Thursday, August 13, 2026
Homeसातारामुधोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा; भारतीय संविधानाचा जागतिक स्तरावरील महत्त्वाचा ठसा अधोरेखित

मुधोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा; भारतीय संविधानाचा जागतिक स्तरावरील महत्त्वाचा ठसा अधोरेखित


फलटण  – स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे भारताने प्रगतीचा मार्ग अवलंबला आहे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल टिके होते. यावेळी प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. सौ. प्रियांका शिंदे, तसेच ऍड. प्रा. डॉ. अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, त्याला अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मान्यता दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध धर्म, जात, वंश आणि संप्रदायांना एका सूत्रात बांधून प्रगतीचा मार्ग दाखवला. हावर्ड विद्यापीठाने त्यांना “मानव मुक्तीचा सर्वोच्च योद्धा” म्हणून गौरवले आहे.

संविधान सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा अधिष्ठान देऊन भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. भारतीय संविधानाचा प्रत्येक नागरिकाने अभ्यास करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि संयोजन प्रा. अक्षय अहिवळे यांनी केले, तर उद्दिष्ट पत्रिकेचे वाचन एनएसएस कार्यक्रमाधिकारी ऍड. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत मोरे यांनी केले, आणि आभार प्रमोद पिचड यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments