Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने खून: वादातून उडाली शहरात खळबळ

बारामती महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने खून: वादातून उडाली शहरात खळबळ

बारामती: तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याने सोमवारी (३० सप्टेंबर) शहरात खळबळ उडाली. हा दुर्दैवी प्रकार सकाळी घडला. खून कोयत्याने वार करुन करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ महाविद्यालय परिसर सील करून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. जखमी विद्यार्थ्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासानुसार, एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मिळून हा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून फरार आरोपीसाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही घटना दुचाकीच्या किरकोळ वादातून गंभीर रुप धारण केली आहे. शहरात सुरक्षा वाढवून तणावग्रस्त स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments