Thursday, July 9, 2026
Home Blog Page 188

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बोधगयामध्ये आंदोलन; सुजात आंबेडकर यांचा सहभाग

0
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बोधगयामध्ये आंदोलन; सुजात आंबेडकर यांचा सहभाग

बोधगया (बिहार) | बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनातून बौद्ध समाजाला मुक्ती मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध समाज दौऱ्याचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बोधगया येथे सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी याआधी या आंदोलनाला बोधगयामध्ये हजेरी लावून पाठिंबा दर्शवला आहे.

या लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. विविध शहरांमध्ये आंदोलनाचे सत्र सुरू करून, लोकजागृती करण्यात आली.

आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सुजात आंबेडकर यांनी बोधगया येथे थेट उपस्थित राहून बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे.

फलटणच्या खेळाडूंनी गाठले राष्ट्रीय पातळीचे यश!

0
फलटणच्या खेळाडूंनी गाठले राष्ट्रीय पातळीचे यश!

फलटण | ५ जुलै २०२५ | साहस Times :फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणच्या पाच महिला खेळाडूंनी हॉकी क्षेत्रात मोठे यश मिळवत सातारा जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे.

हॉकी इंडिया अंतर्गत रांची (बिहार) येथे ७ ते १५ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेपूर्वी आयोजित हॉकी महाराष्ट्रच्या प्रशिक्षण शिबिरात दि हॉकी सातारा संघटनेच्या खेळाडू कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, कु. तेजस्विनी कर्वे आणि कु. वेदिका वाघमोडे यांची निवड झाली होती.

या शिबिराच्या शेवटच्या दिवशी घोषित अंतिम महाराष्ट्र संघात कु. निकिता, कु. श्रेया, कु. अनुष्का आणि कु. वेदिका यांना स्थान मिळाले.
विशेषतः –
🔸 निकिता, श्रेया, अनुष्का यांनी सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले.
🔸 वेदिका वाघमोडे हीने प्रथमच सब-ज्युनिअर संघात स्थान मिळवत महाराष्ट्राच्या सर्वात लहान वयाच्या खेळाडूचा बहुमान पटकावला.

या खेळाडूंना हॉकी महाराष्ट्र संघाचे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश खुटाळे सर आणि प्रशिक्षक सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. सहाय्यक म्हणून बीबी खुरंगे सर कार्यरत आहेत.

या निवडीची संपूर्ण प्रक्रिया हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. श्री. कृष्ण प्रकाश (IPS), उपाध्यक्ष ओलंपियन मा. धनंजय महाडिक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मा. मनोज भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश सरांनी सांगितले, “फलटणसारख्या ठिकाणी अशा दर्जेदार खेळाडू निर्माण होत असतील, तर तेथे ‘एस्ट्रोटर्फ’ हॉकी मैदानाची नितांत गरज आहे.

या घवघवीत यशाबद्दल पुढील मान्यवरांनी अभिनंदन केले:

  • मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर – माजी विधान परिषद सभापती
  • मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर – चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती
  • मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर – अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
  • श्री शिवाजीराव घोरपडे – क्रीडा समिती चेअरमन, फलटण एज्यु. सोसायटी
  • प्राचार्य वसंतराव शेडगे – मुधोजी हायस्कूल
  • श्री बाहुबली शहा – अध्यक्ष, दि हॉकी सातारा
  • श्री पंकज पवार, श्री प्रवीण गाडे, श्री विजय मोहिते, श्री महेंद्र जाधव, श्री सचिन लाळगे, व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर

सातारा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात हे यश एक नवीन अध्याय निर्माण करणारे ठरले आहे!

महाराष्ट्र संघात मुधोजी हायस्कूलच्या ४ खेळाडूंची निवड – राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी रांची, बिहार येथे जाणार!

0
महाराष्ट्र संघात मुधोजी हायस्कूलच्या ४ खेळाडूंची निवड – राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी रांची, बिहार येथे जाणार!

फलटण |रांची, बिहार येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात फलटणचा गौरव वाढवणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच द हॉकी सातारा या संघटनेच्या चार उभरत्या महिला हॉकीपटूंची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंमध्ये
🔹 कु. अनुष्का केंजळे
🔹 कु. निकिता वेताळ
🔹 कु. श्रेया चव्हाण
🔹 कुमारी वेदिका वाघमोरे
यांचा समावेश असून, त्यांच्या उत्कृष्ट खेळकौशल्याच्या जोरावर त्यांनी ही निवड पटकावली आहे.

या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे आणि शाळेचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. या खेळाडूंनी आपल्या मेहनतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवून फलटण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

साहस Times परिवाराकडून या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

नामफलक झाकला, पण योगदान झाकता आलं का? – रामराजे समर्थकांचा सवाल

0
नामफलक झाकला, पण योगदान झाकता आलं का? – रामराजे समर्थकांचा सवाल

फलटण | प्रतिनिधी – साहस Times :- अवकाळी पावसामुळे फलटण शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासन, राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांनी संकटात तातडीने रस्त्यावर उतरून मदतीचा हात दिला. त्या पाठीमागे मोठं नियोजन होतं आणि त्या नियोजनाची फळं दिसली — कारण अवघ्या काही दिवसांत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील कोणत्याही अडथळ्याविना पार पडला.

या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. सोहळ्याचे ठिकाण होतं – फलटण नगरपालिका प्रशासकीय इमारतीतील ‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृह’.

मात्र, याच कार्यक्रमात एक वादग्रस्त घडामोड घडली – सभागृहाच्या नावाचा नामफलक पडद्याने झाकण्यात आल्याचं दिसून आलं. विरोधक आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडूनच हे पाऊल उचलण्यात आलं, असा आरोप रामराजे समर्थकांनी केला असून त्यांनी सवाल उपस्थित केला की – “नामफलक झाकलात, पण कर्तृत्व कसं झाकाल?”

रामराजे हे सध्या फलटणचे आमदार असून राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि संस्थांचे अभिषिक्त अधिपती आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा अपमान केल्याच्या भावना समर्थकांमध्ये आहेत. दिवसभर सोशल मीडियावर आणि नागरी चर्चांमध्ये हाच विषय गाजत राहिला.

एकीकडे फलटण नगरपालिका, विशेषतः मुख्याधिकारी श्री निखिल मोरे यांच्या कार्यशैलीचं कौतुक होतंय, तर दुसरीकडे नामफलक झाकण्याच्या कृतीमुळे प्रशासन आणि विरोधकांच्या संकुचित मानसिकतेवर टीका होत आहे.

फलटणमध्ये राजकारण आता केवळ कामगिरीवर नाही, तर “सन्मान झाकण्याच्या” कृतीवरही केंद्रित झाल्याचं चित्र सध्या तयार होत आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी पुष्पलता बोबडे

0
प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी पुष्पलता बोबडे


सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक समितीच्या पुष्पलता संजय बोबडे, तर उपाध्यक्षपदी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे संजीवन रामचंद्र जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा फलटण तालुक्याकडे गेली आहे. उदय शिंदे आणि सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात आल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी शिक्षक बँकेच्या सभागृहामध्ये निवड प्रक्रिया पार पडली. सहायक निबंधक राहुल देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक समितीचे सिध्देश्वर पुस्तके, उदय शिंदे, सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली किरण यादव, सुरेश पवार, नवनाथ जाधव, महेंद्र जानुगडे, संजीवन जगदाळे, विशाल कणसे, विजय ढमाळ, संजय संकपाळ, विजय शिर्के, नितीन फरांदे, नितीन शिर्के, पुष्पलता बोबडे आदी १६ संचालक निवडीवेळी एकत्र आले होते. संभाजीराव थोरात आणि बलवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, निशा मुळीक, शहाजी खाडे, ज्ञानोबा ढापरे यांची यावेळी उपस्थिती होती. माजी अध्यक्ष निशा मुळीक व उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासो भोसले यांची यावेळी उपस्थित होते.



Source link

ब वर्गातील उमेदवार अजित पवारांना चेअरमनपद, विरोधकांचा आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्यांचं उत्तर – “वेळ संपली”!

0
ब वर्गातील उमेदवार अजित पवारांना चेअरमनपद, विरोधकांचा आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्यांचं उत्तर – “वेळ संपली”!

बारामती :राजकारण आणि सहकाराच्या क्रॉसरोडवर उभ्या असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. तर व्हाईस चेअरमन म्हणून संगिता कोकरे यांची निवड करण्यात आली. मात्र, ही निवड तितकीशी सोपी नव्हती. विरोधी गटाचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्रराव तावरे यांनी याला जोरदार आक्षेप घेतला.

त्यांचा दावा होता की, “ब वर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन बनवण्यास उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) बंदी घातली आहे” – आणि म्हणूनच अजित पवारांची निवड बेकायदेशीर आहे.

यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र “वेळ संपली आहे” असं सांगत अजित पवारांची निवड कायम ठेवली.


एकतर्फी विजय, पण अधुरा स्वप्न!

२२ जून रोजी पार पडलेल्या मतदानात अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला, तर विरोधकांच्या ‘सहकार बचाव पॅनल’चे चंद्रराव तावरे हे एकमेव संचालक निवडून आले. शरद पवार समर्थक ‘बळीराजा पॅनल’ ला एकही जागा मिळवता आली नाही.

विरोधकांचे रंजन तावरे म्हणाले, “अजित पवारांचा हा विजय जनशक्तीवर नव्हे, तर धनशक्तीवर आहे. आम्ही अजित पवारांना झुंजवलं. एक संचालक निवडून आणलाच. त्यामुळे पूर्ण बहुमताचं स्वप्न अजून अधुरंच राहिलं.


विरोधकांची कायदेशीर लढाई सुरूच राहणार?

चंद्रराव तावरे यांनी बैठकीतून वॉकआऊट केल्यानंतर अजित पवारांची चेअरमनपदाची निवड एकतर्फी झाली. पण, यावर कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा रंजन तावरे यांनी दिला आहे. “ही नियुक्ती बेकायदेशीर असून आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवू,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

फलटण नगर परिषद शाळा क्र. 3 ला युवा उद्योजक संग्राम दादा अहिवळे यांच्याकडून पाण्याची मोटर भेट

0
फलटण नगर परिषद शाळा क्र. 3 ला युवा उद्योजक संग्राम दादा अहिवळे यांच्याकडून पाण्याची मोटर भेट

फलटण | मंगळवार पेठेतील नगर परिषद शाळा क्र. 3 येथे युवा उद्योजक संग्राम (दादा) अहिवळे आणि सोनू संग्राम अहिवळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सबमर्सीबल पंप (पाणी उचलण्याची मोटर) भेट देण्यात आली.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालाजी मुकाडे सर, उपशिक्षक हिरामण मोरे सर, बंडू यादव सर, शिवाजी जाधव सर, महिला शिक्षिका चैत्राली कांबळे मॅडम उपस्थित होत्या. सारिका काकडे, अंबिका काकडे, प्रिती रोकडे या अंगणवाडी सेविकांचाही सहभाग होता.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मा. अध्यक्ष सागर अहिवळे, युवा नेतृत्व रोहित (भैय्या) माने, तसेच विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य साबळे, संतोष (दादा) कांबळे, तुषार कोकाटे, गणेश काकडे, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, निखिल काकडे, प्रशांत अहिवळे, आर्यन काकडे, नीरज लगाडे, अनुज काकडे, मुस्ताक कोतवाल, माऊली काकडे, समद कोतवाल, रुद्र लगाडे, दादा काकडे, केतन अहिवळे, निरंजन अहिवळे, सम्यक काकडे, अझीम शेख आदींचा समावेश होता.

संग्राम अहिवळे व सोनू अहिवळे यांनी शाळेच्या डिजिटल यंत्रणांची प्रशंसा करत इथून पुढे शाळेच्या सर्व गरजांना साथ देण्याचे आश्वासन दिले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. बालाजी मुकाडे सर यांनी सत्कार केला व उपशिक्षक हिरामण मोरे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

माळेगाव कारखाना अजितदादांच्या हातात! अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सहकारात पुन्हा एकहाती वर्चस्व”

0
माळेगाव कारखाना अजितदादांच्या हातात! अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सहकारात पुन्हा एकहाती वर्चस्व”

“अध्यक्ष होणार हे आधीच जाहीर केलं… आणि तेच ठरवलं!” – अजितदादांची माळेगाव कारखान्यावर बिनविरोध निवड, संगीता कोकरे उपाध्यक्ष

बारामती :- संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने जोरदार मुसंडी मारत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निवडणुकीतील विजयानंतर आज कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड झाली.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांनी अध्यक्षपद स्वतःकडे घेणार असल्याचं जाहीर करून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी प्रचारादरम्यानच काटेकोर व्यूहरचना आखत सगळी रणनीती स्वतः सांभाळली. या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने एकूण २१ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवला, तर केवळ एक जागा विरोधी ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’चे नेते चंद्रराव तावरे यांनी जिंकली.

आज यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या निवडीत अध्यक्षपदासाठी अजितदादा, तर उपाध्यक्षपदासाठी संगीता कोकरे यांचे एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. अजितदादांची अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषात आनंदोत्सव साजरा झाला.

अजितदादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून केली होती. आज ते उपमुख्यमंत्री असूनही, कारखान्याचा कारभार स्वतःकडे घेत त्यांनी सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा आपली छाप उमठवली आहे. पुढील पाच वर्षांत माळेगाव कारखान्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

डायबिटीसच्या रुग्णांनी आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? काय खाल-काय टाळाल?

0
डायबिटीसच्या रुग्णांनी आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? काय खाल-काय टाळाल?


Ashadhi Ekadashi 2025 : 6 जुलै रविवारी आषाढी एकादशी आहे. वर्षभरातील ही महत्त्वाची एकादशी मानली जाते. अशावेळी डायबिटिस रुग्णांनी काय घ्यावी काळजी? कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात?





Source link

काय आहे 21-21-21 नियम? कपिल शर्माच्या वेटलॉस मागचं खरं कारण

0
काय आहे 21-21-21 नियम? कपिल शर्माच्या वेटलॉस मागचं खरं कारण


Kapil Sharma Weight Loss: प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता वजन कमी केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ४४ वर्षीय कपिल शर्माने त्याच्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलिकडेच कपिल शर्मा विमानतळावर दिसला, ज्यामध्ये तो पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि निरोगी दिसत होता. कपिलचा हा बदल पाहिल्यानंतर, प्रत्येकाला त्याचे वजन कमी करण्याचे सिक्रेट शेअर केले आहे. कपिल शर्माच्या वजन कमी करण्याचे रहस्य म्हणजे २१ २१ २१ नियम. या नियमांचे पालन करून तो वजन कमी करण्यात यशस्वी झाला. त्याचे फिटनेस प्रशिक्षक योगेश भटेजा यांनी याबद्दल माहिती दिली.

 २१ २१ २१ नियम काय आहे?

हा नियम तीन टप्प्यात विभागला गेला आहे यामध्ये प्रत्येक टप्पा २१ दिवस टिकतो.

पहिले २१ दिवस – शारीरिक हालचालींवर भर

वजन कमी करण्याचे पहिले २१ दिवस खूप कठीण असू शकतात. यामध्ये शारीरिक हालचालींवर भर दिला जातो. यामध्ये स्ट्रेचिंग केले जाते. पहिल्या २१ दिवसात, तुम्हाला योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. तुमचे शरीर ताणणे आणि क्रियाकलाप करणे आवश्यक आहे. या दिवसांत आहाराचे पालन करणे आवश्यक नाही.

पुढील २१ दिवस: आहारात बदल

पुढील २१ दिवसांत आहारात बदल केले जातात. या दिवसांत आरोग्य तज्ञ आहारातून कार्ब्स, कॅलरीज आणि फॅट्स कमी करण्याची शिफारस करतात. या दिवसांत आरोग्य तज्ञ तुमच्या आरोग्य आणि गरजेनुसार गोष्टी खाण्याची शिफारस करतात. या काळात साखर आणि चहाचे सेवन बंद केले जाते. या दिवसांत तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटेल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि निरोगी दिसाल.

गेले २१ दिवस: हे करा

गेल्या २१ दिवसांत धूम्रपान, अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन थांबवावे लागेल. या काळात शारीरिक हालचाली आणि आहाराकडे पूर्ण लक्ष दिले जाते. तसेच, अस्वास्थ्यकर गोष्टी पूर्णपणे बंद केल्या जातात.

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही २१ २१ २१ नियम पाळू शकता. प्रत्येकाच्या शरीराचा प्रकार वेगळा असतो. म्हणून, वजन कमी करण्यासाठी कोणताही आहार किंवा नियम पाळण्यापूर्वी, एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.ट

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link