Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशHistory: 54 वर्षांपूर्वी 93000 सैनिकांसह पूर्ण पाकिस्तान भारताने ताब्यात घेतला असता पण......

History: 54 वर्षांपूर्वी 93000 सैनिकांसह पूर्ण पाकिस्तान भारताने ताब्यात घेतला असता पण… एका रात्रीत इतिहास, भूगोल बदलला

[ad_1]

1971 India Pakistan War Story:  जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या जहशवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही कठोर निर्णय घेतले असून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील झाल्याचे दिसत आहे. भारत पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे. अशातच चर्चेत आले आहे भारत पाकिस्तानचे युद्ध.  पाकिस्तानच्या 93000 सैनिकांचे आत्मसमर्पण केले केले होते. एका रात्रीत भारताने पाकिस्तानचा इतिहास, भूगोल बदलला होता. 

1971 चे युद्ध इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या युद्धामुळे भारतीय उपखंडाचा भूगोल आणि राजकीय रचनेमध्ये मोठा बदल झाला. भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तान (सध्या बांगलादेश) एक वेगळा देश बनला. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या 11 हवाई तळांवर हल्ला केला, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. 

पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशला स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला आणि युद्धात उडी घेतली. याआधी, पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये खूप कहर केला होता आणि बंगालींवर अनेक अत्याचार केले होते. पण, पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारतावर हल्ला करून मोठी चूक केली.  त्यानंतर 16 डिसेंबर 1971 पर्यंत चाललेल्या युद्धात पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करावी लागली. यानंतर, पाकिस्तानचे विभाजन झाले आणि पूर्व पाकिस्तानमधून बांगलादेशचा जन्म झाला.

1974 मध्ये, भारतापासून वेगळे झाल्यानंतर पश्चिम पाकिस्तान आजचा पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान आजचा बांगलादेश यांची निर्मिती झाली.  परंतु दोघांमध्ये खोलवर सांस्कृतिक, भाषिक आणि आर्थिक फरक होते. 1970 मध्ये झालेल्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानचे नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाला बहुमत मिळाले, परंतु हे पश्चिम पाकिस्तानला मान्य नव्हते. पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय सत्तेमुळे मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान होण्यापासून रोखले गेले.  यानंतर, पाकिस्तानी सैन्याने मार्च 1971 मध्ये ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरू केले आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अत्याचार सुरू केले. पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये कहर केला, ज्यामध्ये लाखो लोक मारले गेले आणि लाखो लोक निर्वासित म्हणून भारतात आले.

जेव्हा पूर्व पाकिस्तानातील लाखो लोक विस्थापित झाले आणि भारतात निर्वासित झाले, तेव्हा भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनांनाही मान्यता दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजनैतिक माध्यमातून जागतिक पाठिंबा मिळवला. तरीही पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार थांबले नाहीत. यानंतर, बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीला भारताने दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारतीय हवाई दलाच्या अनेक तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारताने याला युद्धाची औपचारिक सुरुवात मानली आणि प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली.

भारतीय सैन्याने हे युद्ध तीन आघाड्यांवर (पश्चिम, पूर्व आणि उत्तर) लढले, परंतु मुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर होते. भारतीय सैन्याने बांगलादेश लिबरेशन आर्मी मुक्ती वाहिनीसोबत एक ऑपरेशन सुरू केले. 16 डिसेंबर 1971 पर्यंत ढाका ताब्यात घेतला. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. पाकिस्तानी सैन्याचे जनरल एए के नियाझी यांना 93000 सैनिकांसह भारतीय जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण करावे लागले.  हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे लष्करी आत्मसमर्पण मानले जाते. युद्धानंतर, पाकिस्तानचे दोन भाग झाले (पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान), ज्यामुळे एक नवीन देश उदयास आला आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments