Saturday, September 12, 2026
Homeसातारालाईट गेली… अन् संताप उसळला ; महावितरणचा अजब कारभार

लाईट गेली… अन् संताप उसळला ; महावितरणचा अजब कारभार

फलटण साहस Times :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच फक्त सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती नव्हे, तर महावितरणच्या अजब कारभारामुळे मंगळवार पेठ, फलटण येथील नागरिकांना चक्क अंधारात बसावे लागले. आज सध्यांकाळी २ ते २.३० तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संपूर्ण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन चालू असताना . काही ठिकाणी ध्वनी-प्रक्षेपणाची तयारी, सुरू असताना. अशा वेळी अचानक वीज गायब झाल्याने सर्वच कार्यक्रम ठप्प झाले.

स्थानीय नागरिकांनी महावितरण कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, सोशल मीडियावरही नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरणला जाब विचारला.

“प्रत्येक वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी असेच होणार का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. यावर महावितरणने तात्काळ खुलासा करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments