Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशEPFO: 10 वर्षांच्या नोकरीनंतर आपण पेन्शनसाठी पात्र ठरतो का? 99 टक्के कर्मचाऱ्यांना...

EPFO: 10 वर्षांच्या नोकरीनंतर आपण पेन्शनसाठी पात्र ठरतो का? 99 टक्के कर्मचाऱ्यांना माहित नाही हा नियम, दर महिन्याला…

EPFO: 10 वर्षांच्या नोकरीनंतर आपण पेन्शनसाठी पात्र ठरतो का? 99 टक्के कर्मचाऱ्यांना माहित नाही हा नियम, दर महिन्याला…

[ad_1]

EPFO Rules about pension: पगारदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही केवळ बचत योजना नसून भविष्य सुरक्षित करण्याचा एक पर्याय आहे. दरमहा तुमच्या पगारातून थोडीशी रक्कम कापली जाते आणि तुमच्या कंपनीकडून समान भाग या निधीमध्ये जमा केला जातो. बहुतेक लोक पीएफला एकरकमी रक्कम मानतात जी गरज पडल्यास काढता येते. परंतु या योगदानाचा आणखी एक आणि कदाचित त्याहूनही महत्त्वाचा भाग कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो.

Add Zee News as a Preferred Source

EPS म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला निश्चित मासिक पेन्शनची हमी. परंतु सध्याच्या काळात लोक सतत नोकरी बदल असतात. अनेकदा, 10 ते 12 वर्षं काम केल्यानंतर, ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव नोकरी सोडतात. यावेळी सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे त्या 10-12 वर्षांत पेन्शन फंडात जमा झालेल्या पैशाचं काय होणाप? ते वाया जाणार की तुम्हाला त्याचा फायदा होणार?

काय आहे EPFO चा नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) नियम या बाबतीत अगदी स्पष्ट आहेत. तुमची मासिक पेन्शन पात्रता किमान 10 वर्षांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते. जर तुमची एकूण सेवा (एक किंवा अधिक कंपन्यांसह) 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला मासिक पेन्शन मिळणार नाही. तथापि, एकदा तुम्ही 10 वर्षांचा टप्पा ओलांडला की, तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरता.

समजा तुम्ही 11 वर्षं काम केलं आणि नंतर नोकरी सोडली तर ईपीएफओच्या नियमांनुसार, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात. तुमच्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळातील सेवेमुळे तुमचं पेन्शन ‘लॉक’ झालं आहे. याचा अर्थ असा नाही की 11 वर्षांनंतर नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला लगेच पेन्शन मिळू लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा हक्क सुरक्षित केला आहे.

नियमांनुसार, किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, तुम्ही 58 वर्षांचे झाल्यावर तुमच्या मासिक पेन्शनसाठी अर्ज करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी नोकरी सोडली तरीही, तुम्हाला तुमची पेन्शन 58 वर्षं पूर्ण केल्यानंतरच मिळेल. 

हे पैसे वितरित कसे केले जातात?

नियमांनुसार, कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12 टक्के ईपीएफ फंडात योगदान देतो. त्यानंतर तुमची कंपनी समान रकमेचं योगदान देते. हे पैसे दोन भागांमध्ये विभागले जातात. या योगदानापैकी 8.33 टक्के तुमच्या कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जातात. उर्वरित 3.67 टक्के तुमच्या मुख्य ईपीएफ खात्यात जमा केले जातात.

ईपीएफचा भाग हा तुमचा प्राथमिक बचत आहे, जो तुम्ही घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसारख्या गरजांसाठी नियमांनुसार काढू शकता. तथापि, ईपीएसमध्ये 8.33 टक्के योगदान निवृत्तीनंतर तुमच्या मासिक पेन्शनसाठी पूर्णपणे राखीव आहे. 10 वर्षांची नोकरी नियम या ईपीएस फंडाला लागू होतो.

तुमचे मासिक पेन्शन कसे ठरवले जाते?

जर तुम्ही 10 वर्षांच्या सेवेनंतर 58 व्या वर्षी पेन्शनसाठी अर्ज केला तर तुम्हाला दरमहा किती रक्कम मिळेल? यासाठी EPFO ​​एक निश्चित सूत्र वापरते.

मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र पगार × पेन्शनपात्र सेवा) / ७०

पेन्शनपात्र सेवा: ही तुमच्या EPS खात्यात योगदान दिलेल्या एकूण वर्षांची संख्या आहे (उदा., 10 वर्षं, 15 वर्षे किंवा 20 वर्षे).

पेन्शनपात्र पगार: हा तुमचा अंतिम पगार नाही. हे तुमच्या गेल्या 60 महिन्यांच्या (म्हणजे 5 वर्षे) सेवेच्या सरासरी पगारावरून ठरवले जाते. तथापि, या पगारावर कमाल मर्यादा आहे, जी सध्या दरमहा 15 हजार रुपये आहे.

उदाहरण द्यायचं झाल्यास समजा तुमची ‘पेन्शनपात्र सेवा’ 10 वर्षं आहे आणि तुमचा ‘पेन्शनपात्र पगार’ (गेल्या 60 महिन्यांचा सरासरी) 15 हजार आहे.

मग तुमचे पेन्शन असे असेल: (15000× 10) / 70= 1,50,000/ 70 = 2143 रुपये (अंदाजे).

याचा अर्थ असा की तुमच्या 10 वर्षांच्या सेवेवर आधारित, तुम्हाला वयाच्या 58 व्या वर्षी 2143 रुपये मासिक पेन्शन मिळेल. जर तुम्ही हीच सेवा 25 वर्षे केली असती, तर तुमचे पेन्शन (15,000 x 25) / 70= 5357 रुपये प्रति महिना झाले असते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments