोबाईलवर फोटो काढले आणि “मी पुन्हा येईन” असा मेसेज मोबाईलवर लिहून तीव्र मानसिक धक्का दिला.

घाबरलेल्या पीडितेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला पुण्यात अटक करण्यात आली.

या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, घरात अनधिकृत प्रवेश आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.