Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रपैशांच्या बदल्यात पर्यवेक्षक नेमणुकीचा सौदा; बारामतीत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी लाच घेताना...

पैशांच्या बदल्यात पर्यवेक्षक नेमणुकीचा सौदा; बारामतीत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटक

बारामती, ता. २५ जून :सरकारी परीक्षा प्रक्रियेसारख्या नितीमूल्यांच्या गोष्टीतही पैशांचा सौदा सुरू असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य आणि सध्या प्राचार्यपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अवधूत भिमाजी जाधवर (वय ५३) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २४ जून) बारामती शहरातील सिटी इन हॉटेलजवळ करण्यात आली.

या प्रकरणी जाधवर यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार हे एका खासगी पॅरामेडिकल संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेतील परीक्षेसाठी शासकीय पर्यवेक्षक नियुक्त करणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी संबंधित शासकीय आयटीआय संस्थेकडे लेखी विनंती केली होती. यावर जाधवर यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये या दराने ४५ विद्यार्थ्यांच्या बदल्यात एकूण ९० हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी दहा हजार रुपये आधीच देण्यात आले होते. उर्वरित ४० हजारांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली.

सापळा आणि अटकेची कारवाई

तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचत जाधवर यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल भोसले, शिपाई कोमल शेटे, कैलास महामुलकर आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

    RELATED ARTICLES

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Most Popular

    Recent Comments