Monday, September 14, 2026
Homeसातारामाजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ 200 टी-शर्ट वाटपाचा उपक्रम संपन्न

माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ 200 टी-शर्ट वाटपाचा उपक्रम संपन्न

फलटण, दि. 29 जून 2025 माजी नगरसेवक कै. गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ आज मंगळवार पेठ, भिमनगर फलटण येथे सामाजिक उपक्रम म्हणून 200 टी-शर्टचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्रशांत अहिवळे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये विजय येवले (जिल्हा सचिव, RPI), मधुकर काकडे (संघटक, पश्चिम महाराष्ट्र), संजय निकाळजे (जिल्हा सदस्य, सातारा), तेजस काकडे (उपाध्यक्ष, फलटण शहर), सुरेश भोसले सर (सेवानिवृत्त शिक्षक), रोहित भैय्या माने, निलेश भाऊ मोरे, विजय भाऊ मोरे, गणेश भोईटे, बापूराव भोसले, दादा मोरे, मनोज दांडोरे, दादा येवले, राजू शिंदे, राजू जाधव यांचा समावेश होता.

संजय निकाळजे यांनी यावेळी माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या समाजकार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन महादेव गायकवाड आप्पा (अध्यक्ष) यांनी केले.

या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments