Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 153

दालवडी येथे स्विफ्ट कारमधून गावठी पिस्तूल व गांजा जप्त

0
दालवडी येथे स्विफ्ट कारमधून गावठी पिस्तूल व गांजा जप्त

फलटण :-  फलटण ग्रामीण पोलिसांनी दालवडी परिसरात मोठी कारवाई करत स्विफ्ट कारमधून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि गांजा जप्त केला. या प्रकरणात कारमालक रवींद्र कोलवडकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अमली पदार्थ विरोधी कायदा आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे २८ ऑगस्ट रोजी फॉरेस्ट चेकपोस्टजवळ संशयित कारची तपासणी करण्यात आली. कारमालकाने चावी नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी गाडी उघडून पाहणी केली असता पिस्तूल, दोन काडतुसे आणि गांजा आढळून आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बडणे, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, नितीन चतुर्वे, हनुमंत दडस, तात्या कदम, तानाजी डोळे, तुषार नलावडे व कल्पेश काशिद यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बडणे करीत आहेत.

मनोज जरांगेंच्या आंदोलनास रामदास आठवलेंचा पाठिंबा, पण..; आरपीआयच्या शिबिरात ठराव मंजूर

0


सातारा : मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा ठराव मंजूर झाला. मुंबईतील आझाद मैदानात आपण 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाची तयारी करुन ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन त्यांनी आज शिवरायांचे दर्शन घेतले. दुसरीकडे त्यांच्या आंदोलनावरुन ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यातच, आता मंत्री रामदास आठवले (Ramdas athvale) यांनी मनोज जरागेंच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचा ठरावच आरपीआयच्या शिबिरात मंजूर केला.  

आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. शिबिरात पक्षवाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. तसेच, महायुतीमधून पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आरपीआय पक्षाला महामंडळ आणि मंत्रिपदे मिळतील, असा ठरावही घेण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरागेंच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घ्यावी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी, असा सल्लाही जरांगे पाटील यांना आठवलेंकडून देण्यात आला आहे. 

ठाकरे बंधूंच्या युतीचा फुसका बार 

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. याउलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदाच होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. या मराठी मतांमध्ये सुद्धा 20 ते 22 टक्के मतं आमच्या बाजूने आहेत. हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसका बार असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. तसेच, यापुढील निवडणुकीत ते दोघे हारणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

हेही वाचा

गणरायाचे आगमन, मुंबईसह मराठवाड्यात पुन्हा जोर’धार’; नांदेड, लातूरमध्ये पाणीच पाणी, गावांचा संपर्क तुटला

आणखी वाचा



Source link

फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांची हरकत

0
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांची हरकत

फलटण – फलटण नगरपरिषदेत आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेबाबत सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख यांनी अधिकृत हरकत नोंदविली आहे. प्रभाग क्र. 10, 11 आणि 13 या रचनेत झालेल्या त्रुटींवर त्यांनी नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप सादर केला.

हरकत नोंदविताना शेख यांनी नागरिकांच्या सुलभतेसाठी आणि न्याय्य प्रतिनिधित्वासाठी प्रभागांचे पुनर्विलोकन करण्याची मागणी केली. यावेळी नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

फलटण तालुक्यातून ‘चलो मुंबई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण तालुक्यातून ‘चलो मुंबई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला निर्णायक टप्पा मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’ च्या हाकेला फलटण तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आज गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी हजारो मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले.

जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान केले असून ते 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तसेच अखंड मराठा समाजाने गेल्या आठ दिवसांत गावागावात जनजागृती मोहीम राबवली.

समन्वयकांनी घोषणा दिली –
“आता कुठे जायचं? मुंबईला जायचं!”

हजारो वाहने मुंबईच्या दिशेने निघाली असून, “आरक्षण मिळाल्याशिवाय परतायचं नाही” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल

0
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल

सातारा : राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीची २००२ पासून चालत आलेली चक्राकार आरक्षण पद्धत रद्द करत नवे नियम जाहीर केले आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय समीकरणात मोठा उलथापालथ होणार असून इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

नव्या नियमानुसार अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठीचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमावर आधारित असेल, तर ओबीसी व महिलांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतील ६५ गटांपैकी अंदाजे ६ गट अनुसूचित जातीसाठी, तर ४ गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकतात. या गटांपैकी निम्मे गट महिलांसाठी राखीव राहतील.

ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण असणार असून, साधारण १८ जागा या प्रवर्गासाठी राखीव असतील. यातील निम्म्या म्हणजे ९ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव राहतील. पंचायत समित्यांमध्ये देखील याचप्रमाणे आरक्षणाचे वाटप होईल.

आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पद्धत बदलल्याने आता अनेकांची समीकरणे बिघडणार आहेत. पुढील काही दिवसांत आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांसाठीही हीच नवी पद्धत लागू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतून 550 किलो बनावट पनीर जप्त! पनीरच्या नावाखाली ‘चीझ अ‍ॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अ‍ॅनालॉग’ म्हणजे काय?

0
मुंबईतून 550 किलो बनावट पनीर जप्त! पनीरच्या नावाखाली ‘चीझ अ‍ॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अ‍ॅनालॉग’ म्हणजे काय?


Fake Paneer In Mumbai: आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सव आणि सणासुदीची घाईगडबड हेरून मुंबई शहरात फसवणुकीचा एक वेगळाच पॅटर्न समोर आला आहे. नफेखोरांकडून पनीरऐवजी ‘चीझ अ‍ॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईतून ही गंभीर बाब समोर आली. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल 550 किलो चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले असून खोट्या पनीरच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.

Add Zee News as a Preferred Source

कारवाईत कोणाकोणाचा सहभाग

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. अ‍ॅन्टॉप हिलमधील जीटीबी नगर परिसरात ज्या दोन डेअरींवर कारवाई करण्यात आली त्यांची नाव, ‘ओम कोल्ड्रींक हाऊस’ व ‘श्री गणेश डेअरी’ अशी आहेत. या दोन्ही डेअरींचे मालक पनीरच्या नावाखाली ‘चीझ अ‍ॅनालॉग’ची विक्री करत होते. सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे, पोलिस उपनिरिक्षक नंदकिशोर बोरोले यांच्या पथकाने छापा टाकून दोन्ही डेअरीतून भेसळयुक्त पनीर जप्त केले.

कारवाईचा इशारा

हॉटेल, केटरिंग व्यवसायिक असे भेसळयुक्त पदार्थ स्वस्त दरात विकत घेतात. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ साठवणे किंवा विकणे टाळा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

काय आहे ‘चीझ अ‍ॅनालॉग’?

‘चीझ अ‍ॅनालॉग’ हा पदार्थ चीझसारखाच दिसतो, मात्र तो दूधाऐवजी दुधाची पावडर, पाम तेल आणि रसायनांपासून बनवला जातो. जे लोक दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाहीत किंवा टाळतात, त्यांच्यासाठी ‘चीझ अ‍ॅनालॉग’ तयार केले जाते. या पदार्थात प्रथिने, कॅल्शिअम व नैसर्गिक चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असते. एफएसएसएआयच्या नियमानुसार, अशा पदार्थांवर ‘चीझ अ‍ॅनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे.

ही घ्या काळजी

पनीर व दुग्धजन्य पदार्थ नेहमी विश्वसनीय ब्रँड व लेबल असलेल्या पॅकिंगमध्ये खरेदी करा.
सुट्टे/लेबल नसलेले पनीर खरेदी करण्याचे टाळा.
खरे पनीर हे दाणेदार असते आणि त्याला नैसर्गिक गंध असतो; तर बनावट पनीर मेणासारखे वाटते.

FAQ

चीझ अ‍ॅनालॉग म्हणजे काय?
चीझ अ‍ॅनालॉग हा चीझसारखा दिसणारा पदार्थ आहे, जो दूधाऐवजी दुधाची पावडर, पाम तेल आणि रसायनांपासून बनवला जातो. हा पदार्थ प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थ टाळणाऱ्यांसाठी तयार केला जातो. यात प्रथिने, कॅल्शिअम आणि नैसर्गिक चरबीचे प्रमाण खूप कमी असते.

चीझ अ‍ॅनालॉग आणि खऱ्या पनीरमध्ये काय फरक आहे?
खरे पनीर हे दूधापासून बनवले जाते, त्याला दाणेदार पोत आणि नैसर्गिक गंध असतो. चीझ अ‍ॅनालॉग मात्र कृत्रिम पदार्थांपासून बनवले जाते आणि त्याचा पोत मेणासारखा असतो. FSSAI नियमानुसार, चीझ अ‍ॅनालॉगवर तसा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे.

मुंबईत चीझ अ‍ॅनालॉगच्या फसवणुकीची प्रकरणे कशी समोर आली?
गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल परिसरात गुन्हे शाखेने दोन डेअरींवर छापा टाकला. यात ‘ओम कोल्ड्रींक हाऊस’ आणि ‘श्री गणेश डेअरी’ या डेअरींमधून 550 किलो चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले, जे पनीरच्या नावाखाली विकले जात होते.





Source link

Prime Minister Modi flags off Maruti Suzuki electric vehicle export inaugurates lithium ion battery plant

0
Prime Minister Modi flags off Maruti Suzuki electric vehicle export inaugurates lithium ion battery plant



Prime Minister Modi flags off Maruti Suzuki electric vehicle export inaugurates lithium ion battery plant | उत्पादन देशांतर्गतच होणे आवश्यक; अमेरिकेच्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून ‘स्वदेशी’चा जागर





Source link

“शिवाजीराजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात झळकदार कामगिरी; श्रेयश भोसलेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

0
“शिवाजीराजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात झळकदार कामगिरी; श्रेयश भोसलेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

फलटण : श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे, श्रेयश भोसले याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तो पुणे येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत झळकले यश

सातारा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे शाहू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रेयश भोसलेने १६ वर्षांखालील गटातील गोळाफेकमध्ये सुवर्णपदक आणि भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यामुळे त्याची २ सप्टेंबर रोजी बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय कामगिरीत पदकांचा पाऊस

फलटण तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत शाळेच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी पदके आणि प्रमाणपत्रे मिळवली.

  • सुवर्णपदक विजेते: श्लेशा काळे, श्रावणी पिंगळे, प्रणय जगताप
  • रौप्यपदक विजेते: सई नांगरे, श्रेयश भोसले, धवल नलावडे, संघर्ष मोरे
  • कांस्यपदक विजेती: आतिफा मुलानी

अभिनंदनाचा वर्षाव

संस्थेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापिका अंजुम शेख व क्रीडा शिक्षक सुहास कदम यांचे अभिनंदन केले.

बौद्ध उपासक व उपासिका यांनी धम्माचे आचार विचाराचे पालन करावे – चंद्रकांत मोहिते

0
बौद्ध उपासक व उपासिका यांनी धम्माचे आचार विचाराचे पालन करावे – चंद्रकांत मोहिते


फलटण : ‘भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पुर्ण करावयाची जबाबदारी आपल्यावर असून प्रत्येक बौध्द उपासक व उपासिका यांनी धम्माचे काटेकोर पालन करावे.आपले आचार विचारांचे पालन करावे असे आव्हान भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेतील मौजे विंचूर्णी येथे दहावे पुष्प गुंफताना केले.
यावेळी बोलताना प्रवचनकार आयु.चंद्रकांत मोहिते यांनी बौद्ध धम्मच्या आचरणाचे नियम व श्रावण पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. त्यांनी उपासक-उपासिका यांनी पंचशीलेचे पालन करुन नीतिमान जीवन जगण्याचा संदेश दिला. धम्म हा निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड सोडून देऊन धम्माचे आचरण केल्याने आपण आपला विकास करू शकता अन्यथा विनाश अटळ असल्याचे चंद्रकांत मोहिते म्हणाले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु.बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्त्व समजून सांगितले. वर्षावासाचा कालखंड हा उपासक उपासिकासाठी किती महत्वाचा आहे हे ही त्यांनी समजावून सांगितले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, तसेच संघटक आयु. विजयकुमार जगताप हे उपस्थित होते. या वेळी विंचूर्णी गावचे श्रद्धावान, शीलवान, गुणवान धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने हजर होते.

फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक विंचुर्णीतील बौद्ध उपासक व उपासिकांना देण्यात आले.याच दरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या फलटण शाखेकडून संविधान उद्देशिका आणि वंदना सूत्रपठन पुस्तिका लहान मुलांना देण्यात आली.

न्यायासाठी नवी दिशा; फलटणमध्ये पहिली दक्षता समिती स्थापन

0
न्यायासाठी नवी दिशा; फलटणमध्ये पहिली दक्षता समिती स्थापन

फलटण :-  फलटण तालुक्यात अनुसूचित जाती-जमातींसाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. १५ वर्षांनंतर प्रथमच दक्षता समितीची बैठक पार पडली असून यावेळी तज्ज्ञ आणि समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तींना समितीवर स्थान देण्यात आले आहे. ही समिती अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कार्यरत राहणार आहे.

फलटण उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नव्या समितीची स्थापना जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ५९ जातींच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही समिती महत्त्वाची ठरणार आहे.

नवीन समितीत आमदार सचिन कांबळे पाटील, माजी नगरसेविका वैशालीताई अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे आणि समाजसेवक सनी काकडे (अध्यक्ष) यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांचे शहर व तालुक्यात स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.