Saturday, September 19, 2026
Homeसाताराकामगारांच्या सन्मानार्थ सामाजिक उपक्रम… घरगुती भांडी वाटप कार्यक्रम उत्साहात पार

कामगारांच्या सन्मानार्थ सामाजिक उपक्रम… घरगुती भांडी वाटप कार्यक्रम उत्साहात पार

फलटण | दि. २ जुलै २०२५ – घरगुती बांधकाम क्षेत्रात दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या कामगारांचा सन्मान राखत आज एक अनोखा सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत कामगारांना त्यांच्या घरेलू उपयोगासाठी भांडी सेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित कामगार वर्गाने दिलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.

या वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील, श्रीमंत संजीव नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, व ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमादरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, “घरेलू बांधकाम कामगार हा समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टाचे भान ठेवत ही मदत करण्यात आली आहे. भविष्यात इतरही कामगार घटकांपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमात C.I.T.U चे आयाझ आतार, कल्पना मोहीते (समता घेरुलू कामगार संघटना), शांताराम कारंडे (फलटण बांधकाम कामगार संघटना) यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे समाजातील श्रमिक वर्गात विश्वास निर्माण होतो. सामाजिक जाणीवा जागृत ठेवून अशा उपक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments