Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रआषाढी वारीत अर्बन नक्षलवाद घुसला हे आरोप बिन बुडाचे"- भंते ज्ञानज्योती

आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद घुसला हे आरोप बिन बुडाचे”- भंते ज्ञानज्योती


सोलापूर : गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. जाणीवपूर्वक हे कोणी गुलामीच्या बेड्या तोडायला लागलेल्या सर्वांना ते अर्बन नक्षलवादी ठरवतील. त्यांचा तो मूळ स्वभाव आहे.बडव्या विरुद्ध वारकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हे मंदिर बडव्यांच्या ताब्यात द्यावे यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केली आहे.
आम्ही हे मंदिर मागण्यासाठी आलो नाही की त्याच्यावर अधिकार जाजवण्यासाठी आलो नाही. आम्ही सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी आलो नाही.तुटलेली मने जोडण्यासाठी आलो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठी कठीण जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे तुटलेली मन जोडण्यासाठी आम्ही आलो. माणसं तोडण्यासाठी आम्ही आलो नाही. उलट ते हिंदू मुस्लिम म्हणून स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक ची मस्जिद तोडली. मुख्य म्हणजे मुंबईचा जैन मंदिर तोडले. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी असे सांगितले की, तुम्ही मशिदीमध्ये मंदिर शोधू नका. अशी ऑर्डर दिल्यानंतर हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवले.
माणसं तोडणं खूप सोप्प आहे. पण तुटलेली माणसं जोडणं खुप कठीण आहे. म्हणून गाडगेबाबा आयुष्यभर पंढरपुरात राहिले पण मंदिरात गेले नाहीत. त्यांना काय पंढरपूरचा पांडुरंग पावला नसेल? अरे देवळात देव राहत नाही रे, देवळात पुजाऱ्याच पोट राहते.असे ते निक्षुन सांगत राहिले.
माणसा माणसांना हिंदू – मुस्लिम म्हणून तुम्ही काय करणार आहात?
माणसा माणसांमध्ये सांप्रदायिक तणाव वाढवून तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला काय बक्षीस मिळणार आहे का?
माणसा माणसात तणाव वाढवून तुम्हाला काय स्वर्ग मिळणार आहे का?
साने गुरुजी ब्राह्मण होते तरी वारकऱ्यांच्या सुटकेसाठी अमरण उपोषण करावे लागले.
पंढरपूरचं श्री.विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वारकरी लोकांसाठी वर्षानुवर्षे बंद होतं. त्यासाठी साने गुरुजींनी उपोषण करत आपले प्राण पणाला लावले. त्यामुळं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं.
चोख्याची भक्ती काय कमी होती म्हणून त्यांना भिंताडात मारून टाकण्यात आलं.

ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाई विनंती करत होती की मी पंढरपूरला जाते त्यावेळी बाबासाहेब तिला म्हणाले,खबरदार म्हणाले, अग शुद्रातिशुद्रांना ते दर्शन देत नाहीत. मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेल जी तुटलेली मने जोडणारी पंढरपूरं तयार होतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी घोषणा केली. आणि 21 वर्षानंतर नागपूर येथे दिक्षा मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा परिपूर्ण केली. पाच लाखाच्या समुदायासमोर बोलताना त्यांना त्यांच्या रमाईची आठवण आली. ते म्हणाले, “हे मी तुटलेली माणसं जोडण्यासाठी नवीन पंढरपूर उभे केले आहे दीक्षाभूमीवर!’ पण हे पाण्यासाठी माझी रामू मात्र जिवंत नाही.
माणसं जोडण्यासाठीचे हे सामाजिक क्रांतीचे आंदोलन आहे.
भवतू सब्ब मंगलम!!!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments