Tuesday, August 11, 2026
Homeआरोग्यफक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत 'ही' 8 कारण,...

फक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत ‘ही’ 8 कारण, 99 टक्के लोकांना माहित नाही

फक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत ‘ही’ 8 कारण, 99 टक्के लोकांना माहित नाही

[ad_1]

Dark Circles Under Eyes Reasons in Marathi : डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स दिसतात, त्यांना आपण झोपेची कमतरता किंवा थकवा असं समजतो. पण खरं सांगायचं झालं, तर हे तुमच्या शरीरातील काही आरोग्याच्या तक्रारींचं लक्षण सुद्धा असू शकतं. आज आपण डार्क सर्कल्स नक्की काय आहेत आणि ते कोणत्या गोष्टींचा इशारा देतात या विषयी जाणून घेणार आहोत. 

डार्क सर्कल्स म्हणजे काय?

डोळ्यांच्या खालील त्वचा जर तुमच्या इतर चेहर्‍याच्या रंगापेक्षा काळी वाटत असेल, तर त्याला डार्क सर्कल्स म्हणतात. त्याचा रंग काही वेळा जरा जास्त भूरा, काळसर दिसू शकतो.

हे अनेक वेळा आपल्या लाइफ्स्टाईलमुळे उदा. झोपेचा अभाव, स्क्रीन टाइम, थकवा या सगळ्यामुळे होतात. पण काही वेळा हे आरोग्याशी संबंधित सिग्नलही असतात.

डार्क सर्कल्स आरोग्याबद्दल काय सांगतात?

अ‍ॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता) 
जर शरीरात आयर्न कमी असेल, तर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. त्यामुळे थकवा येतो आणि डार्क सर्कल्स दिसू शकतात.

थायरॉइडची समस्या
थायरॉइड ग्रंथी म्हणजे हार्मोन्सचं संतुलन बिघडवलं, तरही डार्क सर्कल्स दिसू शकतात.

व्हिटॅमिन्सची कमतरता
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन्स B, K, E आणि D या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेला पोषण नीट मिळत नाही आणि डार्क सर्कल्स तयार होतात.

शरिरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
जर तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल, तर त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डार्क सर्कल्स दिसतात.

हायपरपिग्मेंटेशन 
उन्हात सतत राहिल्यानं त्वचेत मेलानिनचं प्रमाण वाढतं आणि त्वचा काळसर दिसू लागते, ज्यामुळे डार्क सर्कल्स अधिक जाणवतात.

डर्मेटायटिस (त्वचारोग)
या आजारात त्वचा कोरडी, लालसर होते आणि सूज येते. डोळ्यांजवळच्या रक्तवाहिन्या दिसू लागतात आणि त्यामुळे डार्क सर्कल्स जाणवतात.

अ‍ॅलर्जी
काही लोकांना धुळीपासून, परागकणांपासून किंवा हवामान बदलापासून अ‍ॅलर्जी होते, ज्यामुळे डोळ्यांजवळ सूज आणि डार्क सर्कल्स दिसतात.

इतर कारणं
डोळे सतत चोळणे, वंशपरंपरेने मिळणारे डार्क सर्कल्स, वाढती वयोमर्यादा, सततचा तणाव, धूम्रपान, झोपेचा अभाव यामुळेही ही समस्या उद्भवते.

डार्क सर्कल्स कमी कसे करावे?

संतुलित आहार घ्या

भाज्या, फळं, मासे, दही खा. चिप्स, बिस्किट्स आणि पॅकेज्ड फूड टाळा. मीठ आणि साखरेचे प्रमाणही कमी करा.

झोप 
भरपूर झोप घ्या अर्थात दररोज किमान 8 तास झोप आवश्यक आहे.

पाणी प्या 
दिवसभरात 7-8 ग्लास पाणी तरी नक्कीच प्यावे. त्यासोबत नारळपाणी, ताकसुद्धा उपयोगी ठरतात.

त्वचा मॉइश्चराइज ठेवा 
डोळ्यांजवळची त्वचा कोरडी होऊ नये यासाठी मॉइश्चरायझर वापरा. डॉक्टरच्या सल्ल्याने रेटिनॉल किंवा अ‍ॅल्जेइक अ‍ॅसिड वापरू शकता.

सनस्क्रीन वापरा
घराबाहेर पडताना डोळ्यांच्या आसपासही हलकं सनस्क्रीन लावा.

धूम्रपान आणि दारू टाळा
धूम्रपान आणि दारू या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 

फेशियल मसाज करा 
मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि डार्क सर्कल्स थोडे लाइट होतात.

डॉक्टरांचा सल्ला

लाइफस्टाइल बदलूनही फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer – येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments