
दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) आणि सारिका दिलीप लेंडे (वय, ४०) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर, लावण्या लेंडे असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या ही आजारी असल्यामुळे दिलीप आणि सारिका तिला दवाखान्यात घेऊन जात होते. परंतु, जमाळ्याजवळून जाताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी जवळपास ७०० मीटरपर्यंत फरफटत गेली. या घटनेत दिलीप आणि सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर, लावण्या गंभीर जखमी झाली. स्थानिक लोकांनी लावण्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले.



