Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्ररेल्वेच्या विकासासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ठाम पाठपुरावा

रेल्वेच्या विकासासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ठाम पाठपुरावा

पुणे – महाराष्ट्रातील रेल्वे विकासास चालना देण्यासाठी पुण्यात मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे आणि सोलापूर विभागातील विविध रेल्वे प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडत रेल्वेच्या प्रगतीला गती देण्याची मागणी केली.

त्यांनी पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गाच्या प्रगतीची चौकशी केली आणि पंढरपूर-देहू मेमू सेवा व दौंड-कुलबर्गी-दौंड दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची गरज अधोरेखित केली. जेऊर-आष्टी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपची क्षमता वाढविणे, सांगोला-दानापूर किसान रेल्वे सुरू करणे, मोडनिंब येथे कार्गो टर्मिनलची उभारणी आणि कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर पुन्हा सुरू करणे यासारख्या विविध प्रस्तावांवर त्यांनी भर दिला.

या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब वाकचौरे, मेधाताई कुलकर्णी, विशाल पाटील, रजनीताई पाटील, नितीन पाटील, शिवाजी काळूंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments