Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 154

घरात पूजा असल्याने पिरिएड्स थांबवायला गोळ्या घेतल्या, 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू! डॉक्टर म्हणाले, ‘रात्री 2 ला…’

0
घरात पूजा असल्याने पिरिएड्स थांबवायला गोळ्या घेतल्या, 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू! डॉक्टर म्हणाले, ‘रात्री 2 ला…’


Death By Period Medicine: सणवाराच्या दिवसांमध्ये महिलांना सर्वाधिक टेन्शन असतं ते म्हणजे मासिक पाळीचं! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये मासिक पाळी येऊ नये असं प्रत्येकीला वाटतं. या वेळात मासिक पाळी आल्यास धार्मिक कार्यांपासून दूर रहावं लागतं. त्यामुळेच अनेकदा महिला मासिक पाळी लवकर यावी किंवा पुढे ढकलण्यासाठी हार्मोनल गोळ्यांचा वापर करतात. मात्र या गोळ्यांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे. असं न केल्यास हा प्रकार अगदी जीवावरही बेतू शकतो. असाच काहीसा प्रकार एका 18 वर्षीय मुलीसोबत घडला ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं घडलं काय?

घरात पूजा असल्याने मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी 18 वर्षीय तरुणीने हार्मोन्सच्या गोळ्या खाल्ल्या. या गोळ्यांमुळे तरुणीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र याला तिच्या वडिलांनी नकार दिला. या साऱ्या गोंधळात तरुणीचा मृत्यू झाला. या विचित्र प्रकरणाची माहिती  रक्तवहिन्यासंबंधी प्रसिद्ध सर्जन (Vascular Surgeon) डॉ. विवेकानंद यांनी दिली आहे. ‘रीबूटींग द ब्रेन’ नावाच्या पॉडकास्टमध्ये डॉ. विवेकानंद यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं.

“एक 18 वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसहीत माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. तिचे पाय आणि मांड्या प्रचंड दुखत होत्या. तिच्या पायांना सूज आलेली. तिला अस्वस्थ वाटत होतं. मी तिच्याकडे हे सारं कधीपासून होतंय वगैरे विचारलं,” असं डॉ. विवेकानंद यांनी सांगितलं. त्यावर या तरुणीने डॉक्टरांना घरी पूजा असल्याने तिने परिएड्स पुढे ढकलण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्याचं सांगितलं.

तरुणीला कसला त्रास होता?

“चाचण्यांदरम्यान तरुणील डीप व्हेन थोम्बोसिस त्रास असल्याचं निदान झालं. तिच्या नाभीजवळ गाठ आलेली. आम्ही तिच्या वडिलांना फोन करुन तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल करावं लागले असं सांगितलं. मात्र या तरुणीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. तिची आई तिला उद्या घेऊन जाईल,” असं सांगितल्याचं डॉ. विवेकानंद म्हणाले. यानंतर डॉक्टर शिफ्ट संपवून घरी गेले.

मध्यरात्री 2 वाजता फोन आला अन्…

“मध्यरात्री 2 वाजता मला फोन आला की या मुलीला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. तिला श्वास घेता येत नव्हता. तोपर्यंत फार उशीर झालेला. तिचा मृत्यू झाला. तिला डीप व्हेन थोम्बोसिसचा त्रास होता. यामध्ये शिरांमध्ये रक्तांच्या गुठळ्या तयार होतात,” असं डॉ. विवेकानंद म्हणाले. पिरिएड्ससंदर्भातील गोळ्या घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं असा अंदाज बांधला जात आहे.

FAQ

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या का घेतल्या जातात?
सणासुदीच्या किंवा धार्मिक कार्यांच्या वेळी मासिक पाळीमुळे अडचण येऊ नये म्हणून अनेक महिला हार्मोनल गोळ्यांचा वापर करतात, ज्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाते.

मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे सुरक्षित आहे का?
नाही, या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते. यामुळे गंभीर दुष्परिणाम, जसे की रक्ताच्या गुठळ्या (डीप व्हेन थ्रोम्बोसिस) होऊ शकतात, ज्याचा परिणाम जीवावरही बेतू शकतो.

18 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे कारण काय होते?
घरात पूजेसाठी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी तिने हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या. यामुळे तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) झाला, ज्यामध्ये तिच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने तिचा मृत्यू झाला.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणजे काय?
डीप व्हेन थ्रोम्बोसिस हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील खोल शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे वेदना, सूज आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, ज्याचा परिणाम मृत्यूदेखील होऊ शकतो.





Source link

संसदीय प्रणालीचा नितांत आदर आहे, म्हणूनच…

0
संसदीय प्रणालीचा नितांत आदर आहे, म्हणूनच…



प्रा. डॉ. गिरीश नाईक
‘संसदेचे पावसाळी अधिवेशन गोंधळानेच समाप्त’ यासारख्या बातम्या वाचून संसदेचा आता आखाडा झाला आहे हे सिद्ध होते. यंदाचे पावसाळी अधिवेशन २१जुलै पासून सुरू झाले, ते फक्त ३७तास चर्चा करून वाहून गेले. अर्थात अशी चर्चा जेव्हा होऊ दिली गेली, तेव्हा अनेक वक्त्यांची चमक दिसली. विशेषत: निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता व बिहारमधील मतदार यादी पडताळणी मोहिमेविरुद्ध आक्रमक विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले होते. सरकारला मात्र विरोधी पक्षांशी संवाद साधून महत्वाची विधेयके साधकबाधक चर्चेनंतरच मंजूर व्हावीत असे अजिबात वाटताना दिसत नाही. कारण संसदीय कार्य मंत्र्यांनीच, विरोधकांना “महत्वाची विधेयके चर्चेविनाच मंजूर करून घेऊ” असे स्पष्ट सुनावले आहे. लगेच संसदेत सुधारित प्राप्तिकर विधेयक तसेच क्रीडा खात्यांशी संबधीत दोन विधेयके कोणत्याही चर्चेविना मंजूरही करून टाकली आहेत.

हे अत्यंत गंभीर आहे. हे करताना “विरोधी पक्ष कधीच सुधारणार नाहीत” . “विरोधक कामकाजात बाधा आणत आहेत. घटनात्मक संस्थांची बदनामी करीत आहेत,” असे गंभीर आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहेत. महत्वाचे म्हणजे एनडीए ज्यावेळी विरोधी पक्षात होता तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी सातत्याने राज्यसभेत आणि लोकसभेत प्रचंड गोंधळ घालून तत्कालीन यूपीए सरकारला कामकाज करू दिले नव्हते आणि ‘सभागृहाचे कामकाज बंद पाडणे हा विरोधी पक्ष म्हणून आमचा हक्क आहे, तर कामकाज सुरळित चालवणे ही सत्ताधाऱ्यांचीच जबाबदारी’ असे समर्थन अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी केले होते. हे दोघे तर भाजपचे दिग्गज नेते होते. आताच्या भाजप मंत्र्यांना आपल्याच नेत्यांनी पूर्वी घातलेल्या गोधळाचे सोयीस्कर विस्मरण झालेले दिसते. मुळातच अनेकदा या सरकारचा कल चर्चेविना विधेयके मंजूर करून घेण्याकडेच दिसून आला आहे. त्यामुळे सरकारचीच संसदीय कामकाजाची शैली राज्यघटनेविरोधांत दिसून येते आहे.

‘लोकशाहीचीही जननी’ असलेल्या देशाचे कामकाज मात्र लोकशाही मूल्यांना आणि परंपरांना धरून होतांना दिसत नाही, हे घटनात्मक संस्थांच्या कोलमडलेपणातून दिसून येते आहे. खरेतर संसदेला ‘लोकशाहीचे मंदिर’ मानले गेले आहे. जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब संसदेच्या कामकाजात उमटावयास हवे. सर्व वर्गाचा आवाज संसदेत उमटला पाहिजे. जनतेने निवडून दिलेले खासदार शेवटी जनतेलाच जबाबदार असतात. वास्तवात विपरीत चित्र दिसून येते आहे. २०१९-२०१४या सतराव्या लोकसभेची कामकाजाची पातळी फक्त ४७ टक्के इतकीच आढळून आली आहे. त्यानंतर कामकाजात सातत्याने आणखीन घसरण दिसून आली आहे. २०२३ सालात लोकसभेची १८ टक्के तर राज्यसभेची २६ टक्के इतकीच उत्पादकता दिसून आली आहे. संसदेत चर्चा फारच कमी झाली आहे. महत्त्वाची ४२ टक्के विधेयके ३०मिनिटाहून कमी कालावधीच्या चर्चेतून मंजूर करण्यात आली आहेत. वादग्रस्त ठरलेले आणि पंतप्रधानांना मागे घ्यावे लागलेले तीन शेतकरी कायदे २०२०मध्ये फक्त सात मिनिटांत मंजूर करण्यात आले होते.

संसदेने अधिक काम करून जनतेचे प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा असते. पण गेल्या दशकभरात वर्षाला सरासरी ७० दिवस इतकेच कामकाज झाले. आणि बहुतेक वेळा तेही गोंधळात वाहून गेले. देश उभारणीच्या सुरुवातीच्या काळात संसदेने १५०दिवस कामकाज केल्याचा उल्लेख आढळतो. ब्रिटिश पार्लमेंट १५०-ते -१७०दिवस आणि अमेरिकन काँग्रेस २६० कामकाज करतात. चर्चेतून कायदे बनवण्यापेक्षा ‘वटहुकूम’ काढून, संसदेत मांडले जाण्याआधीच कायदे अमलात आणण्याच्या प्रकारांत खूपच वाढ झाली आहे. हा तर संसदेचा अपमान आहे. देशाच्या अर्थसंकल्पावरही गंभीर चर्चा होत नाही. ७५टक्के वित्तीय मागण्या चर्चेशिवाय मंजूर झाल्या आहेत. गोंधळामुळे लोकसभेचा ५५ टक्के वेळ वाया गेला तर राजसभेचा ६० टक्के वेळ वाया गेला आहे.

भारतीय संसदेत आता अभ्यासपूर्ण भाषणे फारच तुरळक प्रमाणात दिसून येतात. अमेरिकेत ‘यूएस काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’ तसेच ब्रिटन मध्ये ‘यू के पार्लमेंटरी रिसर्च सर्व्हिस’ चा उपयोग करून सदस्य विधेयके सादर करीत असतात. इथे याचा दुष्काळ आहे. तीन दशकापूर्वी संसदेत चर्चा व्हायच्या त्याला एक दर्जा होता. विरोधी पक्षातील अटल बिहारी वाजपेयी, मधू दंडवते, बॅ .नाथ पै, इंद्रजीत गुप्ता, हरकिशन सिंग सुरजित आदी मंडळी आपल्या मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारच्या धोरणांचे अक्षरशः वाभाडे काढायचे. विशेष म्हणजे सत्ताधारीही ते लक्षपूर्वक कोणताही गोंधळ न घालता ऐकून घेत असत. खुद्द पंतप्रधान महत्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांना आवर्जून हजार असत. गेल्या तीन दशकापासून संसदीय कामकाजाचा दर्जा घसरतच गेला आहे. राजकीय पक्षांनी संसदेला आखाडाच बनवून टाकले आहे. महत्वाची विधेयके चर्चा न करताच मंजूर होण्याचे विक्रमी प्रमाण गेल्या दहा वर्षात सर्वाधिक दिसून आले.

घाईघाईने विधेयके चर्चेविना मंजूर करून घेतल्याने त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने पार्लमेंटची नवीन इमारत बांधली. पण कामकाजाचा दर्जा मात्र घसरतच गेला आहे. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या कामकाजच्या दर्जावर झालेला दिसून येतो आहे, असे संसदीय प्रणालीचा नितांत आदर करणारा एक नागरिक म्हणून मनापासून वाटते.



Source link

खड्डे, नियोजनअभावी नवी मुंबईत कोंडी; ठाणे-बेलापूर मार्ग, मुलुंड ऐरोली रोड मार्गावर कोंडी – Marathi News | Traffic Jam In Navi Mumbai Traffic Jam On Thane Belapur Road Mulund Airoli Road Ssb 93

0
खड्डे, नियोजनअभावी नवी मुंबईत कोंडी; ठाणे-बेलापूर मार्ग, मुलुंड ऐरोली रोड मार्गावर कोंडी – Marathi News | Traffic Jam In Navi Mumbai Traffic Jam On Thane Belapur Road Mulund Airoli Road Ssb 93



खड्डे, नियोजनअभावी नवी मुंबईत कोंडी; ठाणे-बेलापूर मार्ग, मुलुंड ऐरोली रोड मार्गावर कोंडी – Marathi News | Traffic Jam In Navi Mumbai Traffic Jam On Thane Belapur Road Mulund Airoli Road Ssb 93 – Latest Navimumbai News at Loksatta.com





Source link

“ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे निधन”

0
“ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे निधन”

फलटण – फलटण बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ व माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व विधीक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. गावडे यांनी नगराध्यक्षपदासह विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांचे मार्गदर्शन व कार्य नेहमी स्मरणात राहील.

त्यांचा अंत्यविधी मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता गोखळी येथे पार पडणार आहे.

प्रियकरासह लॉजवर गेली विवाहित महिला; सकाळी दरवाजा उघडल्यानंतर कर्मचारी हादरले; तोंडात चक्क…

0
प्रियकरासह लॉजवर गेली विवाहित महिला; सकाळी दरवाजा उघडल्यानंतर कर्मचारी हादरले; तोंडात चक्क…


Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

…Read More





Source link

फलटण शहरातील गणेश भक्तांची एकच मागणी – “गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न नको!”

0
फलटण शहरातील गणेश भक्तांची एकच मागणी – “गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न नको!”

फलटण :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी नगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मुख्याधिकारी निखील मोरे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी रस्ते दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून हजारो भाविक शहरात येणार आहेत. अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नातेपुतेत पैगंबर मोहम्मद साहेबांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ४१५ जणांचा उत्स्फूर्त सहभाग

0
नातेपुतेत पैगंबर मोहम्मद साहेबांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ४१५ जणांचा उत्स्फूर्त सहभाग

नातेपुते :संपूर्ण जगाला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त नातेपुते शहरातील शाही मस्जिद येथे समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले.

यंदाचा ईद-ए-मिलाद कार्यक्रम युवक वर्गाच्या जबाबदारीत असल्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” ही संकल्पना मनाशी बाळगून ज्येष्ठ, युवक व महिला अशा सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला. सायंकाळपर्यंत तब्बल ४१५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

सर्वधर्मीय समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविधतेत एकतेचे प्रतीक घडवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी मोठी मेहनत घेतली. शाही मस्जिदचे धर्मगुरू आलिम मेराज शम्सी साहेब (किब्ला) यांनी रक्तदाते व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

वाळवंटात दिसणार बर्फ; सौदी अरेबियाचा आगळावेगळा प्रकल्प काय आहे? त्यासमोरील आव्हाने कोणती? – Marathi News | Is Saudi Arabias Plan To Build Desert Ski Resort Proving Too Daunting Rac 97

0
वाळवंटात दिसणार बर्फ; सौदी अरेबियाचा आगळावेगळा प्रकल्प काय आहे? त्यासमोरील आव्हाने कोणती? – Marathi News | Is Saudi Arabias Plan To Build Desert Ski Resort Proving Too Daunting Rac 97



वाळवंटात दिसणार बर्फ; सौदी अरेबियाचा आगळावेगळा प्रकल्प काय आहे? त्यासमोरील आव्हाने कोणती? – Marathi News | Is Saudi Arabias Plan To Build Desert Ski Resort Proving Too Daunting Rac 97 – Latest Explained News at Loksatta.com





Source link

शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार : अजित पवार

0


Ajit Pawar : आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणपासून  बाजूला गेलो नाही, आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितलं होतं, त्याबाबत आम्ही ठाम असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. एखादा निर्णय कर्जमाफीचा बाबत घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत. यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे असे अजित पवार म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते. 

शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधीच म्हणलेलो नाही. योग्य वेळ आल्यावर नेमलेली कमिटी त्यासंदर्भातील माहिती देईल यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार आहोत असे मतअजित पवार यांनी व्यक्त केले. 

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपती दर्शनाचं निमंत्रण दिलं आहे याबाबत अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले. एका भावाने एका भावाला फोन करून गणपतीला बोलावलं मी कसं बघतो मी तसं बघतो. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरी गणेशोत्सवाला जाणार आहे काय बघतो कसं बघतो असं बघतो की कसं बघतो असे मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. पेटा या संस्थेने केलेल्या कबुतरांच्या समर्थनार्थ केलेल्या जाहिरात बाजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोण काय म्हणतं यापेक्षा कायद्याने संविधानाने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. जर आपलं काही वेगळं मत असेल तर ते न्यायालयासमोर मांडावं. सर्वोच्च न्यायालय त्याबाबतचा निर्णय देईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचा निर्णय दिलेला आहे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे.

चांद्यापासून बांध्यापर्यंत आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करुयात

चांद्यापासून बांध्यापर्यंत आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करुयात असे अजित पवार म्हणाले. 27 तारखेला गणरायांच आपल्याला स्वागत करायचं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर या जिल्ह्याने प्रेम केले आहे. आदरणीय पवार साहेबांना मनापासून साथ या जिल्ह्यानं दिली आहे. आपण आपल्या लोकांना AI सारखं नवीन तंत्रज्ञान सांगितलं पाहिजे असे अजित पवार म्हणआले.  उगीच एकमेकांची उणी धुनी काढत बसण्यापेक्षा अशा क्षेत्रात लक्ष दिलं पाहिजे. साहेब जरी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असले तरी चेअरमन चंद्रकांत दळवी यांना केले आहे. यात 4 लाख मुलं शिक्षण घेत असल्याचे अजित पवार म्हणाले. 

निवडणुकीत अपयश आल्यावर आता विरोधक रडीचा डाव खेळत आहेत

दिन का भूक शाम की घर आये तो उसे भूल नही कहते अनिल देसाई पुन्हा घरी आलेत असे अजित पवार म्हणाले. निवडणूक डिसेंबरपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येकाने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे अजित पवार महणाले. कोणत्याही परिस्थितीत एकट वाटून देऊ नका, पक्ष तुमच्या सोबत आहे. निवडणुकीत अपयश आल्यावर आता विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. माणवासीयांच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

आणखी वाचा



Source link

उंबरमाळीतील नागरीकांच्या नशिबी मृत्यूनंतरही हेळसांड! ओढे – नाले परत करत जंगलातून न्यावे लागतात मृतदेह – Marathi News | Citizens Of Umbarmali Have To Carry Bodies Through The Forest And Water Streams Ssb 93

0
उंबरमाळीतील नागरीकांच्या नशिबी मृत्यूनंतरही हेळसांड! ओढे – नाले परत करत जंगलातून न्यावे लागतात मृतदेह – Marathi News | Citizens Of Umbarmali Have To Carry Bodies Through The Forest And Water Streams Ssb 93



उंबरमाळीतील नागरीकांच्या नशिबी मृत्यूनंतरही हेळसांड! ओढे – नाले परत करत जंगलातून न्यावे लागतात मृतदेह – Marathi News | Citizens Of Umbarmali Have To Carry Bodies Through The Forest And Water Streams Ssb 93 – Latest Thane News at Loksatta.com





Source link