Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPakistan Rain | दुबईनंतर आता पाकिस्तानातही मुसळधार पाऊस, 87 जणांचा मृत्यू; गावापासून...

Pakistan Rain | दुबईनंतर आता पाकिस्तानातही मुसळधार पाऊस, 87 जणांचा मृत्यू; गावापासून शहरापर्यंत साचलं पाणी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Pakistan Rain | दुबईनंतर आता पाकिस्तानातही मुसळधार पाऊस, 87 जणांचा मृत्यू; गावापासून शहरापर्यंत साचलं पाणी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

दुबईनंतर आता पाकिस्तानातही मुसळधार पाऊस, 87 जणांचा मृत्यू; गावापासून शहरापर्यंत साचलं पाणी!

पाकिस्तानात वादळ आणि पावसामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाल्याने 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील अनेक गावे आणि अनेक भागात पाणी साचल्याने नागरिक चिंतेत आहेत.

दुबईनंतर आता पाकिस्तानातही पावसानं कहर (Pakistan Rain) केला आहे. पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गावांपासून शहरांपर्यंत अनेक भागात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गावापासून शहरापर्यंतच्या भागात पाणी साचल्याने दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून बचावकार्य सुरू आहे. सध्या देशातील काही भागात सततच्या पावसामुळे लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

पावसामुळे अडीच हजारांहून अधिक घरांची पडझड

पावसामुळे पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे घरांची पडझड झाली आहे. NDMA नुसार, देशभरात 2700 हून अधिक घरे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. पावसामुळे अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सध्या त्या लोकांना सरकारने शेल्टर होममध्ये ठेवले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments