Monday, October 12, 2026
Homeफलटणभाजपला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची जाहीर घोषणा!

भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची जाहीर घोषणा!

जनहिताच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने स्वतंत्र सामाजिक व राजकीय वाटचाल कायम ठेवण्याचा ठाम निर्णय

साहस Times : आज आयोजित पत्रकार परिषदेद्वारे मी जाहीरपणे घोषित करते की, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला (भाजप) दिलेला माझा राजकीय पाठिंबा मी मागे घेत आहे. यापुढे भाजपशी माझा कोणताही राजकीय संबंध राहणार नाही.
मी भाजपची अधिकृत सभासद नसून, पक्षात माझा कोणताही अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी भाजपला जो पाठिंबा दिला होता, तो आता पूर्णपणे मागे घेत असल्याचे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टपणे जाहीर करते.
माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे सर्व बंधू-भगिनी, मित्र-मैत्रिणी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, माता -भगिनी आणि तमाम वडीलधाऱ्या नागरिकांना मी माझी भूमिका स्पष्ट करू इच्छिते.
भाजपला पाठिंबा देण्यामागे माझा उद्देश सत्तेचे समर्थन करणे हा कधीच नव्हता. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, महिलांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, या जनहिताच्या अपेक्षेतून मी भाजपला पाठिंबा दिला होता.
मात्र, या अपेक्षांची अपेक्षित पूर्तता होताना मला दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने, भाजपला दिलेला पाठिंबा पुढे सुरू ठेवणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच, जनहिताला प्राधान्य देत मी हा पाठिंबा मागे घेण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
माझ्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जनतेचा विश्वास, सामान्य माणसाचे प्रश्न आणि समाजहित अधिक महत्त्वाचे आहे. माझे सामाजिक व राजकीय कार्य हे कोणत्याही पक्षाच्या किंवा सत्तेच्या चौकटीपुरते मर्यादित नसून, ते सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित आहे.
यापुढेही मी माझे स्वतंत्र / अपक्ष सामाजिक आणि राजकीय कार्य पूर्वीप्रमाणेच अविरतपणे सुरू ठेवणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे, महिला, विद्यार्थी, युवक आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणे, हेच माझ्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहील.
माझ्या या निर्णयाकडे कोणत्याही राजकीय आकसातून घेतलेली भूमिका म्हणून न पाहता, जनहिताच्या अपेक्षा आणि माझ्या सामाजिक बांधिलकीतून घेतलेला निर्णय म्हणून पाहावे, ही नम्र विनंती.
आजवर आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, जे प्रेम दिले आणि माझ्या सामाजिक व राजकीय कार्याला जे सहकार्य केले, त्याबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. यापुढील माझ्या स्वतंत्र वाटचालीतही आपले प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेच कायम राहील, अशी मला खात्री आहे.
मतदार व समर्थकांना आवाहन
सध्या सुरू असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट करू इच्छिते की, भाजपशी माझा यापुढे कोणताही राजकीय संबंध किंवा पाठिंबा राहणार नाही.
त्यामुळे माझ्या सर्व मतदारांना, पदवीधर मतदारांना, समर्थकांना आणि हितचिंतकांना माझे नम्र आवाहन आहे की, माझा भाजपला असलेला पाठिंबा संपुष्टात आला आहे, याची नोंद घ्यावी. कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता, उमेदवाराची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहिताची भूमिका विचारात घेऊन आपल्या विवेकानुसार योग्य उमेदवाराला आपले अनमोल मत द्यावे.
माझी राजकीय वाटचाल ही सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कांसाठी आहे. माझी बांधिलकी कोणत्याही पक्षाशी नसून ती सर्वसामान्य जनता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाशी आहे.
जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आणि जनसेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जनसेवेची वाटचाल यापुढेही अविरत सुरू राहील, हा मला विश्वास आहे.
धन्यवाद!
आपली विश्वासू,
ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात
स्वतंत्र सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments