[ad_1]
नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ येथे ध्यानधारणा करणार आहे. यावर कॉंग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे.
कन्याकुमारी : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये सुरु आहे. येत्या 1 जून रोजी मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडणार आहे. येत्या 4 जून रोजी देशामध्ये लोकसभेचा निकाल लागणार आहे. यावर्षीची लोकसभा निवडणूक जोरदार रंगली असून एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडीने लढत झाली आहे. त्यामुळे कोणाला बहुमत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचाराचा शेवट ध्यान करुन होणार आहे. येत्या 30 मे रोजी नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ या स्मारक स्थळाला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहे. याबाबत भाजप नेत्यांनी अधिकची माहिती दिली आहे.
एक दिवस ध्यानमग्न अवस्थेत
[ad_2]
Source link


