Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशKARNATAKA | कर्नाटक काँग्रेस नेत्याच्या मुलीची निघृण हत्या, नाकारल्यामुळे मित्राने केली...

KARNATAKA | कर्नाटक काँग्रेस नेत्याच्या मुलीची निघृण हत्या, नाकारल्यामुळे मित्राने केली कॅम्पसमध्ये हत्या | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कर्नाटक काँग्रेस नेत्याच्या मुलीची निघृण हत्या, नाकारल्यामुळे मित्राने केली कॅम्पसमध्ये हत्या

फयाज आणि नेहा दोघेही बीसीएच्या अभ्यासादरम्यान वर्गमित्र आणि मित्र होते. मात्र, त्यांच्या मैत्रीला कॉलेज व्यवस्थापन आणि नेहाच्या पालकांचा विरोध झाला.

कर्नाटक : एखादा व्यक्ती कोणत्या स्तरावर जाऊन व्यक्तीची हत्या करत असेल याचा काही अंदाज लावू शकत नाही. अंगावर शहारे येणारी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकातील हुबली येथील केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये एक विद्यार्थिनी शिकत होती. पीडित महिला नेहा हिरेमठ ही मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (एमसीए) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही संतापजनक घटनेचे फुटेज सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.

एमसीएच्या पहिल्या सत्राची परीक्षा संपवून ती परतत असताना दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. फयाज हा बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी तालुक्यात राहणारा आहे . रिपोर्ट्सनुसार, फयाज आणि नेहा दोघेही बीसीएच्या अभ्यासादरम्यान वर्गमित्र आणि मित्र होते. मात्र, त्यांच्या मैत्रीला कॉलेज व्यवस्थापन आणि नेहाच्या पालकांचा विरोध झाला. नंतर नेहाने फयाजपासून दूर राहण्यास सुरुवात केली. या ताणलेल्या नात्यातून हा वार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे नेहाच्या पालकांनी तिला कॉलेजमध्ये येण्यासही मनाई केली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments