Sunday, September 13, 2026
Homeसातारागळ्यातील चैन गहाण ठेवत मदतीचा हात; बौद्ध समाजासाठी नगरसेवकांचा पुढाकार!

गळ्यातील चैन गहाण ठेवत मदतीचा हात; बौद्ध समाजासाठी नगरसेवकांचा पुढाकार!

फलटण :- फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी संविधान समर्थन समितीने उमेदवार म्हणून प्रा. रमेश आढाव यांची घोषणा केली आहे. गेल्या चार महिन्यांत समितीच्या सदस्यांनी स्वखर्चाने तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रचार दौरे केले, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अपार मेहनत घेतली. मात्र, प्रचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्याने काही समाजहितचिंतकांनी पुढाकार घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांनी प्रा. रमेश आढाव यांना प्रचारासाठी १.५ लाख रुपयांची मदत केली. या रकमेची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची चैन गहाण ठेवली. इतकेच नव्हे, तर त्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात सहभागी न होण्याची आणि संविधान समर्थन समितीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणाही केली.

सोमवार पेठ येथील युवा उद्योजक संजय गायकवाड (महाराज) यांनीही ५०,००० रुपयांची मदत करत आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. या दोघांच्या योगदानाबद्दल संविधान समर्थन समिती व बौद्ध समाजाने त्यांचे आभार मानले आहेत.

संविधान समर्थन समितीने समाजातील दानशूर व्यक्तींनाही प्रचारासाठी आर्थिक मदत किंवा साहित्य स्वरूपात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. प्रा. रमेश आढाव हे आर्थिकदृष्ट्या इतर उमेदवारांसारखे सक्षम नसले तरी तालुक्याच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व पुरवण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे.

“आज दिलेले समर्थन हे उद्या तुमच्या हक्कांसाठी आधारस्तंभ ठरेल. आढाव सरांवर विश्वास ठेवा आणि मतदारसंघाच्या भविष्याला आकार द्या!”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments