Friday, October 2, 2026
Homeफलटणगजानन चौकात गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

गजानन चौकात गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

गांधी जयंतीनिमित्त फलटण काँग्रेसकडून महात्मा गांधींना अभिवादन

फलटण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गजानन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. श्री. सचिन भैय्या सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.

यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, सिकंदर डांगे, अशोकराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमास मनोहर गायकवाड, ताजुद्दीन बागवान, बालमुकुंद भट्टड, बालमभाई शेख, लक्ष्मण तात्या शिंदे, अल्ताफ पठाण, अजय इंगळे, विकास ननावरे, मंजेखान मेटकरी, नितीन जाधव, धनंजय गोरे, अमोल नलवडे, प्रमोद शहा, पोपट शिंदे, संतोष बाचल, हारून इनामदार, मनमोहन बरसावडे, भारत अहिवळे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याची गरज यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. बदलत्या सामाजिक परिस्थितीत गांधीजींच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात शांतता, बंधुभाव आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.

गांधी जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments