Tuesday, August 11, 2026
Homeसातारा"सत्य, नम्रता आणि सेवा भावनेचा संगम – सचिन सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!"

“सत्य, नम्रता आणि सेवा भावनेचा संगम – सचिन सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!”

नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांचा वाढदिवस

फलटण (प्रतिनिधी) – नम्रता, दयाळूपणा, सत्यनिष्ठा, जबाबदारी, सकारात्मकता आणि धैर्य अशा अनेक सद्गुणांचा संगम म्हणजे नगरसेवक सचिन रमेश अहिवळे सर. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण फलटण शहरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सचिन सर हे फलटण नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक असून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे घडत आहे.

ते नेहमी नम्र आणि विनम्र स्वभावाने लोकांशी संवाद साधतात. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणं, प्रामाणिकपणे काम करणं आणि कोणत्याही अडचणींमध्ये सकारात्मक दृष्टी ठेवणं, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.

त्यांच्या कार्यातून आणि विचारातून अनेकांना प्रेरणा मिळते. समाजहितासाठी झटणाऱ्या, सदैव लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अशा या लोकनेत्याला ‘साहस टाइम्स’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🎉 Happy Birthday Sachin Sir! 🎁🎂
💐 आपले आयुष्य उत्तरोत्तर यशस्वी आणि समृद्ध होवो, हीच प्रार्थना! 🙏

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments