Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशOdisha Boat Capsized | ओडिशाच्या 50 जणांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली,...

Odisha Boat Capsized | ओडिशाच्या 50 जणांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Odisha Boat Capsized | ओडिशाच्या 50 जणांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

झारसुगुडाच्या लखनपूर ब्लॉक अंतर्गत शारदाजवळ महानदीमध्ये ही घटना घडली. लहान मुले आणि महिलांना घेऊन जाणारी एक बोट उलटली.

2-3 दिवसापुर्वी ओडीशात प्रवाशांनी भरलेली बस ओव्हरब्रिजवरून रस्त्यावर पडली होती. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आता पुन्हा ओडिशामधे एक दुर्घटना घडली आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे महानदीत बोट उलटून (Odisha Boat Capsized) 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीत 50 लोक होते. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छिमारांनी 40 हून अधिक लोकांना वाचवले.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील झारसुगुडा येथे शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. महिला आणि मुलांसह सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट महानदीत उलटली. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह सापडले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments