Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूच्या हत्येचा कटात भारतीयाला अटक; अमेरिकेचा दावा

0
16
Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूच्या हत्येचा कटात भारतीयाला अटक; अमेरिकेचा दावा


Khalistani Separatist Pannun: खलिस्तानी नेता आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्या जात असल्याचा आरोप अमेरिकेने भारतावर केला होता. तसेच या प्रकरणी भारतीय गुप्तपचर यंत्रणांना अमेरिकेच्या सीआयएने ताकीद दिल्याचे देखील वृत्त होते. दरम्यान, आता पन्नूच्या हत्तेचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीयाला अटक करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या अॅटर्नी कार्यालयाने बुधवारी या संदर्भात माहिती दिली. निखिल गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव असून त्याने पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. गुप्ताला चेक रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी जूनमध्ये अटक केली होती. निखिल गुप्ताला हे काम भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याने करण्यास सांगितले होते, असा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. निखिलवर सुपारी घेऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हा कट भारतातूनच रचण्यात आल्याचे अमेरिकन वकिलांचे म्हणणे आहे.



Source link