Sunday, August 30, 2026
Homeसातारा"संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा फलटण तालुक्यात उत्साहात स्वागतास सज्ज - तरडगाव ते...

“संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा फलटण तालुक्यात उत्साहात स्वागतास सज्ज – तरडगाव ते बरडदरम्यान तीन दिवस मुक्काम, यंत्रणांचा चोख समन्वय”

साहस Times | फलटण, 27 जून 2025 :“विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या माऊलींची पालखी आता फलटणच्या सीमेला साक्षी ठरणार आहे!”
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज शुक्रवार, 27 जून रोजी लोणंदहून कापडगाव नजीक सरदेचा ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश करतो आहे. यावेळी तालुक्याच्या सीमेवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून माऊलींचे स्वागत करणार आहेत.

या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळ्याच्या तीन दिवसांच्या फलटण मुक्कामासाठी संपूर्ण तालुका सज्ज झाला आहे.
🔹 २७ जून – तरडगाव,
🔹 २८ जून – फलटण,
🔹 २९ जून – बरड,
तर ३० जून रोजी दुपारी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

आज दुपारी ४ वाजता तरडगाव नजिक चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले “उभे रिंगण” रंगणार संपन्न झाले आहे. यासाठी हजारो भाविक आणि वारकरी आधीच जमा झाले आहेत.

प्रशासन सज्ज – नियंत्रण कक्ष, पाणी, आरोग्य, सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर

पालखी काळात कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.
▪️ प्रत्येक पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील आदी अधिकारी समन्वयाचे काम करणार आहेत.
▪️ आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी, ३० कर्मचारी, ५ वैद्यकीय गाड्या, २ अॅम्ब्युलन्स, शिवाय १०८ सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.
▪️ महावितरण कडून प्रत्येक मुक्कामी वीज पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
▪️ पाणीपुरवठ्यासाठी २५ जूनपासून नीरा उजवा कालवा सुरू करण्यात आला असून, २७६ विहीरी, ५० बोअरवेल्स तपासून सज्ज केल्या आहेत.

तसेच अन्न व औषध विभागाकडून खाद्य नमुन्यांच्या तपासणीसाठी ४ पथके, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांची डागडूजी व डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

पोलीस बंदोबस्त व शिस्तबद्ध वातावरण

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. पालखी मार्ग, तळ परिसर आणि महत्वाच्या वळणांवर पोलीस कर्मचारी तैनात असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन अत्यंत दक्ष आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments