Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशPakistan Buddha Temple | पाकिस्तानची लागली लॅाटरी, उत्खननात सापडला गूढ खजिना; 2000...

Pakistan Buddha Temple | पाकिस्तानची लागली लॅाटरी, उत्खननात सापडला गूढ खजिना; 2000 वर्षे जुना असल्याचा अंदाज! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पाकिस्तानची लागली लॅाटरी, उत्खननात सापडला गूढ खजिना; 2000 वर्षे जुना असल्याचा अंदाज!

पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. तिथल्या एका बौद्ध मंदिरात एक रहस्यमय खजिना सापडला आहे. हा खजिना पाहून पुरातत्व शास्त्रज्ञांचेही डोळे पाणावले.

पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेकवेळा अशी गुपिते उघडकीस येतात, जी जाणून लोक हैराण होतात. कधी उत्खननादरम्यान काही जुन्या वस्तू निघतात तर कधी खजाना हाती लागतो. असाच काहीसा प्रकार आता पाकिस्तानमधून उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. तिथल्या एका बौद्ध मंदिरात एक रहस्यमय खजिना सापडला (Treasure found in Pakistan Buddha Temple) आहे. हा खजिना पाहून पुरातत्व शास्त्रज्ञांचेही डोळे विस्फारले आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वी हा खजिना जुना असल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

2000 वर्षे जुना असल्याचा अंदाज

लाइव्ह सायन्सने पाकिस्तानमध्ये सापडलेल्या दुर्मिळ खजिन्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हे दक्षिण-पूर्व पाकिस्तानमधील मोहेंजोदारोच्या विस्तीर्ण अवशेषांमध्ये स्थित असल्याचे मानले जाते. ही इमारत इ.स.पूर्व 2600 च्या आसपासची असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या या दुर्मिळ खजिन्याबद्दल अनेक दावे केले जात आहेत. या खजिन्याबद्दल पाकिस्तानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मोहेंजोदारोच्या पतनानंतर सुमारे 1600 वर्षांचा हा खजिना आहे. पूर्वी येथे इमारती होत्या आणि अवशेष तयार झाल्यानंतर बौद्ध स्तूपांची स्थापना झाली. पुरातत्व शास्त्रज्ञांची संपूर्ण टीम आता हा खजिना हाताळत असून पुढील उत्खननाचे कामही सुरू आहे. येथे स्थापन झालेल्या बौद्ध स्तूपांमध्ये आणखी खजिना सापडू शकतो, असे मानले जाते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments