Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशBreaking | दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू |...

Breaking | दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Breaking | दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू

Delhi New Born Baby Care Hospital Fire: दिल्लीतील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या भीषण अपघातात 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील बॉयलर स्फोटक प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील विवेक विहारमध्ये नवजात बालकांच्या तीन मजली खासगी रुग्णालयात शनिवारी (25 मे 2024) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण अपघातात 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 5 नवजात बालके अजूनही जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. आग एवढी भीषण होती की, हॉस्पिटलच्या आजूबाजूची दुकाने आणि इमारतींना आग लागली.

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) कडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एकूण 12 नवजात बालकांना वाचविण्यात यश आले. यापैकी 7 गंभीर भाजलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर इतर 5 नवजात अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments