Thursday, July 9, 2026
Home Blog Page 198

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग सज्ज :

0
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग सज्ज :

फलटण : फलटण नगरपरिषद दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सोयी – सुविधांसाठी तत्पर असते. पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. फलटण नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे राहुल काकडे यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी स्थळावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत. एकाच वेळी आठ टँकर भरतील अशी व्यवस्था पाणी पुरवठा विभागाने केली आहे. सर्व भाविकांना शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. सर्व वारकरी, भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले जाईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. सध्या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा विभागामार्फत सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे.

महत्त्वाच्या पीक उत्पादनावर होणार परिणाम, आंबा रत्नागिरीबाहेर जाण्याची शक्यता

0
महत्त्वाच्या पीक उत्पादनावर होणार परिणाम, आंबा रत्नागिरीबाहेर जाण्याची शक्यता

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य हवामान बदल कृती आराखडा २०३०’मध्ये हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर होणाऱ्या परिणामांबाबत काही ठोस अंदाज वर्तवण्यात आले आहेत. येत्या १५ वर्षांत ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या प्रमुख शेतमालात २० ते ८० टक्क्यांनी घट होऊ शकते आणि प्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरीबाहेर हलवावा लागू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Source link

रेल्वेच्या विकासासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ठाम पाठपुरावा

0
रेल्वेच्या विकासासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ठाम पाठपुरावा

पुणे – महाराष्ट्रातील रेल्वे विकासास चालना देण्यासाठी पुण्यात मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे आणि सोलापूर विभागातील विविध रेल्वे प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडत रेल्वेच्या प्रगतीला गती देण्याची मागणी केली.

त्यांनी पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गाच्या प्रगतीची चौकशी केली आणि पंढरपूर-देहू मेमू सेवा व दौंड-कुलबर्गी-दौंड दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची गरज अधोरेखित केली. जेऊर-आष्टी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपची क्षमता वाढविणे, सांगोला-दानापूर किसान रेल्वे सुरू करणे, मोडनिंब येथे कार्गो टर्मिनलची उभारणी आणि कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर पुन्हा सुरू करणे यासारख्या विविध प्रस्तावांवर त्यांनी भर दिला.

या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब वाकचौरे, मेधाताई कुलकर्णी, विशाल पाटील, रजनीताई पाटील, नितीन पाटील, शिवाजी काळूंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘या’ आजारात सडतात शरीरातील काही भागांमधील टिश्यू, काय आहे गंभीर आजाराची लक्षणे

0
‘या’ आजारात सडतात शरीरातील काही भागांमधील टिश्यू, काय आहे गंभीर आजाराची लक्षणे

Gangrene Symptoms in Marathi: डायबेटीक फुट गँगरीन ही मधुमेहाची जीवघेणी गुंतागुंत आहे. जेव्हा पायात रक्त प्रवाह कमी होतो तेव्हा ते उद्भवते, ज्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि संसर्गामुळे ऊती मृत पावतात. अनियंत्रित रक्तातील साखर, मज्जातंतूंचे नुकसान (न्यूरोपॅथी) आणि रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे असलेल्या व्यक्तींना याचा जास्त धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास, गँगरीन पसरू शकतो, कधीकधी गँगरीन झालेला अवयव कापून टाकण्याचीही वेळ येते.

डायबेटीक फुट गँगरीनचे कारण हे नसांच्या नुकसानासह रक्ताभिसरण प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांमुळेही उद्भवते. जेव्हा नसा खराब होतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या पायांना वेदना किंवा दुखापत जाणवत नाही, ज्यामुळे लहान जखमांवर उपचार केले जात नाहीत. संसर्ग होऊ शकतो आणि रक्ताभिसरण खराब झाल्यास, शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी संघर्ष करते, ज्यामुळे ऊतींचा मृत्यू (गॅंगरीन) होतो. बोटं किंवा हातपाय गळणे तसेच संसर्ग रक्तप्रवाहात पसरल्यास सेप्सिस सारखी गुंतागुंत होऊ शकते. याबाब दिलेली माहिती डॉ. अशांक बन्सल – व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टयांनी दिली आहे. 

ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका

पायांची बोटं काळी पडणे: गॅंगरीनच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे पायांची बोटं काळी पडणे. रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे ऊती मृत पावल्याने ही समस्या उद्भवते. म्हणूनच याबाबतीत त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पाय सुन्न होणे: संवेदना कमी होणे हे देखील एक सांकेतिक लक्षणे समजले जाते. याचाच अर्थ मज्जातंतूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पायाला झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करु नका.

पायांचे अल्सर किंवा उघड्या जखमा ज्या बऱ्या होत नाहीत.

पायात सूज, लालसरपणा किंवा उष्णता जखमेतून येणारा दुर्गंधी तसेच पायांमध्ये अचानक किंवा वाढणारी वेदना, संक्रमण पसरल्यास ताप किंवा थंडी वाजणे . या वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल.

उपाय काय?

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे

संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर करणे

जखम स्वच्छ करणे आणि मलमपट्टी करणे

मृत ऊती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा गंभीर प्रकरणांमध्ये, संसर्ग झालेला अवयव कापावा लागणे 

औषधे किंवा रक्तवहिन्यासंबंधी प्रक्रियांद्वारे रक्त परिसंचरण सुधारणे

प्रतिबंधात्मक उपाय: पायांमध्ये झालेली जखम, फोड किंवा पायांचा रंग बदल तपासणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, आरामदायी तसेच चांगली फिटिंग असलेले शूज वापरणे, अनवाणी चालणे टाळा आणि त्वचेत काही असामान्य बदल दिसल्यास त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या.

पायांची चांगली काळजी घेतल्यास डायबेटीक फुट गॅंगरीन टाळता येते. बोटं काळी पडणे आणि पाय सुन्न पडणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.  तुमचे पाय आणि तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच वैद्यकीय मदत घ्या.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

Source link

‘पप्पा…’ इतकंच बोलला अन् बसच्या खिडकीबाहेर मुंडकं; आतमध्ये शरीर, 11 वर्षाच्या लेकाचा विचित्र अपघातात मृत्यू!

0
‘पप्पा…’ इतकंच बोलला अन् बसच्या खिडकीबाहेर मुंडकं; आतमध्ये शरीर, 11 वर्षाच्या लेकाचा विचित्र अपघातात मृत्यू!

Hathras road accident: जमिनीवर चिखलात मान पडल्याचे पाहून त्याचे काका मान उचलण्यासाठी धावले 

Source link

देसी की पांढरे अंडे, कोणते आरोग्यदायी आहे? काय सांगतात पोषणतज्ज्ञ?

0
देसी की पांढरे अंडे, कोणते आरोग्यदायी आहे? काय सांगतात पोषणतज्ज्ञ?

Desi Egg Vs White Egg : ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, हे तर आपण लहानपणापासून ऐक आलो आहोत. आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर आपल्याला अंडी खायला सांगतात. लहान मुलं असो किंवा प्रौढ अंडे सर्वांसाठी आरोग्यसाठी फायदेशीर मानले गेले आहे. अंडी ही पौष्टिक आणि किफायतशीर अन्न असल्याने ते सर्वांना आवडतं. अंड्यातून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्रोत आपल्याला मिळतो. जीममध्ये व्यायाम करणारी, खेळात सक्रीय असणारी लोक अंड खाण्यावर जास्त भर देतात. पण देसी (तपकिरी) की पांढरे अंडे नेमकं आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, याबद्दल आजही अनेकांच्या मनात गोंधळ आहे. तुम्हालाही हीच समस्या असेल तर पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी पोषण आणि दोन्हीचे फायदे याबद्दल सांगितलं आहे.

सर्वात प्रथम अंड्याचे रंगाबद्दल जाणून घेऊयात. देशी अंडी भारतीय किंवा स्थानिक कोंबड्यांच्या जातींपासून येतात. जसे की देसी बंकर कोंबडी. ही अंडी हलक्या तपकिरी किंवा तपकिरी रंगाची देतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा थर जातीच्या (जसे की व्हाईट लेगहॉर्न) कोंबड्यांपासून येतात. अंड्याचा रंग केवळ कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो, पोषणावर नसतो हे विशेष जाऊन घ्या. 

दोन्ही अंड्यांमधील पोषणात नेमका काय फरक आहे?

देशी अंड्यांमध्ये सामान्यतः थोडे जास्त पोषक घटक असून देशी कोंबड्या खुल्या वातावरणात राहतात आणि नैसर्गिक आहार (कीटक, बिया, हिरवी पाने इ.) खातात. त्यामुळे त्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन जास्त असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. तर पांढरी अंडी सामान्यतः पोल्ट्री फार्ममध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपासून मिळतात. जिथे त्यांना संतुलित आणि नियंत्रित आहार दिला जातो. ही अंडी स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध असतात. कोंबड्यांना पौष्टिक आहार मिळाल्यास त्यांचे पोषण भारतीय अंड्यांसारखेच दिसतातय. जरी सहसा त्यांचे पोषण थोडे कमी असतं. पांढऱ्या अंड्यांचे कवच पातळ असते, ज्यामुळे ते तोडणे सोपे असतं. 

स्वाद कोणाचा चांगला?

देशी अंड्यांचा स्वाद थोडासा घट्ट आणि जाड असतो. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, देशी अंडी जास्त ‘तृप्त’ असतात. दुसरीकडे, पांढरी अंडी हलकी आणि सहज पचणारी असतात, म्हणून मुलं आणि वृद्धांना ती खाण्याचा सल्ला दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे देशी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा महाग असतात कारण देशी कोंबड्या वाढवण्यासाठी जास्त वेळ आणि पैसा लागतो. पांढरी अंडी सर्वत्र सहज उपलब्ध असतात आणि बजेटला अनुकूल मिळतात. 

आरोग्यासाठी काय फायदेशीर?

जर तुम्ही अधिक पोषण, नैसर्गिक स्रोत आणि निरोगी चरबी शोधत असाल तर देशी अंडी थोडी जास्त फायदेशीर आहेत. पण जर तुम्हाला बजेट आणि सहज पचण्याजोगा पर्याय हवा असेल तर पांढरी अंडी देखील एक चांगला पर्याय आहे. दोन्हीही त्यांच्या स्वतःच्या पातळीवर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तुम्हाला फक्त संतुलन आणि गरजेनुसार निवड करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)  

Source link

ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही अवघ्या 2 मिनिटांत ओळखा; डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

0
ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही अवघ्या 2 मिनिटांत ओळखा; डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

Breast Cancer Self Exam Test: जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण सतत नोंदवले जात आहेत. अलिकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका अहवालात म्हटले आहे की २०५० पर्यंत दरवर्षी सुमारे ३२ लाख (३.२ दशलक्ष) स्तनाच्या कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळतील. येत्या काळात हा आजार किती भयानक रूप धारण करणार आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, महिलांनी जागरूक राहणे आणि त्याची लक्षणे काळजीपूर्वक समजून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून हा आजार वेळेत ओळखता येईल आणि त्यावर उपचार करता येतील.

डॉ. आकांक्षा श्रीवास्तव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर स्तनाच्या कर्करोगाच्या स्व-तपासणीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या चाचणीद्वारे, त्यांनी सांगितले की तुम्ही काही मिनिटांत आरशासमोर उभे राहून स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे तपासू शकता.

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्य 

डॉ. आकांक्षा श्रीवास्तव म्हणतात की सध्या भारतातील महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. चिंताजनक बाब म्हणजे या कर्करोगामुळे महिलांचा मृत्यूदरही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत महिलांनी या आजाराबाबत जागरूक असणे खूप महत्वाचे झाले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की यासाठी महिलांनी महिन्यातून एकदा नियमितपणे त्यांचे स्तन तपासले पाहिजेत. ही एक सोपी आणि महत्त्वाची पद्धत आहे, ज्याद्वारे लक्षणे ओळखता येतात.

कोणती चाचणी कराल?

ती पुढे म्हणते की जर तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर मासिक पाळी संपल्यानंतर दर महिन्याला एकदा स्वतः स्तन तपासणी करा. मासिक पाळीनंतर ही प्रक्रिया चांगली असते कारण त्या वेळी स्तनाच्या ऊती मऊ असतात, त्यामुळे यावेळी ते चांगले असते.

निपल्समध्ये दिसतो बदल?  

सर्वप्रथम, आरशासमोर उभे राहून तुमच्या दोन्ही स्तनांची तपासणी करा. आकारात कोणताही फरक नाही का याकडे लक्ष द्या. कोणताही भाग आतल्या बाजूने बुडलेला दिसतो का, त्वचेवर काही आकुंचन किंवा ताण येत आहे का ते पहा. कुठेही काही रेषा आहेत का? स्तनाग्र सामान्य आहेत का किंवा कुठेतरी आतल्या बाजूने वाकलेले आहेत का ते देखील तपासा. स्तनांच्या त्वचेचा पोत संत्र्याच्या सालीसारखा झाला आहे का ते तपासा.

गाठ कशी तपासाल?

दोन्ही स्तनांची तपासणी केल्यानंतर, पुढची पायरी म्हणजे पॅल्पेशन म्हणजे हाताने अनुभवून तपासणी. या प्रक्रियेत, तुम्हाला बोटांच्या मदतीने स्तनाला गोलाकार हालचालीत हळूहळू दाबावे लागेल. खालपासून वरपर्यंत तपासणी सुरू करा आणि नंतर उजव्या किंवा डाव्या स्तनापासून सुरुवात करा आणि प्रत्येक भाग काळजीपूर्वक अनुभवा. स्तनात काही गाठ किंवा सूज जाणवते का ते पहा. स्तनाची तपासणी केल्यानंतर, दोन्ही काखेची तपासणी करणे देखील खूप महत्वाचे आहे, कारण तेथेही गाठ किंवा सूज येऊ शकते. बोटांनी हलक्या दाबाने काखेची तपासणी देखील करा.

आंघोळ करताना काय काळजी घ्या? 

डॉ. श्रीवास्तव म्हणतात की जर तुम्ही आंघोळ करताना स्वतः स्तनांची तपासणी केली तर ते चांगले आहे. कारण त्यावेळी शरीर ओले असते आणि हातात साबण असल्याने हात त्वचेवर सहजपणे सरकतो. ज्यामुळे कोणतीही गाठ जाणवणे सोपे होते. जर तुम्ही त्यावेळी ते करू शकत नसाल, तर तुम्ही हातात तेल किंवा लोशन घेऊनही ही चाचणी करू शकता.

कसं ओळखाल? 

कधी घ्याल डॉक्टरची मदत?

डॉक्टर शेवटी म्हणतात की, अशा प्रकारे तुम्ही स्वतः लक्षणे जाणून घेऊन सतर्क राहू शकता. तसेच, जर कोणतीही असामान्य लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Source link

ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही अवघ्या 2 मिनिटांत ओळखा; डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

0
ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही अवघ्या 2 मिनिटांत ओळखा; डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण सतत नोंदवले जात आहेत. अलिकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका अहवालात म्हटले आहे की २०५० पर्यंत दरवर्षी सुमारे ३२ लाख (३.२ दशलक्ष) स्तनाच्या कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळतील. येत्या काळात हा आजार किती भयानक रूप धारण करणार आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, महिलांनी जागरूक राहणे आणि त्याची लक्षणे काळजीपूर्वक समजून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून हा आजार वेळेत ओळखता येईल आणि त्यावर उपचार करता येतील.

डॉ. आकांक्षा श्रीवास्तव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर स्तनाच्या कर्करोगाच्या स्व-तपासणीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या चाचणीद्वारे, त्यांनी सांगितले की तुम्ही काही मिनिटांत आरशासमोर उभे राहून स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे तपासू शकता.

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्य 

डॉ. आकांक्षा श्रीवास्तव म्हणतात की सध्या भारतातील महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. चिंताजनक बाब म्हणजे या कर्करोगामुळे महिलांचा मृत्यूदरही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत महिलांनी या आजाराबाबत जागरूक असणे खूप महत्वाचे झाले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की यासाठी महिलांनी महिन्यातून एकदा नियमितपणे त्यांचे स्तन तपासले पाहिजेत. ही एक सोपी आणि महत्त्वाची पद्धत आहे, ज्याद्वारे लक्षणे ओळखता येतात.

कोणती चाचणी कराल?

ती पुढे म्हणते की जर तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर मासिक पाळी संपल्यानंतर दर महिन्याला एकदा स्वतः स्तन तपासणी करा. मासिक पाळीनंतर ही प्रक्रिया चांगली असते कारण त्या वेळी स्तनाच्या ऊती मऊ असतात, त्यामुळे यावेळी ते चांगले असते.

निपल्समध्ये दिसतो बदल?  

सर्वप्रथम, आरशासमोर उभे राहून तुमच्या दोन्ही स्तनांची तपासणी करा. आकारात कोणताही फरक नाही का याकडे लक्ष द्या. कोणताही भाग आतल्या बाजूने बुडलेला दिसतो का, त्वचेवर काही आकुंचन किंवा ताण येत आहे का ते पहा. कुठेही काही रेषा आहेत का? स्तनाग्र सामान्य आहेत का किंवा कुठेतरी आतल्या बाजूने वाकलेले आहेत का ते देखील तपासा. स्तनांच्या त्वचेचा पोत संत्र्याच्या सालीसारखा झाला आहे का ते तपासा.

गाठ कशी तपासाल?

दोन्ही स्तनांची तपासणी केल्यानंतर, पुढची पायरी म्हणजे पॅल्पेशन म्हणजे हाताने अनुभवून तपासणी. या प्रक्रियेत, तुम्हाला बोटांच्या मदतीने स्तनाला गोलाकार हालचालीत हळूहळू दाबावे लागेल. खालपासून वरपर्यंत तपासणी सुरू करा आणि नंतर उजव्या किंवा डाव्या स्तनापासून सुरुवात करा आणि प्रत्येक भाग काळजीपूर्वक अनुभवा. स्तनात काही गाठ किंवा सूज जाणवते का ते पहा. स्तनाची तपासणी केल्यानंतर, दोन्ही काखेची तपासणी करणे देखील खूप महत्वाचे आहे, कारण तेथेही गाठ किंवा सूज येऊ शकते. बोटांनी हलक्या दाबाने काखेची तपासणी देखील करा.

आंघोळ करताना काय काळजी घ्या? 

डॉ. श्रीवास्तव म्हणतात की जर तुम्ही आंघोळ करताना स्वतः स्तनांची तपासणी केली तर ते चांगले आहे. कारण त्यावेळी शरीर ओले असते आणि हातात साबण असल्याने हात त्वचेवर सहजपणे सरकतो. ज्यामुळे कोणतीही गाठ जाणवणे सोपे होते. जर तुम्ही त्यावेळी ते करू शकत नसाल, तर तुम्ही हातात तेल किंवा लोशन घेऊनही ही चाचणी करू शकता.

कसं ओळखाल? 

कधी घ्याल डॉक्टरची मदत?

डॉक्टर शेवटी म्हणतात की, अशा प्रकारे तुम्ही स्वतः लक्षणे जाणून घेऊन सतर्क राहू शकता. तसेच, जर कोणतीही असामान्य लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Source link

आई वडिलांच्या एका चुकीमुळे 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टर म्हणाले, ‘अतिसार असताना चुकूनही…’

0
आई वडिलांच्या एका चुकीमुळे 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टर म्हणाले, ‘अतिसार असताना चुकूनही…’

प्रत्येक पालकांसाठी त्याच मुलं हे जीव की प्राण असतं. मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि ते निरोगी राहावेत म्हणून आई वडील आपल्या दिवसरात्र एक करत असतात. मुलांची जरा तरी तब्येत खराब झाली की पालकांच्या जीव नकोसा होतो. मुलांचं संगोपन करणे, त्यांना निरोगी ठेवणे ही जबाबदारी पूर्णपणे आई वडिलांची असते. पण कधी कधी तुमची नकळत घडलेली चूक तुम्हाला मोठ्या महागात पडू शकते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पालकांच्या एका चुकीमुळे त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

मुलीला अतिसार असताना त्यांनी तिला…

बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या घटनेबद्दल सांगितलं आहे. ते या व्हिडीओमध्ये म्हणाले की, एका 9 वर्षांच्या मुलीला जुलाब झाले होते. ज्यामुळे ती काहीही खात-पीत नव्हती. जुलाब आणि त्यात ती काही खात नव्हती त्यामुळे तिला कमजोरी आली होती. तिच्या शरीरात पाण्याची कमतरता आली होती. अशात पालकांना काळजी वाटू लागली. तिच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली होती. या भीतीमुळे, पालकांनी तिला रात्रभर वारंवार साखरेचे पाणी दिलं. जेणे करुन साखर पाण्याने तिची प्रकृती सुधारेल. 

डॉक्टर पवन म्हणतात की, आईवडील रात्रभर मुलीला साखरेचे पाणी देत ​​राहिले आणि सकाळपर्यंत मुलाची साखरेची पातळी 500 च्या वर पोहोचली. त्या मुलीची प्रकृती सुधारण्याऐवजी इतकी बिकट झाली की मुलगी कोमात गेली आणि तिची प्रकृती गंभीर झाली. जेव्हा तिला अतिसार होतो तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. यावेळी साखरेचे पाणी दिल्यास साखरेचे प्रमाण अचानक वाढतं आणि त्यामुळे डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस सारखा आजार होतो. यामुळे मेंदूला सूज येते आणि नंतर मूल कोमात जातं.

फक्त WHO ने मान्यता दिलेले ORS द्या

डॉ. मांडविया म्हणतात की, अतिसार झाल्यास, मग तो लहान मुलगा असो वा प्रौढ, सर्वांना फक्त WHO-मान्यताप्राप्त ORS द्यावं. तसंच, मुलाला कधीही घरी बनवलेले साखर मिसळलेले पाणी किंवा घरी बनवलेला रस चुकूनही देऊ नका. 

ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा

डॉ. पवन पुढे म्हणतात की, जर मूल ओआरएस सोल्यूशन किंवा पाणी पीत नसेल, तर घरी बनवलेले लिंबू किंवा साखरेच्या पाण्याचे द्रावण देऊ नका, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

Source link

फक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत ‘ही’ 8 कारण, 99 टक्के लोकांना माहित नाही

0
फक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत ‘ही’ 8 कारण, 99 टक्के लोकांना माहित नाही

Dark Circles Under Eyes Reasons in Marathi : डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स दिसतात, त्यांना आपण झोपेची कमतरता किंवा थकवा असं समजतो. पण खरं सांगायचं झालं, तर हे तुमच्या शरीरातील काही आरोग्याच्या तक्रारींचं लक्षण सुद्धा असू शकतं. आज आपण डार्क सर्कल्स नक्की काय आहेत आणि ते कोणत्या गोष्टींचा इशारा देतात या विषयी जाणून घेणार आहोत. 

डार्क सर्कल्स म्हणजे काय?

डोळ्यांच्या खालील त्वचा जर तुमच्या इतर चेहर्‍याच्या रंगापेक्षा काळी वाटत असेल, तर त्याला डार्क सर्कल्स म्हणतात. त्याचा रंग काही वेळा जरा जास्त भूरा, काळसर दिसू शकतो.

हे अनेक वेळा आपल्या लाइफ्स्टाईलमुळे उदा. झोपेचा अभाव, स्क्रीन टाइम, थकवा या सगळ्यामुळे होतात. पण काही वेळा हे आरोग्याशी संबंधित सिग्नलही असतात.

डार्क सर्कल्स आरोग्याबद्दल काय सांगतात?

अ‍ॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता) 
जर शरीरात आयर्न कमी असेल, तर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. त्यामुळे थकवा येतो आणि डार्क सर्कल्स दिसू शकतात.

थायरॉइडची समस्या
थायरॉइड ग्रंथी म्हणजे हार्मोन्सचं संतुलन बिघडवलं, तरही डार्क सर्कल्स दिसू शकतात.

व्हिटॅमिन्सची कमतरता
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन्स B, K, E आणि D या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेला पोषण नीट मिळत नाही आणि डार्क सर्कल्स तयार होतात.

शरिरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
जर तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल, तर त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डार्क सर्कल्स दिसतात.

हायपरपिग्मेंटेशन 
उन्हात सतत राहिल्यानं त्वचेत मेलानिनचं प्रमाण वाढतं आणि त्वचा काळसर दिसू लागते, ज्यामुळे डार्क सर्कल्स अधिक जाणवतात.

डर्मेटायटिस (त्वचारोग)
या आजारात त्वचा कोरडी, लालसर होते आणि सूज येते. डोळ्यांजवळच्या रक्तवाहिन्या दिसू लागतात आणि त्यामुळे डार्क सर्कल्स जाणवतात.

अ‍ॅलर्जी
काही लोकांना धुळीपासून, परागकणांपासून किंवा हवामान बदलापासून अ‍ॅलर्जी होते, ज्यामुळे डोळ्यांजवळ सूज आणि डार्क सर्कल्स दिसतात.

इतर कारणं
डोळे सतत चोळणे, वंशपरंपरेने मिळणारे डार्क सर्कल्स, वाढती वयोमर्यादा, सततचा तणाव, धूम्रपान, झोपेचा अभाव यामुळेही ही समस्या उद्भवते.

डार्क सर्कल्स कमी कसे करावे?

संतुलित आहार घ्या

भाज्या, फळं, मासे, दही खा. चिप्स, बिस्किट्स आणि पॅकेज्ड फूड टाळा. मीठ आणि साखरेचे प्रमाणही कमी करा.

झोप 
भरपूर झोप घ्या अर्थात दररोज किमान 8 तास झोप आवश्यक आहे.

पाणी प्या 
दिवसभरात 7-8 ग्लास पाणी तरी नक्कीच प्यावे. त्यासोबत नारळपाणी, ताकसुद्धा उपयोगी ठरतात.

त्वचा मॉइश्चराइज ठेवा 
डोळ्यांजवळची त्वचा कोरडी होऊ नये यासाठी मॉइश्चरायझर वापरा. डॉक्टरच्या सल्ल्याने रेटिनॉल किंवा अ‍ॅल्जेइक अ‍ॅसिड वापरू शकता.

सनस्क्रीन वापरा
घराबाहेर पडताना डोळ्यांच्या आसपासही हलकं सनस्क्रीन लावा.

धूम्रपान आणि दारू टाळा
धूम्रपान आणि दारू या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 

फेशियल मसाज करा 
मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि डार्क सर्कल्स थोडे लाइट होतात.

डॉक्टरांचा सल्ला

लाइफस्टाइल बदलूनही फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer – येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

Source link