Sunday, September 20, 2026
Homeब्लॉग"एक जबाबदारी, एक चळवळ" – कान्हेरी लेणी संवर्धन मोहिमेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

“एक जबाबदारी, एक चळवळ” – कान्हेरी लेणी संवर्धन मोहिमेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

मुंबई, बोरीवली | २५ जून २०२५ :- पावसाळा सुरू होताच पर्यटकांनी भरलेले आणि निसर्गाने नटलेले कान्हेरी लेणी परिसर (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) हे केवळ एक रमणीय स्थळ नाही, तर जगप्रसिद्ध बौद्ध महाविहार आणि शैक्षणिक वारसा असल्याचे अनेकांना ठाऊक नाही. या पवित्र परिसरात सध्या काही अज्ञानी आणि बेफिकीर लोकांकडून होणाऱ्या अश्लील वर्तनामुळे बौद्ध संस्कृतीचा अपमान होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, ‘कान्हेरी लेणी मोहिम – एक जबाबदारी, एक चळवळ’ या नावाने गेल्या वर्षीपासून सुरु असलेली जनजागृती मोहीम यंदाही दर रविवारी राबवली जात आहे. या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कान्हेरी लेणी परिसरातील बौद्ध वारशाचे संरक्षण करणे, अश्लीलतेला आळा घालणे, आणि पर्यटकांमध्ये सांस्कृतिक भान निर्माण करणे.

रविवारी पुन्हा मोहीम – सहभागी व्हा!

येत्या रविवारी, २९ जून २०२५ रोजी, पुन्हा एकदा तरुणांची टीम कान्हेरी लेणी येथे जनजागृतीसाठी दाखल होणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे नावनोंदणी सुरू केली आहे –

  1. सिद्धार्थ गायकवाड
  2. यश खुने
  3. (नोंदणी सुरू आहे)

संपर्कासाठी:

📞 सिद्धार्थ गायकवाड – 8097275909
🌐 WhatsApp समूहात सहभागी व्हा


ही मोहीम केवळ कान्हेरी लेणीपुरती मर्यादित नाही, तर आपल्या संस्कृतीच्या अस्मितेचे रक्षण करण्याचा एक लढा आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments